आपलं कोण?

जालीय फेरफटका मारत असताना सद्य लेख आणि चर्चा, गेल्या काही दिवसांत केलेल्या चर्चा, काही वर्षांपूर्वी केलेल्या चर्चा आणि खरडवह्या उत्खननातून आम्हाला काही मूलभूत प्रश्न पडले आहेत.

अ) शासनाच्या पदरी नमूद नसली तरी हिंदी राष्ट्रभाषा का नाही?
ब) इंग्लीशला अजून किती काळ परकीय भाषा मानायचे?
क) अकबर भारतीय होता का परकीय?
ड) औरंगजेब भारतीय होता का परकीय?
इ) युरोपातले रोमानी आपले की परकीय?

आमच्या प्रश्नांची उत्तरे आपल्याकडे असावीत असा विश्वास वाटतो.

-राजीव.

लेखनविषय: दुवे:

Comments

आम्ही कोण?

हे आपण कोण? याचे उत्तर 'भारतीय' असे गृहीत धरतो. तुम्ही देवनागरी मराठी लिहिले असले तरी 'आपण' म्हणजे 'मराठी' अपेक्षित नव्हे हे तुमच्या अबकडइ वरून दिसते. अन्यथा तुम्ही कखगघङ किंवा अआइईउ वापरले असते. 'भारतीय' असे गृहीत धरण्यातही अडचणी आहेतच की येथील सदस्य परदेशी नागरिक असू शकतात. भेंडीबाजारात पाकिस्तानी संघासाठी फटाके फोडले गेले म्हणून पोटशूळ उठणार्‍यांनी K3G मध्ये भारतीय राष्ट्रगीत गाणार्‍या ब्रिटिश मुलाला बघून भारावू नये.
भारत म्हणजे २६-०१-१९५० + १९-१२-१९६१ (+ नंतर काही प्रदेश घेतले असतील तर माहिती नाही) असेही गृहीत धरतो.

माझी उत्तरे:
प्रादेशिक (प्रामुख्याने दाक्षिणात्य) अस्मिता
माहिती नाही
गैरलागू
गैरलागू
परकीय

मजकूर संपादित. चर्चेशी संबंधित नसणार्‍या वैयक्तिक मजकूरासाठी खरडवही किंवा व्य. नि. सुविधेचा वापर करावा.

तुमची उत्तरेही सांगा

तुमचे पत्ते दाबून ठेवून आम्हाला षो करायला सांगता काय?


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

हा हा हा

त्यांच्याकडे पत्तेच नाहीत.

त्यांना बहुतेक असे वाटत आहे कि ह्या प्रश्नांवर लोक वाद घालतील व त्यांचा जात नसणारा वेळ ते प्रतिसाद वाचण्यात जाईल. (मी कदाचित त्यांची इच्छा पूर्ण करतोय :)).

पत्ते

पत्ते असते तर तुम्हाला कशाला विचारतो. करा की षो? का तुमचा षो पोटफोड्या असल्याने पोटातले बाहेर येईल ही भीती हाये?

-राजीव.

हा श्यो चालेल ?

चर्चा करताना आपली मते मांडून चर्चा करतात, आणि अश्या प्रश्नांची १+१=२ उत्तरे नसतात, मग दुसऱ्यांना चर्चेसाठी आपण खतपाणी पुरवत आहात आसे वाटते, पण ते खतपाणी पण थोडे मुद्देसूद आणि थोडे detail असावे.

मुलभूत की चुकीचे प्रश्न

अ) शासनाच्या पदरी नमूद नसली तरी हिंदी राष्ट्रभाषा का नाही?

कोणत्या शासनाच्या? माझ्यामाहितीतल्या कोणत्याही देशाच्या शासनाच्या पदरी हिंदी राष्ट्रभाषा नाहि

ब) इंग्लीशला अजून किती काळ परकीय भाषा मानायचे?

कोणी?

क) अकबर भारतीय होता का परकीय?

कोणाच्या दृष्टीने? (म्हणजे त्याच्याकाळी भारत हा देशच नव्हता)

ड) औरंगजेब भारतीय होता का परकीय?

कोणाच्या दृष्टीने?(म्हणजे त्याच्याकाळी भारत हा देशच नव्हता)

इ) युरोपातले रोमानी आपले की परकीय?

आपले म्हणजे तुम्ही कोण आहत यावर उत्तरे अवलंबून आहेत

प्रश्नांना मुलभूत म्हटले असते तरी इतके संदिग्ध प्रश्न का विचारले आहेत हे कळलेच नाहि.
तुमच्याकडे उत्तरे नसतील हे कबूल केले तरी प्रश्न तर नीट विचारा

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

ही घ्या माझी उत्तरे

अ) शासनाच्या पदरी नमूद नसली तरी हिंदी राष्ट्रभाषा का नाही?
तुम्हाला हिंदी राष्ट्रभाषा व्हावी असे वाटते आहे का? तशी घटनेत नोंद नसली तरी माझ्यालेखी ती राष्ट्रभाषा आहे. बाकी या भाषिक अस्मितावाल्यांना बसू द्या बोंबलत. जगातल्या सगळ्या भाषा माझ्या आहेत असे मला वाटते.

ब) इंग्लीशला अजून किती काळ परकीय भाषा मानायचे?
इंग्लिश ही परकीय भाषा राहिलेली नाही. इंडियन इंग्लिश ही स्वतंत्र बोली आहे, असे वाटते. तुम्हाला

क) अकबर भारतीय होता का परकीय?
भारतीय. आणि तसे म्हटले तर भारताचा मूळ निवासी ( गोंड, भिल्ल, कोरकू इत्यादी ) मायनॉरिटीत आहे. बाय द वे, लालकृष्ण आडवाणी भारतीय आहेत की परकीय?

ड) औरंगजेब भारतीय होता का परकीय?
भारतीयच. औरंगजेबाचा बाप, त्याचा बाप, त्याचा बाप, त्याचा बाप सगळे भारतीय.

इ) युरोपातले रोमानी आपले की परकीय?
परकीय.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

हम्म!

अ) शासनाच्या पदरी नमूद नसली तरी हिंदी राष्ट्रभाषा का नाही?

कागदोपत्री असेल नसेल पण हिंदी ही भारतीयांना बांधून ठेवणारी एक उत्तम भाषा आहे. मला हिंदीबद्दल मातृभाषे इतकेच प्रेम आहे. किंबहुना ही माझ्या रोज बोलचालीची भाषा आहे. असो.

ब) इंग्लीशला अजून किती काळ परकीय भाषा मानायचे?

माहीत नाही पण इंग्रजीला मी परकीय भाषा मानत नाही.

अवांतरः भारताची महाराणी कोण या प्रश्नाचे उत्तर क्विन विक्टोरिया असे आहे.

क) अकबर भारतीय होता का परकीय?

जन्माने, कर्माने भारतीय.

ड) औरंगजेब भारतीय होता का परकीय?

जन्माने, कर्माने भारतीय.

इ) युरोपातले रोमानी आपले की परकीय?

परकीय पण मूळ भारतीय वंशाचे असल्याने मला थोडा जिव्हाळा वाटेल. :-)

आणखी एक न विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर

बाब्या - आपला
कार्ट - दुसर्‍यांचं.

रोमानींना कार्टे म्हणायचा उद्देश नाही. ;-)

मत

अ) शासनाच्या पदरी नमूद नसली तरी हिंदी राष्ट्रभाषा का नाही?

राष्ट्रभाषा नाही म्हणून तिच्याविषयी प्रेम वाटत नाही असे बिल्कुल नाही. मी दिल्लीत असतो आणि विविध कामासाठी अनेक ठिकाणी फिरत असताना बेधडक मराठी मिश्रीत हिंदी फाडत असतो, पण इथे आल्यापासून एकाही (मूळच्या) दिल्लीकराने माझ्या हिंदी उच्चारावर आपली भृकुटी वर केलेली नाही, किंबहुना रोजच्या व्यवहारात हमेशा लागणारे कितीतरी हिंदी शब्द मला आणि माझ्या मल्याळी रूममेटला इथल्याच लोकांनी अगदी आनंदाने शिकविले आहेत (आणि थ्रिसूरच्या या मामुटीसारख्या दिसणार्‍याचा आयक्यू इतका भन्नाट आहे की, एका महिन्यात त्याने हिंदी साहित्य वाचण्यापर्यंत मजल मारली). त्यामुळे मराठी, इंग्रजी इतकेच माझे हिंदीवर प्रेम आहे, भले ती शासनाच्या लेखी राष्ट्रभाषा असो वा नसो.

ब) इंग्लीशला अजून किती काळ परकीय भाषा मानायचे?

वर 'प्रियाली' यांनी उल्लेख केल्याप्रमाणे मीदेखील इंग्रजीला परकीय भाषा मानत नाही. आणि कुणी मानूही नये. "ग्लोबल लँग्वेज" चा दर्जा आहे या भाषेला हे तरी मान्य करावे. शिवाय आजकाल भारतीयांनी या भाषेवर जी हुकूमत मिळविली आहे तिचा दाखला कुणाला हवा असेल तर केंब्रिज आणि ऑक्सफर्डचे इंग्लिश लँग्वेज डिपार्टमेन्ट पाहावीत. तिथल्या फॅकल्टीमधील भारतीय शिक्षकांची नावे पाहिली तर याची प्रचिती येईल. त्यामुळे "स्वकिय, परकिय" हे मुद्दे इंग्रजीच्या बाबतीत कृपया विसरा.

क) अकबर भारतीय होता का परकीय?

पर्वा इल्ला

ड) औरंगजेब भारतीय होता का परकीय?

कुठलाही असला तरी आम्हाला काय फरक पडतो (कदाचित प्रभाकर पणशीकरांना जास्त माहिती असेल.)

इ) युरोपातले रोमानी आपले की परकीय?

सो? त्यामुळे काय होणार आहे?

आमचीही उत्तरे

अ. हिंदी राष्ट्रभाषा का नाही ते माहीत नाही, पण नाही तेच योग्य आहे असे (म. सा.वर) वारंवार वाचल्याने आम्हाला तसेच वाटू लागले आहे.
ब. हिंदीपेक्षा आम्हालातरी इंग्लिश जवळची वाटू लागली आहे (कारण वरीलप्रमाणेच)
क. परकीयच (कारण वरीलप्रमाणेच -- बाय द वे, हा काय प्रश्न झाला?)
ड. परकीयच (कारण वरीलप्रमाणेच -- बाय द वे, हा काय प्रश्न झाला?)
इ. कमीतकमी इटलीमधले तरी परकीयच -- बाकीच्या देशांबद्दलचे आमचे धोरण* (म. सा.वर) अधिक वाचन करून ठरवू.

अवांतर - आता आज दिवसभर बातम्या ऐकून आम्हाला पडलेला प्रश्न -- राहुल जी आणि राहुल एम यातला आपला कोण? ("जी" हे आदरार्थी नाही, पूर्ण नाव लिहिण्याची आमची तर छातीच नाही)

- अमित
(*मूषक निवारण विभाग, पुणे म. न. पा.)

कोणी कोणाचं नाही!

"कुणी नसे रे कुणाचा. जो तो स्वतःचा स्वतःचा" असे एक जुनी लकेर उगाचच आठवून गेली.

मला येथेही भेट द्या.
http://rajdharma.wordpress.com

आणखी काही प्रसिद्ध ओळी

नाहीच कुणी अपुले रे
प्राणांवर नभ धरणारे
दिक्काल धुक्याच्या वेळी
हृदयाला स्पंदविणारे
-- कवी ग्रेस.

माझे मत

अ) शासनाच्या पदरी नमूद नसली तरी हिंदी राष्ट्रभाषा का नाही?
मला वाटते हिंदी ही राष्ट्रभाषा नाही कारण भारतासारख्या देशात राष्ट्रभाषा हा कंनेस्प्टच गैरलागू आहे. मुळात "राष्ट्रभाषा" हा प्रकार भारत सोडून बाकी कुठल्याही देशात चर्चेत तरी असतो का हे बघावे लागेल. केंद्र किंवा राज्य सरकारची अधिकृत व्यवहाराची भाषा आणि राष्ट्रभाषा यांची गल्लत करता कामा नये. केवळ चर्चेसाठी राष्ट्रभाषा असा कंनेस्प्ट मान्य जरी केला तरी भारत हा अनेक भाषा बोलणार्‍या लोकांचे कडबोळे असल्यामुळे भारताला एकच अशी राष्ट्रभाषा असणे शक्य नाही. भारतात जवळजवळ ४०% लोकांची हिंदी ही मातृभाषा असल्याने भारत सरकारने ती अधिकृत व्यवहाराची भाषा म्हणून स्वीकारली आहे. मला स्वतःलाही हिंदी भाषा मराठी इतकीच आवडते. कदाचित खूप कानावर पडत असल्यामुळे असेल पण हिंदी सोपी, सुटसुटीत, सुगम आणि पाहिजे तशी वाकवता येणारी भाषा वाटते.

ब) इंग्लीशला अजून किती काळ परकीय भाषा मानायचे?
इंग्लिशबाबत प्रियाली आणि प्रतिक देसाईंशी सहमत. पण तरी इंग्लिशला परकी भाषा न मानणारे (म्हणजे माझ्यासारखे) भारतात अजूनही मेजॉरिटीमध्ये असतील असे वाटत नाही. बहुसंख्य लोकांना ती गरजेची पण तरीही परकी भाषाच वाटते. शिक्षणाचे सार्वत्रिकरण जसेजसे होत जाईल आणि ज्ञान मिळवण्यासाठी अधिकाधिक लोक जेव्हा इंग्लिशची कास धरतील तसेतसे हे परकेपण कमी होत जाईल. पण ते पूर्णपणे जाईल (म्हणजेच इंग्लिशला एक अस्सल भारतीय भाषा समजले जाईल) असे नजीकच्या भविष्यकाळात संभवत नाही.

अवांतरः परकीय भाषा का परकी भाषा? परकीय हा शब्दप्रयोग फक्त लोकांच्या समूहाला लागू होते असे वाटत होते. स्वकीय वि. परकीय वगैरे... अर्थात माझे वाटणे चुकीचे असू शकेल. जाणकार अधिक प्रकाश टाकू शकतील.

क) आणि ड) अकबर आणि औरंगजेब भारतीय होता का परकीय?
थिअरेटीकली भारत हा एक राष्ट्र म्हणून (नेशन स्टेट या अर्थाने) १९४७ साली अस्तित्वात आला. त्या अर्थाने ते दोघे भारतीय नव्हेत. परंतु त्या न्यायाने त्यांचे समकालीन किंवा आधीचे कुणीच भारतीय नव्हेत. परंतु याच मातीत जन्म घेतला, येथेच वाढले, येथेच सगळी कारकीर्द घडली असा विचार केला तर ते अस्सल एतद्देशीयच समजायला हवेत. बाबर परकीय होता असे म्हणू शकतो. {का त्याला आजकालच्या अमेरिकन पद्धतीप्रमाणे 'पर्शियन-इंडियन' म्हणावे? ;-) }

इ) युरोपातले रोमानी आपले की परकीय?
कल्पना नाही. काहीच अभ्यास नाही. वर काही जणांनी परकीय असे म्हणले आहे. कुणीच स्वकीय असे म्हणले नाही. त्यामुळे परकीय हे बरोबर असावे. का ते माहित नाही.

भारतीय/परकीय

अच्छा - कौल आहे, तर.

अ) शासनाच्या पदरी नमूद नसली तरी हिंदी राष्ट्रभाषा का नाही?

(प्रश्न समजला नाही.)

ब) इंग्लीशला अजून किती काळ परकीय भाषा मानायचे?

(शासनाच्या पदरी सुद्धा) भारतीय भाषा आहे. त्यामुळे "किती काळ" हा प्रश्न समजला नाही.

क) अकबर भारतीय होता का परकीय?

भारतीयांसाठी एतद्देशीय. (हिंदुस्तानी होता हे निश्चित. भारतीयता ही संकल्पना १९४७/१९५० काळात प्रस्थापित झाली. हल्लीच्या पाकिस्तानामधील लाहोर शहरामध्ये राजधानी असलेला रणजीत सिंह हा सुद्धा भारतीयांना बहुधा "एतद्देशीय"च म्हटला पाहिजे. हा सगळा प्रकार तसा ढोबळ आहे.)

ड) औरंगजेब भारतीय होता का परकीय?

भारतीयांसाठी एतद्देशीय.

इ) युरोपातले रोमानी आपले की परकीय?

भारतीय शासकीय कार्यांसाठी परकीय. वंशाने/भाषाभगिनी म्हणून रोमा लोकांबद्दल आपुलकी वाटू शकते. (पण अजून साक्षात कोणा रोमनी व्यक्तीशी ओळख नाही.)

धन्यवाद काकांनो आणि काकूंनो

चर्चेत भाग घेणार्‍या सर्व प्रतिसादकांचा आभारी आहे.

इंग्लिश ही भाषा परकी नाही हे अनेकांचे मत वाचून आनंद झाला. मोघली बादशहा आणि रोमानी लोकांबद्दलची मतेही आम्हाला रोचक वाटली.

आमचे स्वतःचे मत धम्मकलाडू यांच्या मताशी बरेचसे जुळते.

चिनारकाका/काकू म्हणतात -

भारतासारख्या देशात राष्ट्रभाषा हा कंनेस्प्टच गैरलागू आहे. मुळात "राष्ट्रभाषा" हा प्रकार भारत सोडून बाकी कुठल्याही देशात चर्चेत तरी असतो का हे बघावे लागेल.

भारताशिवाय अन्य देशात राष्ट्रभाषा म्हणून भाषा अस्तित्वात आहे काय? शेजारच्या पाकिस्तानातही अनेक भाषा बोलल्या जातात. तेथे राष्ट्रभाषा म्हणून एखादी भाषा आहे काय? कोणीतरी प्रकाश पाडावा.

- राजीव.

भाषा

>>पाकिस्तानातही अनेक भाषा बोलल्या जातात. तेथे राष्ट्रभाषा म्हणून एखादी भाषा आहे काय? कोणीतरी प्रकाश पाडावा

तिथे बहुतेक उर्दू ही राष्ट्रभाषा आहे.

हिंदी ही भारतातल्या मोठ्या लोकसमूहाची मातृभाषा असली तरी ती राष्ट्रभाषा नाही.
पाकिस्तानात मात्र उर्दू ही पाकिस्तानातल्या कोणाचीच मातृभाषा नसलेली भाषा राष्ट्रभाषा आहे. उर्दू ही भारतातल्या उत्तरप्रदेशातल्या मुस्लिमांची मातृभाषा आहे. पाकिस्तान म्हणून जो भूभाग वेगळा झाला त्या प्रदेशातल्या लोकांच्या मातृभाषा पंजाबी, सिंधी, बलुची, पश्तूनी (?) आणि बंगाली या होत्या.

त्या न्यायाने इंग्रजी आणि संस्कृत या भारताच्या राष्ट्रभाषा व्हायला हरकत नाही.

नितिन थत्ते
(कॅरॅक्टर काऊंटर स्टिल हॅज द बग, सो आय डोण्ट हॅव टु राईट धिस वे)

 
^ वर