धर्म, संप्रदाय, साम्प्रदायिकता

वरिल शिर्षकाचे श्री मा.गो. वैद्य यांचे बौध्दीक पुस्तीकेच्या रुपाने माझ्या वाचनात आले तेही नागालॉन्ड मध्ये. आपल्या सुजाण मित्रांना ते आवडेल या प्रामाणीक हेतुने मी ते त्यांच्याच शब्दात साभार येथे देत आहे. हे त्यांचे प्रगटण आपल्या समोर देत असतांना त्यातील चुका ह्या सर्वश्री माझ्या व विचार त्यांचे आहेत

"धर्म, संप्रदाय, सांप्रदायिकता, धर्म निरपेक्षता असे अनेक शब्द आपण अलीकडे वापरत आहोत.त्यांचे नेमके अर्थ आपण लक्षात घेतो असे मात्र नाही. 'धर्म' शब्द हा काही आजचा शब्द नाही. तो आपल्या या देशातल्या भाषेतला शब्द आहे. त्याच्या खूप विविध छटा आहेत.

रस्त्याने जाता जाता आपल्याला एक फलक दिसतो. 'धर्म काटा'. कुठेतरी आपण एक फलक वाचतो की. 'धर्मशाळा' आहे. कुठेतरी आपल्याला आणखीही एक फलक दिसतो की, हा 'धर्मार्थ' दवाखाना आहे.

भगवद् गीतेमध्ये 'यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् . म्हणजे ,'धर्माची ग्लानी होते आणि अधर्माचा प्रभाव वाढतो तेव्हा मी जन्म घेतो..' असे म्हटले आहे. त्याही पुढे सांगितले की, 'धर्मसंस्थापने करता मी युगा युगा मध्ये जन्म घेतो.'

या शिवाय राजधर्म, स्त्रीधर्म, पुत्रधर्म, आणि मग हिंदू धर्म, ख्रीश्चन धर्म, ईस्लाम धर्म, जैन धर्म, बॉध्द धर्म अशा इतक्या शब्दामध्ये, विविध प्रकारांमध्ये, विविध संदर्भामध्ये "धर्म" या शब्दाचा आपण उपयोग करीत असतो. तर या सगळ्यांच्यामध्ये काही साम्य आहे की नाही? धर्मशाळा म्हणतो तेव्हाही, धर्मार्थ दवाखाना म्हणतो तेव्हाही, हिंदूधर्म म्हणतो तेव्हाही, पुत्रधर्म, राजधर्म म्हणतो तेव्हाही, 'धर्माची संस्थापना करण्यासाठी मी जन्म घेतो' असे म्हणतो तेव्हाही या सगळ्यांच्या मध्ये काही समान आधार आहे की, कुठलाही शब्द कसाही वापरायचा म्हणुन तो वापरतो आहोत? आणी यात समान आधार असेल तर तो कोणता? आणी या सर्व अर्थांमध्ये 'धर्म' शब्दांचा इंग्रजी भाषेत 'रिलिजन' असा अनुवाद केला, तर तो बरोबर आहे काय, असा प्रश्न आपल्या मनामध्ये उत्पन्न झाला पाहिजे.

धर्म गुढ आहे?

धर्मशाळा ही काय रिलिजस स्कुल असते? धर्मकाटा काय रिलिजन तोलण्याचा काटा असतो? धर्मार्थ दवाखाना काय हॉस्पिटल फॉर रिलिजन' असतो? राजधर्म हा काय राजाचा रिलिजन आहे? आणि स्त्रीधर्म हा काय स्त्रीचा रिलिजन आहे? आणि भगवंतानी म्हटले कि, 'मी धर्माची संस्थपना करण्याकरिता जन्म घेतो' तर कोणत्या रिलिजनची संस्थापना करण्याकरिता जन्म घेतो? ख्रिश्चन ? हिंदू? इस्लाम? बॉध्द्? शिख? जैन्? कुठल्या धर्माची?

तेव्हा रिलिजन हा जो धर्माचा अर्थ आपण लावतो, तो बरोबर नाही. पाश्चात्यांच्या परंपरेमध्ये आणि इतिहासामध्ये रिलिजन आणि राज्य सत्ता यांचा संघर्ष झाला; रिलिजनचा आणि सायन्सचा संघर्ष ; त्यांच्या तिथे तसे होणे स्वाभाविक होते. परंतु 'धर्म आणि राज्यसत्ता, किंवा धर्म आणि विद्न्यान यांचा संघर्ष होण्याचे कारण नाही. तिथे त्यांनी कोणी असे म्हटले की, 'रिलिजन ही अफुची गोळी आहे.' मग आम्हीही म्हणु लागलो की, 'धर्मही अफुची गोळी आहे.' परंतु हे सर्व चूक आहे. भ्रांतिपूर्ण आहे. म्हणुन आपण धर्माचा अर्थ समजवून घेतला पाहिजे. आणि त्यासाठी त्यांच्या मुळाकडे गेले पाहीजे. म्हणजेच तळाशी जाउन विचार करायला पाहिजे आणि विचार तसा सोपा नाही.

धर्माच्याही अनेक व्याख्या, अनेक परिभाषा आपल्याकडे आहेत. आणि धर्माचे तत्व मोठे गहन आहे असेही सांगितले गेले आहे. एका सुभाषितामध्ये "धर्मस्य तत्वं निहितम् गुहायाम् " असे म्हटले आहे. याचा अर्थ ते गूढ आहे. गुहा आणि गूढ दोन्ही शब्द एकाच संस्कृत धातू पासुन बनले आहेत्. (गुह् म्हणजे लपविणे, लपवून ठेवणे) श्रुतींना मानावे तर सर्व श्रुती समान नाहीत. "श्रुतयो विभिन्ना" ऋषींचे वचन मानावे तर एकही ऋषी असा नाही की, ज्याचे वचन प्रमाण होईल. "नैको मुनिर्यस्य वचः प्रमाणम." आणि तर्क हा अप्रतिष्ठ् आहे. तर्काच्या आधारे धर्माची व्याख्या करावी तर तर्क हा अप्रतिष्ठ आहे म्हणजे त्याला काही मर्यादा आहेत. तर्काच्या मर्यादा रैशनैलिस्ट मान्य करत नाहीत पण त्या मान्य केल्या पाहिजेत. मान्य यासाठी केल्या पाहिजेत की, तर्क विशिष्ठ मर्यादेपर्यंत थांबला नाही तर त्याला व्यवहारामध्ये काही अर्थ राहत नाही.

गणितामध्ये सांगतात की, १० मजूर १ भिंत १० दिवसात बांधतात. ही भिंत १ दिवसात बांधायला किती मजूर लागतील? असा एक प्रश्न 'काळ काम वेग' याचे जे गणित आमच्या वेळेला होते त्यावेळेला विचारीत असत. त्याचे उत्तर असे १०० मजूर. पुढे तर्क करा की, २४०० मजूर असतील तर एक तासात भिंत तयार होईल . पण खरेच होइल का? २४०० मजूर लावणे काही कठिण नाही म्हणजे १० मजूर १० दिवसामध्ये १ भिंत तयार करु शकतात ते २४०० मजूर १ तासात करु शकत नाहीत. आणि तर्क आणि गणित दोन्ही बरोबर आहेत. तर्क हा अप्रतिष्ठीत आहे म्हणजे काही द्न्यान असे आहे की जे तर्काने मिळत नाही. म्हणुन म्हटले आहे "नैषा तर्केण मतिरापनेया. " हे जे द्न्यान आहे हे तर्काने मिळत नाही. कारण तर्क कुठेतरी थांबतो. कारण बुध्दिला काहीतरी मर्यादा आहेत.पण आम्ही असे म्हटले की, लगेच रैशनैलिस्ट म्हणतात की, "हे बुध्दीच्या विरोधामध्ये आहे. " पण हे बरोबर नाही. बुध्दीला मर्यादा आहेत, म्हणजे बुध्दीला काही अवकाशच नाही असा काही त्याचा अर्थ नाही.

तेंव्हा , अशा धर्माच्या संबधामध्ये सुभाषितकार म्हणतो, की सामान्य माणसाने "महाजनो एन गतः स पंथा." म्हणजे महाजन (थोर् लोक) ज्या मार्गाने जातात तोच धर्माचा मार्ग आहे असे समजावे. पण हे सामान्य लोकांकरीता. विद्वान लोकांचे कसे समाधान होणार? आणि मग धर्माचे जर इतके व्यापक अर्थ आहेत्; इतका त्याचा आशय आहे आणि त्याचा जर आपल्याला अर्थ लावायचा आहे तर मग तळाशी गेले पाहिजे.

चार अस्तित्वे -

व्याख्या करण्याचा एक नियम आहे. 'व्हेन यू आर इन डिफिकल्टी, गो टू द फंडामेंटल्स' जेव्हा आपण अर्थाच्या बाबतीत काही अडचणी मध्ये आलो तर मग मूळाकडे जावे. मग धर्माचे मूळ शोधून काढले पाहिजे. काय मूळ आहे ? कोठून आला आहे हा शब्द आपल्या भाषेमध्ये?

आपल्या असे लक्षात येईल की, 'धृ' नावाचा संस्कृतमध्ये जो धातु आहे, त्या धातुपासुन हा शब्द निघाला आहे. 'धृ' म्हणजे धरुन ठेवणे. बांधून ठेवणे. जोडून ठेवणे. धर्म काय करतो? धरुन ठेवतो. बांधून ठेवतो. मग त्याचा अधिक सुसंस्कृत अर्थे केला तर, 'धारण करतो'. मुख्य धृ म्हणजे धरुन ठेवणे. बांधुन ठेवणे. आता ज्याला बांधुन ठेवायचे असेल त्यासाठी, बांधुन ठेवण्याच्या क्रियेसाठी कमीत कमी दोन गोष्टींची आवश्यकता असते. जी बांधायची ती वस्तू आणि ज्याच्याशी बांधायची ती वस्तू. त्यामुळे धर्म ही सापेक्ष वस्तू आहे.

'राजधर्म' म्हटले म्हणजे 'प्रजेची अपेक्षा' पुत्रधर्म म्हटले की 'पित्याची आणि मातेची अपेक्षा' आहे. 'स्त्री धर्म म्हटले म्हणजे पुरुषाची अपेक्षा' आहे. समाजधर्म म्हटला म्हणजे व्यक्तीची अपेक्षा आहे. हे लक्षात ठेवले पाहिजे, की ही बांधुन ठेवण्याची प्रक्रिया आहे, बांधुन कोणाला ठेवायचे? तर माणसाला. आणि कोणासाठी आहे धर्म? तर मानवासाठी आहे 'धर्म'. पशूसाठी नाही. 'धर्मोहि तेषाम् अधिको विशेषः' सगळ्या प्राण्यांच्या बाकी सगळ्या गोष्टी सारख्याच आहेत. मानवाच्या आणि पशूंच्या. विशेष गोष्ट कोणती आहे मानवामध्ये? तर धर्म आहे. "धर्मोहि तेषाम् अधिको विशेषः" "धर्मेण हीनः पशुभि: समानः' म्हणजे जे धर्मविहीन आहेत ते पशुंसारखे आहेत.

तर हा मनुष्य आहे. त्याला कशाशी बांधून ठेवायचे आहे ? तर विश्वाशी म्हणजे मनुष्याला विश्वाशी जो बांधून ठेवतो तो धर्म. पण विश्वात काय आहे ? स्थूल मानाने चार गोष्टी आहेत्.

१) व्यक्ती म्हणजे 'मी' आहे, ह्याचे अस्तित्व कोणी नाकारत नाही. असे कोणी म्हणतो का, की मीच नाहीये? जर कोणी म्हणत असेल तर तो समाजात राहणार नाही.

२)पुढे मनुष्य विचार करतो की मी एकटा नाही. माझे कुटुंब आहे. आई आहे, वडील आहेत, भाऊ आहेत, बहिणी आहेत. पत्नी आहे, मुले आहेत. शेजारी आहेत. गावातील लोक आहेत. जिल्ह्यातील लोक आहेत. प्रांतातील लोक आहेत. देशातील लोक आहेत. म्हणजे सगळ्या जगातले लोक आहेत. मी जसा आहे, तसा मानवांचा एक समूह आहे. समाज आहे.

३) हा जो मानवांचा समूह आहे. त्यामध्ये व्यक्तींरुपाने मानव आहे. म्हणजे समाजामध्ये मानव आहे. एका वर्तुळाची कल्पना केली तर समाजाच्या वर्तुळामध्ये मानवाचे म्हणजे व्यक्तीचे वर्तुळ समाविष्ट आहे. परंतु या व्यक्तीच्या वर्तुळाच्या पलिकडे एक समाजाचे वर्तुळ आहे. मानव समुहाच्या पलिकडे आणखी काय आहे? त्याच्या पलिकडे प्राणी आहेत. मानवेतर सृष्टी आहे, काही चर आहेत, काही अचर आहेत. काही निर्जीव आहेत. काही सजीव आहेत. निर्जीव म्हणजे आपल्याला त्याचा जीव दिसत नाही. लक्षात येत नाही. म्हणुन निर्जीव. पशु आहेत. पक्षी आहेत. नदी आहे, पर्वत आहे. झाडे आहेत. अशी ही सृष्टी आहे. हे सृष्टीचे वर्तुळ आहे की नाही? तर त्याच्या बाहेरही आहे.

४) आणखीही एक अस्तित्व आपल्या येथे मानलेले आहे. पुष्कळसे मानत नाहीत. जे 'मटेरियालिस्ट' आहेत, केवळ भॉतिकवादी आहेत ते मानत नाहीत. त्यांच्या म्हणण्यानुसार चैतन्यसुध्दा भॉतीकच आहे. ते ही एक " इव्होल्यूट ऑफ मैटर" म्हणजे प्रकृतीचाच एक विकार आहे, परिणाम आहे. आणि तिथूनच 'कॉन्शसनेस' उत्पन्न होतो. आपल्याकडे साधारणतः असे मानत नाहीत. बहुतेक सगळे लोक चैतन्य मानतात. आणि आपण म्हणजे चैतन्य आहे. जसे माझ्यामध्ये चैतन्य आहे. तसे मानव समूहामध्ये आहे. आणि तेच चैतन्य सर्व सृष्टीमध्येही आहे. का मानायचे चैतन्य?

मी आता उभा आहे. आणि माझे हे हात आहेत. हे हात आता हालतात. आता पायाच्या आधारावर मी उभा आहे. मला तोंड आहे म्हणून मी बोलतो. डोळे आहेत म्हणुन मी बघतो. मला कान आहेत मी ऐकतो पण एकदा अशी स्थिती, अवस्था, मनुष्याच्या जीवनामध्ये येते की ज्यावेळेला माझे हात असतात पण हालत नाहीत. पाय असतात पण चालत नाहीत. कान असतात पण ऐकत नाहीत, डोळे असतात पण बघत नाहीत. तोंड असते पण बोलत नाहीत. काय होते? आणि काय निघून गेलेले असते? आता मला लहानसा काटा जरी बोचला तरी माझे सर्व अवयव तो काटा पायातून काढून टाकण्यासाठी प्रयत्न करण्यास धावतील. परंतु अशी एक वेळ येते की, माझ्या छातीवर एक मण वजनाचे लाकूड ठेवले तरी मी काहीच हालचाल करीत नाही. काय होते? आणि काय निघून गेले? शरीरातील चैतन्य होते ते निघून गेले. ते निघून गेले की हे शरीर ठेवण्याच्या लायकीचे वाटत नाही. ते बाहेर काढून जाळून तरी टाकतात किंवा गाडून तरी टाकतात.

शंकराचार्यांनी आपल्या एका स्त्रोत्रामध्ये म्हटले आहे, "गतवति वायॉ देहापाये, भार्या बिभ्यति रस्मिन् काये" ज्या शरिरावर भार्येने खूप प्रेम केलेले असते, त्या शरीरातून ते चैतन्य निघून गेल्यानंतर, त्या भार्येला सुध्दा त्या शरीराची भीती वाटत असते.

या चैतन्याचे एक वर्तुळ आहे. मनुष्य व्यक्तिमध्ये आहे की नाही चैतन्य? तर व्यक्तीमध्ये आहे. व्यक्तींच्या समुहामध्ये आहे की नाही? तर समूहामध्येही आहे. मानवेतर सृष्टीमध्ये आहे की नाही? तर त्याच्यामध्येही आहे. ही सगळी वर्तुळे त्याच्यामध्ये समाविष्ट आहेत. आणि तरी देखिल हे चैतन्याचे वर्तुळ त्याच्या पलिकडेही आहे.

तर ही चार अस्तित्वे आहेत.

१) व्यक्ती
२) व्यक्तींचा म्हणजे मानवाचा समुह , समाज
३) मानवेतर सृष्टी
४) चैतन्य, ज्याला आपल्याकडे परमात्मा, परमेश्वर असे म्हणतात

ही जी चार अस्तित्वे आहेत त्यांना परस्परांशी बांधून ठेवणारे जे तत्त्व आहे त्याचे नाव 'धर्म'. या चार अस्तित्वांना जोडणारा जो पूल आहे त्याचे नाव 'धर्म'

सामंजस्याचे सूत्र

हे जे बांधून ठेवायचे आहे ते कशाच्या आधाराने बांधून ठेवायचे? जबरदस्तीने नाही, जबरदस्तीने काम चालणार नाही.स्नेहाने, सांमंजस्याने, समरसतेने, आणि आदराने बांधून ठेवले पाहिजे. म्हणुन या चौघांना बांधणारे जे सामंजस्याचे सूत्र आहे त्याचे नाव 'धर्म' आहे. 'धर्म इज प्रिन्सीपल ऑफ युनिव्हर्सल एकॉर्ड, प्रिन्सीपल ऑफ युनिव्हर्सल हार्मनी' हे वैश्विक सामंजस्याचे जे तत्व आहे त्याचे नाव 'धर्म'

धर्माची पहिली पायरी काय आहे? तर मनुष्याला आपल्या समाजाशी बांधता येणे. चैतन्याशी कसे बांधायचे हे सगळे रिलिजन किंवा ज्यांना उपासना पध्दती म्हणतात ते सांगतात. सर्वच रिलिजनांनी ईश्वर मानलेला आहे. परंतु धर्मांची पहिली पायरी ही आहे की मनुष्याने आपला जो समाज आहे, जो समुह आहे त्याच्याशी बांधुन ठेवले पाहिजे.

तुम्ही स्वतःसाठी जेव्हा घर बांधता, तेव्हा तो धर्म होत् नाही. पण जेव्हा दुसर्‍यासाठी घर बांधता जेव्हा 'धर्मशाळा' उभी राहते. जेव्हा तुम्ही स्वतःसाठी आरोग्याची व्यवस्था करत तेव्हा तो धर्म होते नाही. जेव्हा दुसर्‍यासाठी आरोग्याची व्यवस्था करता तेव्हा तो 'धर्मार्थ दवाखाना' बनतो. तुम्ही घरामध्ये ईश्वराच्या पूजेसाठी स्वतःची सोय म्हणुन किती सुंदर प्रकारचे देवघर बांधलेले असले तरी तो धर्म नाही. (एक प्रकारे तेवढ्या पुरता आहे. परमेश्वराशी नाते बांधतात म्हणुन ते धर्माचे स्थान आहे.) परंतु जिथे सर्वांनी परमेश्वराच्या दर्शनासाठी जावे, असे स्थान बांधतात, तेव्हा मंदिर तयार होते. तो धर्म आहे.

आता समाजाशी हा जो व्यक्तींचा संबंध आहे, हा संबंध ज्या ज्या प्रकारे मनुष्य तयार करतो, स्वत:ला समाजाशी जोडून ठेवतो, स्वता:ला बांधून घेतो. हे सगळं 'धर्म' आहे; म्हणजे मनुष्य परिश्रमाने कमवितो. तो स्वतःच खाईल काय? नाही. खाता कामा नये. समाजाला दिले पाहिजे. मग तो जो समाजाला देतो तो ही 'धर्मच'. म्हणून दान हा 'धर्म'. म्हणुन 'दानधर्म' करा म्हणजे काय करा? दान द्या. म्हणजे जे तुम्ही कमविता ते द्या. आता देण्याचेही प्रकार दोन आहेत्.

१) अहंकाराने देणे. उपकार बुध्दीने देणे. अजिबात न देण्यापेक्षा हे चांगले आहे.
२) परंतु दुसर्‍या रितीने देता आले पाहिजे. म्हणजे 'त्यागाच्या बुध्दीने' देता आले पाहिजे.

दानामध्ये देणार्‍याचा अहंकार असतो. एकदा याचक आणि दाता यांचे भांडण झाले. दाता जरा स्वतः फार अहंकारी होता. तेव्हा याचकालाही जरा ताव आला. तो म्हणाला , "तुम्ही काय सांगता आपली प्रतिष्ठा ? आम्ही याचक आहोत म्हणून तुमची इज्जत आहे. तुमच्याकडे कोणी मागायलाच आले नाही तर कोण तुम्हाला विचारणार आहे?" त्यावर तो दाता म्हणाला, " अरे वा: भिकारीच्या भिकारी, आमच्यापुढे हात पसरता आणि वर सांगता आमच्यापेक्षा तुमची इज्जत जास्त म्हणून ". त्यांचे भांडण काही मिटेना. म्हणुन ते एका गुरु कडे गेले व म्हणाले "गुरुमहाराज, सांगा बरं, दाता श्रेष्ठ की याचक श्रेष्ठ?" गुरुमहाराजांनी दोघांचेही म्हणणे ऐकून घेतले आणि म्हणाले, "दातृयाचकयोर्भेदः कराभ्यामेव सूचितः" दाता आणि याचक यामधला भेद , त्यांच्या हाताची जी ठेवण आहे त्या ठेवणीने स्पष्ट केला आहे. ' देणार्‍याचा हात वर व घेणार्‍याचा हात खाली असतो'. तेव्हा दुसर्‍याला देता आले पाहिजे म्हणून म्हणतात की "श्रिया देयं" म्हणजे जेवढी आपली ताकद आहे, संपत्ती आहे. त्या संपत्तीला साजेसे देता आले पाहिजे. दुसरे सांगितले आहे, "र्हिया देयं" देताना लाज वाटली पाहिजे की आपण फार कमी दिले आहे. सर्वोत्कृष्ठ् दाता असा की, 'जो त्याग बुध्दीने देतो.' समाजाला जे द्यायचे ते त्याग बुध्दीने द्यावे. त्यागबुध्दीने देऊन मग आपण भोगावे. 'तेन त्यक्तेन भुंजीथा:' असे म्हटले आहे.

हाच विषय त्यांनी पुढे नेउन अतिशय सोप्या भाषेत त्यावर भाष्य केलेले आहे ते त्यांच्याच शब्दात देण्याचा माझा मनोदय आहे. एकाच बैठकित हे सर्व येथे लिहीणे मला शक्य वाटत नसल्याने मीच ब्रेक घेत आहेत्. वाचकांच्या प्रतिसादावरही बरेचसे अवलंबुन आहे. इतक्या गहन विषयावर इतके सुंदर भाष्य माझ्या तरी वाचनात न आल्याने ते येथे देण्याचा हा खटाटोप करित आहे.

लेखनविषय: दुवे:

Comments

रुमाल

प्रकाश घाटपांडे यांच्या 'या बौद्धिकाचा ऑडियन्स वेगळा आहे' या मताशी सहमत आहे.

सहसा धर्म या विषयावरची परिवारातली चर्चा धर्म या शब्दाचे वेगवेगळे अर्थ यानेच सुरू होते.

खरे पाहता स्त्रीधर्म, धर्मशाळा आणि ख्रिश्चन धर्म या प्रत्येक शब्दात वापरलेल्या धर्म या शब्दाचे अर्थ वेगवेगळे आहेत हे कोणत्याही समाजातील मठ्ठातल्या मठ्ठ व्यक्तीलाही समजते. पण जणू 'लोक हे तीनही एकच समजतात' असे आरोपून ते वेगळे आहेत असे नव्याने स्पष्टीकरण केल्याचा आव आणला जातो.

"धर्म ही अफूची गोळी आहे" या वाक्यात धर्म हा उपासनापद्धत, इहलोक-परलोक याविषयीच्या कल्पनांच्या सहाय्याने माणसांचे ऐहिक जीवन नियंत्रित करणारा व्यूह (पक्षी=संप्रदाय) याच अर्थाने वापरलो जातो आणि त्याबद्दलही कुणाच्या मनात संदेह आहे असे वाटत नाही. धर्मशाळा यात वापरलेल्या अर्थाचा धर्म ही अफूची गोळी आहे असे कोणी म्हणणे नसते. त्यामुळे रिलिजन हा धर्माचा अर्थ आपण लावतो असे वैद्य यांचे म्हणणे अनावश्यक/गैरलागू आहे.

काळ काम वेगाच्या गणिताच्या उदाहरणातून रॅशनलिस्ट लोकांच्या तर्कनिष्ठेला जो बोल लावला आहे तोही गैरलागू आहे. रॅशनलिस्ट लोक प्रॅक्टिकॅलिटी सोडून वागतात हे म्हणणे अगदीच काहीतरी आणि श्रोत्यांना कृतक वादाने जिंकण्याच्या मोहातून आलेले आहे. १० मजूर १० दिवसामध्ये १ भिंत तयार करु शकतात ते २४०० मजूर १ तासात करु शकत नाहीत हेही तर्कानेच समजते तर्कापलिकडच्या कुठल्यातरी गोष्टीने नाही.

बाकी चार अस्तित्वे आणि त्यांना जोडणारा पूल म्हणजे धर्म ही कल्पना पुन्हा आपल्याला धर्म = रिलिजन/संप्रदाय याच अर्थाकडे घेऊन येते कारण या पुलाच्या स्वरूपावरूनच तर विविध रिलिजनांमध्ये वाद आहेत.

धर्मशाळा आणि धर्मार्थ या अर्थाने दान वगैरेचे विवेचन ठीक आहे. पण या अर्थाच्या निमित्ताने कोणाचेच वाद नाहियेत.

अजून भागांच्या प्रतीक्षेत.

नितिन थत्ते
(कॅरॅक्टर काऊंटर स्टिल हॅज द बग, सो आय डोण्ट हॅव टु राईट धिस वे)

सहमत

एक लेख म्हणून किवा मनोगत म्हणून खूपच सुंदर परीक्षण आहे. खूपच जड असा विषय आहे, तरीही तो समजावून देण्याचा उत्तम प्रयत्न.

>>>>>पण हे सामान्य लोकांकरीता. विद्वान लोकांचे कसे समाधान होणार? आणि मग धर्माचे जर इतके व्यापक अर्थ आहेत्; इतका त्याचा आशय आहे आणि त्याचा जर आपल्याला अर्थ लावायचा आहे तर मग तळाशी गेले पाहिजे.
श्री विश्वास ह्यांनी सुरुवातीलाच ह्या लेखाचे वाचक ठरवून टाकले आहेत आणि ते योग्यच आहे, कारण त्यानंतर आलेले संदर्भ आणि आशय हे इतके आवघड आहेत कि सामान्य माणसाला त्याचा अर्थ कळणे दुरापास्त आहे, पण मला असे वाटते कि विचार/ संकल्पना जेवढ्या सोप्या तेवढ्या आचरणात आणणे सहज. नाहीतर मग नुसतेच शब्दांचा पाउस पडत राहतो तरीही माणूस कोरडाच राहतो. पण हा समाजाला दिशा (बरोबर/चूक) देण्याचे काम हे विद्वान लोक करत असतात तर मग त्यांचे विचार हे जास्त व्यापक असणे गरजेचे आहे आणि त्या दृष्टीकोनातून मी वरील लेखाशी सहमत आहे.

पूर्ण पुस्तकाबद्दल श्री विश्वास ह्यांनी लिहिले नाहीये,कदाचित मिळणाऱ्या प्रतिसादावर अवलंबून ते बाकीच्या भागाबद्दल बोलतील, पण माझी उत्कंठा आता अशी लागून राहिली आहे कि हे विचार कशाप्रकारे कृतीत आणले जाऊ शकतील ह्याबद्दल काय लिहिले आहे.

हॅ

दिवा विझतो तेव्हा त्यातून चैतन्य निघून जाते असे म्हणता का? तुम्ही गॉड ऑफ द गॅप्स (फटीतला देव?) युक्तिवाद करीत आहात का?

पायरी या रूपकात वरवरच्या पायर्‍या गाठणे अपेक्षित असते. आधीच्या पायरीला 'सोडून' पुढची पायरी गाठली जाते. उदा. व्यक्ती जेव्हा समाजाला बांधून घेते तेव्हा स्वत:कडे दुर्लक्ष करते. त्याच न्यायाने चौथ्या पायरीत पहिल्या तीनही बांधिलक्यांकडे दुर्लक्ष करणेच (उदा. चिलया बाळ, रेणुका, द्रौपदी, सीता, यांच्या कथा) अपेक्षित आहे ना? (चारही डगरींवर पाय ठेवणे चतुष्पादांनाच जमेल.)

तुम्ही घरामध्ये ईश्वराच्या पूजेसाठी स्वतःची सोय म्हणुन किती सुंदर प्रकारचे देवघर बांधलेले असले तरी तो धर्म नाही. (एक प्रकारे तेवढ्या पुरता आहे. परमेश्वराशी नाते बांधतात म्हणुन ते धर्माचे स्थान आहे.)

हा श्रेष्ठतम पातळीचा (क्र. ३) धर्म झाला.

परंतु जिथे सर्वांनी परमेश्वराच्या दर्शनासाठी जावे, असे स्थान बांधतात, तेव्हा मंदिर तयार होते. तो धर्म आहे.

हा कनिष्ठतर पातळीचा (क्र. २) धर्म झाला.

रूढ अर्थाने पातळी ३ लाच धर्म समजतात. शब्दांचे अर्थ बदलतात. संवादात दोन्ही पक्षांना समान अर्थ अपेक्षित असेल तोवर कोणताही शब्द कोणत्याही अर्थाने चालतो.
रास्वसंने जेव्हा जेव्हा धर्मांतराविरुध्द ठणाणा केला तेव्हा कुठे गेली होती तुमची व्याख्या?

१ नशीब की वैद्य यांनी शरीरधर्माविषयी (पातळी ०) सविस्तर लिहिले नाही.

२ तपकीर घेताना देणार्‍याचा हात खाली असतो अशी बिरबलाची दंतकथा आहे.


व्याख्या करण्याचा एक नियम आहे. 'व्हेन यू आर इन डिफिकल्टी, गो टू द फंडामेंटल्स'

म्हणूनच त्यांना फंडामेंटलिस्ट म्हणतात काय?

असही

>>>दिवा विझतो तेव्हा त्यातून चैतन्य निघून जाते असे म्हणता का? तुम्ही गॉड ऑफ द गॅप्स (फटीतला देव?) युक्तिवाद करीत आहात का?
निघून कुठे जाते? चैतन्य परावर्तीत होते, उर्जेप्रमाणे. जसा माणसामध्ये जोपर्यंत चैतन्य आहे तोपर्यंत तो decay होत नाही, तेच तो मृत झाल्यास (चैतन्य निघून गेल्यास) पंचतत्वात परिवर्तीत होत.

>>>(चारही डगरींवर पाय ठेवणे चतुष्पादांनाच जमेल.)
अति नाही करायचा हो, थोडा थोडा वेळ आणि शक्ती सर्व ठिकाणी वापरायची, व्यक्तिगत/सामाजिक सगळीच गणित सोडवता न तुम्ही? गाडी चालवता पण सिग्नल पाळता ना? सामाजिक जाणीव म्हणून? आणि चारही गोष्टी करणे उद्दिष्ट आहे, यथाशक्ती करणे विवेक आहे.

>>>३ रूढ अर्थाने पातळी ३ लाच धर्म समजतात. शब्दांचे अर्थ बदलतात. संवादात दोन्ही पक्षांना समान अर्थ अपेक्षित असेल तोवर कोणताही शब्द कोणत्याही अर्थाने चालतो.
रास्वसंने जेव्हा जेव्हा धर्मांतराविरुध्द ठणाणा केला तेव्हा कुठे गेली होती तुमची व्याख्या?
रास्वसं ज्याला धर्मांतर म्हणते त्याची पातळी आणि वरील लेखातील धर्मांतराची पातळी वेगळी आहे असा लेखातून लक्षात येत.

>>>२ तपकीर घेताना देणार्‍याचा हात खाली असतो अशी बिरबलाची दंतकथा आहे.
तपकीर खाणाऱ्यांचा धर्म आहे तो :)

असे नाही

निघून कुठे जाते? चैतन्य परावर्तीत होते, उर्जेप्रमाणे.

"काय होते? आणि काय निघून गेले? शरीरातील चैतन्य होते ते निघून गेले. ते निघून गेले की हे शरीर ठेवण्याच्या लायकीचे वाटत नाही." म्हणजे निघून जाते.

जसा माणसामध्ये जोपर्यंत चैतन्य आहे तोपर्यंत तो decay होत नाही, तेच तो मृत झाल्यास (चैतन्य निघून गेल्यास) पंचतत्वात परिवर्तीत होत.

  1. "Unless ... you a zombie" -- Mahalik (स्केरी मूवी ४)
  2. दिव्यात जोवर चैतन्य आहे तोवर तो अंधारमय होत नाही, तेच तो मृत झाल्यास (चैतन्य निघून गेल्यास) त्याचे दिव्यत्व तेजतत्वात परिवर्तित होते.
    बर्फात जोवर चैतन्य आहे तोवर तो वितळत नाही, तेच तो मृत झाल्यास (चैतन्य निघून गेल्यास) आपतत्वात परिवर्तित होतो.

गाडी चालवता पण सिग्नल पाळता ना? सामाजिक जाणीव म्हणून?

नोप्स. काटकोनाच्या दिशेतून वेगाने येणारे वाहने, पांडू, कॅमेरा किंवा रडार ही कारणे आहेत.

आणि चारही गोष्टी करणे उद्दिष्ट आहे, यथाशक्ती करणे विवेक आहे.

विवेक हे मासिकाचे नाव आहे की तर्काला समानार्थ? तर्कालातर मर्यादा असतात म्हणे!

रास्वसं ज्याला धर्मांतर म्हणते त्याची पातळी आणि वरील लेखातील धर्मांतराची पातळी वेगळी आहे असा लेखातून लक्षात येत.

वैद्य तर वेगळे नाहीत ना?

तपकीर खाणाऱ्यांचा धर्म आहे तो :)

त्याच्याशी मला कर्तव्य नाही. "देणार्‍याचा हात वर व घेणार्‍याचा हात खाली असतो" या नियमाचा अपवाद दाखविला.

असे पण नाही.

>>>"Unless ... you a zombie" -- Mahalik (स्केरी मूवी ४)
झोंबी चैतन्याशिवाय? कसे असतात? मराठी माणसासारखे? :)

>>नोप्स. काटकोनाच्या दिशेतून वेगाने येणारे वाहने, पांडू, कॅमेरा किंवा रडार ही कारणे आहेत.
हा राजधर्म, धर्म कायद्याच्या चौकटीतून वटवल्यास त्याला राजधर्म म्हणतात.

>>विवेक हे मासिकाचे नाव आहे की तर्काला समानार्थ? तर्कालातर मर्यादा असतात म्हणे!
तर्क व्यावहारिक पातळीवर केला तर त्याला विवेक म्हणतात, तसे तर विवेक नावाचे किती तरी लोक आहेत.

>>वैद्य तर वेगळे नाहीत ना?
ते वैद्यांना माहित, लेख नक्की तसा नाही हे वाचून कळत, आणि वयोमानानुसार आणि परिस्थितीनुसार विचारात फरक पडू शकतो, केवळ रास्वसं बद्दल तिटकारा आहे म्हणून वैद्यना असे म्हणणे कितपत बरोबर?

>>त्याच्याशी मला कर्तव्य नाही. "देणार्‍याचा हात वर व घेणार्‍याचा हात खाली असतो" या नियमाचा अपवाद दाखविला.
मान्य. नियमाचा अपवाद सिद्ध करत आहात, मान्य करायलाच हवे. :)

तसे नाही

झोंबी चैतन्याशिवाय? कसे असतात? मराठी माणसासारखे? :)

चैतन्य असतानाच decay म्हणजे "माणसामध्ये जोपर्यंत चैतन्य आहे तोपर्यंत तो decay होत नाही" या नियमाचा अपवाद दाखविला.
पण मूळ लेखकांनी "मानवेतर सृष्टीमध्ये आहे की नाही? तर त्याच्यामध्येही आहे." हे मान्यच केले आहे ना? त्यामुळे दिव्यात चैतन्य असते असेच त्यांना म्हणावे लागेल. माझा डाव push to extreme and prove wrong असा आहे. ऍनिमिझम मान्य केला की त्यांचे वाचकच त्यांना खुळ्यात काढून निघून जातील. काम तमाम!

हा राजधर्म, धर्म कायद्याच्या चौकटीतून वटवल्यास त्याला राजधर्म म्हणतात.

सामाजिक जाणीव नाही ना? बास!

तर्क व्यावहारिक पातळीवर केला तर त्याला विवेक म्हणतात

मर्यादा तर आहेतच ना? त्याला विवेक म्हणा नाहीतर सलमान.

ते वैद्यांना माहित

मला वाटले या धाग्याचे लेखक वैद्यांचे प्रचारक आहेत.

लेख नक्की तसा नाही हे वाचून कळत, आणि वयोमानानुसार आणि परिस्थितीनुसार विचारात फरक पडू शकतो

म्हणजे? वैद्यसुद्धा चालले का कायदेआझमची पूजा करायला?
चला क्षणभर असे गृहीत धरू की स्थलकालाप्रमाणे आणि परिस्थितीनुसार रंग बदलणे योग्य आहे. पण हे पुस्तक तर पूर्वाञ्चलातच प्रसिद्ध केले ना? धर्मांतरे तेथेच होतात ना? की पुस्तक छापले तेव्हा केवळ लव जिहाद हाच धर्मांतराचा प्रकार ज्ञात होता? सोनिया गांधी राजकारणात उतरण्यापूर्वी छापलेले आहे का हे पुस्तक? की वैद्यांचे वयोमान झाल्यानंतर पुस्तक छापले आहे? त्यांचे विचार भ्रष्ट होतील इतके वय झाले असेल तर त्यांच्या नव्या लिखाणाला काय किंमत उरते?

केवळ रास्वसं बद्दल तिटकारा आहे म्हणून वैद्यना असे म्हणणे कितपत बरोबर?

काय म्हणालो? दुटप्पीपणा दाखवला की लगेच भावना दुखतात का? आणि हो, तिटकारा आहेच.

असे ?

ज्यांना सामाजिक जाणीव नसते तेंव्हा अशा लोकांकडून कधी कधी समाज-उपयोगी कामे जाणीव पूर्वक करून घेतली जातात, तशाप्रकारची सामाजिक जाणीव आहे ती असे म्हणू आपण.

थोडे आजून खोलात गेलात तर प्रस्तुत लेखक विचारांचे प्रचारक आहेत असे पण म्हणता येऊ शकते.

आणि पुस्तकाला नेमाड्यांचे किवा रणजीत देसाईंचे नाव दिले असते तरी असेच म्हणाला असता का आपण? विरोध माणसाला आहे कि विचारांना आहे? इथे आपण पुस्तकात मांडलेल्या विचारांवर चर्चा करत आहोत. हे विचार आणि रास्वसं चे विचार परस्परविरोधी आहेत (काही विचार) आणि तुम्हाला दोन्हीही पटत नाहीत. मग विरोधासाठी विरोध कि केवळ वैद्यांबद्दल राग?

आणि विवेकाला मर्यादा पडल्या कि त्याचा अविवेक होतो, मग तुमचे म्हणणे पटते.

बाकी मान्य?

ज्यांना सामाजिक जाणीव नसते तेंव्हा अशा लोकांकडून कधी कधी समाज-उपयोगी कामे जाणीव पूर्वक करून घेतली जातात, तशाप्रकारची सामाजिक जाणीव आहे ती असे म्हणू आपण.

म्हणजे कोणत्याही पायरीवर उभे राहताना आधीची बंधने झुगारण्याची अपेक्षा असते ना? जे खालच्या पायरीवर असतात त्यांच्या कडून वरील पायरीवरील कर्तव्ये 'करून घेतली जातात', वरचे स्वखुशीने करतात, असे काही? दोघांच्याही बाबतीत खालील पायरीवरील 'धर्म' बाटतोच ना?

आणि पुस्तकाला नेमाड्यांचे किवा रणजीत देसाईंचे नाव दिले असते तरी असेच म्हणाला असता का आपण? विरोध माणसाला आहे कि विचारांना आहे? इथे आपण पुस्तकात मांडलेल्या विचारांवर चर्चा करत आहोत. हे विचार आणि रास्वसं चे विचार परस्परविरोधी आहेत (काही विचार) आणि तुम्हाला दोन्हीही पटत नाहीत. मग विरोधासाठी विरोध कि केवळ वैद्यांबद्दल राग?

विरोध दुटप्पीपणाला आहे.
धर्म हा केवळ एक शब्द आहे. सोडियम आणि क्लोरिनचा संयोग झाल्यावर मिळणारा पांढरा चविष्ट स्फटिक असा त्याचा अर्थ घेऊन चर्चा करायची असेल तर तीही करू.
मला राग नाही पण माझा विरोध आहे कारण हे लोक सुशिक्षितांना गंडविण्यासाठी (पैसे मिळविण्यासाठी, इ.) एक व्याख्या वापरतात आणि त्रिशूळ वाटताना दुसरी व्याख्या वापरतात.

आणि विवेकाला मर्यादा पडल्या कि त्याचा अविवेक होतो, मग तुमचे म्हणणे पटते.

मी विवेकाला मर्यादा घातल्या नाहीत. तर्काचा समानार्थ म्हणून विवेक हा शब्द तुम्ही सुचविलात आणि तर्काला मर्यादा असल्याचे मूळ लेखकांनी एका खुळचट युक्तिवादाने प्रतिपादले आहे.

गाळणी

>>पायरी या रूपकात वरवरच्या पायर्‍या गाठणे अपेक्षित असते. आधीच्या पायरीला 'सोडून' पुढची पायरी गाठली जाते.
पायरी हि जी आहे ती उत्कर्षाचे रूपक आहे, खालची 'सोडून' वरती जात नाही कोणी, खालची पायरी आहे आणि राहणार आहे हे माहित असते, खालची पायरी वर जायला मदत करते, जसे जसे वरच्या पायरीवर जाऊ तसे तसे खालच्या पायरीवरील अपेक्षित गुण/ताकद हे अंगी असतात हे implicit आहे. म्हणजे सर्वात वरच्या पायरीवर असणाऱ्याकडे सर्व गुण असणे अपेक्षित आहे, खालच्या पायरीला कमी लेखले गेले तर वरची पायरी खूपच खाली जाईल.

मुद्दा रास्वसंचा - तर राजकारण आणि समाजकारण ह्यांची एकत्र सांगड नाही घालता येत, जी ताकद उत्तम समाजकारण करण्यासाठी हवी आहे ती राजकारण देते. ह्या दोघांचा balance साधला तर लोक दुट्टपी म्हणतात आणि एकाचीच कास धरली तर fundamentalist म्हणतात. माझामते काळाप्रमाणे निकड ओळखुन तत्वांमध्ये योग्य बदल केला तर कदाचित हा balance जमेल, पण ते जितके सोपे लिहायला आहे तितके सोपे करायला नसावे (निदान राष्ट्रीय स्तरावर)

>>तर्काला मर्यादा आहेत?
ह्याचा अर्थ practially तर्काला मर्यादा आहेत, ते त्यांच्या २४०० मजुरांच्या गणितावरून सिद्ध होते, गणितात किवा तर्कात ते शक्य आहे पण व्यवहारात ते शक्य नाही. म्हणून मर्यादा. logically बराच काही शक्य असता, पण काही वेळा माणसांचे स्वभाव, परिस्थिती, काल, वेळ ह्या सर्वांपुढे logic न वापरणेच योग्य ठरते हे आपण रोजच्या घडामोडीत किवा साधारण आयुष्यात बघत असतो, नाही?

(फाळणी)

तुम्ही गाळणी हे षिर्‍शक का वापरले ते मला समजले नाही. मी फाळणी हे षिर्‍शक दिले आहे कारण लोकांचा बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न वैद्य करतात.

पायरी हि जी आहे ती उत्कर्षाचे रूपक आहे, खालची 'सोडून' वरती जात नाही कोणी, खालची पायरी आहे आणि राहणार आहे हे माहित असते, खालची पायरी वर जायला मदत करते, जसे जसे वरच्या पायरीवर जाऊ तसे तसे खालच्या पायरीवरील अपेक्षित गुण/ताकद हे अंगी असतात हे implicit आहे. म्हणजे सर्वात वरच्या पायरीवर असणाऱ्याकडे सर्व गुण असणे अपेक्षित आहे, खालच्या पायरीला कमी लेखले गेले तर वरची पायरी खूपच खाली जाईल.

साधे व्यक्ती (पातळी ०) आणि समाज (पातळी १) हे उदाहरण बघू. कुटुंब हे समाजाचे सर्वात छोटे उदाहरण मूळ लेखात आहे. कौटुंबिक फायद्यासाठी कुटुंबप्रमुख स्वतःच्या अनेक हौशी आणि गरजा मारतात. हे पातळी ० शी प्रतारणा करण्याचे उदाहरण आहे. त्याच न्यायाने स्वर्गात ७२ कुमारिका मिळविण्यासाठी (=पातळी ३) श्रियाळ, हरिश्चंद्र, राम, युधिष्ठिर, यांनी पातळी १ शी प्रतारणा करण्याची तयारी दाखविली. दिवाळी, होळी, गणेशविसर्जन या सणांत लोक पातळी २ शी प्रतारणा करून पातळी ३ ची आकांक्षा धरतात.

मुद्दा रास्वसंचा - तर राजकारण आणि समाजकारण ह्यांची एकत्र सांगड नाही घालता येत, जी ताकद उत्तम समाजकारण करण्यासाठी हवी आहे ती राजकारण देते. ह्या दोघांचा balance साधला तर लोक दुट्टपी म्हणतात आणि एकाचीच कास धरली तर fundamentalist म्हणतात. माझामते काळाप्रमाणे निकड ओळखुन तत्वांमध्ये योग्य बदल केला तर कदाचित हा balance जमेल, पण ते जितके सोपे लिहायला आहे तितके सोपे करायला नसावे (निदान राष्ट्रीय स्तरावर)

सांगड घालणे, बॅलन्स ठेवणे, म्हणजे फसविणेच का रे भाऊ?
एकाच काळात, एकाच राज्यात, वेगवेगळ्या व्याख्या सांगून रास्वसं फसविते अशी शक्यता आहे. बदल हा काळाप्रमाणे झाल्याचे सिद्ध करण्यासाठी कृपया या उदाहरणातील घटनाक्रमाच्या सनावल्या सांगा.

ह्याचा अर्थ practially तर्काला मर्यादा आहेत, ते त्यांच्या २४०० मजुरांच्या गणितावरून सिद्ध होते, गणितात किवा तर्कात ते शक्य आहे पण व्यवहारात ते शक्य नाही. म्हणून मर्यादा. logically बराच काही शक्य असता, पण काही वेळा माणसांचे स्वभाव, परिस्थिती, काल, वेळ ह्या सर्वांपुढे logic न वापरणेच योग्य ठरते हे आपण रोजच्या घडामोडीत किवा साधारण आयुष्यात बघत असतो, नाही?

२४०० मजुरांचे उदाहरण व्यवहारात शक्य नाही हे तर्कानेच समजते ना? की प्रयोग करून बघावा लागतो? आणि लॉजिक न वापरणे योग्य म्हणता पण 'विवेक' हा शब्द तुम्हीच सुचविलात.

माझी बाकीची विधाने मान्य आहेत की नाही यावर टिप्पणी करण्याची काही पद्धत आहे का?

प्र: (फाळणी)

गाळणी ह्यासाठी कि, तुम्ही पायरीचा मुद्दा काढला होता, तो असा -
>>२ पायरी या रूपकात वरवरच्या पायर्‍या गाठणे अपेक्षित असते
आता पायरी हे रूपक इथे उत्कर्षाच्या स्वरुपात वापरले आहे असे मला वाटले, पण मग तुमचे नंतरचे मत हे विरोधाभासी होते म्हणून मला वाटले तुम्ही आपलेच मत गाळून टाकले कि काय, म्हणून गाळणी.

आणि इथे वैद्यांनी दिलेले धर्म पायरीच्या स्वरुपात ह्याच उत्कर्षाच्या आधाराने वापरलेले आहेत, एका वेळेस एकच काम होऊ शकते अगदी तथाकथित multitasking environment मध्ये देखील, त्याचा अर्थ तुम्ही दुसऱ्या कामाशी किवा कर्तव्याशी प्रतारणा करत आहात असे वापरले म्हणून मी विरोध केला, म्हणून विवेक आला कि असेलेली शक्ती सर्व कर्तव्यामध्ये योग्य प्रमाणामध्ये वापरणे आणि लेखामध्ये अपेक्षित धर्म एकाच संकल्पना आहे, त्यासाठी वापरलेल्या देवघराची किवा देवाचे उदाहरण खूपच चुकीचे आहे हे मान्य. म्हणून मी वाहनाचे आणि सामाजिक नियमांचे उदाहरण दिले त्यास तुम्ही तर्काला धरून विरोध केला, हा तर्क केवळ गणितासारखा आहे कि theortically बरोबर आहे म्हणून समाजात असे वागल्यास chaos निर्माण होईल हि जाणीव असते, म्हणून लोक सामाजिक बंधने नाईलाजाने किवा भीतीने पाळतात.

आणि मग हाच (अ)तर्क बरोबर कसा हे पण तर्कानेच सिद्ध करायचे म्हणजे जरा जास्तच नाही, आता हा तर्क बघा Suppose Homer wants to catch a stationary bus. Before he can get there, he must get halfway there. Before he can get halfway there, he must get a quarter of the way there. Before traveling a fourth, he must travel one-eighth; before an eighth, one-sixteenth; and so on. so तर्काप्रमाणे हे शक्य आहे पण त्याच तर्काने(व्यावहारिक) हे सिध्द होते कि हा अतर्क आहे.

>>>सांगड घालणे, बॅलन्स ठेवणे, म्हणजे फसविणेच का रे भाऊ?
>>>एकाच काळात, एकाच राज्यात, वेगवेगळ्या व्याख्या सांगून रास्वसं फसविते अशी शक्यता आहे. बदल हा काळाप्रमाणे झाल्याचे सिद्ध करण्यासाठी कृपया या उदाहरणातील घटनाक्रमाच्या >>>सनावल्या सांगा.

मी आपले म्हणणे एका अर्थाने मान्य करून असे लिहिले होते -
>>>मुद्दा रास्वसंचा - तर राजकारण आणि समाजकारण ह्यांची एकत्र सांगड नाही घालता येत, जी ताकद उत्तम समाजकारण करण्यासाठी हवी आहे ती राजकारण देते. ह्या दोघांचा balance साधला तर लोक दुट्टपी म्हणतात आणि एकाचीच कास धरली तर fundamentalist म्हणतात. - which implicitly means कि हा मेळ घालणे रास्वसं जमत नाहीये म्हणून ते ढोंगी वाटत आहेत, त्यावर उपाय म्हणून मी असे सुचवले कि (तर्काने) - माझामते काळाप्रमाणे निकड ओळखुन तत्वांमध्ये योग्य बदल केला तर कदाचित हा >>>balance जमेल, पण ते जितके सोपे लिहायला आहे तितके सोपे करायला नसावे (निदान राष्ट्रीय स्तरावर) , म्हणजे रास्वसं तसे वागते असे मी म्हणत नाही, तसे त्यांनी वागावे असे मी म्हणत आहे.

समजले नाही

तुमची विधाने, माझी विधाने, त्यांना एकमेकांचे प्रतिसाद, त्यांच्यामागची अवतरणओळ चिन्हे (>>>) हे सारे या प्रतिसादात बघून माझा गोंधळ झाला आहे, इतकेच कळले की तुम्ही आत्तापर्यंतच्या चर्चेचा सारांश मांडला आहे. माझ्याशी असलेल्या असहमतीचे मुद्दे कृपया वेगळे नमूद करा.

बौद्धिक

वैद्यांनी ज्यांच्यासाठी हे टिपण तयार केले आहे तो वर्ग निराळा आहे.
प्रकाश घाटपांडे

छान् लेख

दोन्ही साइडनी भरपूर ब्याटिंग करण्यास् वाव आहे.
चालु द्या...

(प्रेक्षक )मनोबा

प्रतिसाद

ह्या लेखातील विचार कुणा तीसर्‍याच व्यक्तीचे असल्यामुळे कोणतेही मत मांडणे प्रशस्त वाटत नाही.

तरी देखील....

धर्मासंबंधित अशा प्रकारची भाष्ये मला अगदी जुनाट वाटतात. काळ खूप पुढे गेला आहे. पण विचार मांडण्यासाठीची शैली, उदाहरणे, शब्द वैगरे जुनी-पुराणीच आहेत.
जसे आता मिक्सर वापरला जातो. पाटा-वरवंट्याचा जमाना गेला. पाटा-वरवंट्यावर वाटलेल्या वाटपाची चव ग्राईंडर-मिक्सरला नसते. यावर वाद घालता येईल. पण अखेर मिक्सर-ग्राईंडर, फ्रिज, ओवन, मायक्रोव्हेवचाच जमाना आहे. जुन्या स्वैपाकघरातील वस्तू जशा बदलल्या, तसे तेथील वस्तूंची नावे, (शब्द, व्याख्या, संकल्पना या संदर्भाने) बदलत गेलेली आहेत. तशीच आध्यात्मिक विशया मध्ये सुस्पष्टता, स्थिरता आणून प्रगति, सुधारणा केली जायला हवी.

आध्यात्मिक विशय नव्या युगात नव्या पद्धतीने नव्या पिढी समोर मांडला जायला हवा.
वेगवेगळ्या स्तरांना वेगवेगळी नावे दिली जायला हवीत. वेगवेगळ्या स्तरावर एकच शब्द वापरला जाता कामा नये. त्यातून गोंधळ होतो. (कारण तर्काला मर्यादा नसतात. मर्यादा तर्क 'करणार्‍याच्या क्षमतेला' असतात. एका मर्यादेनंतर खरचं, तर्क पेलवत नाही.)
उदा.:
जिथे धर्म हा 'विचार बैठक' म्हणून येतो तिथे 'विचार बैठक' म्हणूनच यायला हवा.
जिथे 'कर्तव्य' शब्द वापरायचा आहे तिथे 'कर्तव्य' हाच शब्द वापरला जायला हवा, 'धर्म' हा शब्द तिथे येता कामा नये.

चैतन्याचा तर्क

पुढे तर्क करा की, २४०० मजूर असतील तर एक तासात भिंत तयार होईल . पण खरेच होइल का?

तर्क करून हे जर कळत असेल, तर तर्काला मर्यादा आहेत हा तर्क कसा बरं लढवावा? पण तर्काने याहीपुढे जाता येतं. भिंतीऐवजी वाळू ढिगांतनं खड्ड्यांमध्ये भरायची असेल तर २४०० मजूर एका तासात हे करू शकतील हे कळतं. तसंच वाळूचा ढीग किती मोठा आहे, तसे किती ढीग आहेत, ते ढीग व खड्डा यांत अंतर किती आहे हे सगळं लक्षात घेऊन त्या त्या प्रश्नाला योग्य उत्तर काढता येतं. खरोखरच तर्क तोकडा पडला आहे (लेखकाचा नव्हे) याचं चांगलं उदाहरण मला वाचायला मिळालं तर आवडेल.

चैतन्यवाद (अॅनिमिझम) जुना आहे. त्यात माणसात साठून राहिलेलं व चराचरात पसरून राहिलेलं चैतन्य वगैरे कल्पना असतात. मोहक कल्पना आहेत, पण दुर्दैवाने असं काही आहे याला पुरावा सापडला नाही. तो केवळ तर्क आहे. चैतन्य वगैरे काही गोष्टी नसाव्यात असा विश्वास वाटण्यासारखे बरेच पुरावे सापडले आहेत.

एकदा चैतन्याची भंपक कल्पना नाकारली तर मग काय राहिलं? धर्माचं मुख्य काम हे या चैतन्याशीच निगडीत नाही का? इतर तीन पातळ्यांमध्ये बांधायचे पूल राहातात. पण त्यासाठी धर्म कशाला पाहिजे? चीनमध्ये धर्माशिवाय या सगळ्या गोष्टी होतात.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

हॅहॅहॅ

तो केवळ तर्क आहे. चैतन्य वगैरे काही गोष्टी नसाव्यात असा विश्वास वाटण्यासारखे बरेच पुरावे सापडले आहेत.

बघा! म्हणजे तर्क ढगळ झाला :D

 
^ वर