मोर्स कोड चे भवितव्य काय...?

मोर्स कोड चे भवितव्य काय...?
मोर्स कोड म्हणजे सर सॅम्युअल मोर्स यांनी विकसीत केलेली संकेत भाषा.
ही भाषा दोन Elements ची बनलेली असते.
. (dit) - (dah)
या डीट व डाह च्या वापराने संकेत अर्थपुर्ण बनतात.
बहुतेक जणांना जुन्या काळातील तारयंत्र माहित असेल तर हेच तारयंत्र म्हणजे मोर्स संकेत पाठविण्याचे साधन.
मोर्स संकेताला कुठल्याहि प्रकारचे बंधन नाहि जगात अगदि कोणालाहि संकेत पाठवुन आपण गप्पा गोष्टी करु शकतो.
कधीमधी आपल्या घरच्या रेडीओ वरती आपण चॅनल टयुन करतांना
टा टीट टा टीट टा टा टीट टा टीट टीट असे काहि ए‍ेकले असलेच तर ते म्हणजेच मोर्स संकेत.
मोर्स संकेत चा वापर प्रामुख्याने लष्कर व पोलीस खाते हेच लोक करीत असतात.
पोलीस खात्यात पोलीस बिनतारी संदेश विभाग म्हणुन स्वतंत्र विभागच अस्तित्वात आहे.
अजुनहि मर्चंट नेव्ही मध्ये मोर्स संकेताचा वापर होतो तर पोस्ट खात्यात मोर्स संकेता मार्फत तारसंदेश पाठवितात
परंतु आज घडीला जुने जानकार मंडळी वगळता कोणीही मोर्स संकेत शिकण्याच्या मानसिकतेत नाहि.
मोर्स संकेत शिकल्यास बिनतारी यंत्रचालक म्हणुन चांगली नोकरी मिळण्यास मदत होते.
मोर्स संकेत हवे तर आधीच्या पिढीतले इंटरनेट मॅसेन्जरच समजा.
आजच्या पिढीतले चॉ‍टींग आपण मोर्स संकेत (तारयंत्र) च्या सहाय्याने करु शकतो.
मोर्स कोड ही संकेत भाषा छंद म्हणुन काहि लोक वापरत आहेत, त्यांना हॅम असे म्हणतात.. HAM (Humanity for Mankind)
बहुतेक लोक हॅम म्हणुन प्रसिध्द आहेत .
हॅम होण्याकरिता एक परिक्षा द्यावी लागते ती परिक्षा दरवर्षी भारत सरकार घेत असते.
आपले प्रसिध्द माजी राजनेते स्व राजीव गांधी व आताचे फिल्म बादशाह अ‍मीताभ बच्चन हे लोक हॅम परिक्षा पास असुन या मोर्स दळणवळणाचे चाहते आहेत .
मोर्स कोड पाठविणे साठी आवश्यक वस्तु म्हणजे
1) मोर्स कि - एक प्रकारची चाबी जी टक -टिक टिक करताच संकेत रेडीओ तरंगाद्वारे पाठविले जातात़.
2) रेडीओ सेट - एक प्रकारचा रेडीओ अम्प्लिफायर ज्याद्वारे संकेत रेडीओ तरंगाद्वारे पाठविले जातात़.
3) बॅटरी - रेडीओ सेट ला लागणारी.
4) एक तार - जीचा वापर अन्टेना म्हणुन करता येतो

Comments

विकसित भाषा व मराठीचे भवितव्य

मोर्स कोड प्रमाणेच विकसित झालेल्या मराठी भाषेचे भवितव्यही किती उज्ज्वल आहे याची जाणीव खालील नवे शब्द पाहून झाली.

विकसीत
अर्थपुर्ण
कुठल्याहि
अगदि
कोणालाहि
पाठवुन
टयुन
म्हणुन
अजुनहि
जानकार
नाहि
म्हणुन
चॉ‍टींग
परिक्षा
अ‍मीताभ
असुन
वस्तु
कि

शिवाय वरील लेखात खालील हिंदी शब्दही मराठी म्हणूनच वापरले आहेत.

राजनेते : याला मराठी शब्द राजकारणी असा होता.
चाबी : याला मराठी शब्द चावी किंवा किल्ली असा होता.
स्व. : स्वर्गीय चा वापर मराठीत त्या गोष्टीचा गौरवपूर्ण उल्लेख करण्यासाठी होतो. उदा. स्वर्गीय सौंदर्य वगैरे. मृत्यू पावलेल्या व्यक्तीचे संबोधन करण्यासाठी मराठीत
कै. : कैलासवासी
वै. : वैकुंठवासी
पै. : पैगंबरवासी
ख्रि. : ख्रिस्तवासी
बु. : बुद्धवासी

असे पर्याय उपलब्ध आहेत. आता राजीव गांधी हे जन्माने पारशी असल्यामुळे तुम्ही त्यांना झ. (झरतुष्ट्रवासी) म्हणू शकता.
मात्र राजीव गांधी हे "स्वर्गीय" होते हे माझ्या मराठमोळ्या मनाला काही केल्या पटत नाही.

अवांतरः दीपक हे नाव व्याकरणदृष्ट्या अधिक योग्य आहे.

सूचना

नव्या सदस्यांच्या लेखनात जास्त खुसपटे काढू नयेत. त्यांना जरा येथे रुळू द्यावे. ज्यामुळे नवीन सदस्यांचा लिहिण्याचा हुरूप नष्ट होणार नाही.

नवीन सदस्यांनीही अगदी प्राथमिक अशा शुद्धलेखनाच्या चुका करु नयेत असे वाटते. अन्यथा असे प्रतिसाद येतील. त्याचे वाईट वाटून घेऊ नये.मराठी टंकलेखनासाठी वापरा.

सूचना आवडली.

योगेश यांच्या सूचनेशी सहमत. मराठी संकेतस्थळावरील नव्या सदस्यांना लेखन करताना त्रास होत असावा असे वाटते. त्यांना शक्य असल्यास मदत करावी. इतरांच्या चुका काढणे खरंच सोपे असते. याबरोबरच नव्या सदस्यांनी थोडे थांबून, लेखन तपासून ते टाकावे.

अवांतरः राजीव गांधी आडनावाने पारशीच असावेत परंतु त्यांच्या जीवनाचा आढावा घेतला असता आणि त्यांचा अंत्यविधी लक्षात घेतल्यास ते झरतुष्ट्रवासी झाले असावेत का याबाबत साशंक आहे.

मोर्स कोड अजूनही वापरात आहे का याबाबत जाणून घ्यायला आवडेल.

तिघांशीही सहमत..

सर्कीट, योगेश, आणि प्रियाली या तिघांशीही सहमत..

;)

आपला,
(सेफ गेम खेळणारा!) तात्या.

इथे आम्ही काहीही बरळतो - http://tatya7.blogspot.com/

अरे हा आपला सर्किट नाही आहे,

अरे हा आपला सर्किट नाही आहे,
हा हा कोणी तरी वेगळाच आहे http://mr.upakram.org/user/546 ! नाव वाचून माझा ही गोंधळ झाला होता पण
हा कोणीतरी दुसराच महाभाग आहे.... उपक्रमराव ह्यासाठीच मी मी सदस्य-देवाण घेवाण हा शब्द वापरला होता. व तुम्हाला आग्रह करीत आहे की मी लिहलेल्या चर्चचे फक्त वाचक बनू नका तर साध्य झाले तर त्या चर्चेचा भाग देखील बना प्रतिसाद देऊन अन्यथा तुम्ही व मनोगत ह्यात काहीच फरक राहणार नाही. ह्याची नोंद असावी. कारण मनोगतकार देखील खुपकाळ प्रशासक ह्यानावानेच वावरायचे पण काही काळेने सदस्यांना त्यांचे खरे नाव कळालेच ना ! मग लपून का राहता ? तुम्ही उपक्रम चालू करुन काही गुन्हा नाही केला आहे उलट एक विधायक कामच केले आहे.

आपले सर्किट राव हे नसुन हे आपले आहेत http://mr.upakram.org/user/24 ! हा कोणीतरी वेगळाच मनुष्य आहे नाहीतर असला प्रतिसाद ह्यांच्या कडुन अपेक्षीत नव्हता !

तुम्ही कोणी ही असाल अबक पण तुमचा उद्देश चांगला वाटत नाही आहे..... काय कारण असावे ! हे तुम्ही स्वतःच ओळखा व उपक्रमराव ह्यांना निरोप पाठवून आपले सदस्य नाव बदलून ह्यावे व ख-या नावेने समोर तुम्ही यावे ही अपेक्षा नाही पण मराठी पणाला काळीमा फासू नका ही विनंती.

"मोर्स कोड प्रमाणेच विकसित झालेल्या मराठी भाषेचे भवितव्यही किती उज्ज्वल आहे याची जाणीव खालील नवे शब्द पाहून झाली."

तुंमचा हा प्रतिसाद पाहून तर मला वाटते की तो सदस्य बिचारा किती ही नवा असला तरी आपले लेखन पुन्हा करणार नाही / करु नये असा बंदोबस्त तुम्ही केलात ! काय प्रतिसाद आहे ! प्रत्येक वाचकाने लेखकाच्या जागी यावे व मग विचार करावा की तुमच्या पहिल्या वाहील्या लेखनाला असा पहिला प्रतिसाद मिळाला तर् ?

राहीली शुध्दलेखनाची बाब ! हिंदीची बाब !
एक तर तुम्ही अजून १९०७ च्या काळाच्या आसपास राहता अथवा तुम्ही अजून महाजालासाठी परिपक्व नाही आहात ! असे मला वाटते !
नाहीतर तुम्हाला ईतका शुध्द मराठीचा पुळका असेल तर प्रथम आपल्या मराठी समाचारपत्रांचे मराठी सुधारा.... नंतर टि.व्ही. वाल्यांचे नंतर राजकारणी मंडळींची... व जर वेळ मिळालाच तर माझी शुध्दलेखन कला सुधारा व मग नवीन एखाद्या सदस्याच्या पाठीमागे पडा !

तुमचा प्रतिसाद अपेक्षीत नाही तर आग्रहाचा आहे !

नाही तर *** शेपुट व *** समोर ओका-या ! हाच ग्रह माझा तुमच्यासाठी राहील !

धन्यवाद.

मी लपून राहत नाही
माझे नाव राज जैन आहे !
माझे शब्द ! , मनोगत, उपक्रम व गुगल मध्ये तुम्हाला माझी माहीती मिळेलच !

राज जैन !

प्रतिसाद!

उपक्रम व इतर संकेतस्थळावरील सर्किट ही व्यक्ती मी नाही. हे स्वतः सर्किट यांनीच येथे सांगितले आहे. मात्र त्यांनी लिहिलेल्या या प्रतिसादातील भावना ही माझ्या प्रतिसादापेक्षा वेगळी नाही. व्याकरणशुद्ध मराठी वापरण्याला कोणीही सूज्ञ व्यक्ती विरोध करणार नाही.

माझ्या अशा प्रतिसादाच्या हेतूविषयी तुम्ही शंका व्यक्त केली आहे.
येथे लेखन करणार्‍या लोकांनी व्याकरणाच्या दृष्टीने योग्य असे लेखन करावे असा आग्रह धरणे हा चांगला उद्देश नाही का? मराठीत आधीच शब्द उपलब्ध असताना त्याला पर्याय म्हणून दुसर्‍या भाषेतील शब्द (ज्यांचा मराठीत संपूर्णपणे वेगळाच अर्थ आहे) वापरण्याला विरोध करणे ही योग्यच गोष्ट आहे. येथे मराठीपणाला काळिमा कसा फासला गेला आहे?

दिपकजी यांनी येथे लेखन करु नये म्हणून मी असा प्रतिसाद दिला असा त्यांचा गैरसमज झाला असेल तर तो चुकीचा आहे हे मी स्पष्ट करतो. त्यांनी येथे लेखन करावे. योगेश व प्रियाली यांनी म्हटल्याप्रमाणे नवीन सदस्यांना बोचणारे व दुखावणारे प्रतिसाद मी देणार नाही. मात्र जुन्या सदस्यांनी तरी अगदी बाळबोध अशा व्याकरणाच्या चुका करु नयेत.
वाचकाने लेखकाच्या जागी येण्याइतकेच लेखकानेही वाचकाच्या जागी स्वतः आहोत अशी कल्पना करुन आपले म्हणणे आपण वाचकापर्यंत पोचवण्यात यशस्वी ठरत आहोत का याचा विचार करावा. अन्यथा एवढा वेळ घालून आपण मराठीमध्ये टंकलेखन करतो व वाचक काय लिहिले आहे हे समजण्यासाठी दुप्पट वेळ घालवतो असे होईल.

महाजालासाठी परिपक्व होणे म्हणजे काय आहे याचे मार्गदर्शन आपण आम्हाला नक्की करावे.

आपण आग्रह केलाच आहे तर तुमच्या लेखनातील खालील शब्दांविषयी सूचना करतो. आणि माझा प्रतिसाद तुम्ही वैयक्तिकरीत्या घेणार नाही अशी आशा करतो. माझे शब्द व मराठी संकेतस्थळांवरील तुमचे कार्य मला परिचित आहे. तुमच्या कार्याबद्दल मला आदरही आहे. मात्र अशा लहानसहान गोष्टींचे गालबोट अशा कार्याला लागू नये असे प्रामाणिकपणे वाटते.

लिहलेल्या
चर्चचे
खुपकाळ
ह्यानावानेच
नसुन
कडुन
अपेक्षीत
वाहील्या
राहीली
ईतका
टि.व्ही.
अपेक्षीत
माहीती

समाचारपत्र यासाठी मराठी शब्द वर्तमानपत्र / वृत्तपत्र असा आहे.
"एखाद्या गोष्टीचा समाचार घेणे " या वाक्प्रचारात तुम्हाला समाचार या शब्दाचा मराठीतील अर्थ समजेल.

कळावे,
शॉर्ट सर्किट.

मित्रवर्य

अरे !
मित्रवर्य तुमचे सदस्य नाव " शॉर्ट सर्किट " आहे पण मी तुम्हाला ह्म्म्म ........ शॉर्ट नावाने लिहीन कारण सर्किट नावाचे सदस्य व माझे मित्र पुर्वी पासुनच (मनोगत पासून) मला माहीत आहेत.

मुळ मुद्दा !

तुमच्या विषयी वाईट-ग्रह होण्यामागे तुमचे सदस्य नावच कारणीभूत आहे (तुम्ही नाही) कारण मनोगतवर, माझे शब्द वर व ईतर महाजालावर काही घटना घडल्या आहेत जेणे करुन माझे मत असे बनले आहे ईतरांची नावे धारण करुन मजा लुटणे ही आजकाल मराठी संकेतस्थळावर सामान्य गोष्ट झाली आहे असे वाटावे ईतके हे प्रकार घडले आहेत , ह्या बद्द्ल क्षमा असावी.

मी ईतका वाईट प्रतिसाद लिहल्या नंतर ही तुम्ही ज्या सभ्य भाषेत प्रतिसाद दिला आहात हे पाहून मला अत्यंत आनंद झाला व मी आपला आभारी आहे.

शुध्द लेखन हे असावे माझे ही मत आहे. पण अतिरेक नको..
प्रयेक नवीन पिढी ही आपली नवीन संपर्क भाषा बनवतच असते असे मला तरी वाटते !
आपण जे लिहतो ते ईतरांना वाचता यावे ही अपेक्षा पण काही अडचणी असतात येथे स्प्ष्ट करणे उपक्रमच्या नियमाबाहेर आहे (तुम्ही मनोगत वर " माझे शब्द" ह्या सदस्याचे लेखन व प्रतिसाद पाहा तुम्हाला उत्तर मिळेल.)

तुमच्या आधी ही एक आपली मनोगती सदस्या "....." ह्यानी मनोगत वर व माझे शब्द वर मराठी शुध्द लेखनासाठी माझा पिच्छा केला होता व त्यांच्याच प्रयत्नाचे फलीत आहे की माझे शब्द वर प्रथम महिन्यात ९० % शुध्द लेखन् चुका होत्या व सध्या ३०- ४० % आहेत.
( माझा जो वर प्रतिसाद आहे त्या प्रतिसादामध्ये तुम्ही १३ चुका काढल्या पण तुमच्या जागी त्या असत्या तर शक्यतो माझे सर्वच लेखन रद्द झाले असते .. :))

तरी ही तुम्ही माझ्या प्रतिसादाचे वाईट वाटून न घेता मला योग्य भाषेत उत्तर दिले ह्यातच मी समाधान मानत आहे.

आपला मित्र,
राज जैन

सरकारी परवानगी

माझ्या माहीती प्रमाणे सरकारी परवानगी देखील घ्यावी लागते ना ही सुविधा वापरताना ?

जर जास्त माहीती असेल तर प्रकाशीत करावी.

राज जैन

इंडीपेंडन्स डे

या तद्दन हॉलीवूडीयन चित्रपटात परग्रहवासियांच्या आक्रमणानंतर सर्व दळणवळण साधने बंद पडल्यानंतर देशांमध्ये मोर्स कोडच्या सहाय्याने संपर्क साधला जातो.

हॅमच्या अभ्यासक्रमातून काढणार!

सद्याच्या आधुनिकतेच्या जगात मोर्स कोडचे स्थान नगण्य आहे असे म्हणतात त्यामुळे आता ती हॅमच्या अभ्यासक्रमातूनही काढली जाईल असे कळते. तरी देखिल मोर्स सद्याच्या रुपात न राहता इलेक्ट्रॉनिक स्वरुपात कोडर/डिकोडर च्या रुपाने काँप्युटर द्वारा वापरात राहील. त्यामुळे मोर्सची प्राथमिक ओळख असावी म्हणून ती जूजबी स्वरूपात शिकवली जाईल.

(ही ऐकीव माहिती आहे. मी त्यातला तज्ञ नाही.)

मोर्स कोड

मोर्स कोड हा पोलिस बिनतारी विभागाचे पोट भरण्याचे साधन आहे. त्याची गुढता ही आम्ही जाणीवपूर्वक जोपासली आहे. आमच्याकडे अभियांत्रिकी व वाहतूक असे मुख्य दोन प्रवाह आहेत. प्रत्यक्ष संदेशाचे दळणवळण करणारे बिनतारी यंत्रचालक हा वाहतूक विभागाचा पाया तर अभियांत्रिकि विभागाचा पाया म्हणजे रेडिओ यांत्रिक. आता मोर्स कोड वापरात असलेले एच एफ हे खूपच कमी वापरात् आहे.(आमचे अस्तित्व टिकवण्यापुतरते) मोबाइल क्रांती मुळे बिनतारी विभागाचे अस्तित्व धोक्यात आले आहे. पण सुरक्षिततेला मोल नसते या तत्वावर् हे अस्तित्व टिकून आहे. पोलिस बिनतारी विभाग,पाषाण रोड पुणे ४११००८ फोन ०२० २५६५२५०५ या मुख्यालयात या तंत्नज्ञानाचा विकास दाखवणारे प्रदर्शन आहे.
प्रकाश घाटपांडे
(ताजा ताजा स्वेच्छानिवृत्त रेडिओ यांत्रिक)
Visit my VRS in Unicode format at http://bintarijagat.blogspot.com .
Also Visit http://faljyotishachikitsa.blogspot.com for review of my book "Jyotishakade janyapurvee..Prashnottaratoon Susanvaad" by Prof Jayant Natralikar

माफ करा.. पण पुन्हा लिहीतोय..

आपल्या सर्वांच्या प्रतिसादाबद्दला धन्यवाद.. मला माहित आहे.. थोडे नव्हे भरपुर उशीरानेच उत्तर देतोय.. ते तुम्ही ग्राह्य धरणार की नाही? या बद्दल साशंक आहे. थोडा नवखा व वयाने कमी असतांना मी मोर्स कोड बद्दल लिहीण्याचा प्रयत्न केला होता.
मा.शॉर्टसर्कीट यांच्या कडून मिळालेल्या प्रतिसादामुळेच मी माझे लिखाण उपक्रमावर बंद केले होते. राहीले मोर्स कोड विषयी तर या विषयात आपल्या कडून चर्चा अपेक्षीत होती. मला वाटते कोणत्याही चर्चेसाठी भाषा शुध्दीकरणाची गरज नसावी. तो भाग साहित्य संमेलना साठी राखून ठेवावा (नाहीतरी साहित्य संमेलनात दुसरा विषय मिळणे दुरापास्तच आहे.) मी मुळचा वैदर्भीय असल्याने व विदर्भ हा पुर्वीचा मध्यप्रदेश भागातील असल्याने माझी मराठी ही पुणेरी मराठी नाही. तसे असण्याचे कारणही नाही. कारण मराठी म्हणजे पुणे असे जर कोणी मानतो आहे, किंवा मानित असेल तर तो शुध्द मुर्खपणाच ठरेल.
असो.. माझ्या समर्थनार्थ दिलेल्या प्रतिक्रीयांनी मी भारावून गेलो आहे. हा दुवा महाजालात शोधता शोधता सापडला.. मध्यंतरी तर मी हा विषय पुर्णपणे विसरून गेलो होतो. काही वर्षानंतर कां असेणा पण प्रतिसाद दिल्याशिवाय कसे जमेल?
मोर्स कोड विषयी चर्चा करणे मला नक्कीच आवडेल. कारण माझे पहिले प्रेम मोर्स कोडचं आहे.
घाटपांडे साहेबांना मोर्स कोड विषयी जुजबी माहित असणे अपेक्षीत नाही. त्यांचे काम फक्त संच दुरूस्ती पर्यंत मर्यादीत आहे. पण तरीही, त्यांनी प्रयत्नपुर्वक दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
शुद्धलेखनाविषयी क्षमस्वः (मराठी टंकलेखनात अजूनही नवखाच आहे. एवढे लिहायला सुध्दा अर्धा तास वेळ लागला..)

आपल्या सर्वांचा आभारी आहे..
आपलाच..
दिपकजी.

 
^ वर