उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
मैत्रीपार्कस् असावेत का?
विसोबा खेचर
May 6, 2007 - 11:06 am
राम राम मंडळी,
सकाळी फिरायला जाणार्या/जॉगिंगला जाणार्या लोकांकरता जसे जॉगर्स पार्कस् असतात, आज्जी आजोबांकरता जसे नाना नानी पार्कस् असतात, लहानग्यांना खेळण्याकरता जसे सीसॉ, घसरगुंडी असलेले पार्कस् असतात,
त्याचप्रमाणे प्रेमी युगुलांना दोन घटका हातात हात, गळ्यात गळे घालून बसण्याकरता, अंधार्या कोपर्यात बसून थोड्डसं कुचुकुचू करण्याकरता मैत्रीपार्कस् ही असावेत अशी कल्पना अलिकडे मूळ धरू लागली आहे.
मंडळी, आपल्याला काय वाटतं? अश्या जागा असाव्यात की नसाव्यात? असाव्यात तर का असाव्यात? नसाव्यात तर का नसाव्यात? अर्थात, असाव्यात/नसाव्यात ची कारणे देणं हे ऑप्शनल आहे बरं का! ;)
माझं मत - अश्या जागा असाव्यात!
आपलं मत?
धन्यवाद,
आपला,
(बागेतल्या बाकड्यावरचा!) तात्या.
दुवे:
Comments
मैत्री पार्क नसावेत
माझ मत अश्या जागा नसाव्यात. प्रेमी युगूल असे तसे अश्लील चाळे खुल्या मैदानात ,बस थांबा,रस्त्यावर,इ. ठीकाणी करतात आणि असे पार्क बनवल्यावर तर बघायलाच नको. आणि तात्यानू ठाण्यात हे मैत्री पार्क सुरू झाल्याच मी ऐकलय.
(मजकूर संपादित)
आपला
कॉ.विकि
नसावेत
असे मैत्रि पार्कस् असू नयेत.. परप्स्पर संमतीने कायद्यात बसेल असे कसलेही वर्तन प्रेमियुगुलांना कोणत्याही पार्क मध्ये करता यावे.. त्यासाठी शासनाचा आणि पर्यायाने लोकांचा पैसा असल्या पार्कस् निर्मिण्यात जाऊ नये... कुणाला वैयक्तिक निधी उभारुन खर्च करायचा असेल तर तो ज्याच त्याचा प्रश्न आहे
हेच
म्हण'तो'.
पार्क
माझ्यामते पुष्कळ पार्क असावेत. त्यात हा आजी आजोबांचा, हा तरुणांचा असला फार भेदाभेद नसावा. फारतर सीसॉ, घसरगुंडी वाले लहानमुलांचे आणि बाकडी, हिरवळ वाले मोठ्या माणसांचे असे असले की झाले.
मैत्री पार्क्स् कोणाला हवेत?
या विषयावर म.टा.च्या मुंबई टाइम्स् पुरवणींत गेल्या काही दिवसांत दर शुक्रवारी प्रसिद्ध झालेल्या पत्रांवरून असे दिसते की उघड्यावरील प्रेमाचे समर्थन करणारे व मैत्री पार्क्स् हवेत म्हणणारे सर्व पत्रलेखक पुरुष आहेत. ज्या महिला पत्रलेखक आहेत त्यांच्यापैकी कुणीही त्या कल्पनेला अनुकूलता दर्शवलेली नाही. एका पत्रलेखिकेने तर उघड्यावर प्रेम व्यक्त करणे हा निर्लज्जपणा आहे असे म्हंटले आहे. यावरून असे दिसते की स्त्रियांना उघड्यावर प्रेमाचे प्रदर्शन मान्य नाही. पोलीसांच्या कारवाईंत ज्या सापडल्या त्या सोबत असलेल्या पुरुषांच्या इच्छेपुढे हतबल झाल्यामुळे त्यांत अडकल्या असाव्यात.
ज्यांच्यासाठी मैत्री पार्क्स् निर्माण करायचे त्यांतल्या अर्ध्या व्यक्ति त्या कल्पनेला अनुकूल नसतील तर ते बांधायचेच कशाला?
संदेहपूर्ण/फसवा निष्कर्ष
श्री. कोर्डे,
ज्या महिला पत्रलेखक आहेत त्यांच्यापैकी कुणीही त्या कल्पनेला अनुकूलता दर्शवलेली नाही. एका पत्रलेखिकेने तर उघड्यावर प्रेम व्यक्त करणे हा निर्लज्जपणा आहे असे म्हंटले आहे. यावरून असे दिसते की स्त्रियांना उघड्यावर प्रेमाचे प्रदर्शन मान्य नाही. पोलीसांच्या कारवाईंत ज्या सापडल्या त्या सोबत असलेल्या पुरुषांच्या इच्छेपुढे हतबल झाल्यामुळे त्यांत अडकल्या असाव्यात.
हा निष्कर्ष अतिशय घाईत, पुरेशा विदा विश्लेषणाविना काढलेला आणि म्हणूनच संदेहपूर्ण/फसवा वाटतो. पत्रलेखिकांचे वयोगट आणि मॅरिटल स्टेटस या दोन अंगांचा हा निष्कर्ष काढताना विचार केलेला दिसत नाही. साधारण >४० वर्षे वयोगटातील लेखिकांनी तुम्ही म्हणताय त्या निष्कर्षाप्रत येण्याइतपत विश्वासार्हतेने पत्र लिहिलेले असू शकते. तसेच अशा बहुतांश लेखिका विवाहित असण्याची शक्यता (भारतीय समाजमानसानुसार) जास्त आहे. < ४० वर्षे वयोगटातील स्त्रिया आणि अविवाहित अथवा विवाहाच्या उंबरठ्यावरील युवती आणि नुकत्याच तारुण्यात पदार्पण केलेल्या मुली यां संख्यांवर अवलंबून तुमचा निष्कर्ष चुकीचाही ठरू शकतो. आमच्या विदा विश्लेषणशास्त्रात याला 'इफेक्ट ऑफ हिडन वेरिएबल्स' असे संबोधले जाते (वय आणि मॅरिटल स्टेटस ही ती 'हिडन वेरिएबल्स' होय)
बाकी अशा स्वतंत्र बागा तयार करण्याची गरज बिलकुल वाटत नाही. एकमेकांवर खरे प्रेम करणारे प्रेमवीर बागांची उपलब्धी अथवा अभाव यांवर अवलंबून न राहता प्रेम आपापल्या विवेकबुद्धीनुसार व्यक्त करणारच आणि प्रेम म्हणजे केवळ कामोद्दीपनाचे प्रकटीकरण मानणारे त्यांना हव्या त्या मार्गाने व्यक्त करणारच. अशा मैत्री पार्क्सपेक्षा लहान मुले (शक्यतो वयोगट < ८ वर्षे) आणि ज्येष्ठ नागरीक यांच्यासाठी बागा तयार होणे अधिक श्रेयस्कर वाटते.
हिडन् व्हेरिएब्ल्स्
१)'हिडन् व्हेरिएबल्स्' पत्रलेखिकांच्या बाबतींत विचारांत घ्यायची असतील तर ती मैत्री पार्क्स् ना अनुकूल असणार्या पुरुष पत्रलेखकांच्या बाबतींतही विचारांत घ्यावी लागतील.
२) ४० वर्षांपेक्षा कमी वयोगटांतील, अविवाहित, विवाहाच्या उंबरठ्यावरील युवती, नुकत्याच तारुण्यांत पदार्पण केलेल्या मुली यांपैकी कुणीही मैत्रीपार्क्स्बद्दल अनुकूल लिहिण्यास पुढे येऊ नये ही गोष्ट स्त्रियांची मानसिकता दर्शवत नाही का?
खरंच?
अविवाहित, विवाहाच्या उंबरठ्यावरील युवती, नुकत्याच तारुण्यांत पदार्पण केलेल्या मुली यांपैकी कुणीही मैत्रीपार्क्स्बद्दल अनुकूल लिहिण्यास पुढे येऊ नये ही गोष्ट स्त्रियांची मानसिकता दर्शवत नाही का?
आपल्या प्रतिसादावरून असे दिसते की अजून स्त्रिया अशा संवेदनशिल विषयावर चर्चा करण्याईतक्या प्रगल्भ नाहीत..??? आणि जे काही होतं ते फक्त् पुरुषांच्यामुळे होतं?? टाळी एका हाताने वाजते? दर् वेळी दोघांची संमती नसेल् पण म्हणून् काय् कायमच नसेल्??
रस्त्यावर चाळे करण्यापेक्षा पार्कमध्ये एका कोपर्यात बसून केलेले काय् वाईट. संभाजी गार्डन मध्ये चालतं ते रस्त्यावर सुरू झालं तर कसं दिसेल?
प्रेमी युगुलं एकत्र बसून् नुसत्या गप्पा मारू नाही शकत का? की फक्त शारीरिक ओढीनेच ते जवळ आलेले असतात?
आणि मैत्री पार्क असं नाव दिलंय..मैत्री म्हणजे निखळ मित्र्-मैत्रिणी सुद्धा असतात. त्यांनी अशा पार्क मध्ये बसलं तर गुन्हा आहे??
(उत्तराच्या अपेक्षेत) अभि
वा!
प्रेमी युगुलं एकत्र बसून् नुसत्या गप्पा मारू नाही शकत का? की फक्त शारीरिक ओढीनेच ते जवळ आलेले असतात?
आणि मैत्री पार्क असं नाव दिलंय..मैत्री म्हणजे निखळ मित्र्-मैत्रिणी सुद्धा असतात. त्यांनी अशा पार्क मध्ये बसलं तर गुन्हा आहे??
वा अभिजित! अरे तुझा प्रतिसाद वाचला आणि डोळ्यातून पाणी आलं रे! ;)
तात्याला नेमकं काय म्हणायचंय हे तू अगदी बरोब्बर ओळखलंस बघ! मी तुझ्या प्रतिसादाशी सौ फी सदी (असं काहीसं हिंदीत म्हणतात!) सहमत आहे! मागच्या जन्मी आपले काय ऋणानुबंध होते कुणास ठाऊक!
आपला,
(मैत्रीपार्कमध्ये आनंदाने आपल्या प्रिय सखीची वाट पाहणारा आणि आल्या आल्या तिला भेट म्हणून देण्यासाठी भैय्याकडून आधीच दोन रुपयांची चण्यांची पुडी घेऊन ठेवणारा! ;)
तात्या.
ती आल्यावर भैया तिथेच थांबला तर पंचाईत!
इथे आम्ही काहीही बरळतो - http://tatya7.blogspot.com/
गुन्हा?
रस्त्यावर चाळे करण्यापेक्षा पार्कमध्ये एका कोपर्यात बसून केलेले काय् वाईट. संभाजी गार्डन मध्ये चालतं ते रस्त्यावर सुरू झालं तर कसं दिसेल?
या वाक्यात तुम्हालाही त्यांचे असे वर्तन सार्वजनिक ठिकाणी योग्य नाही असे सुचवायचे आहे का? तसे असेल तर यांच्या अशा वर्तनासाठी साठी खास 'सार्वजनिक ठिकाणे' निर्माण केली जावीत असे आपल्याला वाटते का?
प्रेमी युगुलं एकत्र बसून् नुसत्या गप्पा मारू नाही शकत का? की फक्त शारीरिक ओढीनेच ते जवळ आलेले असतात?..आणि मैत्री पार्क असं नाव दिलंय..मैत्री म्हणजे निखळ मित्र्-मैत्रिणी सुद्धा असतात. त्यांनी अशा पार्क मध्ये बसलं तर गुन्हा आहे??
अशा निखळ मित्र-मैत्रिणी साठी, एकत्र बसून गप्पा मारणे हा सध्या असलेल्या बागेत देखील गुन्हा ठरत नसावा. मग अशा वेगळ्या बागांची गरज ती काय?
पटले नाही
१)'हिडन् व्हेरिएबल्स्' पत्रलेखिकांच्या बाबतींत विचारांत घ्यायची असतील तर ती मैत्री पार्क्स् ना अनुकूल असणार्या पुरुष पत्रलेखकांच्या बाबतींतही विचारांत घ्यावी लागतील.
जरूर. म्हणूनच म्हटले की कोणत्याही निष्कर्षाप्रत येण्याआधी या सगळ्या अंगांचा विश्लेषणात समावेश असावा.
२) ४० वर्षांपेक्षा कमी वयोगटांतील, अविवाहित, विवाहाच्या उंबरठ्यावरील युवती, नुकत्याच तारुण्यांत पदार्पण केलेल्या मुली यांपैकी कुणीही मैत्रीपार्क्स्बद्दल अनुकूल लिहिण्यास पुढे येऊ नये ही गोष्ट स्त्रियांची मानसिकता दर्शवत नाही का?
असेच काही नाही. कुणी अनुकूलतेबद्दल न लिहिणे अथवा लिहिणे याचा यासंबंधी अनुकूल/प्रतिकूल असण्याच्या मानसिकतेबरोबरच आपले म्हणणे पत्र अगर इतर माध्यमांमधून स्पष्टपणे मांडण्याची हातोटी आणि इच्छा यांच्याशीही संबंध आहेच.
'उपक्रम' वर ही स्त्री सदस्य आहेत.
कुणी अनुकूलतेबद्दल न लिहिणे अथवा लिहिणे याचा यासंबंधी अनुकूल/प्रतिकूल असण्याच्या मानसिकतेबरोबरच आपले म्हणणे पत्र अगर इतर माध्यमांमधून स्पष्टपणे मांडण्याची हातोटी आणि इच्छा यांच्याशीही संबंध आहेच.
प्रस्तुत लेखावर आतापर्यंत प्रतिसाद लिहिणार्यांत मृदुलाताईंचा अपवाद सोडला तर एकही स्त्री-सदस्य नाही. मृदुलाताईंचा प्रतिसाद चर्चाविषय असलेल्या मैत्रीपार्क्स् ना अनुकूल नाही. प्रतिकूल लिहायला एकतरी महिला पुढे आली. काही महिला अनुकूल असतील असे क्षणभर गृहीत धरले तर त्यांच्यापैकी एकीलाही हातोटी व इच्छा नाही असे म्हणणे धाडसाचे ठरेल.
निष्कर्ष
प्रस्तुत लेखावर आतापर्यंत प्रतिसाद लिहिणार्यांत मृदुलाताईंचा अपवाद सोडला तर एकही स्त्री-सदस्य नाही.
हे लिहीताना परीवश या स्त्री सदस्या नाहीत असा निष्कर्ष आपण काढलेला दिसतो. हा निष्कर्ष अतिशय घाईत, पुरेशा विदा विश्लेषणाविना काढलेला आणि म्हणूनच संदेहपूर्ण/फसवा वाटतो.
परीवशांचा प्रतिसाद
परीवश स्त्री-सदस्या आहेत हे मला माहीत नव्हते. ती चूक सुधारल्यास व परीवश यांचा ७ तारखेचा मूळ प्रतिसादांतील "बाकी अशा स्वतंत्र बागा करण्याची गरज बिल्कुल वाटत नाही" या विधानाने सुरू होणारा परिच्छेद पाहिल्यास त्याही चर्चाविषय असलेल्या मैत्रीपार्क्स् च्या कल्पनेला अनुकूल नाहीत हे दिसून येते. त्याने अनुकूल नसणार्या दोन सदस्या आहेत हे दिसून येते. पण अनुकूल असणार्या स्त्री-सदस्या असल्या पाहिजेत असे दिसून येत नाही.
कूल
माझा प्रतिसाद प्रतिकूलही नाही असे मला वाटते. पुष्कळ पार्क असावेत असे मी म्हटले आहे.
लोकांनी कोणत्याही पार्कात बसून (उभे राहून, पळत इ.) मैत्रीपूर्ण वागायला माझी काही एक हरकत नाही. तसेच असे वागण्यासाठी पार्कांची निर्मिती करण्यालाही नाही. :-)
अनामिक/अनुकूलता
'इतिहासात 'अनामिक' नावाने लिहील्या गेलेल्या बहुतेक सुविचारांमागे स्त्रिया होत्या' असे एक रोचक वाक्य नुकतेच वाचनात आले.
वर्तमान पत्रात दिलेली नावे खरी असतीलच कशावरून?
ज्यांच्यासाठी मैत्री पार्क्स निर्माण करायचे त्यांतल्या अर्ध्या व्यक्ति त्या कल्पनेला अनुकूल नसतील तर ते बांधायचेच कशाला?
यात विरोधाभास दिसतो. ज्यांच्यासाठी म्हणजे कुणासाठी? 'आपल्याला ज्यांच्यासाठी असे पार्क असावे वाटते त्यांच्या साठी'? पण ते जर कल्पनेला अनुकूलच नसतील, तर ही सोय त्यांच्या साठी नसल्याने त्यांचे मत (आपल्या वादापुरते) गैरलागू आहे. उरलेले अनुकूलच आहेत ;).
अर्थात जे अशा सोयीचा (पुरवली असता) वापर करतील, त्यांची अनुकूलता असे पार्क बांधाण्यास पुरेशी आहे?
(अवांतर : गुजरात मध्ये मद्यपानावरील प्रतिबंध हटवल्यास त्याचा पुरेपूर फायदा उठवण्याची तयारी अनेक मद्यपींनी दाखवली होती.)
शब्दांचा कीस
यात विरोधाभास दिसतो. ज्यांच्यासाठी म्हणजे कुणासाठी? 'आपल्याला ज्यांच्यासाठी असे पार्क असावे वाटते त्यांच्या साठी'? पण ते जर कल्पनेला अनुकूलच नसतील, तर ही सोय त्यांच्या साठी नसल्याने त्यांचे मत (आपल्या वादापुरते) गैरलागू आहे. उरलेले अनुकूलच आहेत ;).
मला वाटतं इथे शब्दांचा कीस पाडला जात आहे.
अहो..
हल्ली माझे शब्द राव इथे आहेत. त्यात मैत्री पार्क, त्यात तुमच्या प्रतिसादाचा विषय वाचून जरा भलतेच डोक्यात आले....
- आर्य चाणक्य. मराठीत लिहा.
बाग
नसावेत बहुदा.. 'ही पार्क फक्त हसणार्यांठी आहे' अशी पाटी वाचल्याचे आठवत नाही.. तेव्हा बाग बगिचे जास्तित जास्त असावेत ह्याबाबत दुमत नाही.. ज्याला हसायचे त्याने हसावे रडणार्याने रडावे..
'मारामारी साठी स्पेशल जागा' हा मुद्दा काही पचला नाही! आपल्याल कुस्त्यांची मैदाने असावीत असे सुचवायचे आहे का?
'मारामारी साठी स्पेशल जागा'
'आपापसात' असे सर्किट यांना म्हणावयाचे असावे!
प्रेमी युगुलांना दोन घटका हातात हात, गळ्यात गळे घालून बसण्याकरता, अंधार्या कोपर्यात बसून थोड्डसं कुचुकुचू करण्याकरता मैत्रीपार्कस्
प्रेमी युगुलं एकत्र बसून् नुसत्या गप्पा मारू नाही शकत का?
मैत्री म्हणजे निखळ मित्र्-मैत्रिणी सुद्धा असतात. त्यांनी अशा पार्क मध्ये बसलं तर गुन्हा आहे??
ती आल्यावर भैया तिथेच थांबला तर पंचाईत!
वरील विधानांत विसंगती आहे. आधी सार्वजनिक प्रणयासाठी जागा ही कल्पना आणि नंतर या गोष्टीला जबरा विरोध झाल्यावर 'निखळ मैत्री' अशी सारवासारव असा हा प्रकार दिसतो. निखळ मैत्रीत गळ्यात गळे घालून अंधार्या कोपर्यात कुचूकुचू करण्याची गरज नाही!
सन्जोप राव
तुमी इचारनारं कोन? ;)
आधी सार्वजनिक प्रणयासाठी जागा ही कल्पना आणि नंतर या गोष्टीला जबरा विरोध झाल्यावर
जबरा?? आवं रावदादा, आलिकडं दोन्चार दिसातच कंदी भोमेकाकास्नी तर भेटला न्हाई? ;)
'निखळ मैत्री' अशी सारवासारव असा हा प्रकार दिसतो.
निखळ मैत्रीत गळ्यात गळे घालून अंधार्या कोपर्यात कुचूकुचू करण्याची गरज नाही!
आवं म्हन्जी बगा तसं थोडुसं चालायचंच की! आता बाई म्हनली की थोडीशी सारवासारव कुटं ना कुटं तरी करावीच लागते बगा! ;) आन् आमी मैतरी पार्कात बसून निखळ मैतरी निभावू नायतर आनी काय करू! तुमी इचारनारं कोन? ;) उगा कशापायी बोट ठेवाया लागले आमच्या वर्मावर? ;) पडा की घरी गपगुमान!
जाऊ द्या. तुमी थोरलं भाऊ आमचं! आमी तुमच्या आज्ञेभायेर जानार नाय. तुमी म्हनत असाल तर नाय जानार आमी मैतरी पार्कात. आक्षी दिस मालवायच्या आत घरात परतू!
"सातच्या आत घरात" म्हना की! ;)
वयनिसायबास्नी आमचा दंडवत कळवा. तात्या इचारत व्हता म्हनावं. मोप दिस झाले त्यांच्या हातची भाकर अन् वांग्याचं भरीत खाल्याला! ;)
तात्या.
इथे आम्ही काहीही बरळतो - http://tatya7.blogspot.com/
उडिबाबा!
जे लोक वेगवेगळ्या विषयांसाठी वेगवेगळी संकेतस्थळे असावी असे म्हणताहेत, तेच वेगवेगळ्या विषयांसाठी वेगवेगळे बगिचे असावेत ह्याचा विरोध करताहेत !
आ आ इ ई उ ऊ ए ऐ, उडिबाबा उडिबाबा उडिबाबा, ब्बाब्बा उडिबाबा उडिबाबा उडिबाबा ! ;)
आपला,
तात्या कोल्हापुरे!
सहमत..
राव साहेब, तुमच्याशी पुर्णपणे सहमत....
- आर्य चाणक्य. मराठीत लिहा.
नाव बदला
निव्वळ प्रणय करायचा असेल तरः प्रणय पार्क (इथेताअपापल्या जबाबदारीवर आत जाणे किंवा इंग्रजी ए अक्षर ठळक लिहिणे अशा पाट्या लावू शकतात)
निव्वळ निखळ गप्पा मारायच्या असतील तरः मैत्री पार्क(सर्वांसाठी पण एकमेकांत सुरक्षित अंतर ठेवा)
हसण्यासाठी: हास्य पार्क
आजोबांसाठी: जरठ पार्क..
किंवा: एकाच पार्क मध्ये वरिलप्रमाणे प्रभाग पाडायचे..आणि इकडच्यांनी तिकडे जायचं नाही अशी पाटी लावायची.
तो म्हणतातः
त्यांचे असे वर्तन सार्वजनिक ठिकाणी योग्य नाही असे सुचवायचे आहे का? तसे असेल तर यांच्या अशा वर्तनासाठी साठी खास 'सार्वजनिक ठिकाणे' निर्माण केली जावीत असे आपल्याला वाटते का?
समान हेतू असणारांचा समूह म्हटला तर सार्वजनिक आणि तसे हेतू नसणारांसाठी निषिद्धच असतो. उदा: हास्य क्लब, रोटरी क्लब
दाद देतो! ;)
इथेताअपापल्या जबाबदारीवर आत जाणे किंवा इंग्रजी ए अक्षर ठळक लिहिणे अशा पाट्या लावू शकतात)
(सर्वांसाठी पण एकमेकांत सुरक्षित अंतर ठेवा)
आणि इकडच्यांनी तिकडे जायचं नाही अशी पाटी लावायची.
अभिजित, तुझ्या सूचना बाकी क्लासच आहेत. आपण साला तुला त्याबद्दल मनापासून दाद देतो! ;)
आणि इकडच्यांनी तिकडे जायचं नाही अशी पाटी लावायची.
ही सूचना तर भन्नाटच आहे! ;)))
तो म्हणतातः
!!! ;)
हेही आवडले.
खरं तर तो 'म्हणतो' हे विधान व्याकरणदृष्ट्या जास्त बरोबर असं वाटतं. कारण मुळात 'तो' म्हटलं की आपण अरे-तुरेच करतो. पण तुझा 'तो म्हणतातः' असं म्हणण्यामागचा आदरभाव आणि इनोसन्स भावला! ;)
आपला,
(गाण्या-खाण्यातला!) तात्या.
कल्पनाविलास
तात्या,
बाकी चर्चा विषय मस्तच हो !
असेच मनात आले की जर वर कुणी सुचवल्या प्रमाणे 'प्रणयपार्क' झाले आणि त्याच वेळी शाळेमध्ये ''लैगिक शिक्षणाचे' वर्ग सुरु झाले तर मग शैक्षणिक सहली साठी एक ठिकाण गावातल्या गावात तयार की हो !
( आमचे काळी अशी छोटेखानी सहल ओंकारेश्वरी नदीचा पूर बघायला वगैरे जात असे. )
-- (चणेवाला) लिखाळ.