अरेबियन नाईट मधील एखाद्या जादुई महाल प्रमाणे असलेल्या कैद्यांच्या कोठड्या,

अंधार कोठड्या , जेलरचा धाक, खराब बेचव अन्न, कामात चूक झाली तर मार ,गुंड मवाली खुनी दरोडेखोर यांची दिवसरात्र भीतीदायक साथ-संगत शरीराचे कातडे सोलून काढणारी पोलिसांची अमानुष मारहाण या सगळ्या गोष्टी आठवूनच सामान्य माणूस गुन्हाच काय गुन्हया चा मनात विचार ही करू शकत नाही एवढी पोलीस खात्याची दहाषद सामान्य नागरिकांच्या मनात आहे. पण आता एव्हढी भीती बाळगण्याचे कारण उरले नाही. पण आता एव्हढी भीती बाळगण्याचे कारण उरले नाही. आपल्या . माननीय गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांनी नुसतीच आर्थर रोड जेल ला भेट दिली. तेथील जेल मधील त्यांनी त्यांच्याच शब्दात सुखसोयीचे केलेले वर्णन वाचून सामान्य माणसाला एखाद्या पंचतारांकित हॉटेल चे अदभूत सुरस, रम्य वर्णन वाचत आहोत असेच वाटेल. जेलच्या उंचच उंच दगडी भिंती मागील अरेबियन नाईट मधील एखाद्या जादुई महाल प्रमाणे असलेल्या कैद्यांच्या कोठड्या, त्यांचा थाट- बाट, उंचे लोगोन की उंची पसंद चे राहणीमान बागवे यांनी दिलेल्या माहितीनुसार अबू सालेमच्या खोलीतील टॉयलेट एखाद्या पंचतारांकित हॉटेलला लाजवेल अशा दर्जाचे आहे. एका भिंतीवर वेगवेगळ्या मॉडेल्सची अर्धनग्न पोस्टर्स आहेत. मोहम्मद डोसाच्या खोलीत अनेक कप्प्यांचा भलामोठा डबा आणि पंधरा दिवस पुरतील एवढी फळे, खाद्यपदार्थ होते. कारागृहात कुणा ‘डॉन’ला मोबाइल वगैरे सुविधा मिळतात, कुणी कारागृहाच्या दगडी भिंतींच्या आत दरबार भरवत वगैरे आख्यायिका आपण आजवर ऐकून होतो. पण सालेमच्या टॉयलेटचे वर्णन मंत्र्यांच्या तोंडी ऐकल्यापासून सर्वसामान्य माणसांना कारागृहात रासक्रीडा कराव्याशा वाटतील आणि डोसाच्या डब्याचे वर्णन वाचून तोंडाला पाणी सुटेल, अशी खात्रीच पटली. अजून कायकाय सुविधा मिळत असतील याची आपण कल्पना करू शकतो.

ज्या वेळी मंत्री महोदयांनी या खोली कडे आपला मोर्चा वळवला तेंव्हा तेथे जावू नका . ते आरोपी खतरनाक गुंड आहेत आपल्या जीवितास धोका होईल अश्या लंगड्या सबबी सांगत मंत्री महोदयांना पोलीस अधिकार्यांनी रोकण्याचा पुरेपूर प्रयत्न केला पण मंत्री महोदयांनी जीवावर उदार होवून या कोठड्याना भेटी दिल्याच आणि अलिबाबाची गुहा उघडल्यावर जश्या अनेक चमत्कारी गोष्टी दिसतात तश्या चमत्कारी अफलातून सुखसुविधाच्या आपल्या जनतेला त्यांनी अवगत करून दिल्यात .

अश्या सुविधा भारतात पहिल्या प्रथम फक्त महाराष्ट्रात दिल्या गेल्या या बाबतीत महाराष्ट्र भारतात नंबर एक आहे. महाराष्ट्र विकासात मागे पडला आहे अशी ओरड करणाऱ्याला ही चांगली चपकार बसली आहे. लवकरच महाराष्ट्रा चे मुख्यमंत्री भारतातील सर्व देशातील तुरुंगाना भेटी देणार असून महाराष्ट्रातील तुरुंगांच्या सुखसोयीचे लपटोप वर पॉवर पोईनट प्रेझेनटेंशन देणार असून तेथील सर्व VVIP कैद्यांना महाराष्टात येण्याचे निमंत्रण देण्यात येणार आहे. यामुळे राज्यातील तुरुंगाना मुबलक प्रमाणात VVIP कैदी मिळतील आणि रोजगार ला पोलिसांच्या उद्योगाला मोठ्या प्रमाणत चालना मिळेल असे सरकारी प्रव्रक्त्याने नाव जाहीर न करण्याच्या बोलीवर खास आमच्या पत्रकारांना सांगितले. हा प्रव्रक्ता पुढे म्हणाला जगात कोठेही मिळणार नाहीत अश्या १५ तारांकित सुविधा या कैद्यांना देण्यात येतील. गुन्हेगाराच्या पैसे खर्च करण्याच्या एपती नुसार या तारांकित सुविधा देण्यात येतील. कांही गुन्हेगारांच्या कैदेत जाण्या मुळे त्यांच्या हजारो करोडोच्या उद्योगाचे नुकसान होवून कामगारांवर बेकारीचे संकट ओढवू शकते. या मुळे देशाच्या विकासास अडथळा निर्माण होवून अर्थ व्यवस्थेचे नुकसान होवून देशाची आंतरराष्ट्रीय पत खराब होवू शकते त्यांचा GDP वर वाईट परिणाम होईल म्हणून या उद्योगी गुन्हेगारांना खास १५ तारांकित सुविधा म्हणजे त्यांना त्यांच्या आलिशान घरातच कैदेत ठेवण्यात येईल या मुळे दोन फायदे होतील एक शासनाचा आलिशान कारागृह बांधण्याचा खर्च वाचेल. दुसरा म्हणजे कारखानदारी चालू राहिल्या मुळे देशाची प्रगती होईल. त्याच बरोबर या आलिशान कारागृहाला पर्यटकांनी भेट द्यावी म्हणून स्वातंत्र पर्यटन कंपनी सरकार खाजगी उद्योजकांच्या सहकार्याने काढत आहे.
ताजा कलम:-हा रिपोर्ट इतर कोणत्याही ब्लोगवर आपणास मिळणार नाही हा आमचा दावा आहे. वाचत राहा फक्त THANTHANPAL आणि काळा सोबत राहा.

--
Thanks & regard, आहेत

Thanthanpal,
Always visit:-
http://www.thanthanpal.blogspot.com

 
^ वर