एक किव्वा दोन बस्स...........हिंदू लोकांचा घटता टक्का.
आजकाल जिकडे तिकडे "एक किंवा दोन बस्स" ह्याचे पोस्टर्स लागलेले दिसतात.
"छोटे कुटुंब सुखी कुटुंब" ह्याची सर्वत्र जाहिरात होते आहे.
काही (बर्याच) अंशी हे योग्यच आहे. त्या मुले पालकांना आपल्या पाल्याची व्यवस्थित पणे देखभाल घेता येईल. भविष्यात सुशिक्षित पिढी येण्यास मदत होईल आणि वाढत्या लोकसंखेच्या आलेखला काही प्रमाणात आळा तरी बसेल.
हि झाली नाण्याची एक बाजू
पण........
.
..
...
हा अजून तरी कायदा नाही.
बरीचशी लोक ह्या जाहिरातीच्या मागे लागून एक किंवा दोन मध्येच समाधान मानतात, आणि काही (सुज्ञांनी समजून घेणे) मात्र ५-६ ने आपापली अपत्ये वाढवीत असतात,
त्याने होते काय ?
हळू हळू हिंदूंचा टक्का घसरत चाललेला आहे. ते मात्र कोणाच्याच लक्षात कसे येत नाही. त्यात हिंदू लाकांमध्ये बरेचसे अंतर्गत मतभेद आहेत त्यामुळे हिंदू लोक ठामपणे एक सरकार सुद्धा निवडून आणू शकत नाही. राजकारण्यांना एक गठ्ठा मतातच जास्त रस आहे त्यामुळे असला कायदा होणे भविष्यात तरी शक्य नाही.
अजून एक शोकांकीता म्हणजे एक न शिकलेल्या मताला जेवढी किंमत आहे तीच एका शिकून पुढे गेलेल्याचा मताला किंमत आहे. त्यामुळे ज्या गटाची लोकसंख्या जास्त तोच (पुढे) अधिकारशाही गाजविणार
माझ्या लेखाचा उद्देश असा अजिबात नाही, कि लोकांनी २ पेक्षा जास्त अपत्यांना जन्म द्यावा पण जे जर असंच चालू राहिले तर हिंदू लोकच एक दिवस हिंदुस्थानात अल्पसंख्यांक होतील.
एकतर सर्वांसाठी सारखा ठाम कायदा असावा (जेणेकरून निदान सद्य परीस्थित असलेली हिंदूंची टक्केवारी कायम राहील), नाहीतर १-२ अपत्ये असण्याच्या फसव्या जाहिरातीच्या मागे लागून कोणता निर्णय घेऊ नये.
माझा लेख हा माझे वैयक्तिक निरीक्षण आणि अनुभव यांतून आला आहे. माझी मते हलकी घ्यावीत आणि चर्चा करावी हि विनंती.
जमल्यास तज्ञांनी प्रकाश टाकावा.
Comments
आजच्या मतांच्या लाचार भ्रष्ट्र राजकारणात सर्वाना समान कायदा निर्
आजच्या मतांच्या लाचार भ्रष्ट्र राजकारणात सर्वाना समान कायदा निर्माण करणारा जन्माला येणे शक्य नाही. यावर फक्त एकच उपाय आहे.सर्व समाजात शैक्षणिक सुविधा वाढवणे. आणि याचा निश्चित परिणाम मुस्लीम समाजात ही आता दिसून येत आहे.शिकलेले मुस्लीम युवक विशेषतः युवती हम दो हमारे दो चा आग्रह ठाम पणे धरत आहे. मुलांची फोज निर्माण करून त्यांचे होणारे बेजार संगोपन आणि २ मुलांचे होणारे चांगले संगोपन त्यांच्या लक्षात आले आहे. १९७६ मध्ये आणीबाणीत संजय गांधीने कुटुंब नियोजन मोठ्या प्रमाणात राबवले. पण मतांच्या राजकारणा मुळे भंपक हिंदुत्व वादी समाजवादी पक्षांनी या मोहिमेला बदनाम केले .यामुळे ही मोहीम १०० वर्षे मागे गेली. संजय च्या अनेक चुका झाल्या असतील पण त्याचा देशा बद्दल असलेल्या निष्टा वादातीत होती. आणीबाणीत राजकारण्या पासून नोकरशाही पर्यंत सर्व सुता सरळ झाले होते .
आणि या देशाची परंपरा पाहता लोकशाही कामाची नाही हे माझे ठाम मत आहे. भ्रष्ट्र नेत्यांची भ्रष्ट नेत्याच्या भ्रष्ट्राचारा साठी फक्त जनते कडून निवडलेली शासन प्रणाली म्हणजे भारतीय लोकशाही. लोकशाहीचे हे स्वरूप पाहून अब्राहम लिंकन पासून ते महात्मा सर्व जण स्वर्गात किंवा जेथे असतील तेथे रडत असतील.
हा गरीबीचा आणि आरोग्यसुविधांचा प्रश्न
तुम्ही लिहिलेल्या मुद्यांवर भरपूर चर्चा इतरत्र झालेली पाहिली आहे.
गरीब लोकांना दर जोडपी जास्त मुले असतात. याचे कारण म्हणजे म्हातारपणी मुलांचाच आधार हे गरीबीतून आलेले तत्वज्ञान आहे (शिल्लक ठेवणे अशक्य). याउलट आजकालच्या मध्यमवर्गीयांना उद्देशून केलेल्या जाहिराती पाहिल्या तर त्यात मुलांवर बोझा न टाकता निवृत्तीनंतरचे जीवन कसे जगा यावर विवरण असते. दुसर्रे कारण म्हणजे बालमृत्यु (०-५ वयात होणारे मृत्यु) हा दर भारतात दरहजारी १८० च्या घरात होता (माझी आकडेवारी जुनी आहे.). गरिबांमध्ये हा दर अधिक असल्यास त्यांना जास्त मुलांचा हव्यास वाटणे साहजिक आहे. तिसर्यात अजून संततीनियमनाच्या साधनांची जाण नसणे हे आहे. ही जाण नसणे आता भरपूर कमी झाले असावे.
तुम्ही हिंदू आणि इतर असा उल्लेख केलेला आहे. त्यातील इतरांमध्ये ख्रिश्चन, शीख, बौद्ध, जैन व निरीश्वरवादी याची टक्केवारी वाढल्याचे फारसे माहित नाही. राहिले मुस्लिम तुमचा रोख त्यांच्यावर दिसतो. त्यांच्यातील गरीबीचे प्रमाण जास्त आहे हे देखील त्यांच्या जनगणनेतील मामुली वाढीव टक्केवारीचे रहस्य असू शकेल. हल्लीची एकच जनगणना धर्माधारित झाली. ती नियमीत पणे झाली नाही. दुसरीकडून आलेले निर्वासित, धर्मपरिवर्तन करणारे, आयुर्मान वाढणे (लाइफ एक्स्पेटंसी) असा कुठलाच अभ्यास (धर्मनिहाय) मला आढळला नाही. संतती जास्त होत आहे का यास 'नेट रिप्रॉडक्शन रेट' ही महत्वाची विदा आहे. म्हणजे एका स्त्रीस किती मुले होतात हे नेट रिप्रॉडक्शन रेट दर्शवत असतो. दोन हून अधिक मुले झाली की नेट रिप्रॉडक्शन रेट हा लोकसंख्या वाढीकडे बोट दाखवतो. भारतात हळू हळू तो दोन खाली गेला आहे. याचा अर्थ लोकसंख्यावाढ ही आयुर्मान वाढल्याने होत आहे.
प्रमोद
जर ती एखाद्या संकेत स्थळावर झाली असेल तर दुवा देऊ शकाल काय ?
>> तुम्ही लिहिलेल्या मुद्यांवर भरपूर चर्चा इतरत्र झालेली पाहिली आहे.
जर ती एखाद्या संकेत स्थळावर झाली असेल तर दुवा देऊ शकाल काय ?
चर्चा
२००१ सालच्या जनगणने नंतर ही चर्चा झाली होती एवढे आठवते. मला असा वेगळा दुवा दिसला नाही. गुगलून बघितले तर भरपूर लेख आढळले. मी लिहिले ते लिहिणारा लेख आढळला नाही. (बाजुचे विरुद्ध). तुम्हीही बघू शकता.
प्रमोद
.हिंदू लोकांचा घटता टक्का.
श्री सज्जन यांच्यासारखे विचार करणारे लोक (मग ते कोणत्याही धर्माचे असोत) भारतात आहेत हे खरे या देशाचे दुर्दैव आहे. जेंव्हा केंव्हा या मंडळींच्या मनात ज्ञानाचा प्रकाश पडून त्यांच्या मनातला अंधार दूर होईल तो दिन भारताच्या दृष्टीने खरा सुदिन असेल असे मी मानतो.
चन्द्रशेखर
आपली काहीतरी गल्लत होते आहे,
आपली काहीतरी गल्लत होते आहे,
हे माझे विचार नसून माझे निरीक्षण आहे,
आपल्याला जर खरच अशी परिस्थिती बघायची असेल तर मालेगाव ( महाराष्ट्रतले मिनी पाकिस्तान ) किंवा मोमिनपुरा (पुण्यातले मिनी पाकिस्तान ) येथे एखादी चक्कर मारून यावी.आणि त्यांची होणारी अरेरावी प्रत्यक्ष अनुभवावी.
जर माझे निरीक्षण व (तुमच्या म्हणण्याप्रमाणे) माझे विचार जर खरेच चुकीचे असतील तर मला तर आनंदच होईल.
मला हिंदू , मराठी याचा अभिमान जेवढा आहे त्यापेक्षा किती तरी जास्त भारतीय होण्याचा अभिमान जास्त आहे, पण भारतीय होण्याच्या अभिमानापुढे मी हिंदू ,मराठी च्या अभिमानाचा बळी देऊ इच्छित नाही.
खाली दिलेल्या एक प्रतिसादाप्रमाणे बरेचसे लोक आता छोटे कुटुंब सुखी कुटुंब ह्यात धन्यता मानतात, जर हे खरेच असेल तर सरकार कायदा करायला का धजावत नाहीये ?
माझे तर म्हणणे आहे कि दोन् अपत्यांचाच कायदा करावा, तोच ह्या सर्वांवर ठाम उपाय असेल
पन हा कायदा केल्याने कोण दुखावले जाणार ते जगजाहीर आहे, आणि त्यांच्याच मतांचा गठ्ठा सरकारला सोडायचा नाहीये.
अवांतर : मनात ज्ञानाचा प्रकाश पाडण्यासाठीच तर हे सर्व उहापोह करत आहे. आपल्या सारख्या विचारवंतांनी जर एखादे विचार हे प्रतिसादांनी, विचारांनी खोडून काढले तर प्रकाशही पडेल आणि त्याचा आनंद सुद्धा होईल.
विचार का निरिक्षण
एकतर सर्वांसाठी सारखा ठाम कायदा असावा (जेणेकरून निदान सद्य परीस्थित असलेली हिंदूंची टक्केवारी कायम राहील), नाहीतर १-२ अपत्ये असण्याच्या फसव्या जाहिरातीच्या मागे लागून कोणता निर्णय घेऊ नये.
हे निरिक्षण आपण कोठे कधी व कसे केले हे कृपया विशद करावे.
चन्द्रशेखर
अनुनय आणि मताचा गठ्ठा
>>> पन हा कायदा केल्याने कोण दुखावले जाणार ते जगजाहीर आहे, आणि त्यांच्याच मतांचा गठ्ठा सरकारला सोडायचा नाहीये. <<<
असा 'मताचा गठ्ठा' न सोडण्याचे राजकारण फक्त सध्याचेच सरकार करते असे धागाकर्त्यांना सुचवायचे आहे काय? सत्तास्थानी येणारा प्रत्येक घटक मताचे द्रोण शोधतच असतो. भाजपने पूर्ण ५ वर्षे या देशावर राज्य केले पण कुठेही आणि केव्हाही मुस्लीमविरोधी धोरण राबविल्याचे दिसत नाही. द्विभार्या प्रतिबंधक कायदा, दोनच अपत्ये, अल्पसंख्याक दर्जा रद्द करणे, राखीव जागा हटविणे, आदी कित्येक बाबी त्यांना करत्या आल्या नसत्या का? उलटपक्षी ते सरकार आपल्या पक्षाचा चेहरा अधिक चांगला व निधर्मी दिसावा म्हणून "प्रेस स्पोक्समन्" म्हणून त्यांच्यातील एका मुस्लिम नेत्यालाच पुढे करीत होती ना?
ते तर राहु दे, पण २००५ मध्ये मा.लालकृष्ण अडवाणीसारख्या पंतप्रधानाच्या शर्यतीतील नेत्याने पाकिस्तानात जावून जिनांच्या कबरीवर चादर घालण्यामागे काय प्रयोजन होते? येथील मताच्या त्या गठ्ठ्यासाठीच ना?
सर्व प्रतिक्रिया देण्यार्यांचे हार्दिक आभार.
माझी मते त्यांनी सुद्धा ते करायला हवे होते. त्यांनी केलं नाही म्हणून ते कोणीही करूच नये असे नाही.
>> सत्तास्थानी येणारा प्रत्येक घटक मताचे द्रोण शोधतच असतो.
हे १०० टक्के मान्य.
माझ्या लेखाचा मूळ उद्देश हाच आहे कि सरकारला असा कायदा करण्यासाठी आपण काहीतरी केले पाहिजे. जेणेकरून लोकसंख्या वाढीला आळा बसेल (हा खरा प्रथम फायदा ) आणि सर्व धर्मांची टक्केवारी जशी आहे तशीच राहील (हा दुय्यम म्हणा हवंतर.).
बाकी मला कॉंग्रेस आणि भाजप ह्यांच्यात कोण चूक आणि कोण बरोबर ह्या मध्ये अजिबात रस नाही.
जे कोणी सरकार आहे त्यांच्यावर कश्या प्रकारे ( अर्थात : प्रेमाने ) दबाव टाकता येईल ह्याच्या विचार झाला तर मी हि चर्चा पूर्णत्वास गेली असे समजेल.
आणि जर हे विचार पटले तर नक्की माझे आप्त, मित्र, आजू बाजूचे लोक ह्यां पर्यंत हे विचार पोहोचवता येतील.
अवांतर :
एका प्रतिक्रिये द्वारे हि चर्चा अगोदर झालेली असलेली समजले. पण लेखकाला दुवा देता आला नाही. असो.
मी उपक्रमावर नवीन आहे. (त्यामुळे कृपया नवा गाडी नवा राज असे समजू.)
विचार हे सदा सर्वदा येताच राहणार. जर भविष्यात माझ्या पुढे दुसरे कोणी हे विचार मांडले तर मी नक्की ह्या चर्चेचा दुवा देऊ शकेन.
(संकेत स्थळ हे त्याच साठी असावेत ?)
जेणेकरून चर्चा अधिकच सुलभ होईल.
ज्या प्रमाणे निवडक लेखक यांचे लेख, कादंबर्या, हे जसे माहिती खजिन्याची भंडारे आहेत त्यात पुढे भविष्यात संकेतस्थळ ह्याची सुद्धा भर पडणार हे नक्की.
बाकी सर्व प्रतिक्रिया देण्यार्यांचे हार्दिक आभार.
सज्जन हे दुर्जन आहेत,
सज्जन हे दुर्जन आहेत,
सर्व तथाकथित जमातीतले लोक हे सज्जन आहेत,
सर्व अतिरेकी ऋषी मुनी आहेत, कसाब तर देव आहे, पाकिस्तान स्वर्ग आहे, सरकार ब्रम्हदेव आहे.
एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवितो
जय कसाब, जय अजमल
हे डोकं थंड ठेऊन विचार करा.
हे वाचा, आणि डोकं थंड ठेऊन विचार करा.
१)
२)
फ्याशन
हल्ली सज्जन, गांधीवादी असे आयडी घेऊन द्वेषमूलक लेखन करण्याची फ्याशन आलेली आहे काय?
नितिन थत्ते
(कॅरॅक्टर काऊंटर स्टिल हॅज द बग, सो आय डोण्ट हॅव टु राईट धिस वे)
गरज
आजची गरज आहे निधर्मी लोकांचा टक्का वाढण्याची. हा जस जसा वाढेल तस तशी धार्मिक तेढ कमी होउन अशा चर्चांची गरज भासणार नाही. आंतर जातीय , आंतर् धर्मीय विवाह जसे वाढतील तसे हे अभिनिवेश कमी होतील. जात धर्म कुठला लिहायचा असा प्रश्न पडणार्यांना जेव्हा निधर्मी असा पर्याय शासकीय कागदपत्रात येईल तेव्हा हे जातीपाती धर्माच राजकारण कमी व्ह्यायला वेगाने सुरवात होईल.
माणुसकी धर्माचा टक्का वाढवा.
प्रकाश घाटपांडे
सहमत
>>> जात धर्म कुठला लिहायचा असा प्रश्न पडणार्यांना जेव्हा निधर्मी असा पर्याय शासकीय कागदपत्रात येईल तेव्हा हे जातीपाती धर्माच राजकारण कमी व्ह्यायला वेगाने सुरवात होईल. <<<
१००% सहमत ! श्री. प्रकाशरावांनी मांडलेला असा विचार सर्वच पातळीवर सर्वांनी (त्यातही विशेषतः आपल्या "महान हिंदुधर्मियांनी") केला तर लोभी आणि संधीसाधू राजकारण्यांना आपल्या प्रांगणात प्रवेश करता येणार नाही. २१ व्या शतकातदेखील, दुर्दैवाने अत्यंत सुशिक्षित समजल्या जाणार्या गटाकडून जातीच्या नावाने अभिव्यक्तीचा जो तमाशा केला गेला (उदा. अलिकडचा काही संस्थाळावर 'शिवाजी महाराज' या पवित्र नावाखाली ब्राह्मण-मराठा सदस्यांनी घातलेला धिंगाणा) तो नि:संदेह घृणास्पद होता.
विशेषतः हिंदूंनी निधर्मी व्हावे असे म्हणायचे प्रयोजन
>>> त्यातही विशेषतः आपल्या "महान हिंदुधर्मियांनी"
हे विधान, विशेषत: हिंदूंना लावायचे प्रयोजन समजले नाही. हिंदू लोकच आपल्या धर्माचा दुराभिमान बाळगतात; त्यामुळे विशेषत: त्यांनी निधर्मी होणे जास्त गरजेचे आहे असा काहीसा भाव यात निघतो आहे. स्वत:च्या धर्माचा कमीत कमी अभिमान बाळगणारे, कमीत कमी धर्मप्रसार करणारे लोक हिंदूच असावेत असे वाटते. (रेफेरन्सेस किंवा विदा विचारू नये, माझ्याकडे याचा कुठलाही विदा नाही. म्हणूनच 'असे वाटते' असं मी म्हणलंय)
बाकी टक्केवारी कमी झाली तर ज्यांची मेजॉरिटी आहे त्यातल्या काही लोकांना त्याबद्दल चिंता वाटणे स्वाभाविक आहे. आज अमेरिकेत श्वेतवर्णीयांचे प्रमाण ६६% आहे. ते कमीकमी होत जाऊन २०४२ साली ४६ टक्क्यांवर येईल असा अंदाज आहे. श्वेतवर्णीयांचे प्रमाण ५०% पेक्षा कमी व्हायला २०५० साल उजाडेल असा आधीचा अंदाज होता. आता ते लवकर होईल असा नवीन अंदाज आहे. त्यामुळे काही कॉन्झर्वेटिव श्वेतवर्णीयांना चिंता वाटणे स्वाभाविक आहे. असे बदल नुसते आकडेवारीतले किंवा कागदोपत्री नसतात. तुमच्या संपूर्ण राहणीमानावर, जीवन जगायच्या पद्धतीवर त्याचा प्रभाव पडत जातो. काही जणांना असे बदल झेपतात असे नाही. भारतात जी गोष्ट जात किंवा धर्माची तीच गोष्ट अमेरिकेत रेसची (मराठी शब्द?)
अर्थात भारतात हिंदू अल्पसंख्य होतील असे वाटत नाही. २००१ च्या जनगणनेप्रमाणे भारतात हिंदूंची संख्या ८०.५% टक्के होती. आता किती आहे हे थोड्या दिवसांत कळेलच. बरीच वर्षे ही टक्केवारी साधारण तेव्हढीच आहे असे वाटते. शाळेत असताना ही ७९% किंवा ८३% वाचल्याचे आठवते.
२ किंवा ३ मुलांबद्दल बोलायचे झाले तर शिक्षणामुळेच हे प्रमाण कमी होत जाते यात तथ्य आहे. मुलांचे व्यवस्थित संगोपन करायची परिस्थिती नसताना जास्त मुले होणे हा स्वतःवर आणि पर्यायाने समाजावर बोजा आहे (मग तो माणूस कुठल्याही जाती-धर्माचा असो). शिक्षणाचा प्रसार वाढवणे हा याच्यावरच दूरगामी उपाय आहे याच्याशी सहमत.
अवांतरः निधर्मी होणे ही थिअरेटिकल गोष्ट आहे का? मनुष्य हा उत्सवप्रिय प्राणी आहे. सर्व जगभर उत्सव हे धार्मिक बाबींभोवती गुंफलेले आहेत. खरेदी-विक्रीच्या, पर्यटनाच्या (थोडक्यात इकॉनॉमीच्या) प्रचंड आर्थिक उलाढाली या उत्सवांमध्ये केल्या जातात. लोक निधर्मी व्हायला लागले तर अर्थव्यवस्थेवर किती परिणाम होतील?
बागुलबुवा
>>> तुम्ही हिंदू आणि इतर असा उल्लेख केलेला आहे. त्यातील इतरांमध्ये ख्रिश्चन, शीख, बौद्ध, जैन व निरीश्वरवादी याची टक्केवारी वाढल्याचे फारसे माहित नाही. <<<
आज तारखेस देशपातळीवर जनगणनेचे काम प्रगतीपूर्वक चालू आहे आणि ज्यावेळी ते पूर्ण होईल त्यावेळी अनेक बाबींसमवेत धर्म-जातीनिहाय टक्केवारी प्रसिद्ध होईलच, पण तरीही उपलब्ध शासकीय आकडेवारीनुसार सध्या ८१.४% हिंदू आणि १२.२% मुस्लिम या देशात असून उरलेल्या ७ टक्क्यात अन्य सर्व धर्म-जाती यांचा समावेश झाला आहे. १९५० पासून या आकडेवारीत लक्षणीय असा फरक कधीच झालेला नाही. त्यामुळे 'हम दो हमारे दो' या घोषणेमुळे टक्केवारीच्या तक्त्यात 'चिंताजनक' फरक पडेल असे मानण्याचे काहीएक कारण नाही. शिवाय ही घोषणा झाली म्हणजे प्रत्येक हिंदू कुटुंब प्रमुख ती तातडीने अंमलात आणत गेला आहे असेही चित्र दिसत नाही. फक्त शहरात आणि शिक्षित कुटुंबाला मर्यादितपणाचे महत्व कळाले आहे हे मात्र मान्य केलेच पाहिजे. पण इथेही सुशिक्षित मुसलमान नागरिकाने या घोषणेची अंमलबजावणी केलेली दिसली आहे. कोल्हापुरातील मुस्लिमांची संख्या चांगलीच आहे (....आणि ते इथल्या मातीत असे काही मिसळून गेले आहेत की, दोन सख्खे भाऊदेखील आपसात मराठीमध्ये संवाद करत असतात, असो, हा विषय वेगळा आहे....). कॉलेजमध्ये माझ्या गटात चार मुस्लिम मित्र होते व त्यातील फक्त एकाच कुटंबात तीन मुले होती तर इतर तिन्ही घरे "हम दो हमारे दो" या तत्वाचा पाठपुरावा करणारी होती ~~ विशेष म्हणजे यातील एक कुटुंबप्रमुख बस कंडक्टर आहेत.
थोडक्यात आर्थिक परिस्थितीचा रेटा काय असतो हे सर्वानाच कळून चुकले असल्याने शासन सांगो वा ना सांगो, कुटुंबाचा आकार मर्यादित ठेवण्याकडे सर्वांचाच कल आहे. आणि ही तर सुरुवात आहे, त्यामुळे काही राजकीय संघटना दरदिनी ओरडत असतात म्हणून त्या टक्केवारीचा बागुलबुवा करून काळजी करू नये.
ष्टोरी
णवी ष्टोरी सांगा बुवा आता. ही हम दो हमारे दो आणि हम पाच हमारे पचिस वाली ष्टोरी आता ३०-४० वर्ष जुणी झाली. ती चुकीची असल्याचे सिद्ध होऊनही २० एक वर्ष झाली.
मधे 'लव जिहाद' म्हणून ष्टोरी आली होती ती णवी होती.
नितिन थत्ते
(नाऊ आय डोंट हॅव टु राईट धिस वे)
संपूर्ण भारतासाठीच कुटुंबनियोजन गरजेचे...
हिंदूंची टक्केवारी कमी होते, की इतरांची वाढते यापेक्षाही अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे संपूर्ण भारतालाच कुटुंबनियोजन सक्तीचे आणि गरजेचे आहे. आजच आपली लोकसंख्या १२० कोटी झाली आहे. वर्ष २०२५ मध्ये तिने चीनच्या लोकसंख्येला मागे टाकलेले असेल. चीनचा भूभाग आणि भारताचा भूभाग लक्षात घेता भारतात लोकसंख्येची घनता खूपच अधिक असेल. याचा ताण अन्नधान्य पुरवठा आणि नैसर्गिक साधनसंपतीच्या वापरावर येणारच आहे.
कुटूंबनियोजनाचे महत्त्व समर्थ रामदासांसारख्या संतानेही ३०० वर्षांपूर्वी ओळखून दासबोधातून समाज प्रबोधन केले होते.
ते म्हणतात. 'लेकुरे उदंड जाहली, तो ते लक्ष्मी लयास गेली'
ज्या घरात पोरवडा त्या घरात दारिद्र्य, हे उघड आहे. पण भारताने याचे महत्त्व कधी लक्षात घेतले नाही. महात्मा गांधींसारख्या नेत्यालाही या विषयाचे गांभीर्य उमगले नाही. किर्लोस्करांनी यांत्रिक चरखा तयार केला होता. त्याचे प्रात्यक्षिक महात्मा गांधींपुढे दाखवण्यास ते गेले. गांधीजींना यंत्राने सूत कातणे मान्य नव्हते. औद्योगीकरणापेक्षा त्यांचा भर स्वावलंबनाकडे होता. त्यामुळेच त्यांनी पारंपरिक लाकडी चरखा पसंत केला. यांत्रिक चरख्याची कल्पना बापूंच्या गळी उतरत नाही हे दिसल्यावर किर्लोस्करांनी मग कुटुंबनियोजन या विषयावर चर्चेला सुरवात केली. तेव्हा गांधीजींनी चर्चा आटोपती घेतली आणि किर्लोस्करांना निरोप दिला. (ही कथा मी खूप काळाआधी वाचली होती त्यामुळे तपशिलांपेक्षा त्याचा निष्कर्ष लक्षात राहिला आहे. त्रुटी राहिली असल्यास चू. भू. दे. घे.)
स्वातंत्र्यानंतर पहिल्या आरोग्यमंत्री राजकुमारी अमृतकौर या तर महिला असून त्यांनाही हा विषय किती महत्त्वाचा आहे, हे न कळणे, हे खरे दुर्दैव. बायकांचे अनारोग्य, शारीरिक दुर्बलता व मृत्यू यांचा आणि तिच्यावर दर दोन-तीन वर्षांनी लादल्या जाणार्या बाळंतपणांचा जवळचा संबंध असतो, हे का नाही समजून घेतले गेले?
कुटूंबनियोजनाचा पुरस्कार करणार्या डॉ. र. धों. कर्व्यांसारख्या द्रष्ट्यालाही सामाजिक कुचेष्टेला तोंड द्यावे लागले.
नरसिंह राव, लालूप्रसाद यादव यांसारखे पोरवडा असणारे लोक आपले नेते होतात, ही शरमेची बाब आहे.