कॅलिडोस्कोप भाषेचा

मित्रांनो, तुम्हाला कॅलिडोस्कोपधील बदलणारी नक्षी आठवतेय? त्यात प्रत्यक्षात असतं ते काय! आणि आपल्याला भासत असते ते काय! लहानपणी ही अशी दृश्ये व दृश्यबद्दल पाहणं खूप आनंददायी असतं, नाही का?
जेंव्हा आपण कॅलिडोस्कोपच्या भिंगातून पाहतो तेंव्हा आपल्याला काचेच्या बांगड्यांच्या तुकड्यांपासून एक विशिष्ट नक्षी दिसते. त्या आकृतीचे आतील तीनही बाजूच्या आरशांमधील प्रतिबिंबामुळे अजून एक मोठी व वेगळी नक्षी दिसते. हे आपण पाहत असतानाच जर आपण तो कॅलिडोस्कोप थोडासा जरी कलंडवला तर आतापर्यंत जी नक्षी आपण पाहत होतो, ती नाहीशी होत, एक नवीच नक्षी आपल्याला डोळ्यासमोर दिसू लागते. भाषां-भाषांमधील उत्क्रांती व विलय याबाबत मला हाच संदर्भ वापरायचा आहे.
उत्क्रांती अवस्थेत पोहचण्यासाठी 'सुधारणा' व 'बदल' हे दोन नियम कार्यरत असतात. या नियमांनीच हे जग विकसित होत असते. भाषा देखील त्याला अपवाद नाही. खरतरं, भाषा ही एक प्रतीक-व्यवस्था आहे. भाषेत पर्यायाने 'प्रतीक-व्यवस्थेत' जे बदल घडत असतात ती प्रक्रिया केवळ परिवर्तन नसते; तर त्या प्रक्रियेत परिसरण ही होत असते, परियोजन देखील होत असते.
भाषेतील परिवर्तनाचा परिसर काल असतो. परिवर्तन (change through revolt) म्हणजे मूळ अवस्थेच्या अगदी उलट बदल. हा बदल कालौघातामुळे अर्थामध्येही घडू शकतो किंवा मूळ शब्दातील अक्षरांमधील अदलाबदली मुळेही होऊ शकतो.
भाषेतील परिसरणाचा परिसर स्थल/स्थान असते. परिसरण (explode + spread) म्हणजे 'चारी दिशांना पसरणे, फैलावणे. लोकसंख्या वाढीमुळे प्रदेशव्याप्तिमध्ये वाढ, स्थानांतरामुळे, भाषेत बदल होणं.
भाषेतील परियोजनेचा परिसर व्यक्ती असते. परियोजन म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या आवडी-निवडीमुळे, वैयक्तिक दृष्टिकोनामुळे नवा शब्दप्रयोग, वाक्ययोजना घडत जाणे, तो इतरांकडून स्वीकृत होणे किंवा तत्कालीन प्रगत असलेल्या साधनांच्या वापरामुळे तो बदल टिकून राहणे.
भाषेतील बदला बाबत हे सगळं सुक्ष्मस्तरावर व निन्मस्तरावर अंतर्भूत करता येतं.
त्रोटक उदाहरणादाखल स्थलकालानुसार भाषेतील खाली दिलेले बदल हे सूक्ष्म स्तरावरील आहेत..
ग्रीक........संस्कृत......अर्थ
esti.......asti.........आहे
pater.pitar........पिता
odant.dant.........दात
ombros.ambaram..आकाश
उत्क्रांती अवस्थेत पोहचण्यात 'सुधारणा' होणं हा देखील निकष असतो. ज्या गोष्टीमध्ये काळाच्या ओघात सुधारणा होत नाहीत, त्या गोष्टींना नामशेष होणं क्रमप्राप्त असतं. आणि म्हणूनच सुधारणेसाठी प्रतियोजन – ‘नवं व्यवस्थारोपण’ देखील आवश्यक असते.
कोणत्याही प्रतियोजनेला स्थित्यंतर कारणीभूत असते. स्थित्यंतर म्हणजे स्थितीतील बदल. इथं स्थिती म्हणजे एका स्तरावरील अवस्था. याच अनुषंगाने भाषेतील प्रतियोजन म्हणजे 'प्रतीक-व्यवस्थेचेच' स्थित्यंतर हे भाषेचा एका स्तरातील अवस्थे मधून दुसऱ्या स्तरातील अवस्थेत प्रवेश असतो.
सनई चौघडे या मराठी चित्रपटामध्ये एक गाणं आहे, आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोहे!!! गाणं अगदी रॉकींग आहे!, नाही का? ह्या गाण्याच्या ह्या ओळीमध्ये जे आहे तेच मला या लेखातून सांगायचे ते आहे. काळ हा कधीही सरळ रेषेत चालत नाही. तो नेहमी सर्पिल्या चालीने, नागमोडी वळणे घेत वरच्या दिशेने पुढे सरकत असतो. कधी वरच्या स्तरावर, तर कधी खालच्या स्तरावर. आयुष्यातील ह्या चढ-उताराने, वर-खाली होण्याने मानवी जीवन देखील अगदी चुलीवरच्या कढईतील कांदेपोह्यांसारखे ढवळून निघते, पक्के शिजते, तयार होते.
संस्कृतही ज्या इंडोयुरोपीअन भाषा कूलातील सदस्य आहे, त्याच कूलातील इंग्रजी सुद्धा तिचीच दूरची नातेवाईक आहे. इंग्रजी संस्कृतची नातेवाईक आहे म्हणून मराठी भाषेची देखील नातेवाईकच आहे. आणि म्हणूनच आपण इंग्रजीला दोष देणं व संस्कृताला देव्हाऱ्यात बसवणं किंवा अगदी उलट वागणं ह्या दोनही चुकीच्या गोष्टी टाळायला हव्यात. तुम्ही म्हणाल हे सगळं 'वरवरचं बोलणं' आहे, मराठीने इंग्रजीच्या जागतिकीकरणापुढे स्वतःचे अस्तित्व टिकवायचे कसे? हा सध्याचा ज्वलंत प्रश्न आहे.
तुमच्या ह्या प्रश्नाच्या उत्तरासाठी आपण बृहद प्रतलावर (ब्रॉड स्केल) नजर टाकूया. याकरिता भाषांची प्रभुत्वता, इतिहासातील घटनां, व गीतेतील त्रिगुणात्मक प्रकृतीचे नियम ह्या तीन गोष्टींचा कॅलिडोस्कोप सारखा वापर करून पाहूया.
प्रत्येक कालखंडात, युगात सत्व, रज, तम ह्या गुणांमुळे प्रेरित झालेल्या त्या-त्या वृत्तींचे वर्चस्व असते. या आधीचे, प्रतिकात्मक पद्धतीने म्हणायचं झालं तर व कित्येक वर्षाआधी आध्यात्मिक नजरेने पाहता, सत्वगुणाने प्रेरित ब्राह्मणयुग होते. सत्व गुण दुर्बल झाल्यानंतर रजोगुणाने प्रेरित तलवारधारींचे क्षत्रिययुग होते, वैश्य इंग्रज भारतात व्यापाराच्या उद्देशाने येईपर्यंत हे क्षत्रिययुग होते. त्यानंतर जगाच्या आर्थिक राजधानीतील वर्ल्ड ट्रेड सेंटर पडला/पाडला तेव्हापासून पेश्यांची ताकद लोप पावत वैश्य युग संपले. सध्याचे युग शूद्रांचे, कष्टकऱ्यांचे आहे. ओबामा, मायावतींचा विजय असो!!
पुढील दृष्य

Yuganter

बाजूचे दृष्य

ह्या युगात 'आपले मन आपल्या 'कामात' गुंतवून जीवनाचा आनंद घेत, शांततेने व्यतीत करणे, हा साधा सोपा मार्ग असू शकेल.'
'द्न्यान हे आध्यात्मिक उन्नतीने प्रकट होवून त्यायोगे संसारी आयुष्याबाबत विरक्ती यायला हवी!'हा मंत्र संस्कृत ने दिला.
'द्न्यान हे नवनिर्मितीतून प्रकट होवून पैसे कमावण्याचे माध्यम व्ह्यायला हवे!'हा मंत्र इंग्रजी भाषेने दिला.
या पुढे.. 'द्न्यान हे नवनिर्मितीतून प्रकट होत बहुजनांच्या उपयोगास यायला हवे!' कदाचित हा मंत्र जी भाषा ह्या शुद्रयुगात अमलात आणेल तो भाषक समाज येत्या काळात सुखाने नांदू शकेल! या बद्दल तुम्हाला काय वाटते?
'स्वर व व्यंजन ह्यांच्या जुळण्याने 'अक्षर'तयार होतं.', हे विचार भारतीय तत्वद्न्यानातील 'शिव' व 'शक्ती' यांच्या मिलनातून विश्व उत्पन्न होत जाते'- ह्या विचाराशी समरूप होणारे आहेत. जणूकाही 'अक्षर'हि संकल्पना म्हणजे 'अर्धनरनारी'च रूपच! 'ब्राह्मी लिपी' देखील आजपावेतो तशाच पद्धतीने विकसित होत तिच्या सध्याच्या बाळबोध स्तरापर्यंत उदाहरणार्थ 'देवनागरी लिपी'पर्यंत पोहचलेली आहे. परंतु 'स्वर व व्यंजन ह्यांच्या जुळण्याने 'अक्षर'तयार होतं.' हि संकल्पना पूर्णतः वर्णाच्या –व्यंजन-चिन्हांच्या, स्वर-चिन्हांच्या माध्यमातून व्यक्त झालेली नाहीत. सुबोध स्तर ही पुढची अवस्था असू शकते.

टीप: - या लेखात काही नवे शब्द योजले आहेत. त्या शब्दाबाबत तुम्हाला काही सुचवायचे असेल, तर जरूर सुचवा.
-----
चित्रांचा आकार इथे खूप मोठा झालेला आहे, तो मला ऍडजेस्ट करता आलेला नाही. यासाठी क्षमस्व!

लेखनविषय: दुवे:

Comments

सत्वगुणाने प्रेरित ब्राह्मणयुग होते. कोणी पाहीले?

कित्येक वर्षाआधी आध्यात्मिक नजरेने पाहता, सत्वगुणाने प्रेरित ब्राह्मणयुग होते. कोणी पाहीले?
पण या ब्राम्हण वर्गाने महात्मा फुले, आंबेडकर , या थोर सामाजसुधाकाराना ज्या यातना दिल्या त्या सर्वांनी पहिल्या . ९०% जनतेला विटाळाच्या नावा खाली देवाच्या दर्शना पासून वंचित ठेवलेले पाहीले आज ही पाहत आहे. सतीच्या नावा खाली विधवांची होणारी अवेहेलाना पहिली. त्यांचा केशकलप कापून त्यांना विद्रूप करणे पाहीले. धर्माच्या नावाखाली समाजाच्या ५०% भाग असलेल्या स्त्रियांना ( स्वतः:च्या सुद्धा ) शिक्षण आणि धार्मिक कार्या पासून वंचित ठेवलेले पाहीले. रोटीबेटी व्यवहार खाली खालच्या समाजाची रोटी चालत नव्हती पण अवेध्य रीत्या बेटी मात्र चालत होती. या सर्व वागणाल्या जर कोणी सत्वगुण म्हणत असतील तर त्याची नार्को टेस्ट करण्या शिवाय पर्याय नाही. या टेस्ट मध्ये त्यांची गुणाची आणि अवगुणांची व्याख्या तरी काय आहे .ते समजेल.

काहीही कळले नाही

हे म्हणायची गेल्या काही दिवसांतली ही दुसरी वेळ.

एकतर, माझी आकलन शक्ती कमी पडते किंवा लेखच अनाकलनिय आहे. (ही आता माझी सही बनेल असे वाटते.)

+1

काहीही कळले नाही

चन्द्रशेखर

खूप वळणे

खूप वळणे घेणारा लेख आहे.

काळ हा कधीही सरळ रेषेत चालत नाही. तो नेहमी सर्पिल्या चालीने, नागमोडी वळणे घेत वरच्या दिशेने पुढे सरकत असतो. कधी वरच्या स्तरावर, तर कधी खालच्या स्तरावर.

हे कळले नाही. म्हणजे स्थित्यंतरे होत असतात असे म्हणायचे आहे का?

'द्न्यान हे आध्यात्मिक उन्नतीने प्रकट होवून त्यायोगे संसारी आयुष्याबाबत विरक्ती यायला हवी!'हा मंत्र संस्कृत ने दिला.
'द्न्यान हे नवनिर्मितीतून प्रकट होवून पैसे कमावण्याचे माध्यम व्ह्यायला हवे!'हा मंत्र इंग्रजी भाषेने दिला.

हे मंत्र भाषांनी दिले नाहीत, वेगवेगळ्या देशातील माणसांनी वेगवेगळ्या काळात दिले.

सुबोध स्तर ही पुढची अवस्था असू शकते.
म्हणजे कसे?

+१

+१
मात्र नेमके काय मुद्दे कळले नाही हे सांगण्यास कचरतो.
(भित्रा) धनंजय

+२ कॅलिडोस्कोप

सहमत आहे.

लेखास सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे कॅलिडोस्कोपची उपमा योग्य ठरेल, म्हणजे काय खरे व काय प्रतिमा हे नीटसे कळत नाही. नक्षी मात्र चांगली दिसते.

प्रमोद

इतर वाचकांना अजून काय काय वाटतं?

अजून काही प्रतिसाद येवू देत. मग मी प्रतिसाद देईन म्हणतो. थोडा वेळ मला ही मिळेल प्रतिसादासाठी.

प्रमोद सहस्त्रबुद्धे,
आपल्याला नक्षी दिसली, ही माझ्यासाठी (अर्धीमुर्धी का होईना पण) पोचपावती आहे. लेख वाचता-वाचता वाचकांच्या डोळ्यासमोर नक्षी साकारणं, त्यासोबत 'आयुष्य हे चूलीवरला कढईतले कांदेपोहे' हे गाणं कानांनी एकल्याचा 'अनुभव पोहचवणे' हाच उद्देश लेख लिहीण्यामागे होता.
धन्यवाद!

म्हंजे??

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

जेवढे

कळले त्यात काही पटले. उदा. कोणत्याही भाषेला देव्हार्‍यात बसवू नये.
या सर्वाचा अध्यात्माशी/युगांशी संबंध ओढून ताणून आणला आहे असे वाटले.
परियोजन म्हणजे काय?

--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com

तिथे दुसरा कोणता शब्द वापरता येईल?

भाषेतील परियोजनेचा परिसर व्यक्ती असते. परियोजन म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या आवडी-निवडीमुळे, वैयक्तिक दृष्टिकोनामुळे नवा शब्दप्रयोग, वाक्ययोजना घडत जाणे, तो इतरांकडून स्वीकृत होणे किंवा तत्कालीन प्रगत असलेल्या साधनांच्या वापरामुळे तो बदल टिकून राहणे.

मराठीत 'योजना' म्हणजे (इंग्रजी) प्लान,
व 'योजणे' म्हणजे (इंग्रजी) टू ऍरेंज
परियोजन हा शब्द हिंदीतील वापरातील शब्दामुळे काहिसा वेगळा वाटू शकतो. पण तिथे दुसरा कोणता शब्द वापरता येईल?

हिंदीत 'परियोजना' 'प्रोजेक्ट' म्हणून वापरला जातो.
मराठीत 'प्रोजेक्ट' म्हणजे 'प्रकल्प'

माहित नाही

नवीन शब्द घडवणे/सुचवणे या बाबतीत मी ढ आहे. :(

ज्यांनी लेख वाचला, पण समजला नाही त्यांच्यासाठी....

एखादा लेख शब्दबद्ध करून तो 70 एम.एम.च्या पडद्यावरील व्यावसायिक चित्रपट प्रेशकांना जो थिएटर मध्ये जो आनंद देतो काहिसा तसाच आनंद देण्याचा मी विचार केला. कर्मा, सौदागर, खलनायक हे सुभाष घई चे चित्रपट पहाताना, जो एक 'भव्य कलाकृती'चा फिल येतो तो एखाद्या लेखाच्या वाचनातून वाचकांना देण्याचा हा प्रयत्न. ललित लेख, अभ्यासपर लेख, हलकाफुलका मनोरंजनात्मक लेख हे आतापर्यंत येथे आले आहेतच, हा लेख सगळ्याचे मिश्रण करीत एक व्यापक, भव्यतेचा अनुभव तेही कमीत कमी शब्दात!

आता बायस्कोप असो, कि कॅलिडोस्कोप दोनही साधने आहेत, प्रेक्षकांना मायावी दुनिया दाखवण्याची. पहिल्या दोन परिच्छेदांमध्ये मी ते स्पष्ट केले आहे.
कॅलिडोस्कोप मध्ये काचेच्या बांगड्यांचे तुकडे असतात. 'भाषेच्या कॅलिडोस्कोप' मध्ये अक्शरचिन्हं घेतली आहेत.
कॅलिडोस्कोप मध्ये तीन आरसे असतात. 'भाषेच्या कॅलिडोस्कोप' मध्ये 'त्रिगुणात्मक प्रकृति' ही संकल्पना घेतली आहेत.
कॅलिडोस्कोप मध्ये आरश्यातील पहिल्या स्तरावर काही प्रतिबिंबे दिसतात. 'भाषेच्या कॅलिडोस्कोप' मध्ये संस्कृत व ग्रीक या प्राचिन भाषांमधील त्रोटक उदाहरणे प्रतिबिंब म्हणून दाखवण्यात आलेली आहेत.
कॅलिडोस्कोप मध्ये प्रतिबिंबांची देखील प्रतिबिंबे दिसतात व त्यामुळे एक स्वतंत्र दुसरी आकृति दिसते. 'भाषेच्या कॅलिडोस्कोप' मध्ये काळाच्या कोणत्या बदलाने कोणते बदल होत जातात, त्रिगुणात्मक प्रकृति मुळे समाजात, व्यवहारांमध्ये बदल घडून भाषा, संस्कृती कशी बदलत जाते ते सांगण्यात आले आहे.

व शेवटी, आपण सद्या कोणत्या अवस्थेत आहोत, हे दाखवण्यासाठी काहि चित्रे मी स्वत:हून रेखाटली आहेत ती दाखवलेली आहेत. भविष्यात बदल नेमके कुठे होत आहेत, कसे होत आहेत ते ओळखून आपली लिपी, भाषा, संस्कृती कशी आकार घेवू शकते याचे अंदाज व्यक्त केले आहेत.

मला या लेखातून, भव्यतेचा फिल देत हे सांगायचे होते. काही प्रेक्षकांना पिक्चर आवडला नाही. काहिंना ठिक वाटला.
ग रे गवतातला,
म रे मक्यातला,
भ रे भटजीतला,(ठणठणपाळ यांनी इथे 'भ रे भजीतला' असे वाचावे.)
लेख अशा पद्धतीनेच असावा, असे ज्यांनी कुणी अपेक्षिला त्यांना तो समजला नसावा.

---------------------------------------
तूम पंछी, परदेसी,तू जोगी है कि जादूगर????
इनमेसे कोई भी नही, मै "सपनोका सौदागर"

:(

मला लेखही कळला नाही आणि हा खुलासाही :(

खर्र!!

खर्र!! अजूनही या अज्ञ बालकाला (म्हंजे मला) काहिहि कळलेले नाहि.
* स्वगत:माझी स्वाक्षरी खरी करायचा मक्ता घेतलेला दिसतोय ;) *

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

ओ की ठो कळले नाही.

मित्रांनो, तुम्हाला कॅलिडोस्कोपधील बदलणारी नक्षी आठवतेय? त्यात प्रत्यक्षात असतं ते काय! आणि आपल्याला भासत असते ते काय! लहानपणी ही अशी दृश्ये व दृश्यबद्दल पाहणं खूप आनंददायी असतं, नाही का?

होय नक्कीच असते. आजही मी आवर्जुन बांगड्यांचे तुकडे टाकून घरीच कॅलिडोस्कोप बनवतो.

जेंव्हा आपण कॅलिडोस्कोपच्या भिंगातून पाहतो तेंव्हा आपल्याला काचेच्या बांगड्यांच्या तुकड्यांपासून एक विशिष्ट नक्षी दिसते. त्या आकृतीचे आतील तीनही बाजूच्या आरशांमधील प्रतिबिंबामुळे अजून एक मोठी व वेगळी नक्षी दिसते. हे आपण पाहत असतानाच जर आपण तो कॅलिडोस्कोप थोडासा जरी कलंडवला तर आतापर्यंत जी नक्षी आपण पाहत होतो, ती नाहीशी होत, एक नवीच नक्षी आपल्याला डोळ्यासमोर दिसू लागते. भाषां-भाषांमधील उत्क्रांती व विलय याबाबत मला हाच संदर्भ वापरायचा आहे.

भाषां-भाषांमधील उत्क्रांती व विलय याबाबत कॅलिडोस्कोपचा खूप चांगला संदर्भ घेतला आहे.

उत्क्रांती अवस्थेत पोहचण्यासाठी 'सुधारणा' व 'बदल' हे दोन नियम कार्यरत असतात. या नियमांनीच हे जग विकसित होत असते. भाषा देखील त्याला अपवाद नाही. खरतरं, भाषा ही एक प्रतीक-व्यवस्था आहे. भाषेत पर्यायाने 'प्रतीक-व्यवस्थेत' जे बदल घडत असतात ती प्रक्रिया केवळ परिवर्तन नसते; तर त्या प्रक्रियेत परिसरण ही होत असते, परियोजन देखील होत असते.

(सतत) उत्क्रांती अवस्थेत पोहचण्यासाठी 'सुधारणा' व 'बदल' हे दोन नियम (सतत) कार्यरत असतात.- मान्य.
या नियमांनीच हे जग विकसित होत असते. भाषा देखील त्याला अपवाद नाही.- अगदी खरे. श्रवणबेलगोळच्या मुर्तीकारांची मराठी केव्हाच संपली.
खरतरं, भाषा ही एक प्रतीक-व्यवस्था आहे. - हे नाही कळले.
भाषेत पर्यायाने 'प्रतीक-व्यवस्थेत' जे बदल घडत असतात ती प्रक्रिया केवळ परिवर्तन नसते; तर त्या प्रक्रियेत परिसरण ही होत असते, परियोजन देखील होत असते.- सपकन डोक्यावरुन गेलं.
वरील मुद्दे कृपया सोप्या मराठीत समजावून सांगाल का?

भाषेतील परिवर्तनाचा परिसर काल असतो. परिवर्तन (change through revolt) म्हणजे मूळ अवस्थेच्या अगदी उलट बदल. हा बदल कालौघातामुळे अर्थामध्येही घडू शकतो किंवा मूळ शब्दातील अक्षरांमधील अदलाबदली मुळेही होऊ शकतो.

परिसर काल- म्हणजे काय?

परिवर्तन (change through revolt) म्हणजे मूळ अवस्थेच्या अगदी उलट बदल. हा बदल कालौघातामुळे अर्थामध्येही घडू शकतो किंवा मूळ शब्दातील अक्षरांमधील अदलाबदली मुळेही होऊ शकतो.- एकदम मान्य!

भाषेतील परिसरणाचा परिसर स्थल/स्थान असते. परिसरण (explode + spread) म्हणजे 'चारी दिशांना पसरणे, फैलावणे. लोकसंख्या वाढीमुळे प्रदेशव्याप्तिमध्ये वाढ, स्थानांतरामुळे, भाषेत बदल होणं.
भाषेतील परियोजनेचा परिसर व्यक्ती असते. परियोजन म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या आवडी-निवडीमुळे, वैयक्तिक दृष्टिकोनामुळे नवा शब्दप्रयोग, वाक्ययोजना घडत जाणे, तो इतरांकडून स्वीकृत होणे किंवा तत्कालीन प्रगत असलेल्या साधनांच्या वापरामुळे तो बदल टिकून राहणे.

भाषेतील परिसरणाचा परिसर स्थल/स्थान असते.- सोप्या मराठीत समजावून सांगाल का?
परियोजन म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या आवडी-निवडीमुळे, वैयक्तिक दृष्टिकोनामुळे नवा शब्दप्रयोग, वाक्ययोजना घडत जाणे, तो इतरांकडून स्वीकृत होणे किंवा तत्कालीन प्रगत असलेल्या साधनांच्या वापरामुळे तो बदल टिकून राहणे.- मराठी माणसं आणि एकवाक्यता? शक्य नाही! त्यामुळे असे बदल फक्त त्या व्यक्तिपुरतेच शक्य असावेत.

भाषेतील बदला बाबत हे सगळं सुक्ष्मस्तरावर व निन्मस्तरावर अंतर्भूत करता येतं.
त्रोटक उदाहरणादाखल स्थलकालानुसार भाषेतील खाली दिलेले बदल हे सूक्ष्म स्तरावरील आहेत..
ग्रीक........संस्कृत......अर्थ
esti.......asti.........आहे
pater.pitar........पिता
odant.dant.........दात
ombros.ambaram..आकाश

भाषेतील बदला बाबत हे सगळं सुक्ष्मस्तरावर व निन्मस्तरावर अंतर्भूत करता येतं.- मायक्रो आणि मॅक्रो असे म्हणायचे आहे का?

मायक्रोचे उदाहरण तुम्ही दिले आहे. मॅक्रोचे कोणते?

उत्क्रांती अवस्थेत पोहचण्यात 'सुधारणा' होणं हा देखील निकष असतो. ज्या गोष्टीमध्ये काळाच्या ओघात सुधारणा होत नाहीत, त्या गोष्टींना नामशेष होणं क्रमप्राप्त असतं. आणि म्हणूनच सुधारणेसाठी प्रतियोजन – ‘नवं व्यवस्थारोपण’ देखील आवश्यक असते.

सहमत!

कोणत्याही प्रतियोजनेला स्थित्यंतर कारणीभूत असते. स्थित्यंतर म्हणजे स्थितीतील बदल. इथं स्थिती म्हणजे एका स्तरावरील अवस्था. याच अनुषंगाने भाषेतील प्रतियोजन म्हणजे 'प्रतीक-व्यवस्थेचेच' स्थित्यंतर हे भाषेचा एका स्तरातील अवस्थे मधून दुसऱ्या स्तरातील अवस्थेत प्रवेश असतो.

प्रतियोजना म्हणजे काय?
याच अनुषंगाने भाषेतील प्रतियोजन म्हणजे 'प्रतीक-व्यवस्थेचेच' स्थित्यंतर हे भाषेचा एका स्तरातील अवस्थे मधून दुसऱ्या स्तरातील अवस्थेत प्रवेश असतो.-
समजले. पण हा मुद्दा येथेच सोडून सनई-चौघडे का आणले? एखादे उदाहरण देऊन हे अधिक बळकट केले असते तर?

सनई चौघडे या मराठी चित्रपटामध्ये एक गाणं आहे, आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोहे!!! गाणं अगदी रॉकींग आहे!, नाही का? ह्या गाण्याच्या ह्या ओळीमध्ये जे आहे तेच मला या लेखातून सांगायचे ते आहे. काळ हा कधीही सरळ रेषेत चालत नाही. तो नेहमी सर्पिल्या चालीने, नागमोडी वळणे घेत वरच्या दिशेने पुढे सरकत असतो. कधी वरच्या स्तरावर, तर कधी खालच्या स्तरावर. आयुष्यातील ह्या चढ-उताराने, वर-खाली होण्याने मानवी जीवन देखील अगदी चुलीवरच्या कढईतील कांदेपोह्यांसारखे ढवळून निघते, पक्के शिजते, तयार होते.

"आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोहे!!!" आणि "काळ हा कधीही सरळ रेषेत चालत नाही. " कशाचाच अर्थ लागत नाहीये हो.

तो नेहमी सर्पिल्या चालीने, नागमोडी वळणे घेत वरच्या दिशेने पुढे सरकत असतो. - असाच का? पृथ्वी सूर्याभोवती गोल फिरल्यामुळे काळ पुढे जात आहे अशी भावना निर्माण होते. प्रत्यक्षात काळ एकाच जागी आहे. माणसाने त्याला मोजायचे प्रमाण लावून टाकले आहे. मग तो नागमोडी वळणे का घेतोय?

संस्कृतही ज्या इंडोयुरोपीअन भाषा कूलातील सदस्य आहे, त्याच कूलातील इंग्रजी सुद्धा तिचीच दूरची नातेवाईक आहे. इंग्रजी संस्कृतची नातेवाईक आहे म्हणून मराठी भाषेची देखील नातेवाईकच आहे. आणि म्हणूनच आपण इंग्रजीला दोष देणं व संस्कृताला देव्हाऱ्यात बसवणं किंवा अगदी उलट वागणं ह्या दोनही चुकीच्या गोष्टी टाळायला हव्यात. तुम्ही म्हणाल हे सगळं 'वरवरचं बोलणं' आहे, मराठीने इंग्रजीच्या जागतिकीकरणापुढे स्वतःचे अस्तित्व टिकवायचे कसे? हा सध्याचा ज्वलंत प्रश्न आहे.

थोडं-थोडं कळलंय.

तुमच्या ह्या प्रश्नाच्या उत्तरासाठी आपण बृहद प्रतलावर (ब्रॉड स्केल) नजर टाकूया. याकरिता भाषांची प्रभुत्वता, इतिहासातील घटनां, व गीतेतील त्रिगुणात्मक प्रकृतीचे नियम ह्या तीन गोष्टींचा कॅलिडोस्कोप सारखा वापर करून पाहूया.

भाषांची प्रभुत्वता, इतिहासातील घटनां, व गीतेतील त्रिगुणात्मक प्रकृतीचे नियम- कशाचाच लॉजिकल संबंध लागत नाहीये हो.

प्रत्येक कालखंडात, युगात सत्व, रज, तम ह्या गुणांमुळे प्रेरित झालेल्या त्या-त्या वृत्तींचे वर्चस्व असते. या आधीचे, प्रतिकात्मक पद्धतीने म्हणायचं झालं तर व कित्येक वर्षाआधी आध्यात्मिक नजरेने पाहता, सत्वगुणाने प्रेरित ब्राह्मणयुग होते. सत्व गुण दुर्बल झाल्यानंतर रजोगुणाने प्रेरित तलवारधारींचे क्षत्रिययुग होते, वैश्य इंग्रज भारतात व्यापाराच्या उद्देशाने येईपर्यंत हे क्षत्रिययुग होते. त्यानंतर जगाच्या आर्थिक राजधानीतील वर्ल्ड ट्रेड सेंटर पडला/पाडला तेव्हापासून पेश्यांची ताकद लोप पावत वैश्य युग संपले. सध्याचे युग शूद्रांचे, कष्टकऱ्यांचे आहे. ओबामा, मायावतींचा विजय असो!!

सोप्या मराठीत समजावून सांगाल का?

खरं सांगू का?- ओ की ठो कळले नाही.

यातील किती कळले ते जरूर कळवा!

-'असा मी आसामी' यांना,

'लेख नाही कळला' इतपर आणि एवढंच ठिक होतं. पण इतकी विरोधाभासी मते मांडत प्रतिसाद का दिला?

1)भाषेतील बदला बाबत हे सगळं सुक्ष्मस्तरावर व निन्मस्तरावर अंतर्भूत करता येतं.- मायक्रो आणि मॅक्रो असे म्हणायचे आहे का?
सोप्या मराठीतून म्हणजे इंग्रजीतून असे तुम्ही म्हणत आहात का?

2) - मराठी माणसं आणि एकवाक्यता? शक्य नाही! त्यामुळे असे बदल फक्त त्या व्यक्तिपुरतेच शक्य असावेत.
महाराज, आपण स्वातंत्रवीर सावरकर यांचं नाव व त्यांनी मराठी भाषेत नवे शब्द निर्मित केले होते व त्यालीत अजूनही बरेच शब्द आता फक्त मराठीतच नाहीत हिंदीत ही स्विकारले गेले आहेत. हे जर तुम्हाला माहीत नव्हते तर एवढे विरोधाभासी का लिहीले?

तुमच्या भाषेत म्हणजे सोप्या मराठीत शब्दांचे अर्थ...
परीसर म्हणजे 'एरिया'
प्रतीक म्हणजे 'सिम्बॉल' (प्रतीक एवजी प्रतिक असे झाले होते. पण तरीही अर्थ बदलत नव्हता.)

मायक्रोचे उदाहरण तुम्ही दिले आहे. मॅक्रोचे कोणते?
डिअर फ्रेंड, तुम्ही नोकरी/व्यवसाय करीत असाल तर हे उदाहरण देत आहे, नसेल तर तुम्हाला ते वरून जाईल.
कोणत्याही संस्थापनामध्ये निंर्णय घेण्यासंबधित वेग-वेगळे स्तर असतात. छोट्या स्तरावर जे काम केले जाते त्या कामाचे 'आउट पूट' वरच्या स्तरावरचे इनपूट असते. त्या स्तरावर त्या इनपूट वर वेगळ्या पद्धतीने काम केले जाते ह्या स्तरावर काम करण्याची पद्धत खालच्या स्तरावरी ल कामापेक्षा अगदी वेगळी असते. टॉप मॅनेजमेंटचे काम व विचार करण्याची पद्धत वेगळीच असते. वेगवेगळ्या स्तरावर एकसारखे काम होत नाही. भाषा मॅक्रो लेव्हल कशी बदलते आहे हे सांगण्यासाठीच मी त्रिगुणात्मक प्रकृतिचा आधार घेतला होता. मोगलांचे राज्य भारतावर होते तेव्हा मॅक्रोस्तरावर फारशीचे वर्चस्व, पग़डा होता. आता तोच पग़डा इंग्रजीचा आहे. तो का आहे हेच सांगितले, तरी विचारता मॅक्रो चे उदाहरण कोणते?

चुलीवरल्या कढईतले कांदेपोहेचा अर्थ लागत नाहीये हो.
चूलीवर ठेवलेल्या कढईच्या खाली आग असते. ती आग कढई तापवते. जीवन जगताना माणसाला आयुष्यभर दु:खाचे, अडचणींचे अपेक्षाभंगांचे चटके खावे लागतात. तुम्हीही खाल्ले असतीलच. तापलेल्या कढईतले कांदेपोहे काविलत्याने/पलित्याने वरखाली केल्याने पोहे चांगलेच भाजले जातात. कधी वर कधी खाली. कधी सुखाचा गारवा तर कधी दु:खाचे चटके. हे सांगायचे होते. मानवी आयुष्यात आज जे आहे ते उद्या नसणार. हे सांगायचे होते. आज जी भाषा देवांची भाषा म्हटली जाते ती उद्या तशी नसणार, आज जीला जग जिंकणारी भाषा म्हटले जाते ती उद्या तशी नसणार. तापलेल्या कढईत काळाच्या काविलत्याने कधी वर, कधी खाली, कधी खाली, कधी वर.

असाच का? पृथ्वी सूर्याभोवती गोल फिरल्यामुळे काळ पुढे जात आहे अशी भावना निर्माण होते. प्रत्यक्षात काळ एकाच जागी आहे. माणसाने त्याला मोजायचे प्रमाण लावून टाकले आहे. मग तो नागमोडी वळणे का घेतोय?

तुमचं वय काय आहे? हे तुम्ही जे काळ मोजायचे प्रमाण लावले आहे त्याने सांगू शकाल. परंतु काळ एकाच जागी असता तर तुम्ही जन्माला आले नसते, जन्माला आले असते तर मोठे झालेच नसते, मोठे झालेच तर उद्या म्हातारे होणार नाहीत, म्हातारे झालेच तर तुम्हाला मरण ही येणार नाही. पृथ्वी काय सुर्याभोवती अशीच फिरत राहील पण तुमचे शरीर बदलतेय ते कशामुळे? आयुष्यात सगळ्या घटना एकारेषेत येतात का? तुम्हाला भुक लागली की भूक लागतच रहाते का? तशी घटना घडली की तुम्ही काहीतरी खाणं खाता. तुम्ही खाणं खात बसता तेव्हा फक्त खातच बसता? थांबत नाही? पोट भरले हा संकेत मिळाला की थांबता ना? ह्या घटना काळाच्या परिसरातच (एरियामध्येच) घडतात ना? मग काळ एकाच जागी असता तर तुम्हाला भूक लागणार नाही, लागली तर ती थांबणारच नाही. प्रत्येक क्रिया काळाच्या परिसरातच मोडतात. मी मायक्रो स्तरवर वेगळं ते काय सांगतोय?

^ वर