'चंगू-मंगू'ची कमाल

अमेरिकेच्या रॉजर स्पेरी या शास्त्रद्नयाने 'चंगु-मंगु ची कमाल' अर्थात 'उजवा मेंदू-डावा मेंदू' ही संकल्पना मांडली.
रॉजर स्पेरी साहेबानं दुसर्‍यांच्या मेंदूचा अभ्यास करीत ही संकल्पना कागदावर उतरविली. खरंच गंमत आहे ना? आपल्या इतिहासामध्ये र्‍हूषी मुनींनी स्वानुभवातून आत्मा-परमात्म्याचं मिलन, कुंडलिनी जागृत होणं असं बरंच काही सांगून ठेवलं होतं. हा 'आत्मा-परमात्मा' स्पेरीसाहेबाचा 'चंगु-मंगु' तर नाही ना? त्या काळात र्‍हूषी मुनी जसजसे आपले मनोबल आत्मज्ञानाने वाढवत न्यायचे तसतसे त्यांना महर्षी, देवर्षी अशा उपाध्या मिळायच्या. गंमत म्हणजे आजच्या काळात, स्पेरीसाहेब ही 'नोबेल पारितोषिकाने सन्मानित झालेला आहे. ह्या स्पेरीसाहेबाला १९८१ च्या दरम्यान त्यानं केलेले संशोधन कागदावर लिहून काढून ते पद्धतशीरपणे ठराविक संस्थेच्या माध्यमातून जगासमोर आणल्याबद्दल 'नोबेल पारितोषिक' मिळालं होतं.
आता ह्या 'चंगु-मंगुं' च्या स्वभावाचे विश्लेषण पाहूया.
उजवा मेंदू-
1. नियमांची चौकट न मानणारा
2. उपजत शहाणपण किंवा प्रतिभासंपन्न असणारा
3. सगळ्या गोष्टीचं एकत्रीकरण करून, संयोग करून पहाणारा
4. आत्मकेंद्रीत
5. कल्पनाविश्वात रमणारा
डावा मेंदू
1. नियमांची चौकट मानणारा, सहज-सुलभ तर्क करणारा
2. परंपरावादी
3. पृथक्करण करणारा असल्यामुळे 'दोष काढणारा', 'आरोप-प्रत्यारोप करणारा'
4. बाह्यगोष्टीत रस घेणारा
5. वास्तववादी
वरील उदाहरणावरून आपल्या लक्षात येईल की,बदलत्या काळानुसार लिखाणाला व ते पद्धतशीरपणे मांडण्याला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झालेलं आहे. पण आपलं घोडं अडतं ते लिहिण्यावरच. एका हाताने मनातले विचार धडाधड लिहून-लिहून लिहिणार तरी किती? पाश्च्यात्यांनी 'टंकलेखन यंत्र' व त्या पाठोपाठ काही काळानंतर संगणकावर 'लिखाण' करण्याचा शोध लावला. (खरंतर संगणकावर 'लिखाणाचा शोध लागण्यामागे नियतीचीच इच्छा होती. कारण वॉन नॉमनच्या मनाविरोधात ते घडले होते) आणि त्या बरोबरच पाश्च्यात्यांनी मनातले विचार दोन हातांनी धडा-धडा प्रवाहीत करण्याचा सपाटा लावला व जे लिहिलं ते वास्तवात अणूनं संपूर्ण जगाला हरवलेच. रोमन लिपीही या यंत्रांना चांगलीच सोयीची ठरली. पण आपण मात्र आपल्या भाषेतच, आपल्या लिपीतच लिहायचं म्हटलं तरी अडखळतोय. इथं 'लिहिणं' म्हणजे फक्त कागदावर वा पडद्यावर अक्शर उमटविणं नाही, तर दोनही मेंदूंची -'चंगु-मंगुं' ची साथसंगत घेवून स्वतःच, काहीतरी दर्जेदार, जे लोकांच्या उपयोगी पडेल असं काहीतरी लिहिणं असा आहे.
शेवटी, देवबाप्पानं तोंड दिलंय ते गुळाचा गोडवा जपून बोलण्यासाठीच नां? दोन हात दिलेत ते स्वजनांसाठी ज्ञानाचा अमृत कुंभ रिता करून देण्यासाठीच नां?
सध्याची 'बाळबोध लिपी' ही एका हाताने लिहिण्यासाठी सोयीची होती. परंतू हे जग स्पर्धेचे असल्यामुळे वेगानं लिहायचं म्हटलं, तर 'टंकले़खन यंत्र' वा 'संगणकाचा' वापर हा करावाच लागणार. नाही का? आता संगणकाचा वापर म्हणजे दोन हातांचा, नऊ बोटांचा वापर ही आलाच. स्पेरी साहेबानं आपल्या 'चंगु-मंगु' च्या संकल्पनेतून सांगितलंच आहे की, उजव्या मेंदूचे शरीराच्या डाव्या भागावर नियंत्रण असते. व डाव्या मेंदूचे शरीराच्या उजव्या भागावर नियंत्रण असते. आणि म्हणूनच 'बाळबोध लिपी' च्या वापराने आपण एका मेंदूचाच वापर करतो.
तुम्ही म्हणाल याला पुरावा काय?
उजव्या मेंदूचे व डाव्या मेंदूचे गुण आपण वर पाहिलेच. ते परस्परभिन्न म्हणजेच अगदी 'उलट-सुलट' आहेत. होय नां?
आरशात पाहिल्यावर आपल्याला आपलं 'प्रतिबिंब' कसे दिसते? 'उलट-सुलट'. होय नां?
मग तसंच, ऱ्हस्व 'इकारांत' (पि) आपण ज्या पद्धतीने लिहितो त्याच्या अगदी सुलट दीर्घ 'ईकारांत' (पी) लिहितो. होय नां?
तसंच, ऱ्हस्व 'उकारांत' (पु) आपण ज्या पद्धतीने लिहितो त्याच्या अगदी उलट दीर्घ 'ऊकारांत' (पू) लिहितो. होय नां?
'असं कसं?' म्हणून तुम्ही विचारताय. अहो 'उत्तर' हेच आहे की आपण आतापर्यंत आपण 'बाळबोध लिपी' मुळे एकाच मेंदूचा वापर करतोय. या जगात जी प्रगती दिसतेय ती तंत्राची कमाल नसून प्रगत होत जाणार्‍या 'चंगू-मंगू'ची कमाल आहे. घ्यायचंच झालं तर पाश्च्यात्यांकडून त्यांचा 'गूळ' घ्यावा, व तो 'लपलाय' त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीमद्ध्ये, आपले विचार दुसर्‍यापर्यंत पोहचविण्याच्या तंत्रामध्ये.

--------------------------------------------------------------------------------------------
हेतू:- या लेखाचा हेतू 'लिहिण्याचा पद्धतीचे'.......'लिपीचे'.........'सुबोध लिपी' चे महत्व विशद करणे हा होय.

लेखनविषय: दुवे:

Comments

कल्पक मांडणी

पण विचार पटत नाहीत.

इंग्रजी दोन्ही हातांनी टंकणारे गेली अनेक दशके दिसून येतात. ते सर्व डावा मेंदूच वापरतात. (किंवा थोडे उजवा मेंदूच वापरतात. दोन्ही नाही.)

(९०% उजवखुरे, ७०% डावखुरे, यांच्या मेंदूतली भाषा केंद्रे डाव्या मेंदूतल्या "ब्रोका" आणि वेर्निक्के" भागातच असतात. उरलेल्यांची उजव्या मेंदूतच. मेंदूच्या दोन्ही गोलार्धात नाही.)

दोन हातांनी टंकन केले तरी मेंदूतली एकीकडचीच भाषा केंद्रे कार्यरत असतात.

टाइपराइटरचा पुष्कळ वापर १८५०च्या आजूबाजूला होऊ लागला. पोर्तुगिजांनी गोवा बेट १५१० मध्ये जिंकले, आणि इंग्रजांनी प्लासीची लढाई १७५७ साली. दोनहाती लेखनामुळे पाश्चात्त्यांनी जग जिंकले असे म्हणणे म्हणजे जरा ओढून-ताणून वाटते.

तुमच्या मूळ हेतूबाबत : आहे ती देवनागरी लिपी "बाळबोध" आहे, हे मला फारसे पटलेले नाही. (किंवा "बाळबोध" शब्दापासून तुम्हाला अभिप्रेत अर्थ कळत नाही. तुम्ही फार श्रम घेऊन निर्माण केलेली सुबोध लिपी छानच आहे. पण देवनागरी लिपी बदलून सुबोध लिपी वापरावी असे तुम्ही म्हणता. तो सामाजिक खर्च व्यवहार्य वाटत नाही. तुम्ही सांगता तो फायदा खर्चाच्या मानाने कमी वाटतो.)

(वेलांट्यांमध्ये "कि" एका दिशेने, "की "दुसर्‍या दिशेने, उकारांमध्ये "कु" एका दिशेने आणि "कू" दुसर्‍या दिशेने, म्हणजे दोन्ही दिशांचे हात, आणि दोन्ही दिशांचे मेंदू वापरल्यामुळे आहे, असे तुम्हाला नाही वाटत? ह. घ्या.)

पण तुमच्या कल्पक मांडणीला सलाम! उजव्या-डाव्या मेंदूचे काहीही असो, आणि इतिहासाचे काहीही असो, दोन-हाती टंकनाने वेळ वाचतो असा मलाही अनुभव आहे. त्याबद्दल तुमच्याशी सहमत.

विचार पटत नाहीत?

श्री. धनंजय अमेरीकी,

यांचे प्रस्तुत लेखास प्रतिसाद देण्याबाबत आभार!

या संकेतस्थळावरील आपले अनेक लेख त्याचबरोबर इतर लेखांवरील प्रतिसाद ही आम्ही वाचलेत. आपल्या लिखाणातून आपण अतिशय बुद्धिमान, चतुर, व्यवहार कुशल आहात हे प्रतीत होते. 'जग हे वाद-विवादातून जिंकायचं असतं' ह्या वरती आपली चांगलीच श्रद्धा आहे हे आपल्या विद्वत्तापूर्ण उत्तरांमधून अभिव्यक्त होते. खरंच, तुम्ही तुम्ही किती थोर आहात. आपल्या कष्टाने, बुद्धिमत्तेने, ज्ञानाने आपण आपल्या देशाची, आपल्या स्वजनाची सेवा करता. व त्यातूनही आपल्या अमूल्य वेळात वेळ काढून आम्हा महाराष्ट्रातील अजाण, अज्ञानी मराठी परजनांसाठी आपल्या ज्ञानाचे भांडार खुले करण्यासाठी चर्चा करता हे खरंच किती, किती छान आहे!
आपल्याला सर्व कळतं. आपल्याला सर्व कळतंय.......पण....

मग आपण कृपया....
'घोडा का अडला?...
भाकरी का अडली?....'
या कोड्याचं उत्तर आम्हाला सांगून उपकृत कराच, अशी आपणांस विनंती.

-------------------------------------------------------------------------
सुबोध लिपी - पूढचं पाऊल

प्रश्न फिरवावा

बेलगाम फिरवलेले घोडे आणि न थापता फिरवलेली भाकरी, अडली नाही तरी काय कामाची, असा विचार मनात येतो.

बदल सुचवताना खर्च आणि फायद्याचा हिशोब लावावा. मग कल्पनांच्या तसेच पैशाच्या बाजारात हा नाविन्यपूर्ण प्रस्ताव अडणार नाही.

अन्य चर्चांमधील माझ्या सहभागाबद्दल तुमच्या प्रशंसेला मी पात्र नाही. त्या त्या चर्चांमधील तुमची मते तिथे तिथे द्यावीत. माझे काही चुकले असल्यास मला सुधार करता येईल.

डी ची वाटी.

मुले जेव्हा नव्याने रोमन लिपी लिहायला सुरुवात करतात, तेव्हा छोट्या 'डी' आणि 'बी' मध्ये घोटाळा करतात. तसेच पी आणि क्यू मध्ये. त्यामुळे आमचा मुलगा तोंडाने "डी'ची वाटी डावीकडे" असे मोठ्याने बोलतबोलतच डी काढायचा. (याला त्याचा एक व्यत्यास होता--'बी'ची वाटी बुजवीकडे!). म्हणजे डी आणि बी लिहिताना आपण दोन्ही मेंदू वापरतो असा चुकीचा निष्कर्ष निघेल. तसेच र्‍हस्व दीर्घ वेलांटी आणि उकारांचे.--वाचक्‍नवी

 
^ वर