खंडोबाची टेकडी

खंडोबाची टेकडी हे ठिकाण माहित नाही असा माणूस नासिकमध्ये विरळाच! नासिकपासून १५ किमी. वरील देवळाली कॅंप भागात असलेली ही टेकडी स्वच्छ, मोकळ्या हवेमुळे व निरव शांततेमुळे प्रसिद्ध आहे. देवळालीतून निघाल्यावर काही मिनिटांतच टेकडीजवळ पोहोचायला होतं.हा संपूर्ण भाग सैन्याच्या ताब्यात असल्याने पायथ्यापाशी जवान उभे असतात. पायथ्यापाशीच डावीकडे एक तोफ दिसते. चढाईच्या सुरूवातीलाच या ठिकाणाबद्दलची माहिती लिहिलेली आहे. त्यांत या टेकडीचा विश्रामगड आणि शिवाजीमहाराजांच्या या टेकडीवरील वास्तव्याचा चुकीचा उल्लेख आहे. खरं तर विश्रामगड म्हणजे इथून जवळच असलेला पट्टा किल्ला व महाराजांचं वास्तव्य पट्टा किल्ल्यावर होतं. असो. टेकडी चढतांना रूंद व कमी उंचीच्या पायर्‍या असल्याने दमछाकही फारशी होत नाही. टेकडीचं सुंदर सुशोभीकरण केलं आहे. माथ्यावरील घुमटाकृती खंडोबाच्या मंदिराला आटोपशीर तट आहे.

मंदिराच्या आवारामध्ये बघण्यासारखे म्हणजे एक मोठी घंटा ...

..आणि बसलेल्या शंकराच्या डोक्यावर तोंड रेलवून मागे उभ्या असलेल्या नंदीची मूर्ती आणि द्वारावर उभे असलेले २ राक्षस-- मणि आणि मल्ल. या मणी आणि मल्ल या राक्षसांपासून भक्तांचे संरक्षण करण्यासाठी शंकराने मार्तंड भैरवाचा अवतार घेऊन त्यांचा विनाश केला. ते दोघेही शिवभक्त होते. परंतु त्यांना शंकराचाच विसर पडला होता. त्यामुळे त्यांचा नाश करण्यासाठी शंकराला मल्हारी मार्तंडाचा अवतार घ्यावा लागला होता, अशी आख्यायिका.

गाभार्‍यात ८ फुटी मुर्ती असलेल्या खांडधारी खंडोबाच्या दोन्ही बाजूंस बाणाई व म्हाळसाई यांच्याही मुर्त्या आहेत.राक्षसांशी झालेल्या युध्दात 'खांड' नामक तलवारीचा वापर कण्यात आल्याने खांडधारी 'खंडोबा'च्या नावाने मार्तंड मल्हारी ओळखले जाऊ लागले. खंडोबा मुळात कर्नाटकमधील देव आहे. कानडी भाषेत येळू म्हणजे सात व कोट म्हणजे कोटी म्हटले जाते. खंडोबाचे सात कोटी सैन्य होते.सात कोटींच्या संख्येत आपल्या घरात धनधान्य संपत्ती नांदावी,असा हेतु त्यांत आहे. त्यामुळे 'तळी आरती'च्या वेळी 'येळकोट येळकोट जय मल्हार' असा जयघोष केला जातो.
खंडोबाच्या पत्नीचे नाव म्हाळसा होते म्हणून खंडोबांला म्हाळसाकांत म्हटले जाते. खंडोबाची दुसरी पत्नी बाणाई धनगर होती. धनगर समाजाची ती कुलदेवता आहे. खंडोबाची पूजा करताना तळी भंडार्‍याला खूप महत्व आहे. नवीन येणारी बाजरी, वांगी, गुळ, लसुण, कांदे यांचा नैवेद्य यावेळी दाखविला जातो. खोबर्‍याचा प्रसाद देऊन कपाळावर हळदीचा भंडारा लावला जातो. त्यासोबत 'येळकोट येळकोट जय मल्हार' च्या जयघोषात 'तळी' उचलून खंडोबाचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.खंडोबाचा उत्सव चंपाषष्ठीला असतो.

अशी ही अर्ध्या दिवसाची खंडोबाची टेकडीची वारी सुफळ संपुर्ण...

लेखनविषय: दुवे:

Comments

..फोटो ?????

फोटो कां चिकटत नाहीयेत? कुणीतरी सांगा..

- हेमन्त

पिकासावरील फोटो देण्याची पद्धत

१. लेखात टाकण्यासाठी पिकासावर चढवलेला फोटो निवडावा. (त्यावर क्लिक करावे)
२. फोटोच्या उजवीकडे दिसणार्‍या Link to this photo वर क्लिक करावे.
३. Embed image मधील शब्द लेखात पेस्ट करा म्हणजे चित्र दिसेल.

स्रोत चुकीचे

प्रकाशचित्रांचे स्रोत चुकीचे होते. चित्रे ज्या पानावर होती त्या पानांचे पत्ते टाकले होते.

गूगल पिकासावेबच्या आपल्या पानावर जाऊन हवा तो चित्रसंग्रह टिचकी मारून निवडावा.
उघडलेल्या चित्रसंग्रहातले आपल्याला हवे ते चित्र टिचकी मारून निवडावे.

पर्याय १

  1. उघडलेल्या चित्राच्या पानावर उजवीकडच्या स्तंभात निरनिराळे पर्याय दिसतात त्यातला Embed Image ह्या पर्यायाकडे लक्ष द्यावे.
  2. तेथेच खाली Select size मध्ये चित्राचे हवे ते आकारमान निवडावे आणि Image only (no link) हा पर्याय त्याच्या चौकटीत टिचकी मारून निवडावा.
  3. अशी सर्व निवड केली की त्याच्या लगोलग वर Embed Image ह्या रकान्यात चित्राचा अनुरूप स्रोत तयार होतो, तो मूषकाने निवडून त्याची प्रत घ्यावी.

किंवा

पर्याय २
उघडलेल्या चित्रावर उजवी टिचकी (राइट क्लिक) देऊन प्रकाशचित्राचा स्रोत (इमेज लोकेशन) निवडून त्याची प्रत घ्यावी.

छान आहे

मंदीर छोटे पण सुबक दिसते आहे. लष्कराच्या प्रभावामूळे इतकी स्वच्छता आहे का?
मंदीरावर मुस्लीम बांधकाम शैलीचा प्रभाव दिसतो, म्हणजे मध्ययुगीन असावे. नंदीचे शिल्प दक्षिण भारतीय वाटते. या दोन्हीचा विचार करून हे आदीलशाही राजवटीतील असावे का?
||वाछितो विजयी होईबा||

माहितीपूर्ण स्फुट

मिलिटरी शिस्तीतील देवळाचे अंतरंग आवडले.
मंदिराच्या कालाबद्दलचा तुषार यांचा कयास विचार करण्याजोगा आहे.
अवांतरः
रा.चिं.ढेरे यांचे 'दक्षिणेचा लोकदेव खंडोबा' हे पुस्तक आणि पुस्तकावर आधारित हे विकीपान वाचण्याजोगे आहे.

देऊळ मस्त आहे

जावे लागेल एकदा.

 
^ वर