छायाचित्र : क्रिस्टीन फॉल्स

माउंट रेनियर नॅशनल पार्क ही अमेरिकेच्या वॉशिंग्टन राज्यातील अतिशय सुंदर जागा आहे.
माउंट रेनियर हे मूख्य आकर्षण असले तरी तिथल्या कडेकपारीत काही छान झरेही बघण्यासारखे आहेत. त्यापैकीच एक म्हणजे क्रिस्टीन फॉल्स.

शटरस्पीड कमी जास्त करुन एक षष्ठांश सेकंदापुरते शटर उघडे ठेवल्यावर मनासारखा (पाण्याला धूसर करणारा) परीणाम मिळाला.

लेखनविषय: दुवे:

Comments

उत्तम

हवा स्तब्ध असल्यामुळे पाने रेखीव आलेली आहेत.

आणखी एक फार चांगले : तंत्राबाबत वापरण्याजोगी माहिती चित्रासोबत पुरवली. (नुसते आस्वादाकरिता चित्र पुरवले, तर ती ललितकला होय. विद्युतचलनचक्रगुरुजींशी सहमत. त्यातून माहिती कळत नाही. अशी चूक मी खुद्द मागे काही वेळा केलेली आहे. प्रकाशचित्रण समुदायात आस्वादाच्या जोडीने माहितीची देवाणघेवाण केली तर उपक्रम अधिक खुलतो.)

सहमत

बर्‍याच दिवसांनी कोलबेरने काढलेले छायाचित्र पहायला मिळाले.


छा॑न

सुंदर जागा आणि फोटोदेखिल!

मस्त

फोटो व धबधबा!

सुरेख

वाह! फारच सुरेख चित्र!
**अवांतरः बर्‍याच दिवसांनी धागा सुरू केलात. वेलकम ब्याक :)**

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

अप्रतिम

फारच छान एक्सपोजर! स्लो शटरस्पीडचा सुंदर परिणाम साधलाय!

झकास

झकास बुवा. राज कपूर ह्यांच्या एका चित्रपटाची आठवण झाली. नाही दोन.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

छान

खालच्या बाजूला चित्र थोडे कमी केल्यास अधिक परिणाम साधता आला असता या शक्यतेवर विचार करतोय.

*धबधब्याचे मुख व पुढे असलेला डिल्डोसदृश खडक यावरून राहूल सांस्कृत्यायन यांचे एक पुस्तक आठवले.*

उत्तम

सुरेख चित्र. धबधबा पाहून व एक्पोजर हा शब्द वाचून श्री. रामगोपाल वर्मा यांच्या दौड चित्रपटाची आठवण झाली.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

मस्त रे...!

फोटो भारीच....!

-दिलीप बिरुटे

छान

धबधब्याचे चित्र आणि त्यातले धूसर पाणी... मस्त!
का, कुणास ठाऊक, पण मला चित्राचा खालचा अर्धा भाग जास्त आवडला. बराच वेळ बघत होते.

अवांतरः नंतर वाटले की पाणी धूसर न दिसता नैसर्गीक दिसले असते तर हे चित्र मला आणखी आवडले असते का?
आपली हरकत नसल्यास आणि आपल्याजवळ उपलब्ध असल्यास तसे एखादे चित्र येथे द्यावे.

 
^ वर