पहिले अंडे, की पहिली कोंबडी

पहिले अंडे, की पहिली कोंबडी
-
Wednesday, July 14, 2010 AT 12:00 AM (IST) सकाळ पुणे
Tags: egg, research, Chicken

लंडन - पृथ्वीवर पहिले अंडे आले, की कोंबडी?, हा प्रश्‍न हजारो वर्षांपासून सर्वांना सतावत आहे. आता मात्र, या प्रश्‍नाचे उत्तर शोधून काढण्यात वैज्ञानिकांना यश आले आहे. अर्थात काही शास्त्रज्ञांनी तसा दावा केला आहे.

शेफील्ड आणि वारविक विश्‍वविद्यालयाच्या वैज्ञानिकांनी हा दावा करताना सर्वप्रथम कोंबडीचा जन्म झाल्याचे सांगितले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, ओवोक्‍लाइडिन नावाचे प्रोटीन अंडे उघडण्यात महत्त्वाची भूमिका बजावत असते. हे प्रोटीन कोंबडीच्या अंडाशयातून निर्माण होत असते. त्यामुळे आता अंडे पहिले आले, की कोंबडी हा प्रश्‍नच राहात नाही. कोंबडीचाच जन्म आधी झाला आहे.
अंडे उघडून त्यांची तपासणी करण्यासाठी वैज्ञानिकांनी अत्याधुनिक संगणक हेक्‍टरचा वापर केला आहे.
शोधाशी निगडित असलेले प्रमुख वैज्ञानिक डॉ. कोलिन फ्रीमैन म्हणाले, की गेल्या हजारो वर्षांपासून हा प्रश्‍न विचारला जात होता. मात्र, आता आमच्याकडे पहिले कोंबडी आली, याचा पुरावा आहे.
वैज्ञानिकांच्या या अहवालात मात्र पहिले कोंबडी कशी आली, याचा माहिती दिली गेलेली नाही.
आधी कोंबडी का अंडे या फंदात आपण न पडता कोंबडीच्या आणि अंड्याच्या विविध खाद्यपदार्था चे सेवन करू . शास्त्रज्ञा ना काय डोकेफोड करायची ती करु द्या खरच कोण आधी हा प्रश्नच आहे ?

लेखनविषय: दुवे:

Comments

आधी कोंबडीच

आधी कोंबडीच. नाहीतर देवाला अंडी उबवायला लागली असती. हे उत्तर गेल्या ५ वर्षापासून ऐकत आलो आहे.

धन्यवाद.......!

माहितीबद्दल आभारी.......!

दै. संध्यानंदमधेही अशा उलट-सुलट संशोधनाच्या बातम्या असतात.
या विद्यापीठातील अमुक तमुक डॉक्टर, अमुक तुमुक संशोधन करणार्‍या शास्त्रज्ञांच्या गटाने,
अमुक तमुक वर्षापासून संशोधन करणारे अमुक-तमुक देशाच्या संयुक्त विद्यमाने विषय आणि त्यांचे निष्कर्ष....सत्य-असत्य कोण पडताळून पाहणार नाही का ?

-दिलीप बिरुटे

आषाढस्य प्रथम दिवसे?

श्री. ठणठणपाळ तुमचा आखाड सुरु झाला काय? पुन्हा चार महिने खायला मिळणार नाही म्हणून विचारतो.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

अतिशय मौलिक घटना दिसतेय

अरेच्या! हा प्रश्न इतका गहन आणि गाजलेला आहे हे आजच कळलं.. आज अनेक घटना घडूनही (भारत पाक चर्चा, सायना चे क्रमवारीत दुसरे स्थान, मुंबईतील सेवरीची गॅस गळती, रुपयाची नवी खुण वगैरे वगैरे) लोकसत्तासारख्या एका अग्रणी वृत्तपत्राने आधी कोंबडी की अंडे या शोधाला आजचा अग्रलेख वाहिला आहे.

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

बट व्हॉट अबाऊट कोंबडा!!!

खरचं! जगातील सगळ्या आधी जन्मलेल्या कोंबडीने पहिल्यांदा 'अंड घातले' असेल तेव्हा ती किती गोंधळली, गडबडली असेल नां? कारण हे सगळे आहे तरी काय? हे तीला कुठे माहित होते?

पण मला प्रश्न पडला आहे तो...कोंबड्याचा?
'आधि अंडे कि आधि कोंबडी' हा प्रश्न वैद्न्यानिकांनी सोडवला चांगली गोष्ट आहे.
पण हे सगळे होत असताना 'कोंबडा काय करत होता?'

प्रकृती

काय हो? प्रत्येक संस्थळाच्या प्रकृतीप्रमाणे लेखन करायचे असते ना?
मग इकडे असा प्रतिसाद ?

नितिन थत्ते
(नाऊ आय डोंट हॅव टु राईट धिस वे)

माझं काय चूकलं?

नितिन दादा,
प्रश्न गहन आणि किलीष्टच आहे. प्रश्न लिहीण्यात, विचारण्यात माझं काय चूकलं?
कोंबडी अंड केव्हा देवू शकते? हा माझा प्रश्न आहे.

हे उत्तर असू शकेल.

कदाचित सगळ्यात आधि तो/ती 'टू-इन-वन' असेल.

'आधि कोंबडी' शक्यच नाही! 'आधि अंडेच' असेल पाहीजे!

काल परवाच वर्तमान पत्रात बातमी आली की ' कोंबडीच आधी'! म्हणजे पाश्चात्य संशोधकांनी ‘कोंबडी आधी की अंडं आधी?’ या प्रश्नाचा फैसला लावला असून ‘कोंबडीच आधी’ असा निर्वाळा दिला आहे. खरचं! काय गंमत आहे ना? जगातील सगळ्यात पहिल्या कोंबडीने पहिल्यांदाच 'अंड घातले' असेल तेव्हा ती खरचं किती गोंधळली, गडबडली असेल नां?
'हे सगळे आहे तरी काय?' हे तीला कुठे माहित होते? अहो! कारण ती बिचारी एकटीच तर होती ना? तिला कोणी समजवायला, धीर द्यायला तिच्या जगळपास कोणीच नव्हते ना! आधि काय खायचे? नंतर काय खायचे? दाणे, बीया खायच्या? कि किडे, मुंग्या खायच्या? किडे खायचे तर असेच खायचे की सोलून खायचे? असल्या प्रश्नोत्तरांनी व्यापलेले सल्ले देणार्‍या कोणी ताई, माई आत्या, मावशी जवळ नव्हते. कुणी म्हणजे कुणीच नव्हते. त्या कुमारीकेला तीने जगातील पहिले अंडे घातल्यानंतर तीचे अभिनंदन करणारेही तीच्या पाशी कुणीच नव्हते.

खरचं पाश्चात्य संशोधकांनी ह्यावर संशोधन करून त्यांचे निश्कर्श जाहिर काय केले आणि काही मराठी वर्तमानपत्रात त्या बातमीवर अग्रलेख ही लिहीले गेले. बघा! आहे कि नाही कमाल?

पण मी एक हिंदू! माझ्या विचारांवर आतापर्यंत विष्णूचे अवतार कोरले गेले आहेत. ब्रह्माने सृष्टी निर्माण केल्यावर सजीवांमधील पहीला अवतार पाण्यातला, दुसरा जमिन-पाण्यावरचा वैगरे-वैगरे, हेच समजत होतो. जगाचे नियम 'आतून' व 'बाहेरून' सारखेच असतात. म्हणजे .. पृथ्वी गोल असते, पृथ्वीवर आधि पाणीच-पाणी होते. अंड देखील गोल असते. (एक्सॅटली गोल नसते, नाहीतर कोंबडीला त्रास होईल ना!) अंड्यातही पाणि (द्रव्य पदार्थ या अर्थाने) असते. सगळ्यात आधि पाण्यात जीव जन्म घेतो.

उन्हाळ्यात, ओसाड माळावर जिथे सगळे ओसाड असते, तिथे पावसाळ्यात अनेक जीव, जंतु जन्माला येतात, हिरवाई बहरून येते. ते कसे? परस्परावलंबन हाच सजीव सृष्टीचा आधार आहे. अनेक जीव, जंतु, पशू, पक्शी, वेली, झाडे एकमेकांवर अवलंबून असतात. 'विष्णूचे अवतार' या संकल्पनेशी सार्धम्या सांगणारे डार्विन ह्या पाश्च्यात्य संशोधकाची मते मला इथपर पटतात. पण 'आधि कोंबडीच!' हे लंडनच्या संशोधकांचे संशोधन करून मांडलेले मत मान्य करता येत नाही.

मी लहानपणापासून 'शंकर, पार्वती व गणपति' डोळ्याने पहात आलो आहे.
आधी 'कुमारीका' मग तीचे 'अपत्य', त्यात ही ते अपत्य 'तो' असणार की 'ती' असणार? हे माहीत नाही. असे कसे?
''आधि अंडे कि आधि कोंबडी' हा प्रश्न पाश्चात्य संशोधकांनी सोडवला' असे म्हटले तरीही, मला प्रश्न पडतो , 'तर मग कोंबड्याचा उपयोग तो काय?'

????

घासकडवी यांची उत्क्रांतीवरची मालीका वाचून थोडं समजू लागलंय असं वाटू लागलं होतं.
पण आता कोंबडीच आधी असे म्हटल्यावर पुन्हा काही कळेना झालंय.

नितिन थत्ते
(नाऊ आय डोंट हॅव टु राईट धिस वे)

 
^ वर