फाफॉ - ऍडऑन

ब्राउझर वॉरमुळे सध्या कोणता सगळ्यात चांगला हे सांगणे कठीण झाले आहे. त्यावर मी शोधलेला उपाय म्हणजे सगळे वापरून जो चांगला वाटतो तो वापरणे. असे केले असता खिडक्यांमध्ये क्रोम/सफारी आणि लिनक्समध्ये फाफॉ सगळ्यात वेगवान असल्याचे दिसले.

फाफॉचा आणखीन एक मोठठा फायदा म्हणजे ऍडऑन. मी वापरत असलेले ऍडऑन :

ऍडब्लॉक प्लस : जाहीराती ब्लॉक केल्या की पाने पटापट लोड होतात.

एचटीटीपीएस एव्हरीव्हेअर : : हे ऍडऑन बर्‍याच सायटीचे कनेक्शन एनक्रिप्टेड करते ज्यामुळे तुमची सुरक्षितता वाढते.

नोस्क्रिप्ट : आमचे आंतरजाल कनेक्शन आधीच दिव्य. त्यात पानावर स्क्रिप्टा असल्या की "घरचं झालं थोडं, अन व्याह्यानं धाडल घोडं" अशी परिस्थिती व्हायची. स्क्रिप्टा बंद केल्या की बराच फरक पडतो असे आढळले. अर्थात काही स्क्रिप्टांना परवानगी द्यावी लागते पण ते आपल्याला ठरवता येते.

रीड इट लेटर : हल्ली ट्विटरमुळे बरेच चांगले लेख मिळतात. वाचायला वेळ असतोच असे नाही. बुकमार्क केले तर वाचून झाल्यावर शोधून डिलिट करणे आले. आणि पान सेव्ह केले तर परत धुंडाळणे आले. त्याऐवजी रीड इट लेटर मध्ये नंतर वाचायच्या लेखांची नोंदणी केली तर काम फारच सोपे होते.

डाउन देम ऑल : डाउनलोड म्यानेजर

फास्ट डायल : क्रोम तुम्ही नेहेमी जाता ती पाने नवीन ट्याबमध्ये खिडक्यांच्या रूपात साठवते. फाफॉमध्ये ती सोय हवी असल्यास हे वापरा. मात्र पाने हाताने साठवावी लागतात.

याखेरीज फाफॉचे पर्सोनाही मस्त आहेत.

तुमचे आवडते ऍडऑन वरच्या यादीत नसले तर सांगा.

Comments

मी वापरत असलेले ऍडऑन (विंडोज-फाफॉ)

फास्टेस्टफॉक्सः गूगल शोध (वेब/चित्रे) सारख्या ठिकाणी जेथे एकाहून अधिक् पाने असू शकतात, तेथे पुढील पाने आधीच डाऊनलोड होतात आणि नेक्स्ट् वर् क्लिक करावे लागत नाही.
घोस्टरी: आपण पाहत असलेल्या पानावर ट्रॅकर कूकीज असल्या तर सूचना देतो आणि पाहिजे असल्या तर ब्लॉक पण करता येतात.
वॉट(WOT-Web of trust): आपण पाहत अस्लेले पान किती विश्वासार्ह आहे ते कळते.(विश्वासार्ह इन् द सेन्स्, त्या पानावर धोकादायक गोष्टी आहेत की नाहीत-उदा. ऍडवेअर)
ट्वीक ट्युब : यु-ट्युब एनहान्सर(मराठी पर्यायी शब्द?)
||वाछितो विजयी होईबा||

वॉट

मागे धंडाळताना वॉट नजरेला पडले होते पण इन्स्टॉल करताना काहीतरी अडचण आली होती. आता परत करून बघतो. फास्टेस्टफॉक्स आंतरजाल कनेक्शन हळू असेल तर उपयोगी पडेल का याबद्दल विचार करतो आहे.

फोर्जरीने भरपूर कुक्या अडवल्या पण त्याने काही पाने लोड होत नाहीत असे लक्षात आले.

--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com

अनब्लॉक

घोस्टरी मध्ये त्या कूकीज् परत अनब्लॉक करता येतात की!

||वाछितो विजयी होईबा||

हो

पण कधीकधी कुठल्या कुकीच ब्लॉक केल्यामुळे घोळ होतो आहे हे कळणे थोडे कठीण जाते. तरीही परत एकदा करून बघतो.
वॉट टाकले, मस्त आहे. अनेक आभार.

--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com

वॉट

वॉटमध्ये उपक्रमाचे रेटिंग नाही. :(

रेटिंग

वॉटमध्ये उपक्रमाचे रेटिंग नाही. :(

कारण, संकेतस्थळाला भेट देणार्‍यांनी हे रेटिंग द्यावे लागते. त्यासाठी वॉटच्या संकेतस्थळावर सदस्यत्व घेऊन आपण रेटिंग द्यावे लागते. मी हा धागा सुरू झाला तेव्हाच रेटिंग दिले होते, पण मला वाटते, एकाचे रेटिंग पुरेसे नसावे. उपक्रमचे सदस्य वॉटचे सदस्य बनून उपक्रमचे रेटिंग वाढवतील काय?

रेटिंग प्राप्त करण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे वॉटकडून ते विकत घेणे. शुल्क मला माहिती नाही, पण उपक्रम हे १००% अव्यावसायिक आणि शुल्क रहित असल्याने, हा मार्ग मला अव्यवहार्य वाटतो.
||वाछितो विजयी होईबा||

ऍड ब्लॉक प्लस

ऍड ब्लॉक प्लसच्या सहाय्याने आता जाहिरातीच नाही तर मालवेअरही थांबवता येते. अर्थातच ब्यांडविड्थच्या मोबदल्यात.
अधिक माहिती इथे.

--
अनुदिनी : शब्द
http://rbk137.blogspot.com/

आरएसएस टिकर

आरएसएस फीड दाखविण्यासाठीचे RSS Ticker हे एक उत्तम अॅड ऑन आहे. मी वापरतो. सर्व ताज्या फीड दूरचित्रवाणीच्या पडद्याप्रमाणे फिरत्या ठेवण्याची सोय यात आहे. (scrolling text). खूपसा ताजा मजकूर सतत दृष्टीखाली राहण्यासाठी हा चांगला पर्याय आहे.

गूगल

मी आरएसएससाठी गूगल रीडर वापरतो. त्यापेक्षा हे वेगळे/सोपे पडावे का?

--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com

थोडेसे वेगळे

गूगल रिडर मुख्यतः ब्लॉग किंवा तत्सम मजकुरासाठी चांगले आहे. दिवसातून एकदा त्यातील ताज्या फीड तपासल्या, की काम भागते. मात्र ताज्या बातम्या किंवा जो मजकूर नेहमी बदलत आहे त्यासाठी असा फिरता मजकूर चांगला वाटतो. शिवाय एखादा दुवा आपण पाहिला, की तो वाचल्या गेला म्हणून निघून जातो. आपल्या एकूण फीडपैकी मोजक्या फीड फिरविण्याचीही सोय यात आहे.
मी आकाशवाणी, गुगल न्यूज आणि मटाच्या फीड घेतल्या आहेत. त्याची एक वानगी इथे देतो.

शेजारी आणखी एक अॅड ऑन आहे 'यूनू'चे. त्यातून ट्विटर, फेसबुक आणि अन्य ठिकाणांची अद्यतने पाहता व आपली अद्यतने तिथे नोंदवता येतात. त्यामुळे त्या संस्थळांवर जाण्याचा वेळ वाचतो.

ओक्के

ओक्के आता कळले. आभार.
मी न्यूज फीड विशेष वापरत नाही पण ट्वीटरसाठी हे बरेच उपयोगी आहे.

--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com

एरर येत आहे.

आर एस.एस. टीकर डाऊनलोड होत नाही. :(

-दिलीप बिरुटे

खिडकी

डाउअनलोडवर टिचकी मारल्यावर फाफॉच्या वरच्या भागात (जिथे ट्याब असतात त्याच्या खाली) अलाउ करावे का अशी विचारणा येते. तिथे टिचकी मारल्यावर आणखी एक खिडकी उघडते त्यात परत इन्स्टॉलवर टिचकी मारावी. इन्स्टॉल होईपर्यंत आधीची मोठी खिडकी बंद करू नये.

--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com

सहमत

किमान १% डाउनलोड होईपर्यंत तरी खिडकी बंद करू नये असा माझा 'वैयक्तिक अनुभव' आहे.

चांगला धागा

मी डाउन देम ऑल वापरतो. बाकीचेही बघतो आहे.

टॅब काउंटर: टॅबची संख्या दिसते (माझे साधारणपणे ५० असतात).
टॅबमिक्स प्लस: टॅबचे स्वरूप, उंदराने टॅबमध्ये करण्यासारखे बदल, टॅब जपण्याची अधिक चांगली सोय, टॅबची प्रत (कॉपी) करणे, बंद केलेल्या टॅबची यादी, इ.
स्पीड डायल: फास्ट डायल सारखेच आहे.
अन एमएचटी: इंटरनेट एक्स्प्लोररमध्ये कोणतेही पान mht स्वरूपात जपता येते. फाफॉमध्ये ते पान उघडता येते पण नवे पान mht जपण्यासाठी हे ऍडऑन उपयोगी आहे. mht स्वरूपात जपल्यास पानावरील मजकूर, सार्‍या चौकटी (फ्रेम), चित्रे, फ्लॅश चलच्चित्रे, इ. सारे एकाच फाईल मध्ये राहतात. सेव ऍज कम्प्लीट वेबपेज अशा प्रकारे पान जपल्यास मूळ पानावरील मजकूर एका फाईलमध्ये आणि बाकी सार्‍या फाईल एका फोल्डरमध्ये जातात. या फाईल-फोल्डरची जोडी जपणे त्रासाचे होऊ शकते.
हायपरवर्डस: पानावरील मजकुराचा कोणताही भाग उंदराने निवडून मग त्यावर अनेक प्रक्रिया करता येतात. उदा. वेगवेगळ्या शोध-संस्थळांवर शोधणे, भाषांतरित करणे, इ.
इमेज झूम: स्वयंस्पष्ट.
कूल आयरिस: (थोडेसे फास्टेस्टफॉक्ससारखे) अनेक चित्रे/चलच्चित्रे असलेली काही संस्थळे, उदा. गूगल प्रतिमा-शोध (इमेज सर्च), यूट्यूब, फ्लिकर, इ. ना पूर्ण-पडदा (फुल स्क्रीन) स्वरूपात बघता येते. आपण एखाद्या अनंत लांबीच्या भित्तीचित्रप्रदर्शनात चालतो आहोत असा अनुभव यावा अशी रचना आहे.
जीमेल मॅनेजर: एकापेक्षा अधिक जीमेल खाती एकाच वेळी फाफॉमध्ये वापरता येतात.
शिवाय शंतनूंचे ऍडऑन आहेतच.

यूट्यूब सारख्या संस्थळांवरील चित्रफिती ढापून संगणकावर उतरविणारे काही ऍडऑन होते. या फिती मग जालाशी संपर्क न जोडता बघता येतात, शिवाय जालसंपर्काचा वेग कमी असल्यास फीत तुटक तुटक चालते. त्यापेक्षा फीत उतरवून निवांतपणे बघणे सोयीचे पडते. यूट्यूबने नुकत्याच लावलेल्या सुरक्षांमुळे हे ऍडऑन चालत नाहीत. कृपया कोणास कार्यक्षम ऍडऑन माहिती असल्यास सांगा.

आभार

पाने सेव्ह करताना फोल्डरांचे काय करावे हा प्रश्न बरेच दिवसांपासून छळत होता. एमएचटीमुळे त्याचे उत्तर मिळाले. अनेक आभार.

बाकीची बघतो आहे. माझे ट्याब ५-६च्या वर जात नाहीत त्यामुळे ट्याब काउंटर बहुधा लागणार नाही.
--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com

युट्युब

युट्युब चित्रफिती साठवण्यासाठी मी थोडा वाकडा मार्ग वापरतो. चित्रफित एकदा संपूर्ण पळवून झाली की मोझिल्लाच्या क्याशेत तिची फाइल सापडते, ती कॉपी करायची. अर्थात बर्‍याच फिती साठवायच्या असतील तर हा मार्ग योग्य नाही.

--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com

हे पहा

सो थिंक् व्हीडीओ डाउनलोडर माझा अजुन् काम् करत् आहे. (मी सहसा व्हिडीओ डाउनलोड करत् नाही पण् व्हीडीओ पाहताना त्याची कॅश जमा होत आहे असा सिग्नल मला दिसतो म्हणुन् काम करत आहे.)

बाकी जीमेल् मॅनेजर फायरफॉक्स अपडेट करताना त्रास् देतो असे ऐकले होते, तुमचा काय् अनुभव?

-Nile

धन्यवाद

सोथिंक वापरून बघतो.
जीमेल मॅनेजर मी सध्या वापरत नाही.

चित्रफिती उतरवून घेण्यासाठी...

मी सर्व डाऊनलोड्स साठी इंटरनेट डाऊनलोड मॅनेजर वापरतो. ते इंस्टॉल करतानाच फाफॉशी स्वत:ला जोडून घेते. मग एखाद्या पानावर flv, 3gp, mp4, इ. कोणत्याही प्रकारची अंतर्भूत चित्रफित असेल तर तेथे पॉप देतो की डाऊनलोड करायचे का? पाहिजे तर् ऑनलाईन बघा नाहीतर डाऊनलोड करा...

example of IDM

त्याशिवाय चा पर्यायः ऍडऑनः Video DownloadHelper 4.7.4
||वाछितो विजयी होईबा||

ऑर्बिट

चित्रफीती, गाणी, फ्री सॉफ्टवेअर उतरवण्यासाठी मी ऑर्बिट डाऊनलोडर वापरतोय. मस्त आहे. उतरवताना मध्येच पॉझ वगैरे पण करता येते. शिवाय फाफॉमधून डाऊनलोड करताना बर्‍याचदा वेग कमी मिळतो. याच्यात वेग बरोबर मिळतो.

-सौरभ.

==================

+

फेवआयकॉनाइज़टॅब वापरा

टॅबची संख्या दिसते (माझे साधारणपणे ५० असतात).
एवढ्या टॅबा असल्यास फेवआयकॉनाइज़टॅब वापरून बघावे.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

कीबोर्ड शॉर्टकट

फाफॉमधील आणखी एक सोईची गोष्ट म्हणजे कीबोर्ड शॉर्टकट.

कंट्रोल + टी : नवीन ट्याब
कंट्रोल + एल : कर्सर युआरएल लोकेशन बारला जातो
कंट्रोल + के : कर्सर गुगल सर्च खिडकीत जातो.
दुवा नवीन ट्याबमध्ये उघडायचा असेल तर कंट्रोल + दुव्यावर टिचकी मारा.
जर एखादा ट्याब तुम्ही चुकून बंद केला तर कंट्रोल + शिफ्ट + टी दाबा. नुकताच बंद केलेला ट्याब परत येईल.
पानात खाली जायचे असेल तर स्पेस, वर यायचे असेल तर शिफ्ट + स्पेस.

याखेरीज क्याशे डिलिट केला नसेल आणि तुम्ही आधी गेलेल्या पानावर परत जायचे असेल तर जाण्याचा सर्वात वेगवान मार्ग म्हणजे त्या पानाच्या युआरएलमधील काही शब्द ऍड्रेस बारमध्ये टंका. उदा. उपक्रमासाठी फक्त mr टंकले की पर्याय दिसतील. पूर्ण पत्ता आठवत नसेल तर हे बरेचदा खूप उपयोगी पडते.

--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com

बाप...

बाप शॉर्टकटस् आहेत हे. नवीन टॅबचा सोडला तर इतर माहित नव्हते. धन्यु!

==================

+

हेच

हेच म्हणतो - मलाही हे माहितीच नव्हते.
आरागार्नरावांनी चांगली माहिती दिलीत!

मला हे सापडले -

 • कंट्रोल आर ने रिलोड
 • कंट्रोल यु ने कोड दिसतो
 • कंट्रोल आय ने बुकमार्क्स् ची यादी
 • कंट्रोल बी ने बुकमार्क्स् ची यादी
 • कंट्रोल डी ने बुकमार्क बनतो
 • कंट्रोल ओ ने नवी फाईल उघडण्याचे साधन
 • कंट्रोल पी ने प्रिंट
 • कंट्रोल एफ ने पानावर शोधा
 • कंट्रोल एच ने इतिहासाचे दालन
 • कंट्रोल जे ने डाउनलोड दालन
 • कंट्रोल एन ने नवे फाफॉ
 • कंट्रोल एम ने गमभन!
 • कंट्रोल # ने शेवटच्या उघडलेल्या टॅबवर जाता येते
 • कंट्रोल - आणि + ने अक्षरे लहान मोठी करता येतात

इतके मला सापडले

शिवाय
कंट्रोल शिफ्ट पी एकत्र दाबल्यास प्रायव्हेट ब्राउझींग करता येते - म्हणजे काय करता येते?

कुणी सांगेल का?

आपला,
कि-बोर्डावरची अक्षरे दाबून पाहणारा,
गुंडोपंत

प्रायव्हेट

प्रायव्हेट ब्राउझिंग करताना त्या सायटींची हिस्टरी/कूकी इ. काहीच संगणकावर साठवले जात नाही. थोडक्यात तुम्ही त्या सायटींवर गेल्याचा कुठलाही पुरावा संगणकावर उरत नाही. ही सुविधा सगळ्यात आधी क्रोमने सुरू केली, आता सगळीकडे मिळते. आयईचे माहीत नाही पण मी आयईला ब्राउझर मानत नाही. ;)

--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com

समजले नाही

थोडक्यात तुम्ही त्या सायटींवर गेल्याचा कुठलाही पुरावा संगणकावर उरत नाही.
पण आपण तर साईटवर जातोच, तेथे आयपी पत्ता तर नोंदला जातोच ना?
म्हणजे आता मी उपक्रमावर आलो आहे तर लॉग इन केले लिहिले, त्याचा पुरावा माझ्या संगणकावर असला किंवा नसल्याने नक्की काय फरक पडतो?
कशासाठी असा पुरावा ठेवायचा नाही?

आपला
गुंडोपंत

मना वासना दुष्ट कामा न ये रे

अहो गुंडोपंत, 'तसली' संकेतस्थळे बघायची असतील तर संगणकावर असा पुरावा राहू नये म्हणून ही सोय दिलेली आहे.

फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स वगैरे करतानाही प्रायवेट ब्राऊजिंग वापरता येते.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

हात् तुझी तर

हात् तुझी तर! अरे तसल्या स्थळांवर जायचे तर लाजायचे कशाला?
करणारी लोकं लाजत नाहीत तर...
असो,
आपली आपली आवड ;))

आपला
गुंडोपंत

अर्थातच

तुम्ही जिथे जाता आणि ज्या मार्गाने जाता तिथे तुमचे ठसे उमटणारच. पण समजा हापिसात भलत्या सायटी बघायच्या असतील तर उपयोगी पडेल किंवा एकच संगणक बरेच जण वापरत असतील आणि तुम्हाला तुमची हिस्टरी प्रायव्हेट ठेवायची असेल तरी उपयोगी.

आजानुकर्णांनी म्हटल्याप्रमाणे फायनॅन्शियल गोष्टी करतानाही उपयोगी ठरावे. नंतर संगणक ह्याक वगैरे झाला तर काही सापडू नये.

--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com

हे पटले

संगणक ह्याक वगैरे झाला तर काही सापडू नये.
हे पटले! कुनी माझ्या माहितीची ढापाढापी करायला नको!

आपला
गुंडोपंत

कंट्रोल+डब्ल्यू

ctrl+w=सध्याची टॅब बंद होते
||वाछितो विजयी होईबा||

आणखी काही

१) जर एखादा ट्याब तुम्ही चुकून बंद केला तर...
मी कोणत्याही ट्याबवर राईट क्लिक करून "undo close tab" हा ऑप्शन वापरतो. हिस्टरी मेन्यूमध्ये "recently closed tabs" हा पर्याय असतो तो ही वापरतो कधी कधी.

२) F 11 वापरून स्क्रीन खूप मोठा बनवता येतो व मी माझे वाचन नेहमी त्यातच करतो. "View - Full screen" हा पर्याय वापरून देखील त्यात जाता येते.

३) माझ्यासारख्या चाळीशी (चश्मा) लागलेल्यांसाठी ही खालील टिपः
Tools - Options - Contents - Fonts & Colors - Advanced - Minimum font size
यात कमीत कमी फॉन्ट साईज मी १७ ठेवतो. काही पानांवरील मजकूर खूप कमी फॉन्टात बसविलेला असतो. अशी पाने आपोआप मोठी दिसतात. हा एक पर्याय माझ्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे.

४) एखादे पान वर वर चाळून इंटरेस्टिंग वाटले तर मी प्रथम View - Page Style - No Style असा पर्याय वापरतो, याने पानावरील मजकूर डिझाईनमधून बाहेर पडतो व नीट वाचता येतो.

गमभन

मी पर्सोना वापरतो. नियमित बदलतोही
शिवाय फाफॉ-मराठी वापरतो. इतर ऍडऑनपैकी ऍडब्लॉक होते ते काढून टाकले कारण ऑफीसच्या सिस्टीमचे काहि पॉप अप् ते जाहिरात समजून रोखायचे.
अरे गो! लाडकं गमभन चे ऍड ऑन राहिलंच की

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

ऍडब्लॉक

ऍडब्लॉकमध्ये काही सायटींना मुभा देण्याची सोय आहे का? तसे असल्यास हापिसच्या सायटींना मुभा देऊन वापरता येईल.

--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com

गमभन आणि बझ्झ

गमभन ऍडऑन वापरून गूगल बझ्झच्या खिडकीत मराठी टंकायला सुरूवात केली की आख्खी खिडकी उजवीकडे सरकायला लागते. आणि पूर्णविराम टंकतच नाही. :(

--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com

मी वापरत असलेले ऍडऑन्स

वर आलेल्यांव्यतिरीक्त

--------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

एम्पी ३

फितींच्या एम्पी३ बनवण्यासाठी मी ही साइट वापरायचो. ऍडऑनमुळे काम सोपे होईल. अनेक आभार.

--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com

बरेच आहेत (वर् दिलेले सोडून)

१. फायरफॉक्स् सिंक् - सगळ्या मशिन्स् वर् सारखेच् सेटिंग्स् (पासवर्ड्स्, प्रेफ्, बुकमार्क्स्)
२. जीमार्क्स् - गुगल् बुकमार्क्स् साठीचे ऍड् ऑन्
३. इंडिक् इनपुट् आणि गमभन - मराठी साठी
४. स्क्रीनग्रॅब् - स्क्रीन् शॉट्स् घेण्यासाठी (फारच् छान् सोयी आहेत)
५. वेब मेल नोटिफायर् - प्रमुख मेल अकाउंट् मधे नविन मेल्स् आल्या आहेत् का (जीमेल्, याहू, हॉटमेल, रिडिफ्)

अजून एक: फेबे

फेबे: फाफॉमधील सारी ऍडऑन, वैयक्तिक सेटिंग्स, बुकमार्कस, इ. दुसर्‍या संगणकावर नेण्यासाठी उपयुक्त. या सार्‍यांची एक बॅकअप फाईल बनते आणि ती दुसर्‍या संगणकावर टाकली की फाफॉ पूर्ववत!

मी वापरलेले ऍड्-ऑन

मराठीत टंकलेखन करण्यासाठी एकूण ५ एड-ऑन उपलब्ध आहेत.
१) इंडिक इनपुट एक्स्टिंशन - हे बहुधा एकमेव एड-ऑन आहे जे इन्स्क्रीप्टमध्ये टाईप करण्याची सुविधा देते.
२) गुगल ट्रान्स्लिटरेशन - गुगलच्या तंत्रज्ञानावर आधारित.
३) प्रमुख टाईप पैड - विशाल मोनपरा यांनी प्रामुख्याने गुजराती भाषेसाठी बनविलेली सुविधा. गुजराती स्पेल चेकरही त्यांच्या साईटवर बघायला मिळतो.
४) लिपिकार - या कंपनीला मंथन पारितोषिक मिळालेले आहे.
५) गमभन - ओंकार जोशी यांनी बनविलेली ही सुविधा मराठी सायटींवर प्रसिद्ध.

स्पेल चेकर बर्‍याच भाषांत उपलब्ध आहे. मराठीसाठी मी बनविलेले दोन अ‍ॅड-ऑन (उपक्रमावरील ४-५ मंडळींमध्ये) प्रसिद्ध आहेत.
१) मराठी डिक्शनरी - आपण टाईप केलेल्या मजकुरातील शुद्धलेखन इंग्रजीसारखे तपासणे.
२) मराठी स्पेल चेकर - मराठी वेबसाईटवरील शुद्धलेखनाच्या चुका शोधणे.

लिप्यंतरासाठी २ अ‍ॅड-ऑन आहेत.
१) गिरगिट - मी बनविलेला, अधिक माहिती येथे मिळेल.
२) एन.एम.एच. ट्रान्स्लिटरेटर - दक्षिण भारतीय भाषांतील अचूक लिप्यंतर.

भाषांतरासाठी २ अ‍ॅड-ऑन सांगता येतील.
१) हिंदी पॉप-अप - इंग्रजी भाषेतील शब्दांचे हिंदी अर्थ पॉप-अप मध्ये
२) क्विक ट्रान्स्लेटर - इंग्रजी ते हिंदी भाषेतील छोट्या मजकुराचे शब्दशः भाषांतर.

ही झाली भारतीय भाषांशी संबंधित सूची. आपण आपली यादी मोजिलाच्याच साईटवर बनवून ठेवू शकतो. उदाहरणार्थ वर दिलेली बहुतेक सर्व अ‍ॅड-ऑन आपल्याला माझ्या इंडिक एस्क्टिंशन्स या यादीत मिळू शकतील.
https://addons.mozilla.org/en-US/firefox/collection/bcfe6b89-d1dc-2b61-0...

प्रोग्रामर्ससाठी ३ अ‍ॅड-ऑन हवीच.
१) वेब डेव्हलपर टूलबार - हे वापरून कोणत्याही पानाची अक्षरशः चिरफाड करता येते.
२) फायर-एफटीपी - फाईल रिमोट सर्वरवर अपलोड करण्यासाठी
३) एस.क्यु.एल. लाईट मॅनेजर - डेटाबेस फ्रंट एंड

सर्वांसाठी म्हणून २-३ अ‍ॅड ऑन सुचविता येतील.
१) न्युक एनिथिंग - हे वापरून वेब पानावरील हवा तो मजकूर किंवा चित्र काढून टाकता येते. मी हे अ‍ॅड-ऑन प्रिंट करण्यापूर्वी वापरतो. बरीच पाने व शाई वाचते.
२) क्विकनोट - महत्त्वाचा मजकूर एका जागी साठवून ठेवण्यासाठी उपयुक्त
३) विकीपीडिया कन्साईज - एखाद्या शब्दावर उजवी टिचकी मारून विकिपीडियावर थेट जाता येते.

अ‍ॅड-ऑन व्यतिरिक्त बुकमार्क टूलबार वरील बुकमार्कलेट्स माझ्या ब्राउजरचा अविभाज्य भाग आहेत. ती येथून मिळवता येतील आणि इंटरनेट एक्स्प्लोअर वापरणार्‍यांनाही उपयोगी ठरतील.

http://saraswaticlasses.net/sites/links4.php

यातील आवडलेल्या सुविधेची लिंक क्लिक - ड्रॅग करून बुकमार्क टुलबार आणावी. किंवा त्यावर राईट क्लिक करून बुकमार्क करावी.

मी ही वापरतो

फायर बग
फॉक्स क्लॉक्स
फायर एफटीपी
गमभन
गुगल शॉर्टकट्स


छान धागा!

चांगला धागा आहे.
कीबोर्ड बद्दल धन्यवाद - अजून दिलेत तरी चालतील!

विकासरावांनीनक्की काय ऍडऑन्स दिले ते दिसतच नाहीत. नावे द्याल का?
नोस्क्रिप्ट - काही तरी झाल्याने मधे काढून टाकले होते, पण परत टाकले. का ते आता आठवत नाही.
मराठी डिक्शनरी - आपण टाईप केलेल्या मजकुरातील शुद्धलेखन इंग्रजीसारखे तपासणे.
मराठी स्पेलचेकर - मराठी वेबसाईटवरील शुद्धलेखनाच्या चुका शोधणे.
लिपिकार - काही मला आवडले नाही, कदाचित सवयीचा भाग असावा त्यामुळे ते वापरणे आवडले नाही.
हायपरवर्डस टाकले, उत्तम आहे. आवडले - धन्यवाद रिकामटेकडेराव!
न्युक एनिथिंग टाकले, उत्तम आहे. आवडले असे काही तरी हवेच होते मला - धन्यवाद शंतनु!
RSS Ticker वापरून पाहतो, अजून वापरले नाही.
फायरफॉक्स सिंक रे तसे काही कामाचे नाहीत त्यामुळे ते वापरले नाही.

Web of trust टाकतो - हे माहितीच नव्हते!!!
असे अजूनपण काही असेल तर सुचवात जा रे बाबांनो (आणि बायांनो!).

आपला
गुंडोपंत

चांगली चर्चा

चांगली चर्चा आहे.

मी सध्या ऍडब्लॉकप्लस, फायरबग, ब्लॉकसाइट, पिक्सलपरफेक्ट, फायरबगसाठीचे कोडबर्नर, नोस्क्रिप्ट, रिमूवफेसबुकॅड्स, डाउनलोडहेल्पर वापरतो आहे.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

छान धागा

छान धागा

असेच म्हणतो

छान धागा. विकासरावांनी त्यांच्या ऍडऑन्सची नावेही द्यावीत.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

मी वापरतो

फास्टेस्ट फॉक्स - पेज पटापट डाऊनलोड करतो. नेक्स्ट पेजसाठी उपयुक्त.
रॅमबॅक आणि फ्लॅशब्लॉक - फ़ायरफ़ॉक्स जास्त मेमरी वापरत असेल तर हे कंट्रोल करते. फ्लॅशब्लॉक फ्लॅश कंटेट ब्लॉक करते.
डाऊनलोड हेल्पर - व्हिडीयो, गाणी, फोटो डाऊनलोड करण्यासाठी.

खबरदारी

नवीन परिचित नसलेले ऍडऑन टाकताना खबरदारी घ्यावी. बहुधा अनरिव्ह्यूड ऍडऑन टाकू नये. (जाणकारांनी खुलासा करावा.)

या संदर्भात आत्ताच ही बातमी वाचली.

--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com

सहमत

होय. म्हणूनच मी केवळ अत्यंत लोकप्रिय ऍडऑनच वापरतो. (दर आठवड्यात किती लोकांनी ऍडऑन घेतला ते ऍडऑनच्या पानावर दिसते.)

हम्म

प्रश्न असा की किती लोकांनी घेतले म्हणजे सुरक्षित समजावे. वर दिलेल्या दुव्यातील एक वाक्य :
About 177,000 users have a vulnerable version of CoolPreviews installed. Mozilla plans to blacklist the vulnerable versions soon.

--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com

 
^ वर