फाफॉ - ऍडऑन

ब्राउझर वॉरमुळे सध्या कोणता सगळ्यात चांगला हे सांगणे कठीण झाले आहे. त्यावर मी शोधलेला उपाय म्हणजे सगळे वापरून जो चांगला वाटतो तो वापरणे. असे केले असता खिडक्यांमध्ये क्रोम/सफारी आणि लिनक्समध्ये फाफॉ सगळ्यात वेगवान असल्याचे दिसले.

फाफॉचा आणखीन एक मोठठा फायदा म्हणजे ऍडऑन. मी वापरत असलेले ऍडऑन :

ऍडब्लॉक प्लस : जाहीराती ब्लॉक केल्या की पाने पटापट लोड होतात.

एचटीटीपीएस एव्हरीव्हेअर : : हे ऍडऑन बर्‍याच सायटीचे कनेक्शन एनक्रिप्टेड करते ज्यामुळे तुमची सुरक्षितता वाढते.

नोस्क्रिप्ट : आमचे आंतरजाल कनेक्शन आधीच दिव्य. त्यात पानावर स्क्रिप्टा असल्या की "घरचं झालं थोडं, अन व्याह्यानं धाडल घोडं" अशी परिस्थिती व्हायची. स्क्रिप्टा बंद केल्या की बराच फरक पडतो असे आढळले. अर्थात काही स्क्रिप्टांना परवानगी द्यावी लागते पण ते आपल्याला ठरवता येते.

रीड इट लेटर : हल्ली ट्विटरमुळे बरेच चांगले लेख मिळतात. वाचायला वेळ असतोच असे नाही. बुकमार्क केले तर वाचून झाल्यावर शोधून डिलिट करणे आले. आणि पान सेव्ह केले तर परत धुंडाळणे आले. त्याऐवजी रीड इट लेटर मध्ये नंतर वाचायच्या लेखांची नोंदणी केली तर काम फारच सोपे होते.

डाउन देम ऑल : डाउनलोड म्यानेजर

फास्ट डायल : क्रोम तुम्ही नेहेमी जाता ती पाने नवीन ट्याबमध्ये खिडक्यांच्या रूपात साठवते. फाफॉमध्ये ती सोय हवी असल्यास हे वापरा. मात्र पाने हाताने साठवावी लागतात.

याखेरीज फाफॉचे पर्सोनाही मस्त आहेत.

तुमचे आवडते ऍडऑन वरच्या यादीत नसले तर सांगा.

Comments

पटले

रिव्ह्यूही हवाच.

संगणक हॅक होण्याचा मार्ग

लहान मोठी खुसपटे काढून अ‍ॅड-ऑन स्वीकारता येत नाही असे मोझिलाकडून सांगितले जाते. त्यात सिक्युरिटीचा भाग फार कमी असतो. मोझिलाच्या प्रोग्रामिंग स्टाईलशी जुळवून घेत अ‍ॅड-ऑन लिहावे लागते. त्यांचे नियम इतके काटेकोर असतात की मोझिलाने स्वतः तयार केलेले एक अ‍ॅड-ऑन अजून रिव्ह्यू झालेले नाही! उदा.

https://addons.mozilla.org/en-US/firefox/addon/8397/

आपण दिलेल्या लिंकवरील माहिती खरीच आहे, पण असे होण्याची शक्यता फार कमी प्रमाणात असते. संगणक हॅक होण्याचा सगळ्यात जवळचा मार्ग विंडोज + इंटर्नेट एक्स्प्लोअर + पॉर्न साईट या दिशेने जातो. शेवटी रिव्ह्यू झालेला नाही येवढ्या एकाच कारणासाठी एखादी चांगली सुविधा टाकून द्यायची का याचा निर्णय आपणच घ्यायचा आहे.

ऍड्-ऑन ऍड करताना

(निदान क्रोमवर् तरी) तो दाखवतो कि ह्या ऍड्-ऑन ला तुमच्या सगळ्या डेटाचा ऍक्सेस आहे. असे असताना आपणच् विचार केला पाहीजे की कुठले वापरायचे.

"रिकामटेकडा" ह्यांनी सांगितलेली 'स्निफ टेस्ट्' म्हणून नक्कीच् उपयोगी आहे, की अनेक वापरकर्ते असतील् तर 'रिव्ह्यू' व्हायची, झाला असण्याची शक्यता बरीच असते. ह्या सगळ्या ऍड्-ऑन चा कोड बघता येउ शकतो. खूपच भिती वाटत असेल् तर तो पर्याय स्वीकारावा (लागेल).

संगणक हॅक होण्याचा सगळ्यात जवळचा मार्ग विंडोज + इंटर्नेट एक्स्प्लोअर + पॉर्न साईट या दिशेने जातो.

हे भारीच - पण सत्य आहे, त्याचप्रमाणे सॉफ्टवेअरच्या हॅक्स् देणार्‍या साईट्स् - अगदी हमखास् व्हायरस् देतात.

आभार

माहितीबद्दल आभार. एकुणात निर्णय घेणे तितके सोपे नाही असे दिसते. लिनक्स वापरले तर धोका कमी होईल अशी आशा आहे.

--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com

नाही

संस्थळांची संकेताक्षरे चोरणार्‍या ऍडऑनला 'लिनक्स की विंडोज' याने काहीच फरक पडणार नाही.

ठीक

त्या एडऑनला फरक पडू नये हे पटले.
मात्र शंतनू यांनी संगणक हॅक होण्याचा सगळ्यात जवळचा मार्ग विंडोज दिला आहे. लिनक्स असल्यास सुरक्षितता वाढेल असे वाटते.

--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com

मेरे सामने वाली खिडकी में

संगणक हॅक होण्याचा सगळ्यात जवळचा मार्ग विंडोज + इंटर्नेट एक्स्प्लोअर + पॉर्न साईट या दिशेने जातो.

पॉर्न नसले तरी चालेल. नुसत्या खिडक्या पुरेत. :)
आत्ताच सगळ्या खिडक्यांमध्ये मेजर लोच्या असल्याचे वाचले.

--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com

पासवर्ड धापणारे अ‍ॅड-ऑन

पासवर्ड चोरणार्‍या या अ‍ॅड-ऑनविषयी अधिक माहिती येथे मिळेल.

http://news.netcraft.com/archives/2010/07/15/firefox-security-test-add-o...

फायरफॉक्स हा एक मोफत आणि मुक्त स्रोत न्याहाळक आहे. फायरफॉक्स आणि विकिपीडिया हे दोन प्रकल्प हे खर्‍या अर्थाने लोकशाही पद्धतीने विकसित होत आहेत. राजशासन असो, हुकुमशाही, ठोकशाही वा लोकशाही असो प्रत्येकात काही जन्मजात दोष आहेत. कित्येकदा विकीवर चुकीची, दिशाभूल करणारी, एकांगी, प्रसंगी अपमानास्पद, जुने हिसाब-किताब चुकते करणारी (होय, अगदी मराठी सायटींसारखी) माहिती दिसून येते. पण म्हणून कोणी विकी वापरणे सोडणार नाही. कारण त्याच्या गुणदोषांसकट आपण त्याचा आपल्याच फायद्यासाठी स्वीकार केला आहे. तसेच फायरफॉक्सच्या सर्व अ‍ॅड-ऑनचा जगातील ९९.९९% लोकांच्यात असलेल्या चांगुलपणावर विश्वास ठेवून स्वीकार करावा. नाहीतर रिव्ह्यू न झालेली अ‍ॅड-ऑन मोजिलाच्या साईटवर ठेवण्याचा दुसरा कोणता हेतू असावा?
थोडेसे विषयांतर झाले तरी अ‍ॅड-ऑन मागची मला समजलेली तात्त्विक भूमिका या निमित्ताने मांडत आहे.
आपण नोट स्विकारताना ती खोटी आहे का खरी हे दर वेळी पाहतो का? मी फक्त एटीएम मशीन किंवा बँकेतून आलेली नोटच स्वीकारीन, इतर नोटा स्वीकारणारच नाही अशी भूमिका फार कमी लोक घेऊ शकतात. साधारणपणे नोट देणाऱ्याच्या विश्वासावर विसंबून आपण नोटेचेच नव्हे तर सर्वच व्यवहार करत असतो.
मी कोणतेही अ‍ॅड-ऑन वापरताना, अ‍ॅड-ऑन बनविणार्‍याची विश्वासार्हता, एकूण किती लोकांनी हे अ‍ॅड-ऑन डाऊनलोड केले आहे, कोणी ते रेकमेंड् केले आहे का या गोष्टी पाहून तारतम्याने निर्णय घेतो. काही वेळा अगदी नवे, १-२ दिवसांपूर्वीच बनलेले अ‍ॅड-ऑन वापरताना मात्र "माणसातील चांगुलपणावर असणारा भरवसा" हा एकच निकष लावतो!

आभार

विस्तृत माहिती दिल्याबद्दल अनेक आभार. सर्व मुद्दे पटले. मुक्त स्त्रोत प्रणालीवर विश्वास आहे. लिनक्ससारखी सुंदर प्रणाली मोफत मिळू शकते यातच मुक्त स्त्रोत प्रणालीचे यश आहे असे वाटते. इथे चर्चा एवढ्यासाठी केली की नवीन ऍडऑन वापरताना कोणत्या खबरदारी घ्यायला हव्यात हे जाणकारांकडून कळावे.

--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com

एपिक

अस्सल भारतीय न्याहाळक वापरा : एपिक


नोस्क्रिप्ट...

नोस्क्रिप्ट वापरताना फारच त्रास देते आहे. कित्येक पानांवर चित्रेच दिसत नाही. फेसबुकावर फोटो अपलोड करायला सेटींग्ज बदलावी लागली. दरवेळेस प्रत्येक पानावर काहीना काही गोंधळ करुन ठेवत आहे. मग दरवेळेस त्याला या पानाला परवानगी दे म्हणून सांगत बसावे लागते.

नोस्क्रिप्टचे फंक्शन काय आहे? त्याने काय फायदा होतो? असा त्रास अजून कुणाला होतो आहे का?

==================

+

प्रत्येक

प्रत्येक वेळी परवानगी द्यावी लागू नये. एकदा अलाउ म्हटले की नंतर अलाऊ करायला हवे. मात्र अलाउ म्हणावे, टेंपररिली अलाउ म्हटले तर पुढच्या वेळी परत विचारणा होईल.

साधारणपणे युट्युब, फेसबुकसाठी fbcdn.net, quanteserve.com गुगल, उपक्रम अशा काही सायटींवर स्क्रिप्टांना परवानगी द्यावी लागते. पण एक्दा दिली की त्रास होऊ नये. मला चित्रे न दिसणे हा त्रास कधीच झाला नाही. प्रसिद्ध सायटी अलाउ केल्या तरी चालण्यासारखे आहे उदा. याहू, फ्लिकर, पिकासा इ. बाकीच्या ऍडसायटी ब्लॉक केल्या तर अडचण यायला नको.

नोस्क्रिप्टचा मुख्य फायदा म्हणजे जाहिराती वगैरेंच्या न लागणार्‍या स्क्रिप्टा बंद होतात आणि आपली ब्यांडविड्थ/मेमरी वाचते. एकेका पानावर मला तब्बल ९० स्क्रिप्टा आढळल्या आहेत. शिवाय सुरक्षिततेच्या दृष्टीने फायदा असावा. (जाणकारांनी खुलासा करावा.)

--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com

'नो स्क्रिप्ट'

सगळे जावास्क्रीप्ट 'ब्लॉक्' करते. सध्याच्या वेब २.० च्या जमान्यात स्क्रिप्ट् शिवायची साईट सापडणे / वापरणे अशक्य आहे. 'निवडक' स्क्रिप्ट्स् ना ऍक्सेस देणे शक्य असले तरी वेळखाउ, त्रासदायक, एरर-प्रोन असते. मी सुद्धा ह्याच कारणांसाठी 'नोस्क्रिप्ट्' 'डिसेबल' करुन् ठेवले आहे, अगदीच गरज् पडेल् तेव्हा चालू करतो. (अवांतरः ह्यापेक्षा 'ग्रीजमंकी' हे ऍड्-ऑन् मला उपयोगाचे वाटते. (अनेक) स्क्रिप्ट्स् उतरवून् घेउन् आपल्या मर्जी प्रमाणे वापरता येतात.)

 
^ वर