महागाई-इंधन दरवाढ भारत बंद यांचा संबंध !
भारतात वस्तूंच्या किमतीवर भारत सरकारचे कोणतेही नियंत्रण नाही. तर सट्टेबाज काळाबाजार करणारे मोठे व्यापारी उद्योजक यांचे नियंत्रण आहे आणि पक्ष चालवण्यासाठी लागणारा प्रचंड काळा पैसा कांही सामान्य नागरिक किंवा शेतकरी देवू शकत नाही. आणि आजकाल निवडून येण्या साठी मत सुद्धा या पक्षांना विकत घ्यावी लागतात. उच्च मध्यम वर्ग सुद्धा मत विकत आहे. शहरा पासून खेड्या पर्यंत हेच हाल आहेत.
आता तर खेड्या मध्ये ग्रामपंचायतीनचा जाहीर लिलाव होवून जो जास्त रक्कम मोजेल त्याची माणस बिनविरोध निवडून येत आहेत. आणि आपले मुख्यमंत्री सांगतात हे लोकशाहीला घातक आहे.याची चोकशी आयोग नेमून केली जाईल. यांनीच घोडेबाजाराची सुरवात केली हे मात्र सोयीस्कर रित्या विसरतात. निवडून आल्यावर रावले म्हणतात तसे आधी पहिले आपले भले पाहीले पाहीजे. या न्यायाने निवडून आलेले आपला झालेला खर्च + नफा + पुढील निवडणुकीचा नवीन खर्च वसूल करण्या साठी अवैध मार्गाने पैसा मिळवणे सुरु करतात . त्याकरता त्याना काळा पैसाच हवा असतो कारण खर्च काळ्या पैशात करावा लागतो, आणि तो मग या भांडवलदार , व्यापारी यांच्या पासून त्यास मिळवावा लागतो, हे लोक पैसा पुरवतात पण त्या बदल्यात जनतेला लुटण्याचा परवाना ते या नेत्या कडून घेतात. मग महागाई असे दुष्ट चक्र सुरु होते या टप्प्या वर जनता होरपळली जाते , नेत्या विरुद्ध राग, आवाज उठवणे,त्याला भ्रष्ट्र ठरवणे असे प्रकार सुरु होतात, यात विरोधी पक्षास कांहीच मिळत नसल्याने तो या असंतोषाचा गैर फायदा घेत आगीत तेल ओतून आग भडकावण्याचे काम करतो. महागाई शी त्याचे कांही देणे घेणे नसते. प्रस्थापित राजवटी विरुद्ध असंतोष निर्माण करून आपण सत्तेवर यावे हाच फक्त स्वार्थ असतो.
पण प्रश्न असा निर्माण होतो या जनतेला राग व्यक्त करण्याचा तक्रारीचा हक्क आहे का? माझ्या मते बिलकुल नाही. जेथे नेता निवडताना जात, पात, दारू, पैसा, धर्म या गोष्टी पाहून मतदान होते त्या जनतेला हा हक्क नसतोच. आणि जो कांही सुशिक्षित वर्ग असतो तो माझ्या एका मताने काय होणार म्हणून मतदानाच करत नाही. या मतदान न करणाऱ्या वर्गाला तर अन्याय विरुद्ध तक्रार करण्याचा कांही एक अधिकार नाही पूर्वी जसा राजा तशी प्रजा असे म्हणत पण आज लोकशाहीत जशी प्रजा तसा नेता असे समीकरण झाले आहे , मग दोष कोणाला देणार जनतेला की नेत्याला.
आज शासन ज्या भावात पेट्रोलियम वस्तू पुरवते. त्यात हजारो करोडो नुकसान सरकार सहन करत आले आहे. बरे या सवलतीच्या दरात पुरवलेल्या वस्तू ज्या गरीबान करता शासन पुरवते त्या वस्तू त्यांना तरी प्रामाणिक पणे मिळतात का? नाही या वस्तू सरळ काळ्या बाजारात विकल्या जातात. गरिबांना घरगुती वापरा साठी १३-१४ रुपये लिटर मिळणारे राकेल काळ्या बाजारात सर्रास ३०-३५ रुपये लिटरला विकले जाते. त्याचा दुरुपयोग डिझेलच्या जागी ट्रान्सपोर्ट , उद्योग जगतात केला जातो. घरगुती गैस सरळ हॉटेल, मोठ्या उद्योगात वापरला जातो. स्वस्त रेशन प्रणालीत कोणाला किती वाटप याचा कांहीच हिशोब मुद्दाम व्यवस्थित ठेवला जात नाही .या बेईमानी ची साखळी राशेन दुकानदार, जिल्हा महसूल कार्यालया पासून ते मुख्यमंत्र्या पर्यंत असल्या मुळे तेरी भी चूप मेरी भी चूप असा हा कारभार चालतो
सरकारने पेट्रोल डीझेल च्या किमती वाढवल्यात . या वाढलेल्या किमती मुळे खरे तर वस्तूच्या किमती किलो मागे .२० पैसे , किंवा १०० किलो मागे रुपये २०.०० फक्त वाढल्या पाहिजे . पण शासनाचे नियंत्रण नसल्या मुळे या किमती ४ रुपया ते ५ रुपया किलो म्हणजे ४०० ते ५०० रुपये १०० किलो मागे वाढल्या आहेत. त्या समर्थनीय नाही.
शेतमाल तय्यार होवून विक्री साठी बाजारात येतो त्याच वेळी हे भांडवलदार किमती मुद्दाम हून पाडतात
आणि हंगाम संपल्यावर मात्र किमती भरमसाठ वाढत जातात हे कसे , यावर कोणाचेही नियंत्रण कसे नाही. या कंपन्यांच्या खेड्यापाड्यातील गोदामात लाखो टन अन्नधान्य साठवून ठेवले जाते
यात ही हे भांडवलदार नियंत्रण कायदा गुंडाळून ठेवतात. अन्न शेतकऱ्यांच्या नावावर ठेवले जाते, यावर शेतकऱ्यांच्या नावाने बँका कडून कर्ज घेतले जाते . कागदोपत्री सर्व हा व्यवहार जरी शेतकऱ्यांच्या नावाने होत असला तरी ज्या वेळी भाव वाढतात त्याचा फायदा माल शेतकऱ्यांच्या नावावर असून ही त्यांना मिळत नाही. वाढीव भावात माल विकून भांडवलदार नफा कमावतात. गेल्या वर्षी सरकारने अनेक गोदामावर धाडी घालून माल जप्त करण्याच्या बातम्या आल्या पण नंतर हा सर्व माल कागदोपत्री शेतकऱ्यांच्या नावावर असल्याने सर्व माल सोडून देवून सरकार ची नामुष्की झाली . सर्व राकेट माहित असून ही कागदपत्री पुरावा नाही. जसा भोपाळच्या जनतेचा यमदूत वारेन अडरसन भारतातून २५००० भारतीय जनतेचा खून करून करून सत्ताधारयांच्या मदतीने भारतातून पळून गेला पण कागदपत्री हे कुकर्म कोणी केले याचा पुरावा नसल्या मुळे सर्व सत्ताधारी मोकळे सुटले. तसेच काळाबाजार वाले मोकाट आहेत. आणि लाल किल्ला वर झेंडा फडकवताना नेहरू पासून ते मनमोहन सिंग काळाबाजार, लाचलुचपतखोर भ्रष्ट्राचारी यांना फासावर देण्याची भाषा करून जय हिंद म्हणतात!!
Thanks & regard,
Thanthanpal,
Always visit:-
http://www.thanthanpal.blogspot.com