जागतिक हास्यदिन.

हास्य ही एक कला मुलत: जागतिक जगण्याची भाषा आहे.हसण्याचे विविध प्रकार आहेत.स्मित हास्य ते अनेक मजली हास्य.जगभर माणसं आनंदाच्या मनस्थितीत विविध प्रकारात हसत असतात.मनाच्या आरोग्यासाठी खळखळून हसणं आवश्यक आहे.सध्याचं जीवन ताण-तणावाचे,संघर्षाचे,संकटाचे,स्पर्धेचे,असल्याने हसणारा माणूस,दाखवा अन् हजार रुपये मिळवा असे म्हणण्याची वेळ आलीय.जीवनातील संघर्षाला ह सतमुखांनं सामोरी जाणारी व्य़क्ती स्वतः व आपल्या संपर्कात येणा-या व्यक्तीचे जीवन आनंदमय करते.जगात १९९८ पासून हास्यमंडळ स्थापन झालीत.२००२ पासून जगातील,सर्व राष्ट्रात "जागतिक हास्यदिन"मे महिन्याच्या पहिल्या रविवारी साजरा केला जातो,घोर निराशा,आणि सायकोसोमेटिक,(नाव बरोबर नसेल तर या शब्दावर हसा)आजार आहेत त्यांना दररोजच्या हसण्यानं खूप फायदे होतात.मेंदूत काही तरी रासायनिक बदल होतात(म्हणतात,मला माहिती नाही) या करिता खळखळून हसा.ज्याला खळखळून का खळाळून हसता येतं तो माणूस सुदैवी,खिन्नतेच्या निराशेच्या शेवाळात अडकून पडणारी निराश माणसं खूप आहेत.तुम्ही त्यांच्या जीवनपथावर हास्याचं मधूर चांदणं शिंपण्यासाठी सज्ज व्हा आणि क्रुतार्थ व्हा एवढंच "हसायदान"मी तूमच्यापाशी मागतो आहे.

लेखनविषय: दुवे:

Comments

हसायदान..! वा..!!

तुम्ही त्यांच्या जीवनपथावर हास्याचं मधूर चांदणं शिंपण्यासाठी सज्ज व्हा आणि क्रुतार्थ व्हा एवढंच "हसायदान"मी तूमच्यापाशी मागतो आहे.

वा बिरुटेसाहेब, आपलं छान लिहिलं आहे. "हसायदान" हा शब्द खूप आवडला. क्या बात है..

हसा आणि लठ्ठ व्हा! ;)

आपला,
(लोटपोट हसण्यावर श्रद्धा असलेला) तात्या.

इथे आम्ही काहीही बरळतो - http://tatya7.blogspot.com/

 
^ वर