चैन ही घातक आहेका? किंवा कुठली चैन घातक आहे?
चैन ही घातक आहे का? किंवा कुठली चैन ही घातक आहे?
एका बाजुला डबल इंजिन (गरजेपेक्षा जास्त उत्पन्न व त्यासोबत होणारे दुष्परिणाम) आणि दुसर्याबाजुला नेमके किती उत्पन्न हे गरजे पेक्षा जास्त आहे त्याबद्दल चालु आहे.
त्यात हा तिरकस मुद्दा.
आतापर्यंतच्या चर्चेत श्रेयस (हे काय आहे?) मधे जाणे, पिज्जा खाणे वा रिक्षाचे १५० रु भाडे देणे अशासारख्या चैन करणार्यांवर लिहिले गेले.
यातील कित्येक चैनी समाजातील दुर्बल घटकांकडे पैसे वळते करतात. (रिक्षावाला, वेटर, कामवाली). पिज्जा/बर्गर खाणे, दारु पिणे (विदेशी), दिवाळीत फटाके उडवणे, सिनेमा,नाटके, महागडे वाहन/मोबाईल, महागड्या ठिकाणी वा विदेशात वर्षसहल अशा चैनीच्या ठिकाणी देखील काही प्रमाणात पैसा दुर्बल वा मध्यमवर्गीय घटकांकडे जातो. यामुळे अर्थकारणाला गती मिळते. देशाचे सामायिक उत्पन्न वाढते. या उलट कोणी छानछोकी करून कपडे घातले नाहीत वार्षिक दोन जोडात काम भागवले तर कित्येक शेतकरी, मजूर गरिबीत ढकलले जातील. लोक पैसा खर्च करेनासे झाले की अमेरिकेची उत्पन्न स्थिती गडगडते असे म्हटले जाते.
कुठल्या गोष्टी चैनीच्या मानल्या पाहिजेत हा एक मुद्दा. पण कुठल्या चैनी योग्य आणि कुठल्या अयोग्य याची यादी करता येईल का?
प्रमोद
Comments
चैन
चैनेची संकल्पना पूर्णपणे सापेक्ष आहे. सायकल चालवणार्याला मोटर सायकल चालवणे ही चैन वाटू शकते तर मोटर सायकल वाल्याला मारुती. मारुती चालवणार्याला मर्सिडिज ही चैन वाटते.
याच पद्धतीने प्रत्येक बाबतीत चैन काय व जरूरी काय हे प्रत्येक व्यक्ती ठरवते. चैनेच्या बाबतीत सर्वसाधारण मानक ठरवणे केवळ अशक्य वाटते.
चन्द्रशेखर
सहमत
चंद्रशेखर यांच्या प्रतिसादाशी एकदम सहमत.चैन करावी का नाही हे प्रत्येक माणसाने स्वतःच्या चालू आणि भविष्यकालीन उत्पन्नाच्या अंदाजावरून ठरवावे. जे असं न बघता जे लोक चैनी करतात, त्या चैनी त्यांच्यासाठी घातक!
तारतम्य
हे तारतम्य सुटावे व लोक कर्जाच्या विळख्यात जावेत असा प्रयत्न मार्केटिंगचे लोक करतात. कल क्या होगा किस को पता अभी जिंदगीका ले लो मजा! या तत्वात लोक गुरफटत चालले आहेत.
यावज्जीवेत्सुखं जीवेत् , ऋणं कृत्वा घृतं पिबेत् ।
भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुतः ॥
जोपर्यंत जगावे, सुखाने जगावे, कर्ज घेऊन तूप प्यावे. राख झालेल्या देहाचे पुन्हा येणे कुठचे?
( यातील ऋणं कृत्वा हे माधवाचार्यांनी घुसडलेल आहे असे म्हणतात. त्या ऐवजी तिथे नास्ति मृत्यु: अगोचर: आहे असे म्हटले जाते)
गरज व चैन यातील सीमारेषा पुसट आहे. तुम्ही कुठले निकष लावता यावर ते अवलंबुन आहे.
चैनी साठी पैसा खर्च करायला ज्यांच्याकडे आहे ते खर्च करतील बाकीचे नाही करणार. पैशाच सोंग थोडच आणता येतय. असाही युक्तिवाद केला जातो. अर्थस्य पुरुषो दासः || पैशाने विद्वान पाळता येतात. त्यांना त्यांच्या विद्वत्तेनुसार योग्य ते 'मानधन' देउन युक्तिवादांची बौद्धिक दांडगाई करुन बुद्धीभेद करता येतो. आपल्या विवेकाचा कौल काय सांगतो? हे महत्वाचे. श्रद्धावान लोक त्याला आपल्या अंतर्मनाची साद म्हणतील मथितार्थ एकच.
प्रकाश घाटपांडे
असहमत
आगगाडीत विनातिकीट प्रवास केल्यास दहा रुपये वाचतील पण आगगाडीची दुरुस्ती, कर्मचार्यांचा पगार इ. निधीमध्ये दहा रुपयांची तूट होईल. परंतु या तुटीमुळे विनातिकीट प्रवास करणार्याला सहन करावा लागणारा त्रास नक्कीच कमी असतो. हा त्रास तिकीट काढणार्यांनाही होतो म्हणजेच विभागला जातो. दूरचित्रवाणीच्या मोफत वाहिन्या जाहिरातींवर चालतात. या जाहिरातींना न भुलणारे मोअर इक्वल हे 'फ्री रायडर' असतात.
मार्गारिटाविल खूप मस्त आहे.
अंथररुण पाहून पाय पसरणे
समतोल साधणे हे सर्वात महत्वाचे. कमाई - अत्यावश्यक खर्च - अत्यावश्यक बचत = चैनीसाठी सरप्लस. हा सरप्लस कसा खर्च करावा हे ज्याचे त्याने ठरवावे. काटकसर करुन पैसे वाचवण्याच्या नादात बर्याचदा आयुष्यातले छोटे छोटे आनंद गमावले जातात. १० रुपयाची बचत आणि १०,००० रुपयाची बचत ह्यादोन्ही मधे तितकाच जोश लावला जातो. निव्वळ काटकसर म्हणून उन्हात चालत जाण्यापेक्षा किंवा बसच्या गर्दित गुदमरण्यापेक्षा (परवडत असल्यास) रिक्षाच करावी.
मुलभूत गरजा भागवण्यासाठी कधी कुणापुढे हात पसरावे लागू नयेत म्हणून काटेकोर बचत करणे हे महत्वाचे आहेच. पण अशा नियोजनात यशस्वी झाल्यानंतर त्यातच अडकून न राहता आयुष्याचा उपभोग घेण्यासाठी सरप्लस पैसा उडवण्याचेही जमले पाहिजे.
वसुलि
वसंत सुधाकर लिमये
योग्य
ज्या चैनीकरता वापरलेला पैसा अर्थव्यवस्थेत सर्वाधिक फिरतो (एका हातातून दुसर्या हातात) त्यास सर्वात योग्य चैन समजावे असे ऐकून आहे. चूभूदेघे.
विषयांतर
हा प्रतिसाद आणि माझा एक प्रतिसाद वगळता सारे प्रतिसाद हे विषयांतर आहेत. धाग्याचा विषय आहे: ज्यांना परवडते त्यांनीही कोणती चैन करणे चांगले/वाईट?
असहमत
धाग्याचा विषय एवढाच मर्यादित नाही. धाग्याचे शीर्षक आहे - चैन धातक आहे का? किंवा कुठली चैन घातक आहे? त्यामुळे जे प्रतिसाद 'चैन घातक आहे का?' या विषयावर काही टिप्पणी करतात ते विषयाला धरूनच आहेत.
टॉटॉलॉजी
स्वतःला घातक खर्च म्हणजे चैन अशी व्याख्या सारेच करीत आहेत. म्हणूनच चैन स्वतःला घातक आहे का? हा निरर्थक प्रश्न आहे. मूळ प्रश्न असा आहे की चैन समाजाला घातक आहे का?
हातभट्टीची पिणे ही गरज
सापेक्ष आहे. उदा. ढोर अंगमेहनतीचे काम करणाऱ्या मजुरासाठी हातभट्टीची पिणे ही गरजही असू शकते, किंबहुना असतेच. आणि ही घातक गरज आहे.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
आठवण
वेंजामिन फ्रॅकलीनचे आत्मचरित्रात (जे गुटेनबर्गवर मिळते, आणि चांगले आहे) याचा एक छान उल्लेख आहे. तो इंग्लंडात गेला असताना तेथील मजुरांशी त्याचा संवाद झाला होता. त्या मजुरांच्या मते विस्की घेतल्याशिवाय हवी तेवढी उर्जा मिळत नाही. जेवढ्या बार्लीच्या पिठातून विस्की तयार होते त्यापेक्षा तर ती उर्जा जास्त नसणार असे त्यावरचे फ्रॅकलीनचे उत्तर होते.
या गोष्टीची इथे आठवण झाली.
प्रमोद
घसरतो
इथे इतर विषयावर घसरतो-
फ्रँकलीनचे उत्तर व्हिस्कीने मिळणार्या भौतिक (शारिरीक) ऊर्जेबद्दल होते तर मजुरांचे उत्तर व्हिस्कीने मिळणार्या अज्ञात (मानसिक) ऊर्जेबाबत होते. :)
अजून घसरण
प्रोसेस्ड फूड मधून इन्स्टंट एनर्जी प्रक्रिया केलेल्या अन्नातून झटपट उर्जा मिळू शकते.
सापेक्ष
>>>> पण कुठल्या चैनी योग्य आणि कुठल्या अयोग्य याची यादी करता येईल का? <<<
या प्रश्नाचे उत्तर फार निसरडे होऊ शकते. मी हे अशासाठी म्हणत आहे की, "चैन" या गटात येणार्या अनेक बाबी इतक्या सापेक्ष आहेत की काल चैन समजली जाणारी आज गरजेची बनते तर ती उद्या अटळ होणार असते. त्यातच हा "उद्या" चा खेळ इतका वेगवान बनला आहे की, मोबाईल आता समाजातील प्रत्येक घटकाचा अविभाज्य अंग बनत चालला आहे. [हा धागा "त्या दोन" धाग्यांचे प्रॉडक्ट असल्याने मी इथे फक्त "मध्यमवर्गीय" हीच कॅटेगरी विचारात घेत आहे. दारिद्र्यरेषेखाली जीवन जगणार्यांच्या बाबतीत काय गरज आणि कोणती चैन हा विषय इथे येवू नये कारण तो सर्वस्वी निराळा प्रांत आहे. तीच बाब नदीपलिकडील अंबानी, मोदी, टाटा, बिर्ला या साम्राज्यांची. त्यांचाही विचार करणे आवश्यक नाही.]
पुण्यातील मध्यमवर्गीयाला १/२ बीएचके, फ्रीज्, टीव्ही, केबल, फोन, मोबाईल, वॉशिंग मशिन, कॉम्प्युटर, डिव्हीडी प्लेअर, टू व्हीलर या गोष्टी अत्यावश्यक वाटतात्, नव्हे त्या आहेतच. "डबल इंजिन" असेल तर सुबकशी फोर् व्हीलरदेखील गरजेची वस्तू म्हणून पार्किंग लॉटमध्ये येईल. "ए.सी." मात्र अजूनही "चैन" गटात असावा असे वाटते, पण माझ्या घरात आहे तो घरी कायमस्वरूपी आजारी असलेल्या आजीसाठी (जीवघेणा उन्हाळा हेही कारण आहेच.) गरज म्हणून. मनोरंजनाच्या माध्यमाने "चैनी"चे रूपांतर "गरजे"त केले आहे हे आपण ज्या पध्दतीच्या मालिकांचा रतीब २४*७ चालू आहे ते पाहून म्हणू शकतो. कोणतेही खाजगी टीव्ही चॅनेल् गरीब कुटुंबाचे चित्रण करणार्या मालिका निर्माण करीतच नाही. श्रीमंती आणि खूप श्रीमंती हेच या मालिकांचे आणि त्यातील कथानकांचे स्वरूप असल्याने त्यातील कित्येक अनावश्यक घटकांचा स्त्रीयांमध्ये "गरजे"च्या गोष्टीत रुपांतर होण्याचा घाट घटत आहे. उदा. उंची दागदागीने आणि परदेशप्रवास. आजदेखील "केसरी" आणि "सचिन" ट्रॅव्हल्सच्या प्रचंड खर्चाच्या जाहिराती पाहिल्या की लक्षात येईल की त्या पुण्यामुंबईतील मध्यमवर्गीयाला नजरेसमोर ठेवून आणि त्याला (व त्याच्या तिला) "नायगारा"चे स्वप्न दाखविणार्याच असतात. महाबळेश्वर, माथेरान गेले आहेत आता बासनात. ते राहिले आहेत फक्त शनिवार-रविवारच्या जोडसुट्टीसाठी आणि सिम्बॉयासिस व भारती विद्यापीठ हॉस्टेलमधील फ्रेंड सर्कलसाठी.
देशात सन १९९९-२००० मध्ये फोन, मोबाईल, केबल, फ्रीज, टू/फोर व्हीलर या उत्पादनीत सेवांचे प्रमाण २० ते २५ टक्के होते ते "सॅलरी अर्नर्स्" मध्ये अचानक आलेल्या श्रीमंतीच्या लाटेमुळे २००८-०९ मध्ये ७० टक्क्यावर गेले आहे. मुंबई-पुणे तर सोडाच पण त्यांच्यापुढे दुय्यम असलेल्या जिल्ह्याजिल्ह्यात मारूती, फियाट, ह्युन्दाई, शेवरलेट या मोटारींची भलीमोठी होर्डिन्ग्ज् काय सांगतात्? "आता प्राथमिक शिक्षकदेखील स्वतःच्या कारमधून आपल्या शाळेला जाईल. त्वरा करा आणि या नंबरवर् मोबाईल् करा. सेवेस हजर." ~ काल ही बाब अतर्क्य वाटत होती, पण उद्या तुमच्याच गावातील एक प्रा.शिक्षक आणि सरकारी कचेरीतील एक ज्युनिअर क्लार्कदेखील कारला "चैन" न म्हणता "गरज" म्हणायला सुरू करेल.
काही ठिकाणी हे घडतदेखील आहे.
मायक्रोव शेगडी, श्रेयस, टचस्क्रिन हँडसेट, लॅपटॉप, मल्टिप्लेक्स
बायकोपोरासोबत माझा एका सहकाऱ्यावर त्याच्या आईवडलांची जबाबदारी आहे. दोघांनाही व्याधी आहेत. त्याचे उत्पन्न ३५ हजाराच्या आसपास आहे. त्याच्यासाठी मायक्रोव शेगडी, श्रेयस, टचस्क्रिन हँडसेट, मोठ्ठा एलसीडी टीव्ही, लॅपटॉप, मल्टिप्लेक्स म्हणजे त्यासाठी चैनच आहे. तो त्यांच्यावर पैसे खर्च करू शकत नाही. बाळ लहान असल्याने आणि आईवडलांची तब्येत पाहता दुसरे इंजिन घरीच असते. असो.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
भलतीच चंगळ आहे.
मायक्रोवेव शेगडी, टचस्क्रीन फोन, एलसीडी टीवी आणि मल्टिप्लेक्स मला तरी शुद्ध चंगळवाद वाटतो. एक तर या शेगडीमुळे एकही भारतीय पदार्थ धड बनत नाही. माझ्या भावाने एक महागडा फोन त्याच्या पहिल्या की दुसऱ्या पगाराच्या पैशातून घेतला होता (पीअर प्रेशर). त्यावरुन मी त्याची बरीच कानउघाडणी केली होती. काही दिवसांनी बाथरूममध्ये हातपाय धुताना तो फोन पाण्याने भरलेल्या बादलीत पडला. मूळ किंमत 16000, दुरुस्तीसाठी 5000 आणि नंतर तो 9000 ला सेकंडह्यांड मार्केटमध्ये विकला :D
आता शांतपैकी नोकिया 1100 वापरतो व गंमत म्हणजे हा फोन वापरुनही त्याला इतरांशी संवाद साधता येतो. :)
मल्टिप्लेक्स तर मला सूज आलेल्या श्रीमंतीचे लक्षण वाटते. मी मल्टिप्लेक्सकडे ढुंकूनही पाहत नाही. 5 रुपयाच्या लाह्या 50 रुपयांना विकणारी भामटी मंडळी आहेत ही. (काही गाढवे गर्लफ्रेंडला इम्प्रेस करायला स्वतःचा खिसा इथे हलका करुन घेतात.)
मला कामासाठी आणि रिलॅक्सेशनसाठी (उपक्रमावर उखाळ्यापाखाळ्या वगैरे) ल्यापटॉप लागतोच. त्याशिवाय जमणार नाही. :(
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
पिअर प्रेशर
मल्टीप्लेक्सला जाणे ही आपल्या पिढीला चैन वाटू शकेल पण (बरे आहे की तुम्ही अजून त्या गटात नसावे- ) शाळेत जाणार्या आपल्या मुलांमध्ये / इतर स्त्रियांमध्ये वावरणार्या पत्नीमध्ये 'मल्टिप्लेक्सला न जाणे' या गोष्टीमुळे न्यूनगंड उत्पन्न होऊ शकतो. तो टाळाण्यासाठी ही सूज स्वतःला फटके मारून का होईना आणावी लागते.
(हा माझा वैयक्तिक अनुभव नाही याची कृपया नोंद घेणे..)
सहमत आहे
माझ्यासारखेच विचार असणाऱ्या एकदोन विवाहित सहकाऱ्यांनी त्यांचे अनुभव सांगताना मल्टिप्लेक्सला नेले नाही तर मुलांना/पत्नीला वाईट वाटते त्यामुळे जावेच लागते असे सांगितले. मात्र या बिचाऱ्यांना मल्टिप्लेक्समध्ये चित्रपट पाहताना मनातून उधळपट्टी करत आहोत असे वाटून अपराधी वाटते.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
योग्य की अयोग्य
श्री धम्मकलाडू व आजानुकर्ण यांना माझा असा प्रश्न आहे की मायक्रोवेव्ह शेगडी, श्रेयस, टचस्क्रीन हँडसेट, लॅपटॉप, एलसीडी टीव्ही किंवा मल्टिप्लेक्स यापैकी काही आवश्यक व काही अनावश्यक किंवा चैन हे त्यांनी कोणत्या आधारावर ठरवले. श्री. आजानुकर्ण यांना लॅपटॉप आवश्यक वाटतो. पण टचस्क्रीन मोबाईल नाही. का? प्रत्येक व्यक्ती स्वत:च्या गरजा काय आहेत हे ठरवायला स्वतंत्र असते. एकट्या रहाणार्या ब्रह्मचारी मंडळींना मॅचेस किंवा कार रेसेस बघण्यासाठी मोठ्या आकाराचा एलसीडी टीव्ही गरजेचा वाटू शकतो. लग्न झालेल्या कुटुंबाला ती चैन वाटेल.
चन्द्रशेखर
परवडत नाही म्हणून
ह्या गोष्टी काही जणांना परवडत नाहीत. म्हणून चैनीच्या. मासिक बजेट आणि भविष्यासाठीची तरतूद केल्यावर ह्या गोष्टींचा विचारच करता येत नाही. पण ह्या गोष्टींशिवायही जगता येते. म्हणूनही गरजेच्याही नाहीत.
माझ्यामते गरज (नीड) आणि वाँट (मराठीत काय?) ह्यात गल्लत होते आहे. टीवी असणे/बघणे ही गरज आहे. ती गरज आपण साधा टीवी घेऊनही भागवू शकतो किंवा अगदी मोठा एलसीडी टीवी घेऊनही.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
एलसीडीची गरज भासली तेंव्हा
एलसीडी मला निव्वळ चैन वाटते. पण आमच्या घरात जुना सीआरटी प्रकारचा टीवी होता. त्याने भयानक जागा व्यापली होती. केवळ जागा वाचवण्यासाठी म्हणून एलसीडी घ्यावा लागला. इथे एलसीडी घेणे ही गरज झाली.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
बचत
एलसीडीने वीजही वाचते, यूपीएस वापरताना हे विशेष जाणवते.
एचडी वाहिन्या आणि एचडी संच लवकरच लोकप्रिय होतील आणि एलसीडी सीआरटीसारखेच स्वस्त होतील. ३जीमुळे तीच गत २जी टचस्क्रीनची होईल/झालीच आहे. हल्ली थोडी वाट बघितली की कोणतेही यंत्र स्वस्त होते. अर्ली बर्ड म्हणून पियर्स मध्ये इंप मारायचे असेल तर अधिक किंमत मोजावी लागते.
आणखी काही
एलसीडीने डोळ्यांवर कमी ताण येतो.
मुळात टीव्ही पहाणे हीच अनावश्यक(!) चैन आहे का?
+१
आहेच.
मी ती अजिबात करत नाही.
नितिन थत्ते
(नाऊ आय डोंट हॅव टु राईट धिस वे)
लॅपटॉप आवश्यक वाटतो. पण टचस्क्रीन मोबाईल नाही
कारण मोबाईलचा वापर मी फक्त बोलण्यासाठी करतो. बोलण्यासाठी उपयुक्त स्वस्त आणि टिकाऊ मोबाईल उपलब्ध आहेत. लॅपटॉप घेतानाही मी ऍप्पल किंवा थिंकपॅडसारखे महाग, किंवा तोशिबा-सोनी यांचे पांढरे हत्ती न घेता गरीबांचा अमिताभ असलेला डेल घेतो.
इतर कोणाला मोबाईलचा वापर अन्य कारणांसाठी करायचा असेल. (उदा. अश्लील ध्वनीचित्रफीतींची देवघेव) त्यांना टचस्क्रीन व तत्मस पर्याय उपलब्ध आहेत. (मी अशा देवघेवींसाठी इमेलचा वापर करतो.) ;)
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
सगळेच सापेक्ष
आजुबाजुला जेव्हा इतर लोक व त्यांच्या खरेदया बघतो (ज्या दुसर्यांना अनावश्यक् वाटू शकतात) जवळजवळ ९९.९९% वेळा खरेदी करणारी व्यक्ती ती खरेदी कशी महत्वाची आहे व किती बेस्ट डील मिळाले ह्याचे वर्णन सांगतो. बॉटमलाईन आपल्याकडे आपल्या खरेदीचे जस्टीफिकेशन असतेच.
बर आज बरेच जणांची ह्या जमाखर्चाच्या खेळात दमछाक होत असणार निश्चित, फायनान्शियल सॅव्ही नसणारे काही न काही खर्चाचे चुकीचे निर्णय घेत असतील. त्यावरुन एक सहज कल्पना सुचली. एक प्रायव्हेट व कॉर्पोरेट बेंकींग असते तर एका बाजुला महंमद युनुस यांनी प्रकाशझोतात आणले मायक्रोफायनान्स असते ज्यात अगदी खेड्यातल्या गरीब महीलेला कर्ज दिले असते व ते कर्ज व्यवस्थित फेडायचे प्रमाण चांगले आहे असे म्हणतात. त्याप्रमाणेच जसे हाय नेट वर्थ इन्डीव्हिज्युअल्सचे प्रायव्हेट बँकींग असते. त्यांचा पोर्टफोलीओ सांभळणारे जसे असते. तसे सामान्य माणसाकरता प्रायव्हेट बँकींग असेल का की पगार माणसाच्या हातात जाण्याऐवजी त्या खात्यात जाईल व ते खाते सांभाळणात प्रायव्हेट बँकर हा त्या खातेदाराशी अगोदर चर्चाकरुन ठरवलेल्या फायनान्शियल प्लॅन सांभाळेल. त्यात नोकरदाराला एक ठराविक रक्कम हातात मिळेल व त्याचे लाईफ मधल्या झंझटी कमी होतील. सर्व नियमीत खर्च बँक बघुन् घेईल. :-)
लेख लिहताना माझे डोके गरगरत होते. रोज सगळे हे बील भरले का ते बील् भरले का इ. झकझक करण्यापेक्षा अशी सर्व्ह्रिस असलेली उत्तम :-)
असो आता इंटरनेट बँकींग मुळे हे सोपे झाले आहे इ मान्य पण अजुन कित्येकजण नेट बेंकींग वापरत नाहीत हे देखील सत्य. शिवाय कोणी मित्राकरवी डायरेक्ट मार्केटींग इ च्या फंदात अडकायची शक्यता कमीच.
कारण
चैन ही सापेक्ष का आहे? कारण ज्याला ती चैन वाटते त्याच्या मते तितके पैसे त्या गोष्टीसाठी द्यायला नको. मल्टीप्लेक्स चैन वाटते पण जर मल्टीप्लेक्स आणि सामान्य थेटर यांचे दर सारखेच असतील तर ती चैन वाटेल का? इथे जो पैसे देतो आहे त्याच्या मते ती किंमत फार नाही त्यामुळे त्याला ती चैन वाटत नाही.
नीता अंबानींचा एका तासाचा खर्चही मला चैन वाटते कारण तो माझा कित्येक महिन्यांचा पगार असू शकतो. त्यांना ती चैन न वाटता गरज वाटते.
हे थांबणार कुठे असा विचार करण्यापेक्षा दुसर्या टोकाला जाऊन बघा. माणसाला जगण्यासाठी अत्यंत मूलभूत गरजा काय आहेत? अन्न, वस्त्र, निवारा. हिमालयाच्या पायथ्याशी जाऊन राहिले तर मोबाइल सुद्धा नको आणि ल्यापटॉपही नको. काही वर्षांपूर्वी मोबाइल नव्हता तेव्हाही लोक जगत होतेच की. त्या आधीही टीव्ही नव्हता तेव्हा रेडिओने काम भागत होतेच की.
--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com
साध्या रहाणीचीही सापेक्षता
चैनीच्या सापेक्षतेबद्दल सहमत तसेच साध्या रहाणीच्याही सापेक्षतेबद्दल -
नीताताई अंबानी रस्त्यावरून पायी चालल्या की त्याची बातमी होते. नीताताईंनी फुटपाथ बाजारातून काही घेतले तर त्याचे किस्से होतात.
चैन आणि साधी रहाणी दोन्ही सापेक्षच आहेत!
अवांतर -
शोभा डे ने घेतलेल्या मुलाखतीत त्यांनीच सांगितलेला किस्सा - एकदा त्यांनी घातलेली एक प्लास्टिक मोत्यांची माळ रस्त्यावर खरेदी केलेली होती. अंबानीबाई ज्या पार्टीत गेल्या होत्या तिथल्या पाहुण्यांनी त्या माळेचे तोंड दुखेल इतके कौतुक केले.
मूळ मुलाखत वाचावी अशी आहे.
अनदर किरण इन एनवायसी
लिंक
ही कमेंट वाचून हसून हसून पोट दुखले. झकास उपरोध बऱ्याच दिवसांनी वाचला. :D
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
म्हणूनच -
मुलाखत वाचावी अशी आहे. ;)
कित्ती कित्ती साधी आहे ती. मुळात मध्यमवर्गीयच हो! पेंटहाऊसमध्ये न रहाता एक्झेक्युटीव्ह सूट मध्ये राहते.
"आणि घर तर किती साधं आहे तिचं - वूली मॅमॉथच्या दातांचं कोरीव काम असलेले पलंग तिनं पाहुण्यासाठी राखून ठेवले आहेत - स्वतः मात्र फक्त महॉगनीच्या साध्या पलंगावर झोपते." इ.इ.
धन्य
धन्य त्या शोभा डे आणि धन्य त्या नीता अंबानी. :)
मस्त
मुलाखत वाचून मजा आली. :)
इथे दुसरा प्रश्न पडतो (कदाचित आणखीन एक चर्चा) : पैशाला कितपत महत्व द्यावे? पैसा आवश्यक आहे हे तर उघडच आहे पण प्रायोरिटी लिष्टमध्ये पैसा कितव्या क्रमांकावर असावा/आहे?
--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com
पंचायतन
चतुष्टय झालेच आहे. आता दे दणादण पंचायतनही होऊ द्या.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
हम्म
नवीन चर्चा सुरू करण्याइतका उत्साह नाहिये. :प्
--
घातक
घातक चैनी कुठल्या यापेक्षा कुठली जीवनशैली घातक आहे असा विचार करणे अधिक योग्य आहे असे वाटते. चैनी किंवा सवयी जीवनशैलीमध्ये अंतर्भूत आहेत.
आपली आजची जीवनशैली अगोदरच पुरेशी घातक आहे. तरूण वयात हृदयविकार, मधुमेह यांचे प्रमाण आपल्याकडे प्रचंड आहे. आपल्या आहारावर नियंत्रण ठेवणे, नियमित व्यायाम करणे, आपण काय खातो/पितो याकडे लक्ष देणे हे साधे नियम जर तुम्ही पाळत असाल तर बहुतेक सर्व जनता तुम्हाला "हेल्थ फ्रीक" म्हणून चिडवत असणार. आपल्या पारंपारिक जेवणामध्ये बहुतेक पाककृतींचा उद्देश सर्व जीवनसत्वांचे समूळ उच्चाटन कसे करता येतील हाच असतो. कच्चे गाजर अत्यंत रूचकर लागते आणि पौष्टीकही असते. मात्र त्याचा हलवा झाला की त्यातील अर्ध्याहून जास्त चांगले घटक जातातच, शिवाय भरमसाठ साखर येते ती वेगळीच. पण कच्चे खायचे ही संकल्पना कोपर्यातील चमचा-दोन चमचे कोशिंबीर सोडली तर आपण जवळजवळ बादच केलेली आहे.
--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com
अंथरूण बघून पाय पसरणे
माणसाला जगण्यासाठी अत्यंत मूलभूत गरजा काय आहेत? अन्न, वस्त्र, निवारा.
त्यानुसार आपल्याला काय परवडू शकते ते बघायला हवे. अंथरुण बघून पाय पसरायला हवेत.
हिमालयाच्या पायथ्याशी जाऊन राहिले तर मोबाइल सुद्धा नको आणि ल्यापटॉपही नको.
हिमालयाच्या पायथ्याशी जाऊन राहणे ही तर खूप मोठी चैन झाली. मोबाइल व ल्यापटॉपपेक्षाही.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
पण
त्यानुसार आपल्याला काय परवडू शकते ते बघायला हवे. अंथरुण बघून पाय पसरायला हवेत.
मग त्यात डबल इंजीन सुरू करून अंथरूण मोठे केले तर बिघडले कुठे? किंबहुना तेच होते आहे.
हिमालयाच्या पायथ्याशी जाऊन राहणे ही तर खूप मोठी चैन झाली. मोबाइल व ल्यापटॉपपेक्षाही.
रहाणे म्हणजे घर खरेदी करून नाही. साधू लोक रहातात तसे. ;)
--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com
पर्वतीचा पायथा बरा
त्यानुसार आपल्याला काय परवडू शकते ते बघायला हवे. अंथरुण बघून पाय पसरायला हवेत.
मग त्यात डबल इंजीन सुरू करून अंथरूण मोठे केले तर बिघडले कुठे? किंबहुना तेच होते आहे.
गरज नसताना अंथरूण मोठे करायचे का? आणि अंथरूण मोठे करून मग दुसरे इंजिन लावायचे का ?
हिमालयाच्या पायथ्याशी जाऊन राहणे ही तर खूप मोठी चैन झाली. मोबाइल व ल्यापटॉपपेक्षाही.
रहाणे म्हणजे घर खरेदी करून नाही. साधू लोक रहातात तसे. ;)
तरीही चैनच. पर्वतीच्या पायथ्याशी जाऊन राहायला हवे :):)
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
गरज
गरज नसताना अंथरूण मोठे करायचे का? आणि अंथरूण मोठे करून मग दुसरे इंजिन लावायचे का ?
गरज आहे की नाही हे ठरवायचे कुणी? हे सापेक्ष आहे हे सर्वांनाच मान्य आहे.
तरीही चैनच. पर्वतीच्या पायथ्याशी जाऊन राहायला हवे :):)
भिक्षांदेही करायचे असेल तर पर्वती काय आणि हिमालय काय, सारखेच.
--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com
घातक चैनी
कुठल्या गोष्टी चैन मानल्या पाहिजेत यावर चांगली चर्चा झाली. बहुतेकांच्या मते त्या सापेक्ष आहेत. म्हणजे आयटी वाल्यांच्या १५० रुच्या रिक्षा देखील.
मात्र घातक कुठल्या यावर फारशी चर्चा झाली नाही.
मी खालील वर्ग वारी करतो. यात प्रत्येकात खर्च वाढत जातो. यातील शेवटच्या वर्गवारीला अंत नाही.
आवश्यक मधील पहिली बाब गरजेची आहे. आज कित्येकांची ती पूर्ण होत नाही आहे. दुसरी मध्यमवर्गीय व प्रतिसादांना धरून आहे तर तिसरी + ही श्रीमंतीकडे जाणारी आहे.
आवश्यकः
अन्न : १. स्वस्त (सकस) आहार (गरज), २. चवदार आहार, ३. आयता आहार
अन्नातील घातक चैन : प्रकृतीला अपायकारक आहार
वस्त्रः १. (लज्जा रक्षणार्थ पुरेसे ) स्वस्त (गरज), २. आरामदायी, ३. आरामदायी आणि दिसायला झकास
निवारा: १. माणशी ५० स्के.फु. सैपाक (गरज), २. हवेशीर, जोडप्यागणिक स्वतंत्र खोली, आंघोळ,शौचाची अंतर्गत सोय, ३, (२+) सृष्टीसौंदर्य दिसेल असे, जिम, थिएटर, पाहुण्यांची वेगळी सोय
आरोग्यः १. आजार पणावर योग्य उपचार (गरज) २. (१+) निरोगी जीवनासाठी करण्याच्या गोष्टी.
प्रवास (हा नित्याचा आहे): १. रोजगार, शिक्षण, बाजारपेठ येथे जाण्याची सोय (चालत,सायकल, सार्वजनिक) (गरज), २. स्वयंचलीत दुचाकी, ३. चारचाकी ४. वाहनचालकासह एक वा अनेक
संपत्ती (बचत) : १. संकटास तोंड देण्याइतपत (कदाचित यालाच अंत नसेल) २. वृद्धापकाळाची सोय भागवणारी ३. सात पिढ्यांना पुरेशी(हे वाक्प्रचारातून)
संपर्क: १. नाते/मित्रपरिवाराला पोचणारा (टपाल/तार) (गरज) २. गप्पा (काव्य शास्त्र विनोद) मारणारा (मोबाईल, इंटरनेट) , ३. ३ जी ++
शिक्षणः १, रोजगारास पुरेसे (गरज) २. एकाहून जास्त रोजगारास पुरेसे ३. माहितगार आणि विचारी बनवणारे , कला गुणांना जोपासणारे.
एक प्रश्नः जेंव्हा समाजात गरज (प्रकार १ ची) न भागता जगणारी माणसे आहेत तेंव्हा प्रकार २/ ३ + ही चैन अनाठायी समजावी का?
इतर प्रकार
व्यसने: हा प्रकार घातक समजावा (व्यक्तिला व समाजाला)
करमणूकप्रधान निर्मीतीशून्य प्रकारः (अनप्रॉडक्टीव)
रेडीओ, दूरचित्रवाणी, चित्रपट ,नाटके, संगीत, नृत्य, चित्रकला, पुस्तके, खेळ बघणे
हे घातक का पूरक?
लिहिता लिहिता: आळस नावाची चैन राहिलीच.
प्रमोद
परवडत असेल तर
हीच वाक्ये
यातील कित्येक गोष्टी/ रूढी/ परंपरा समाजातील दुर्बल घटकांकडे पैसे वळते करतात. (फूलवाला, भटजी, मूर्तीकार). पूजा घालणे, नैवेद्य दाखवणे, जेवणावळी घालणे, फुले,आरास, दक्षिणा, तीर्थयात्रा अशा ठिकाणी देखील काही प्रमाणात पैसा दुर्बल वा मध्यमवर्गीय घटकांकडे जातो. यामुळे अर्थकारणाला गती मिळते. देशाचे सामायिक उत्पन्न वाढते.
अशीही लिहिता येतील नाही का? :-)
माणसांना स्वतःला ज्या गोष्टी रूचत नाहीत त्याविषयी त्याच्या मनात अढी असते आणि कधीतरी अशा गोष्टींना तो चैनही म्हणतो. (तर कधी इतर काही.)
चैन परवडत असेल तर अवश्य करावी. ज्या गोष्टींनी माझ्या आरोग्याला किंवा कौटुंबिक स्वास्थ्याला धोका पोहोचणार नाही असे वाटते त्या सर्व चैनी मी करते आणि करेन.
चैनीचं एक चांगलं उदाहरण आताच पाहिलं - कँडीशॉपमधला चॉकलेटचा धबधबा.
पहिल्या चौरसाकडे परत
एखाद्या कृतीमध्ये आनंददायी स्वतोमूल्य वाटत असेल तर त्या कृतीला स्वेच्छेने भागविलेली/केलेली गरज/उधळपट्टी/चैन म्हणता येईल. इतर कोणतीतरी आनंददायी घटना घडण्याच्या तर्कसंगत हिशोबाने केलेली कृती ही तशा घटनेसाठी (ती घटना गरज/उधळपट्टी/चैन यांपैकी काहीही असो) मोजलेली किंमत असते. पण जर इतर कोणतीतरी आनंददायी घटना घडण्याच्या निराधार, भोळ्या आशेने एखादी कृती केलेली असेल तर मात्र ती कृती गुलामी ठरते आणि हे 'दुर्बल घटक' एका शोषक व्यवस्थेचे जाणते/अजाणते हस्तक ठरतात.
खरे आहे
दारू पिणे, शिग्रेट ओढणे, गाड्या उडवणे वगैरे गोष्टीही पीअर प्रेशर खाली केल्या जातात तसेच.
असो. स्पष्टीकरणाची गरज नव्हती. ते स्पष्टीकरण नेहमीच मान्य आहे. वाक्ये बदलून कशी लिहिता येतात एवढेच दाखवायचे होते. त्यावर प्रमोद सहस्त्रबुद्ध्यांचा उपप्रतिसाद बरेच सांगून गेला.
समजले नाही
पण जर दारू, गाड्या, इ. खर्चाने मित्र आणि विशेषतः मैत्रिणी खरोखरीच प्रभावित होत असतील आणि त्यात एखाद्या व्यक्तीस (प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष) सुख मिळत असेल तर त्या कृती(=हिशोब)ची तुलना देवाला इंप्रेस करण्याच्या आशे(=समजूत)शी कशी करता येईल? अशी तुलना करता आली तरच वाक्य बदलून लिहिता येईल ना?
आवडीन केली तर चैन नाहीतर शिक्षा
यातील कित्येक गोष्टी/ रूढी/ परंपरा समाजातील दुर्बल घटकांकडे पैसे वळते करतात. (फूलवाला, भटजी, मूर्तीकार). पूजा घालणे, नैवेद्य दाखवणे, जेवणावळी घालणे, फुले,आरास, दक्षिणा, तीर्थयात्रा अशा ठिकाणी देखील काही प्रमाणात पैसा दुर्बल वा मध्यमवर्गीय घटकांकडे जातो. यामुळे अर्थकारणाला गती मिळते. देशाचे सामायिक उत्पन्न वाढते.
अशीही लिहिता येतील नाही का? :-)
हे पण चालेल. फक्त ती आवडीने केली असली पाहिजे. मात्र देशाच्या सामायिक उत्पन्न वाढते वा अधिक लोक सुखी होतात याविषयी माझ्या मनात संभ्रम आहे. त्यावर कोणी मतप्रदर्शन करेल का?
माणसांना स्वतःला ज्या गोष्टी रूचत नाहीत त्याविषयी त्याच्या मनात अढी असते आणि कधीतरी अशा गोष्टींना तो चैनही म्हणतो. (तर कधी इतर काही.)
हे मात्र पटले नाही. उदाहरणे मिळतील का?
प्रमोद
का बरे?
हो ठिक आहे ना. आवडच म्हणू. बर्याचदा, महागड्या गोष्टींची चैनही पीअर प्रेशरखाली केलेली असते त्यात आवडीचा भाग कमी असतो. :-) तसेच हे ही.
देवांच्या मूर्तीकाराचे उत्पन्न,फुले विक्रेत्याचे उत्पन्न, तीर्थक्षेत्री होणारे उत्पन्न आणि पुरोहिताचे उत्पन्न वगैरेतून लोक देशाच्या उत्पन्नाला हातभार लावत नाहीत असे म्हणायचे आहे का?
न पटू द्यात पण उदाहरण देईन.
१. "अ" या व्यक्तीला लहानपणी अतिशय काटेकोर शिस्तीत वागवले गेले. हातखर्चासाठी अतिशय मोजके पैसे दिले गेले. मोठेपणी तरूण किंवा लहान मुलांना मिळणार्या महागड्या भेटींना ही व्यक्ती उधळपट्टी समजते "आम्हाला आमच्या लहानपणी असे काही मिळत नव्हते. आताच्या पोरांना शेफारून ठेवले आहे." असे म्हणते. हे एक सर्वसामान्य उदाहरण आहे. अशी अनेक उदाहरणे प्रत्येकाच्या पाहण्यात असतात असे मला वाटते.
२. ही चर्चा (पिझ्झा/ बर्गर सकट) याच गोष्टींचे बेष्ट उदाहरण कारण या गोष्टी सर्वांना रूचत असत्या तर चर्चा झालीच नसती. कसें? :-)
अक्षता एक उदाहरण
यातील मात्र भाग सर्व चैनींविषयी होता. चुकुन तो देवपूजेच्या मागे लागला.
हो ठिक आहे ना. आवडच म्हणू. बर्याचदा, महागड्या गोष्टींची चैनही पीअर प्रेशरखाली केलेली असते त्यात आवडीचा भाग कमी असतो. :-) तसेच हे ही.
मान्य
देवांच्या मूर्तीकाराचे उत्पन्न,फुले विक्रेत्याचे उत्पन्न, तीर्थक्षेत्री होणारे उत्पन्न आणि पुरोहिताचे उत्पन्न वगैरेतून लोक देशाच्या उत्पन्नाला हातभार लावत नाहीत असे म्हणायचे आहे का?
हे इतर चैनींसारखे संभ्रमात टाकणारे.
माझा एक मित्र लग्नात अक्षता म्हणून तांदुळ टाकू नका अशी चळवळ करतो. एका लग्नात सात आठ किलो तांदुळ जातात. आणि त्यांचा प्रसाद बहुतेक जोडप्यापर्यंत पोचत नाही. तुडवल्यामुळे त्यांची रवानगी कचर्यात होते. यावरचा धार्मिक उपाय म्हणजे जे लोक वधुवरांजवळ असतात केवळ त्यांच्या हातात अक्षता द्याव्यात. दुसरा उपाय म्हणजे कोणीच अक्षता टाकु नये. हेच तांदुळ मग माझा मित्र दूरच्या आदीवासी कुटुंबामध्ये वाटतो. या सिजन मध्ये त्याने हे शंभरावर लग्नात केले.
हे उदाहरण धार्मिक उदाहरण म्हणून घेऊ नये. अक्षता टाकल्याने शेतकर्याला तांदुळाचा चांगला भाव मिळतो काही जणांना रोजगार मिळतो वगैरे पण त्या न वाटल्याने काही जणांना खायला मिळते. यातील काय अधिक उणे?
प्रमोद
दुसर्याची चैन
१. "अ" या व्यक्तीला लहानपणी अतिशय काटेकोर शिस्तीत वागवले गेले. हातखर्चासाठी अतिशय मोजके पैसे दिले गेले. मोठेपणी तरूण किंवा लहान मुलांना मिळणार्या महागड्या भेटींना ही व्यक्ती उधळपट्टी समजते "आम्हाला आमच्या लहानपणी असे काही मिळत नव्हते. आताच्या पोरांना शेफारून ठेवले आहे." असे म्हणते. हे एक सर्वसामान्य उदाहरण आहे. अशी अनेक उदाहरणे प्रत्येकाच्या पाहण्यात असतात असे मला वाटते.
चैनीची सापेक्षता मला मान्यच आहे. म्हणून दुसर्याची चैन बरेचदा आपल्याला रुचत नसतेच. मला वाटले तुम्ही स्वतःला न रुचणार्या गोष्टींबद्दल बोलता आहात.
प्रमोद
पिझ्झा/ बर्गर खाणे आणि चैन
चैनींच्या गोष्टींत पिझ्झा/ बर्गर खाणे यांचा समावेश पाहून अंमळ गंमत वाटली. पाश्चात्य देशांतला वडापाव म्हणजे पिझ्झा/ बर्गर. एका अर्थी गरीबांचे खाणे. :-) त्याला झिलई देऊन फास्ट फूड म्हणून प्रसिद्धिला आणलेले. भारतात मॅक डॉनल्डमधली प्रचंड गर्दी पाहिली की अशीच गंमत वाटते. विशेषतः, मॅक डॉनल्डमध्ये जाऊन खाणे म्हणजे चैन करणे असा आपल्याकडे समज आहे. सध्या मॅक बर्गर कॉम्बो कितीला पडतो माहित नाही परंतु काही वर्षांपूर्वी तो सुमारे १०० रु. ना पडत असे. त्याच बर्गरची अमेरिकेत किंमत तेव्हा दोन-तीन डॉ. पेक्षा जास्त नव्हती. आता ज्या पटीने वाढली तेवढीच भारतात वाढली का याची कल्पना नाही. असो. आमचे मॅक डॉनल्डला जाणे म्हणजे आड हायवेवर भूक लागली असता दुसरे काही मिळत नसेल तेव्हा मॅक अवश्य दिसतेच म्हणून होते... नाईलाजाने.
असो. अंबांनींचा विषय निघालाच आहे तर आणखीही एक गोष्ट आठवली. काही वर्षांपूर्वी टिना आणि अनिल अंबानीच्या मुलाचा वाढदिवस थाटामाटाने टि.जी.आय. फ्रायडेला साजरा केला गेला होता. आता हे टि.जी. आय. फ्रायडे प्रकरण दरवेळेस आम्ही लंच-टाईममध्ये बाहेर जायचं ठरवलं की एकमताने कटाप केले जाते कारण - "बेक्कार जागा आहे आणि अन्न तर त्याहूनही बेक्कार."
चैन ही सापेक्ष तर असतेच असते पण चैनीच्या कल्पना एकासाठी खर्या तर दुसर्यासाठी खोट्याही असू शकतात.
वैद्यकिय क्षेत्र आणि चैन
>>>चैन ही सापेक्ष तर असतेच असते पण चैनीच्या कल्पना एकासाठी खर्या तर दुसर्यासाठी खोट्याही असू शकतात.<<<
काळाच्या ओघात ज्या कल्पना बदलत जातात तीत "चैन" ची व्याख्याही बदलत जाणे क्रमप्राप्त असते. कालचा "कार्डिऑलॉजिस्ट" ह्र्दयाच्या रक्तपुरवठ्यातील कमीजास्त आलेखासाठी केवळ एक ई.सी.जी. काढून घेऊन, त्याचे वाचन करे आणि आवश्यक असेल तर "ऑपरेशन" हे प्रमाणभूत वाक्य (जी सर्वमान्य टर्म आहे) अन्यथा "टोटल रेस्ट" या नावाने पेशंटला काही पथ्य व दोनतीन महिन्याची सक्तीची विश्रांती इतपत भागवून घेत असे. पण काळाच्या ओघात नवनवीन तंत्राच्या वावटळी आल्या आणि कालपर्यंत "चैन" वाटणारी अँजिओग्रॅफी, अँजिओप्लास्टी, बायपास आज मध्यमवर्गींयाच्या घरातील सहज बोलणारा विषय झाला आहे. एफएम् बँडवर या संदर्भातील एक जाहिरातही केकाटत असते, "आमच्याकडे बायपास फक्त ८० हजार रुपयात..." इथे 'फक्त' शब्द असा काही उच्चारला गेला आहे की, ८० हजार रुपयाच्या नोटा म्हणजे जणू घरातील बाळ्याने दुकानात जावून दुधाची पिशवी आणावी इतकी ती सोपी बाब आहे.
या शस्त्रक्रिया आता "चैनी" च्या ट्रीटमेन्ट राहिल्या नाहीत, किंबहुना वैद्यकिय क्षेत्राकडून तसा समज तरी करून देण्यात येत आहे.