मध्यमवर्गीय डबलइंजिन कुटुंबे

सध्याच्या मध्यमवर्गात डबलइंजिन कुटुंबेच जास्त दिसतात. उदा. आयटीवाल्या कुटुंबातला नवरा २ वर्षे परदेशी (ऑनसाइट) जातो. काही लाख कमावतो. कधी बायको जाते. मग फ्लॅट मोकळा होता. एक फ्लॅट मोकळा झाला की दुसरा मोकळा होतो. मग आणखी एक चारचाकी होते.. हे काही संपत नाही. ( एवढेच कशाला परदेशात जाऊन राहिले तरी नवरा एकीकडे नोकरी करतो आणि बायको दुसरीकडे.) हे झाले आयटीवाले जोडपे. इतरांच्या बाबतीतही कमी-अधिक अशीच परिस्थिती आहे. पैसे कमावण्याच्या नादात लोक जगणे विसरून गेले आहेत. एवढा पैसा कमावून करणार काय कळत नाही. माणसाने किती जगायला हवे हो? जगायला किती पैसा लागतो हो?

एकट्याच्या/एकाच्या पगारात मूलभूत गरजा अगदी नीट भागत असताना दोघांनी नोकरी करण्याची गरज काय? असो. मुले आईवडलांपासून दुरावत आहेत. मुलांचे पालन-पोषण ही पूर्णवेळ जबाबदारी नाही काय? आपली कुंटुंबव्यवस्था मोडकळू लागली आहे आणि एवढे मोठे आमूलाग्र बदल आपल्या समाजाने बहुधा अनेक शतकांत बघितले नसावेत. (युरोपीय समाज दुसऱ्या महायुद्धानंतर जसा आणि जेवढा बदलला तसेच काहीसे भारतात होते आहे. अर्थात हा वेगळ्या चर्चेचा विषय आहे.) संकेतस्थळांची सदस्यसंख्या वाढते आहे. जिथेतिथे, बाह्यसौंदर्य ते वटपौर्णिमाच्या शुभेच्छाछाप फालतू चर्चा होत आहेत. नवराबायको संस्थळावर जळवांसारखे चिकटून पडलेले आहेत. पोर विडियो गेम्ज़ खेळत आहेत. (ह्याबाबत विदा उपलब्ध नाही. हे केवळ एक निरीक्षण). असो. तर कुटुंबव्यवस्था टिकायला हवी असे तुम्हाला वाटते का? आणि ती टिकवण्यासाठी नवरा-बायकोपैकी कुणी तरी एकाने घर सांभाळायला हवे का?

कृपया आपली मते मांडावी.

लेखनविषय: दुवे:

Comments

कुणी गोविंद घ्या कुणी गोपाळ घ्या

"तुफान रिकामा वेळ" हा खरा कळीचा मुद्दा झाला आहे या झमेल्यात.

मूळ प्रश्न 'नोकरी करण्याची इच्छा पूर्ण होत नाही' असा नसून 'वेळ कसा घालवावा' असा आहे. मग मुलीने थोडा इनिशिएटिव घेऊन शेजारपाजाऱ्यांशी ओळखी काढायला हव्यात, वाढवायला हव्यात. तिच्या छंदांमध्ये तिने वेळ घालवायला हवा.

इतका रिकामा वेळ मला मिळाला तर किती पुस्तके वाचून होतील.

नाही तर प्रतिसादाच्या शीर्षकात दुसरा उपाय आहेच.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
 
^ वर