माऊंटन ब्लू-बर्ड (डोंगरी नीलपक्षी!)

माऊंटन ब्लूबर्ड
माऊंटन ब्लूबर्ड


उत्तर अमेरिकेमध्ये आढळणारा हा निळाशार पक्षी कमालीचा लोभस आहे! वरच्या चित्रात नर पक्षी (उजवीकडचा) आपल्या प्रेयसीला (डावीकडची) भेटवस्तु (अळी) आणुन देताना दिसतोय. विणीच्या हंगामात प्रेयसीला आकर्षीत करण्यासाठी असे प्रकार बर्याच पक्षांत केले जातात.

आणखी एक गमतीचा भाग म्हणजे ह्याच्या पिसांचा रंग ह्या त्या पिसांमधिल कोणत्याही रासायनिक घटकद्रव्यांमुळे (जसे की pigments) आलेला नसुन, पिसांच्या विशिष्ट प्रकारच्या रचनेमुळे आला आहे. पिसांच्या सुक्ष्म रचनेमुळे फक्त निळा प्रकाश बाहेर परावर्तित केला जातो आणि त्यामुळे पिसांना तो रंग प्राप्त होतो. जर एखादे पिस प्रकाशाच्या स्त्रोताच्या पुढे धरुन पाहिले (backlit) तर तिच पिसे राखाडी रंगाची दिसतात!!

-भालचंद्र

लेखनविषय: दुवे:

Comments

फार सुरेख

माहीती चांगलीच दिलीत. लेन्स कोणते व कॅमेरा - पक्षातील अंतर साधारण कीती होते. फार शार्प जमले आहे.

"विणीच्या हंगामात प्रेयसीला आकर्षीत करण्यासाठी असे प्रकार बर्‍याच पक्षांत केले जातात".
इथे निवडणूकीत केले जातात हा पक्षी त्यांचा मेंटर असावा.

सुंदर!

सुंदर!
नुसता पक्षी टिपण्यापेक्षा त्यातले नाट्य टिपले आहे हे खास आहे.

फार आवडले!

आपला
गुंडोपंत
~काही सदस्यांच्या सदैव डॉकिन्सपणामुळे मला उपक्रमाचा कंटाळा आला आहे. हल्ली येथे फार काही मजा येत नाही. चर्चा करणेच नको वाटते!~

+१

उत्तर अमेरिकेमध्ये आढळणारा हा निळाशार पक्षी कमालीचा लोभस आहे!

सहमत आहे. त्याचा रंग फारच वेधक असतो.

सुंदर!
नुसता पक्षी टिपण्यापेक्षा त्यातले नाट्य टिपले आहे हे खास आहे.

+१.. चित्र फारच आवडले

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

+१

+१ चित्र फारच आवडले.

नेमके कुठे टिपलेत?

सर्वांग सुंदर

सर्वार्थाने सुंदर प्रचि...शार्पनेस, रंग, डेप्थ, बोके, काँपोझिशन, चित्रातील भावना..मस्त टिपल्या आहेत!

मस्त

मस्त रे!

वा:

फारच सुंदर फोटो. विशेषतः असा क्षण टिपता येणे म्हणजे ग्रेटच.

पक्षाच्या पिसांच्या निळ्या रंगाविषयी जे लिहिले आहे ते बहुधा मोरपिसाच्या बाबतीतही खरे आहे असे वाटते.

नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)

फार छान

सुरेख!

आवडले...

भालचंद्र, चित्र आवडले. माहिती रंजक आहे.

पण चित्र काढले कुठे (अमेरिकेत?) आणि वर म्हटल्याप्रमाणे कॅमेरा आणि लेन्सच्या माहितीची वाट बघतो आहे.

==================

+

मस्तच

फार सुंदर आहे चित्र. आवडले.






+१

फार सुंदर आहे चित्र. आवडले.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुंदर

सुंदर चित्रनाट्य.

________________________________
माझा प्रतिसाद या मार्गदर्शक सूचनांशी सुसंगत आहे का? नसल्यास कृपया खरड अथवा व्यनिने कळवा.

सुंदर

+१
फार सुंदर टिपलाय क्षण आणि पक्षी.

मोरपिसाचे पण तसेच असते.

प्रमोद

माहिती

प्रतिक्रियांबद्दल सर्वांचे आभार!

छायाचित्राविषयीची काही तांत्रिक माहिती:

कॅमेरा : कॅनन ईओएस् ३५०डी
लेन्स : ५५-३५० मिमी, एफ्/४-५.६ आय् एस्
ऍपर्चर : ५.६
शटर : १/१०००
आय एस ओ: ४००
स्थळ : कॅनडातील अल्बर्टा राज्य
पक्ष्यापासुनचे अंतर : ३०-४० फुट (नक्की आठवत नाही)

चित्रावरिल संस्कार :
क्रॉप
ब्राइटनेस-कॉन्ट्रास्ट
लेव्हल
अन्शार्प माक्स
नॉईस रिडक्शन (Anisotropic smoothing)
अन्शार्प माक्स
बॉर्डर, कॉपीराईट, स्केल

चित्र बर्‍यापैकी क्रॉप केलेले आहे आणि संस्कारही बरेच आहेत (जर चित्रातील अळी बारकाईने पाहिली तर एक पांढरी सीमारेषा दिसुन येते, हा संस्कारांचाच परिणाम) .. परंतु मलासुद्धा चित्राच्या दर्जापेक्षा जिवंतपणाच जास्त आवडला! .. खरेतर बर्याच वेळ त्या खांबावर लेन्स रोखुन बसलो होतो आणि जसा तो नर आला तसे फटाफट फोटो काढले. तो नर केवळ २ सेकंद त्या खांबावर होता आणि माझ्या सुदैवाने कॅमेरा तयार होता, झटझट ५/६ फोटो काढले, आणि पैकी वरचा हवा त्यापेक्षाही भारी आला!!!

http://bspujari.googlepages.com/

व्वा!

खरोखरच योग्य क्षण टिपण्याला कॅमेरा हाताळण्याची सवयं तुम्हाला चांगलीच आहे ह्याचा हा पुरावा. तसेच इमेज एडीटरचा संतुलीत वापर आवडला. अजून असे काही आनंदाचे क्षण जरुर दाखवा.

लोभस

छान चित्र आहे, आवडले.
तो निळा पक्षी तर फारच लोभस आहे.

 
^ वर