उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
एक सूर्यास्त - लायन्स व्ह्यू पॉईंट, लोणावळा
अभिजा
June 22, 2010 - 5:10 am
लोणावळ्यापासून १२ किमि अंतरावर, ऍम्बी व्हॅली मार्गावर लायन्स व्ह्यू पॉईंट आहे. तेथील एक सूर्यास्त!
अतिशय सुंदर पर्यटन स्थळ आहे, पण व्यवस्थापन शून्य! पर्यटकांनाही सामाजिक आरोग्याची जाणीव नाही! प्लॅस्टिक बॅग्स, खाऊन टाकलेले खाद्य पदार्थ, पाण्याच्या प्लॅस्टिकच्या बाटल्या इतस्ततः विखुरलेल्या असतात. असो!
होरिझोन्टल फ्रेम इथे पहा.
धन्यवाद!
दुवे:
Comments
छानच!
मला व्यक्तीशः आडवे चित्र आवडले. अर्थातच दोन्ही चित्रे वेगळी कथा सांगु पहातात.. पण मला आडवे आवडले.
बाकी ह्या पॉईंटच्या अव्यावसायिकपणाबद्द्ल, तेथील अस्वच्छतेबद्दल व एकूणच लोणावळा व परिसरातील ग्रामस्थांचे/नागरीकांचे स्वतःच्याच नगरा/गावाबद्दलची हेळसांड बघण्याबद्दल किंबहुना त्यात सक्रिय सहभागाबद्दल जितकं बोलु तितकं कमीच आहे. असो.
अवांतरः ह्या चित्रापेक्षा त्या दुव्यावरचे त्याच ठिकाणहून काढलेले हे कृष्णधवल चित्र अधिक आवडले
ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?
सुंदर
मला उभ्या फ्रेमचेच जास्त आवडले.
चित्राचा विषय
चित्राचा विषय नक्की काय आहे? झाड, ढग की सूर्यास्त. चित्र बघून कोणताच विषय अभिप्रेत होत नाही. मथळा सूर्यास्त असा दिला आहे. परंतु प्रथम लक्षात येते ते झाड नंतर ढग आणि सर्वात शेवटी मुद्दाम शोधल्यावर सूर्य. जो विषय अभिप्रेत आहे त्यावर फोकस केले असते तर चित्र जास्त उठावदार झाले असते असे वाटते.
चन्द्रशेखर
चित्र संगणकाच्या मॉनिटरवर
चित्र संगणकाच्या मॉनिटरवर पाहताना वरून खाली स्क्रोल करावे लागल्यामुळे प्रथम झाड, ढग आणि शेवटी सूर्य असे झाले असेल काय? संपूर्ण चित्र एकत्र पाहिले तर मला नाही वाटत सूर्य शोधावा लागेल... त्याचवेळी हा सूर्यास्ताचाच फोटो आहे हेही लगेच लक्षात येईल.
चित्र अप्रतिमच !! मला उभी फ्रेमच जास्त आवडली.
चित्राचा विषय
चंद्रशेखरजी,
प्रचिचा विषय लँडस्केप आहे. पण लँडस्केप असे शीर्षक फार ढोबळ स्वरूपाचे वाटले असते, म्हणून सूर्यास्त असे शीर्षक दिले आहे. लँडस्केपमध्ये फ्रेममधील प्रत्येक एलिमेंटला महत्व असते असे मला वाटते. मनःपूर्वक प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!
सूर्यास्त
चित्राला सूर्यास्त असे नाव दिल्याने तर गडबड झाली आहे. नाव दिलेच नसते तर एक Landscape म्हणूनच चित्राकडे बघितले असते. एक देखावा म्हणून कित्र फारच छान आहे यात शंकाच नाही. चन्द्रशेखर
सुंदर
या चित्रात झाडाच्या कातर फांद्यांनी जादू केलेली आहे. झाडाच्या जवळचे सोनेरी कापसासारखे ढगही सुंदर. वा.
हेच चित्र वरून १/४ व उजवीकडून १/३ कापून वेगळाच परिणाम साधेल असंही वाटतं.
राजेश
द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी
धन्यवाद!
राजेशजी, रचनेतील सूचनेबद्दल धन्यवाद!
अप्रतिम
अप्रतिम !
व्वा..!
केवळ सुंदर.......!
सुंदर!
अप्रतिम! खुप आवडले. जास्त करुन सुर्यास्ताचे रंग!!!
-मित्र
लाजवाब
हे छायाचित्र तर सुंदर आहेच, परंतु दुव्यावरील अन्य छायाचित्रेही छान् आहेत. वरळी किनार्यावरील आकाशाचे छायाचित्रही (पेटल्स ऑफ अ स्काय) अप्रतिम आहे. आवर्जुन बघण्यासारखा अल्बम आहे.
जयेश
सुंदर चित्रे
सुंदर चित्रे
+१
सुंदर चित्रे!
________________________________
माझा प्रतिसाद या मार्गदर्शक सूचनांशी सुसंगत आहे का? नसल्यास कृपया खरड अथवा व्यनिने कळवा.
+२
सुंदर चित्र... :)
मदनबाण.....
झाड
दोन्ही चित्रे छान आहेत.
कृष्णधवल चित्रात झाड वेगळे दिसते. आधीचे कुठले?
सुर्यास्ताचे ठिकाण कृष्णधवल मधे जास्त उजवी कडे (उत्तरेकडे) आहे म्हणजे ते पावसाळ्याच्या सुरुवातीचे तर दुसरे पावसाळ्याच्या शेवटचे?
का हे कोन बदलल्यामुळे झाले?
प्रमोद
स्थानमाहात्म्य
प्रमोदजी,
स्थान एकच आहे. एका संध्याकाळी वेगवेगळ्या वेळी, विविध कोनातून फोटो काढले आहेत. धन्यवाद!
धन्यवाद!
प्रतिक्रियेबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार! :-)
अतिशय सुंदर
अतिशय सुंदर!!
अतिशय सुंदर पर्यटन स्थळ आहे, पण व्यवस्थापन शून्य! पर्यटकांनाही सामाजिक आरोग्याची जाणीव नाही! प्लॅस्टिक बॅग्स, खाऊन टाकलेले खाद्य पदार्थ, पाण्याच्या प्लॅस्टिकच्या बाटल्या इतस्ततः विखुरलेल्या असतात. असो!
समाज जागृतीची फार फार आवश्यकता आहे हो. काय सांगायचे...?
फार नैराश्यजनक चित्र आहे.
मजा म्हणजे नक्की काय याच्या कल्पनाच चमत्कारीक आहेत आपल्याकडे!
आपला
गुंडोपंत
~काही सदस्यांच्या सदैव तर्कटपणामुळे मला उपक्रमाचा कंटाळा आला आहे. हल्ली येथे फार काही मजा येत नाही. चर्चा करणेच नको वाटते!~
मजा म्हणजे नक्की काय?
गुंडोपंत,
प्रतिक्रियेसाठी धन्यवाद!
मजेची व्याख्या वयोमानपरत्वे बदलते.
त्याच ठिकाणी टिपलेला एक फोटो इथे पोस्ट केला आहे. कृपया इमेज इन्फो वाचावी. :-)
धन्यवाद!
बरोबर
मजेची व्याख्या वयोमानपरत्वे बदलते.
अगदी बरोबर आणि शिवाय तीच पगाराबरोबरही बदलते!
इन्फो पाहिली साधारणपणे विशीत जरा असे करणे चालतेच...
आवांतरः
पण म्हणून वन्यजीव अभयारण्यात दारू प्यायल्यावर तीच बाटली
वन्यजीव अभयारण्यात फोडण्याला कोणत्याही वयात मी मजा म्हणू शकत नाही, पाहू म्हणू शकत नाही.
असे समोरच घडल्यावर मग पगार आणि वय काहीही असले तरी, माझे वाद, भांडण, मारामारी, आणि उरलेल्या फुटक्या बाटलीनेच भोस्काभोस्की सहीत काहीही होवू शकते!
आपला
गुंडोपंत
कशाला हवी सामाजिक जागृती
अहो गुंडोपंत कचरा व्हावा, करावा ही तुमच्या देवाची इच्छा. तोच (म्हणजे ईश्वर) कर्ता आणि करविता. तोच (म्हणजे ईश्वर) प्लास्टिक ब्याग बनवतो तोच कचरा टाकवतो. त्यामुळे ही समाज जागृती कशाला हवी. चला टाळ कुटूया. तो सगळे काही ठीक करेल.
बाकी चित्र सुरेखच!
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
अप्रतिम
हा फोटो आणि अभिजित तुम्ही दिलेल्या दुव्यावरचे इतर फोटोही चाळले. अप्रतिम आहेत.
धन्यवाद
धन्यवाद, प्रियाली!
अप्रतिम
अप्रतिम. बऱ्याच काळाने प्रकाशचित्रे पाहिली तुमची. बरं वाटलं.
धन्यवाद
धन्यवाद, श्रामो! अलभ्यलाभ! ब-याच दिवसांनी तुमच्याशी संवाद झाला! :-)