उपक्रम व ड्रुपल मोड्युल

प्रस्तावना : - काही अडचणी येतात उपक्रमवर वावरताना त्या बद्दल खुप आधीपासून सांगावे सांगावे असे वाटत होते पण व्यवस्थापन अधिकार्‍याबदल काहीच माहीत नाही व कोणाला सांगावे तेच कळत नव्हते, धम्मकलाडू नां विचारले व त्या खरडाखरडीतून हा धागा निर्माण करत् आहे.

१. लिहण्यात येणारी अडचण.

एक जादा "अ" टाइप करावे लागते नेहमी त्यामुळे लेखन करण्याचा मुडच जातो, कारण बाकी संकेतस्थळावर प्रणाली वेगळी व येथे वेगळी.

उपाय : -

अ. तुषार जोशीं ह्यांचे युनी-स्वरस्वती हे मराठी टायपिंगचे ड्रुपल मोड्युल.

ब. सर्वांना माहीत असलेले व वापरण्यास सुटसुटीत असे गमभन. उपक्रम ड्रुपल ५ वर आहे तर त्यासाठी गमभनचे अपडेटेड मोड्युल आहे ते वापरले तर ही अडचण दुर होईल व काही खास बदल करावे लागणार नाहीत.

२. जुने लेखन शोधणे.

अ. ड्रुपलचे सर्च मोड्युल दिसत नाही आहे.वापरलेले नाही आहे ते देखील द्यावे, जेणे करुन लेखन शोधसाठी गुगलला हीट्स देण्यापेक्षा उपक्रमला हिट्स मिळाल्यातर ते सर्वात उत्तम.

ब्. दिनांकानूसार / महिन्यानूसार लेख शोधण्याची व्यवस्था.

३. नवीन लेखन प्रथम पानावर दिसण्याची व्यवस्था.

सध्या समुदायचा ट्रकर आहे तेथे नवीन लेखाचा ट्रकर टाकला तर काम होईल. समुदायचा ट्राकर रोज पहावा लागतो असे नाही पण् नवीन लेखन कुठले आले ते पाहणे गरजेचे आहे.

Comments

गमभनचे अपडेटेड मोड्युल नको!

गमभनचे अपडेटेड मोड्युल नको कारण त्यात अनेकदा भलतीच अक्षरे उमटत जातात.
जुने मोड्युल उत्तम आहे. योग्य वेळी लेखनासाठी पाय मोडकी अक्षरे नीट लिहिता येतात, तेंव्हा हेच बरे आहे.

गमभन या चमत्कारीक कळफलकासोबत शिवाय इन्स्क्रिप्ट किबोर्डची पण सोय द्यावी.

बाकी साठी काहीसा सहमत.

आपला
गुंडोपंत

मीम्

>>गमभनचे अपडेटेड मोड्युल नको कारण त्यात अनेकदा भलतीच अक्षरे उमटत जातात.

ही अडचण फक्त गुगल क्रोम मध्येच येते व मीम वापरत आहेच ना गमभन काही अडचण जाणवली नाही अजून तरी.

राज जैन
*********
"हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले,
बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । "

सगळीकडे येते

नाही नाही!
सगळीकडे येते हे नक्की.

अगदी फाफॉ ३.५.१ पासून ते आय ई ८ सर्वत्र हाच अनुभव मला येत आहे.
आपला
गुंडोपंत

गोंधळ

काही तरी गोंधळ आहे नक्की.

कुठल्या साईटवर तुम्हाला असा अनुभव आला ?

राज जैन
*********
"हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले,
बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । "

राजेंशी सहमत

राजेंशी सहमत. गमभन चे नवीन मोड्युल बाकी मराठी संस्थळांवर आहे. त्यात मला तरी कुठलीही तर्‍हेवाईक अक्षरे उमटल्याचे कधी जाणवले नाही. मी सद्ध्या फायर फॉक्स् ३.६.३ आणि आय. ई. ८ वापरतो. क्रोम वापरत नाही.

गमभन च्या नवीन मोड्युलमध्ये ऍ हे अक्षरही अ‍ॅ असे व्यवस्थित लिहिता येते. (हा 'अ‍ॅ' मीम वरुन कॉपी करुन इथे पेस्ट केला आहे.)

शेवटच्या पायमोडक्या अक्षराबद्दल काहीसा सहमत. पण अशी पायमोडकी अक्षरे कितीवेळा वापरावी लागतात? त्यासाठी प्रत्येक वेळेला जास्तीचा अ टंकायला लागणे अतिशय वेळखाऊ आणि इनएफिशियंट (मराठी शब्द?) आहे.

राजे, चांगला धागा.

राजे, चांगला धागा सुरु केला आहे. डुपल ६ साठी अक्षररंगाचे [text color] मोड्युल्स सांगा ना राव ! आमचे 'शिमगा’ संकेतस्थळ त्यामुळे अडले आहे. :)

अवांतर : 'उपक्रमवर' मला कोणतीच अडचण वाटत नाही. आहे ते स्वरुप खूप चांगले आहे.

टीप : मला कोणतेही मराठी संकेतस्थळ चालू करायचे नाही. उगाच खटपट करण्याची हौस.

- दिलीप बिरुटे

रंग

ड्रुपल ६ वर अक्षर रंग देण्याचा कोड अजून तरी मला ही जमला नाही आहे :(

पण् मी त्यावर एक कल्पना लढवून आयडिया तयार केली आहे जे बेसिक रंग आहेत्, लाल, निळा, ग्रे व पांढरा ह्यांची बटणे तयार् करुन इडीटर बरोबर जोडली आहेत्.. सध्यातरी.

राज जैन
*********
"हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले,
बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । "

आयड्या चांगली

>>बेसिक रंग आहेत्, लाल, निळा, ग्रे व पांढरा ह्यांची बटणे तयार् करुन इडीटर बरोबर जोडली आहेत्.. सध्यातरी.

हम्म, पाहिलंय मी. आपल्या प्रयत्नाला दाद देतो.
BUEditor मधे कोणी ते कोड का करत नाहीत ?

-दिलीप बिरुटे

पुस्तकविश्व

माझ्या ऐकीव माहितीप्रमाणे पुस्तकविश्व हे ड्रुपल ६ वर बेस्ड आहे.. तिथे हे अक्षररंग कसे व्यवस्थित देता येतात बरे??

.

नाही आहे तेथे पण्.

राज जैन
*********
"हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले,
बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । "

नक्कीच आहे...

पूर्वपरिक्षण करताना इनपुट् फॉरमॅट् फुल एचटीएमएल सिलेक्ट करा..

इन्सक्रिप्ट वापरा, बाकी सारे विसरा..

मराठी भाषेच्या संगणकीय लिखाणात (कि बोर्ड , फॉन्ट्स वगैरे) क्रांती करत असल्याचा आव आणत सध्या नवनवीन जे काही प्रकाशित होते आहे त्याचा परिणाम म्हणून मराठी च्या संगणकिय टंकनप्रणालीचे प्रमाणीकरण होण्याऐवजी तिला नको तितके फाटे फुटत आहेत. (या प्रकाशनामागचा प्रामाणिक हेतू व मराठी भाषेवरील संबंधितांचे प्रेम याबद्दल मला आदर आहे )
शासकीय पातळीवरुन दिलेला इन्सक्रिप्ट बोर्ड बऱ्यापैकी प्रमाणीत होत असतांना मला तरी वाटते इतर कळफलकांचा नाद सोडून अधिकाधिक लोकांनी इन्स्क्रिप्ट मध्ये मराठी टायपिंग शिकून घेतले पाहीजे. त्यासाठी मोफत ट्यूटर सुद्धा www.ildc.gov.in येथे उपलब्ध आहे.

एकदा तुम्ही इनस्क्रिप्टमध्ये मराठी टाईप करणे शिकलात की कोणत्याही संगणकामध्ये मराठी भाषा इन्टॉल करुन तुम्ही जगातल्या कुठल्याही (भाषेच्या) संकेतस्थळावर चुटकीसरशी मराठी टाईप करु शकता. फॉन्ट डिस्प्लेची कुठलीही अडचण न येता मराठीतून मेल करु शकता.

मराठी भाषा एक्सपी मध्ये अशी इन्स्टॉल करा.
स्टार्ट- कन्ट्रोल पॅनल- रिजनल लॅंग्वेज ऑप्शन- लॅंग्वेज (टॅब)-इन्स्टॉल फाइल्स फॉर द कॉम्पलेक्स स्क्रिप्ट्स वर टिक करा- अप्लाय- एक्सपीची सीडी टाका- फाईल्स कॉपी झाल्यावर ओके म्हणा- सिस्टीम रिस्टार्ट करा - स्टार्टबारवरील EN तसेच MA या पर्यायाद्वारे हवी तेव्हा हवी ती भाषा निवडा. भाषेतला बदल Alt+Shift या शॉर्टकट की ने सुद्धा करु शकता.

सहमत

मी तुमच्याशी १००% सहमत आहे इन्स्क्रिप्टच्या बाबतीत.
प्रमाणीकरणाचा उपाय म्हणून हाच किबोर्ड वापरला पाहिजे असे वाटते.
मात्र त्यातही काही तृटी आहेत जसे ऍ न लिहिता येणे वगैरे... (तो इथेही लिहिता येतचनाही म्हणा!)

आपला
गुंडोपंत

हीच तर गोची आहे.

मराठी आणि इन्स्क्रिप्ट इन्स्टॉल करताना हीच तर मोठी अडचण आहे. म्हणे एक्सपीची सीडी टाका. ही कुठून आणायची? भारतातल्या नव्वद टक्के संगणकात अनधिकृत एक्सपी असतो. असल्या संगणक मालकांकडे सीडी कुठून असणार? दुसर्‍याची सीडी आणून चालत नाही. लगेच मायक्रोसॉफ़्टला खबर मिळते, आणि आपला संगणक बंद पडण्याचा धोका संभवतो. संगणक विकत घेताना टाकलेली विन्डोज़ची आवृत्ती संगणक शाबूत असेपर्यंत सुधारता येत नाही. याच कारणास्तव माझ्या संगणकातली विषाणुप्रतिबंधक प्रणालीसुद्धा मला बदलता येत नाही, की सुधारित आवृत्ती टाकता येत नाही. विन्डोज़ एक्सपी आता कालबाद झाल्याने त्याची सीडी किंवा सर्विस पॅक बाज़ारात मिळतही नाहीत. मिळत असते तरी कोण चारपाच हज़ार रुपये खर्च करणार होते म्हणा, ती गोष्ट वेगळी. चारपाच हज़ारात आख्खा आडगिर्‍हाइकी संगणक मिळतो.
गमभन काय, बराहा काय किंवा इन्स्क्रिप्ट काय, या गोष्टी अमराठी माणसांसाठी बनवल्या आहेत. यांतल्या कुठल्याही टंकांत च़, च़ा नसतात, नैर्‍ऋत्य, कुर्‍आन, हविर्‍अन्न, पुनर्‍ऐक्य, पुनर्‍उच्चार हे शब्द चंद्रकोरीसारख्या( ‍र्‍ ) ऐवजी अनुक्रमे ऋ, आ, अ, ऐ, उ वर रफ़ार काढून लिहिण्याची सोय नसते. असे प्रमाण मराठी शब्द लिहिता येत नसतील तर ते कसले मराठी लिखाण? हिंदी टंकात एका ’ळ’ ची सोय केली की झाले मराठी टंक, अशा भावनेने असले टंक आपल्या गळ्यात मारले ज़ातात. तमिळमध्ये लागणारे ळ्ह, कॆ, कॊ आणि नुक्तावाले र, व य आणि न देताना च-झ चा कसा विसर पडतो, समजत नाही.
मराठी लिपीतली उभ्या मांडणीची ज़ोडाक्षरे आता संगणकावरून बाद झाली आहेत. मराठी श, ख, आणि ल यांनाच फक्त सरकारी मान्यता असली तरी तसली अक्षरे सरकारी संकेतस्थळावरही टाइप केलेली दिसत नाहीत. सरकारी आदेश एका प्रकाशकाला दाखवला तर तो म्हणाला, ते ठीक आहे, सरकारचे काय ज़ाते आदेश काढायला? आता मराठी ल, श आणि ख आम्ही कुठून आणायचे? जे आडातच नाही ते पोहर्‍यात कुठून येणार?

ट्विटर हा शब्द कसा वाचायचा? ट्‍इवटर की ट्‌विटर? स्पोर्ट्स हा स्पोट्‌-र्स‌? साधे स्पोर्ट्‌स लिहिता येऊ नये?

मराठीतल्या पहिल्या वेलांटीची व्याप्ती ही स्वरदंडापासून ते ज़ोडाक्षरातले शेवटचे व्यंजन शिरोरेषेला जिथे स्पर्श करते तिथपर्य़ंत असली पाहिजे. असते? कॉन्स्ट्यिट्यूशन मध्ये ती र्‍हस्व वेलांटी य पर्यंत पोचायला हवी होती. चिनी लिपीतली दहा हजाराहून अधिक अक्षरे संगणकाच्या कळफलकावर बसतात, मराठीच्या साध्या चारपाच र्‍हस्व वेलांट्या बसू नयेत?
मराठीसाठी अजून ना टंक बनले आहेत, ना कळफलक, हे सत्य आहे.. -वाचक्‍नवी

सहमत.

इन्स्क्रीप्ट फारच अपुरे आहे.

 
^ वर