मराठी कवितेची बदलती भाषा

मराठी अभ्यास परिषदेच्या वतीने, संस्थेच्या वर्धापनदिनानिमित्त दरवर्षी १ मे रोजी एक विशेष कार्यक्रम आयोजित केला जातो.

ह्या वर्षी, शनिवार दि० १ मे २०१० रोजी सायंकाळी ५.३० ते ७.३० ह्या वेळेमध्ये
मराठी कवितेची बदलती भाषा

ह्या विषयावर एक परिसंवाद आयोजित केला आहे. ह्या परिसंवादात हेमंत जोगळेकर, डॉ० नीलिमा गुंडी, डॉ० मनोहर जाधव व सलील वाघ हे कवी सहभागी होणार आहेत.

अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध कवी व समीक्षक प्रा० वसंत आबाजी डहाके असतील. ह्या विशेष कार्यक्रमासाठी आपण अवश्य उपस्थित राहून सहभागी व्हावे अशी विनंती आहे.

कार्यक्रम पत्रिका :
चहापान प्रास्ताविक : प्रा० प्र०ना० परांजपे स्वागत-परिचय
विषय मांडणी : श्री० हेमंत जोगळेकर, डॉ० नीलिमा गुंडी, डॉ० मनोहर जाधव, श्री० सलील वाघ
अध्यक्षीय समारोप : प्रा० वसंत आबाजी डहाके
आभार प्रदर्शन

कार्यक्रमाचे स्थान :
श्रीमती ना०दा० ठाकरसी महिला विद्यालय, पदव्युत्तर विभाग, महर्षी कर्वे रस्ता, पुणे येथील सभागृह. (सूचना : विधी महाविद्यालयाकडून येणार्‍या व्यक्तींनी कृपया, प्रवेशद्वार क्र० २ने (स्वाद उपाहारगृह चौकातून उजवीकडे वळून) आत यावे.

आपले,
आनंद काटीकर, कार्यवाह
प्र०ना० परांजपे, अध्यक्ष
मराठी अभ्यास परिषद
१ शीतल सहनिवास, ४६/४ एरंडवन, प्रभात रस्ता (गल्ली क्र० १४), पुणे ४११ ००४.

लेखनविषय: दुवे:

Comments

धन्यु....!

परिसंवादाची माहिती कळविल्याबद्दल धन्यु...!

कवितेच्या भाषेत कोणते बदल होत आहेत, सद्यकाळात कवितेतील भाषेचे स्वरुप कसे आहे. यावर आणि एकूण परिसंवादातील विचार इथे डकवल्यास ते वाचायला आवडेल.

-दिलीप बिरुटे

सहमत

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे म्हणतात त्याप्रमाणे हे विचार वाचावयास मिळाले तर फार बरे होईल. श्री. प्रकाश घाटपांडे बर्‍याच संवादांचे
रेकॉर्डिन्ग करतातच. तेव्हा त्यांनी व श्री चित्तरंजन यांनी एवढे काम करावेच. आताच धन्यवाद.
शरद

 
^ वर