वर भारतीय खेळाडूंनी आता तरी सत्य समजल्यावर बहिष्कार टाकावा

विचार करा भारतीय खेळाडूना जाहीर आवाहन .IPL द्वारे भारतीय खेळात भ्रष्ट्राचार आणणाऱ्या IPL वर भारतीय खेळाडूंनी आता तरी सत्य समजल्यावर बहिष्कार टाकावा. या स्पर्धेत भाग घेणार नाही म्हणून जाहीर करावे भ्रष्ट्राचारात आपले हात काळे करून लाखो देशवाशियांच्या भावनेशी खेळू नये.जुन्या जाणत्य खेळाडूंनी ज्यांना लोक देव मानतात त्या वरिष्ठा या बाबत पुढाकार घ्यावा. तसेच जनतेने सुधा या स्पर्धेवर बहिष्कार टाकून आपण सट्टेबाजीवर, बेइमानिवर नव्हे तर शुद्ध खेळावर प्रेम करतो हे या बेईमान राजकारणी,खेळाडूना दाखवून द्या

Comments

का?

का बुवा बहिष्कार?

ज्यांना ज्यांना (खेळाडू, जुने जाणते खेळाडू आणि जनता) बहिष्कार घालायला सांगता आहात ते सगळे स्वच्छ आहेत असा काही तुमचा समज दिसतो.

असो. माझा २०-२० वर बहिष्कारच असतो. कारण मी त्याला क्रिकेट समजत नाही.

नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)

कुठला भ्रष्टाचार?

आयपीएल मधल्या गोंधळाबद्दल वर्तमानपत्रात रोजच वाचतो आहे. (खेळाचा आनंदही अधून मधून घेतोय.) पण आयपीएल मध्ये भ्रष्टाचार नेमका कुठे झाला हे अजूनही कळले नाही. (तसे अधिकृतपणे कुठे जाहीरही झालेले नाही) निदान ठणठणपाळांनी तरी या भ्रष्टाचाराचे तपशील द्यावेत म्हणजे बहीष्काराबद्दल स्पष्ट मत व्यक्त करता येईल.

आयपीएल् : ललित मोदी हे घाशीराम कोतवाल

काल आयबीएन् लोकमत वाहिनीवर झालेल्या चर्चेत राष्ट्रवादी पक्षाचे नेते गोविंदराव आदिक यांनी थक्क करणारा पवित्रा घेतला होता.
त्यांचे म्हणणे थोडक्यात असे -
"'आय् पीएल' मध्ये सरकारचा पैसा नाही, सामान्य जनतेचा पैसा नाही.पैसा आहे तो मोठमोठ्या उद्योगपतींचा! त्यांची जर आय् पीएल बाबत काहीच तक्रार नसेल तर तुम्हाला कशाला एवढा त्रास होतोय? त्यांनी कुठे केले आहेत भ्रष्टाचाराचे आरोप? मग कुठे आहे भ्रष्टाचार?"
त्यांच्या या शहामृगी पवित्र्याला हसावे की रडावे ते कळेना...
'उंदराला मांजर साक्ष' ही म्हण गोविंदराव विसरले की काय?

तर भ्रष्टाचार असा झाला आहे -
मोठ्या नेत्यांनी आपले वजन खर्ची घालून आय्पीएल् ला विविध सोयीसवलती आणि करसुविधा मिळवून दिल्या. देशातील प्रचंड काळा पैसा बेनामी फ्रँचायजी (पडद्यामागील) भागीदारांमार्फत खेळात ओतला गेला. (त्यात नफा/तोटा झाला तरी ) काळा पैसा पांढरा झाला. बेनामी काळा पैसा भारतातून मॉरिशसमध्ये जाऊन तेथील बोगस कंपन्यांच्या मार्गे परत भारतात पांढरा बनून आला. (मनी लाँडरिंग). आयपीएल् हे काळा पैसा पांढरा करण्याचे रॅकेट आहे. त्यात मुख्य सूत्रधार कोण हे माहीत नाही. पण ज्याअर्थी या गैरप्रकाराकडे सरकार यंत्रणेने आतापर्यंत दुर्लक्ष केले त्याअर्थी मोठे राजकारणी यात सामिल आहेत असे सकृतदर्शनी वाटते.

दुसरीकडे करोडो प्रेक्षकवर्ग असलेल्या सामन्यांच्या प्रसारणाचे हक्क एका विशिष्ट कंपनीला मिळावेत म्हणून आय्पीएल् च्या पदाधिकार्‍यांकरवी विशेष प्रयत्न झाले. या कंपनीने त्या प्रयत्नांचा मोबदला म्हणून करोडो रुपयांची लाच दिली. या कंपनीला अर्थातच फायदा होणार आणि त्या कंपनीतही एका मोठ्या नेत्याच्या नातलगांची हिस्सेदारी आहे.म्हणजे वाटीतले ताटात आणि ताटातले वाटीत!

तिसरीकडे आयपीएल -२ मध्ये द. अफ्रिकेत बेटिंग-सट्टेबाजी मधून फायदा मिळवता यावा म्हणून मॅच फिक्सिंग केल्याचे आरोप होत आहेत. यातही आय्पीएल् चे प्रमुख सामिल होते असे आरोप आहेत.

हे सारे झाले ते कुणाच्या जिवावर? तुमच्या-आमच्यासारखे करोडो सामान्य प्रेक्षक - जे आवडीचा खेळ पहायचा म्हणून निमूटपणे जाहिरातींचा मारा सहन करतात आणि एका विशिष्ट चॅनलला पहाण्यासाठी पैसे भरतात -त्यांच्या जिवावर. प्रेक्षकांमुळेच तर इतका पैसा जमा होतोय.
मग या घोटाळ्यात सामान्य माणसाचा काही संबंध नाही?
समजा आयपीएलमुळे दहा वर्षात एक हजार कोटी रुपये काळ्याचे पांढरे झाले तर देशाचे नुकसान नाही काय?

पण इतके झाले तरी या प्रकरणाची पाळेमुळे खणून काढली जाणार नाहीत आणि वरवरची मलमपट्टी करून 'ऑपरेशन यशस्वी' झाल्याचे जाहीर केले जाईल असे वाटते.
(ललित मोदी हे घाशीराम कोतवाल आहेत असे आयबीएन-लोकमत म्हणते. मग नाना फडणवीस कोण?)

वॉटरगेट

ऋषिकेशने वॉटरगेटची उपमा दिली होती ती सार्थ ठरते आहे.

सरकार याच्या मुळाशी जाऊ शकत नाही कारण शरद पवारांशी सध्या पंगा घेतला तर बहुमत धोक्यात. जेपीसी बसविली तर साटेलोटे कारण यार वसूम्धराराजेही आहेत असे म्हणतात. शिवाय आता फोन टॅपिंगचे नवे प्रकरण.

एकूणात प्रत्येक जण स्वतःचे बूड कसे वाचेल या विवंचनेत आहे. बाकी न्याय वगैरे दुय्यम गोष्टी आहेत.

---
"भाई बनना है तेरेको?" -- भिकू म्हात्रे

पटते आहे.

आयपीएल् हे काळा पैसा पांढरा करण्याचे रॅकेट आहे.

एकूण आयपीएल वरुन दिसते तितके सोज्वळ नाही हे समजले.

आयपीयल सोज्ज्वळ

एकूण आयपीएल वरुन दिसते तितके सोज्वळ नाही हे समजले.

आयपीयल आपणाला वरुनतरी कसे काय सोज्ज्वळ दिसले होते?

त्यातल्या त्यात एक सोज्ज्वळ फोटो खाली


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

लै भारी

मला माहिती होते cheergirls असतात ते..पण " अश्या" हे माहिती नव्हते...अमेरिकेत cheerleads इतके कमी कपडे आणि इतकं अंग दाखवणारे, घातलेले बघितले नाही...चालू द्या..

पूर्ण कपडे घालणारी पण तोकड्या कपडेवाल्यांना नवे न ठेवणारी

शिल्पा

सत्य...

कोणतंही सत्य समजले तरी खेळाडू क्रिकेटवर बहिष्कार टाकणार नाहीत.
प्रसिद्धी, पैसा, हे कोण टाळणार. आणि
काहीही झालं तरी भारतियांचे क्रिकेट वेड कमी होणार नाही. [असे वाटते]

आयपीएलचे कमिशनर ललित मोदी राजीनामा देणार आहेत.
रवीशास्त्रीकडे त्यांचा कार्यभार देऊन खेळ पुढे जाण्याची शक्यता आहे . [बातमी: मटा]

सगळ्या भानगडी कळतात. पण क्रिकेट रसिकांच्या क्रिकेटवेडावर कोणत्याही गोष्टींचा
काहीही परिणाम होत नाही. तिसर्‍या स्थानासाठी आज आयपीएल मधे 'रॉयलचॅलेंज विरुद्ध डेख्खन चार्जेर्स' यांचा सामना होणार आहे, आणि आम्हीही तो पाहणार आहोत.

-दिलीप बिरुटे
[क्रिकेटवेडा]

 
^ वर