थरूर गेले, मोदी चालले
सध्याची परिस्थिती पाहून आम्हाला वेताळापेक्षा जास्त प्रश्न पडले.
मोदी एकटे भ्रष्टाचारी, बाकी सगळे स्वच्छ असे समजायचे का? जर गैरव्यवहार झाला असेल तर बीसीसीआयला त्याची कल्पना नव्हती? किंबहुना त्यांच्या संमतीशिवाय असे घडू शकते. का मोदींना बळीचा बकरा करून बाकी सर्व आपली कातडी वाचवत आहेत? आणि फ्रँचायझींचे व्यवहार? त्यातील पैसा कुठून आला आहे हे कधी उघड होईल की नेहेमीप्रमाणे सर्व बडी मंडळी निसटून जातील?
वित्त विभागाला इतक्या उशिरा जाग का आली?
मुळात बीसीसीआय/आयपीएल मध्ये इतके राजकारणी लोक का आहेत. पवार, अरूण जेठली, फारूख अब्दुल्ला, नरेंद्र मोदी. हे या सर्वांचे क्रिकेटप्रेम समजायचे का? तुलनेत हॉकी किंवा फुटबॉलच्या संघटनांमध्ये किती राजकारणी आहेत?
बीसीसीआय जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट संघटना आहे. तिचा सर्व कारभार स्वच्छ आहे असे वित्त विभागाला वाटते का? नसल्यास कधीकाळी बीसीसीआयची चुअकशी होऊ शकेल का?
थरूर यांचे काय चुकले? त्यांच्या आजूबाजूचे ९९% लोक सत्तेच्या माध्यमाने स्वतःचा फायदा करून घेत आहेत. त्यांनीही तसे केले असावे. फक्त नवीन असल्याने त्यांना ते सफाईने करणे जमले नाही. राजकारणात लोक यासाठीच तर येतात. मायावतींना घातलेला कोटींचा हार, जयललितांची संपत्ती, लालू.. यांना हात लावायची आहे हिम्मत? शेवटी भ्रष्टाचार आपल्या देशाचा अविभाज्य घटक आहे.
चलता है यार.. मेरा भारत महान. सारे जहांसे अच्छा १५ ऑगस्ट/२६ जानेवारीला न चुकता म्हणा. मिले सुरची नवीन आवृत्ती निघालीय म्हणे.
Comments
भारतीय वॉटरगेट
वरील प्रश्न खरेच प्रश्न आहेत का त्याची उत्तरे काय येतील (जर बाहेर आली तर) याची आम जनतेला कल्पना आहे?
फक्त या भारतीय वॉटरगेट मधे कोणा-कोणाचा बळी जातो हे पहायचे झाले
ऋषिकेश
------------------
भ्रष्टाचार संपविण्याचा सर्वोत्तम आणि सर्वात सोपा(?) उपाय म्हणजे त्यात स्वतः सहभागी न होणे
आम
आम जनता आयपीएल म्याच आणि त्यातील नाचणार्या सुंदर्या बघण्यात मग्न आहे. :)
रोज जशा नवीन भानगडी समोर येत आहेत, त्यामुळे वॉटरगेटशी तुलना अधिकाधिक रोचक होते आहे असे वाटते. वॉटरगेटप्रमाणे शोध प्रकरणाच्या मुळापर्यंत जाईल किंवा नाही हे सांगणे मात्र कठीण आहे.
---
"भाई बनना है तेरेको?" -- भिकू म्हात्रे
खरं आहे...!
>>आम जनता आयपीएल म्याच आणि त्यातील नाचणार्या सुंदर्या बघण्यात मग्न आहे. :)
सहमत आहे. अंतिम सामन्याच्या अगोदर लै भारी मनोरंजनाचा कार्यक्रम झाला.
'शशी थरूर: नवनवीन वादांचे अवखळ वारु' हा अनंत बागाईतकरांचा आजच्या लोकमतच्या 'मंथन' मधे चांगला लेख आहे. 'इंटेलेक्च्युअल' असलेल्या थरुरांच्या काही चांगल्या गोष्टीही आहेत. परराष्ट्रीय धोरणाच्या बाबतीत त्यांचा प्रबंध एक महत्त्वाचा दस्तऐवज मानला जातो. असो, 'मंथन' चा दुवा देता येत नाही वाटतं आता :(
-दिलीप बिरुटे
शशी थरूर
शशी थरूर गेल्याचे नक्कीच वाईट वाटले. तेही मोदीसारख्या टुकार माणसाच्या मोबदल्यात. राजकारणात सराईत नसल्यानेच या जगात कसे वागायचे याचे कौशल्य दाखविण्यात थरूर कमी पडले. आंतरराष्ट्रीय राजकारणाचा एक चांगला अभ्यासक मंत्रिमंडळात असायला हवा होता. अर्थात त्यांनीही स्वतःवर काही बंधने घालून घ्यायला हवीत. बाकी बीसीसीआयची चौकशी केल्यानंतर काय काय निघेल याचा अंदाज लावणेही मुश्किल व्हावे. तिथे असलेला पैस राजकारण्यांना खेचून आणत असावा दुसरे काय?
(भोचक)
रविवार पेठ नि कुठेही भेट !
हम्म!
असेच म्हणते.
अगदी!
बाकी,
राजकारणापेक्षा बॉलीवूडमध्ये थरूर अधिक शोभून दिसले असते असे माझे प्रामाणिक मत आहे.
वाईट वाटले नाही
मंत्री असूनही ट्विटरवर उथळपणे लेखन करणार्या थरूर यांच्या जाण्याचे दु:ख झाले नाही. इतके दिवस टिकून राहिले कसे हेच आश्चर्य वाटते.
राजकारण्यांपेक्षा टेक्नोक्रॅट लोकांनी राज्य करावे अशा समजुतींना असे धक्के बसले तर बरेच आहे.
असो. मोदींची गच्छंतीसुद्धा निश्चित दिसू लागली आहे.
नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)
ट्विटर लिहिणे हा कांही थरूर यांचा गुन्हा नाही
लालू यादवांनी ५ वर्षे खोटे रेल बजेट सादर केले .ही बाब नवीन रेलमंत्री ममता बनर्जीने स्पष्ट केले. हा प्रकार म्हणजे वराती मागून घोडे असा आहे. अर्थतज्ञ पंतप्रधान, नियोजन अध्यक्ष,असताना लालू सारखा घोटाळे बाज रेल्मंत्री ५ वर्ष खोटे रेल बजट मांडतो,पंतप्रधानास कांहीच समजत नाही आश्यर्य आहे. IPL चा तमाशा घोटाळा ४ वर्ष चालला तरी पंतप्रधान झोपलेले.याचा अर्थ या घोटाळ्यात सर्वच जन सामील आहेत
ट्विटर लिहिणे हा कांही थरूर यांचा गुन्हा नाही.तर मुहमे राम बगल मी छुरी अशी भारतीय नेत्याची करामत त्यांना जमली नाही. आज ५ वर्षा पासून हा घोटाळा चालू आहे आपल्या अर्थतज्ञ पंतप्रधान मनमोहनसिंग यांना समजले नाही का? एक म्हण आहे राजाच्या राणीचे चारित्र्य संशयातीत असले पाहिजे येथे तर राजाचेच चार्रीत्र्य संशयात आले आहे. यामुळे कांही होणार नाही. जनतेची महात्म्याने अहिंसेच्या नावाने केलेली नसबंदी यांच्या कामाला येईल . चार दिवसाने मांडवली झाली की सर्व गप्प
सहमत
१००% सहमत.
वाईट
मला वाईट वाटले नाही. माणूस बुद्धीमान, मात्र तोंडावर ताबा नाही.
शिवाय या प्रकरणात ते पूर्ण निर्दोष होते असे अजूनतरी सिद्ध झालेले नाही. सुनंदा यांना फुकट ७५ कोटींचे समभाग मिळतात, नंतर उघडकीला आल्यावर त्या ते परत करतात हे संशयास्पद नक्कीच आहे. पण आजकाल याचा धक्का बसत नाही. १००% स्वच्छ आहेत अशी खात्री आपण किती राजकारण्यांबद्दल देऊ शकतो? आत्ता तरी चिदंबरम आणि मनमोहम सिंग ही नावे समोर येतात पण उद्या त्यांचेही काही निघाले तर आश्चर्य वाटणार नाही. कदाचित थरूर यांची चूक ही की त्यांना हे सर्व मुरलेल्या राजकारण्यांप्रमाणे करता आले नाही.
---
"भाई बनना है तेरेको?" -- भिकू म्हात्रे
नाही
थरूर आणि मोदी यांच्या तुलनेत मोदी यांना टुकार म्हटले आहे खरे, पण कोणत्या संदर्भात? थरूर बुद्धिवंत आहेत आणि मोदी नाहीत, असे तर काही गृहितक नाही ना? मोदीही तितकेच हुशार आहेत, जितके थरूर आहेत. एकानं उघडपणे आपल्या बुद्धीचा धंदा केला, दुसऱ्यानं अंगभूत धंदेवाईकपणे तो छुपेपणाने केला इतकंच. दोघंही सारखेच. हां, मोदींसारखा थरुरांवर गुन्हा वगैरे नसेल. पण एक बरं आहे - मोदींवर गुन्हा नोंदवलेला आहे/होता हे ठाऊक असल्याने निदान ते काय चीज आहेत हे उघडपणे ठाऊक तरी आहे. थरूर यांचे काय? तिथं तर समोर आहे तो फक्त मुखवटाच. हे असले लोक अधिक महाग. उघड शत्रू परवडले म्हणतात तसं आहे हे.
बरे वाटले
तोंडावर सदा माजोरडेपणा वागवणारा व नेहमी तुसड्या प्रतिक्रिया देणारा शशी थरुर गेल्याचा फार आनंद झाला. त्या निमित्ताने मोदी व त्याच्या संप्रदायाची कुलंगडीही बाहेर येतील अशी आशा वाटते.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
हा हा ..
>> मिले सुरची नवीन आवृत्ती निघालीय म्हणे
पी.डी.एच.... ( पोट धरुन हसलो)
हिमनगाचे टोक
बिचारे थरूर हिमनगाचे टोक निघाले असे दिसते मात्र हेच टोक आता टायटॅनिक बुडवणार का?
बीसीसीआय ही तमिळनाडूमधील कायद्याखाली नोंद झालेली संघटना आहे! त्यामुळे कधीही त्यांना अडचण आली तर ते बैठक घेऊन अडचणीत आणणारा नियम बदलून टाकतात. :)
बीसीसीआयच्या नियमाप्रमाणे संघटनेतील अधिकार्यांना आयपीएल मध्ये समभाग घेता येत नाहीत पण २००८ मध्ये हा नियम बदलला. सध्या श्रीकांत आणि इतर काही अधिकार्याचे आयपीएल मध्ये समभाग आहेत.
याशिवाय (म्हणे) बेटींग, हवाला, काळा पैसा, फ्रँचायझींचे जगभर छोट्या कंपन्यांचे पसरलेले जाळे.. जितके खणाल तितके थोडेच.
सध्या म्याचपेक्षा हेच जास्त रोचक होते आहे. :)
---
"भाई बनना है तेरेको?" -- भिकू म्हात्रे
चिकणा व भोकणा
काही वाईट वाटले नाही. थरूर चिकणा गेला आहेच. आता मोदी भोकणाही जाईल. टीव्हीवरून ह्यावरच्या चर्चा कोणीतरी ब्यान करा रे!
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
आणीबाणी
टीव्हीवरून ह्यावरच्या चर्चा कोणीतरी ब्यान करा रे!
सहमत. गैरसोयीचे मुद्दे टाळण्यासाठी टीव्हीवर एखादा जनरल डायर किंवा आणीबाणीचा शासनकर्ता हवा बुवा! (ह.घ्या.)
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
क्षमस्व
प्रतिसाद उडालेला नाही. याच विषयावरील ठणठणपाल यांच्या लेखात आहे.
गोंधळाबद्दल क्षमस्व.
---
"भाई बनना है तेरेको?" -- भिकू म्हात्रे
भ्रष्टाचार
देशात भ्रष्टाचार किती पसरला आहे याची गणती करणे अशक्य आहे. मेडिकल काउन्सिलचे अध्यक्ष केतन देसाई यांच्या घरात १८०० कोटी कॅश सापडली. ज्याप्रमाणे प्रकाशवर्ष किंवा फेम्टोसेकंद म्हणजे नेमके किती याचे आकलन होत नाही त्याचप्रमाणे १८०० कोटी म्हणजे किती याचे आकलन करणे मला शक्य झाले नाही. मोबाइलमधील क्यालसीवर तर इतकी मोठी संख्या टंकताच येत नाही. :प्
शेवटी डोक्याची मंडई झाली तेव्हा हे गाणे बघत बसलो. बाकी गाणे सत्य परिस्थितीवर आधारले आहे.
जहां डाल डाल पर सोने की चिडीया करती है बसेरा.. देसाईंकडे दीड टन सोने सापडले.
---
"भाई बनना है तेरेको?" -- भिकू म्हात्रे
+१
सहमत आहे. याचा शोध घेण्यासाठी / गणतीसाठी समिती बसवली तर ते "आधार" (युआयडी चे नवे नाव) पेक्षा मोठे प्रोजेक्ट असेल
ऋषिकेश
------------------
भ्रष्टाचार संपविण्याचा सर्वोत्तम आणि सर्वात सोपा(?) उपाय म्हणजे त्यात स्वतः सहभागी न होणे
व्यंगचित्र
ह्यावर बनवलेले एक छानसे चित्र येथे देत आहे.