ऐतिहासीक पुणे
हुजूर् पागा-संतोष भुवन
नूमविच्या समोर असलेली हुजूरपागा ही पेशव्यांच्या काळात एक मोठी घोड्यांची पागाच होती. शे दोनशे घोडी तिथे असत. एक मोठा चौकही तिथे होता.
नूमविला लागुनच पूर्वी प्रसिध्द असलेला जॉन स्मॉल मेमोरियल हॉल होता. त्याकाळी शे दोनशे श्रोत्यांची सभा म्हणजे भरगच्च सभा समजली जात असे. अनेक मोठमोठ्या वक्त्यांची भाषणे या हॉलमध्ये झालेली आहेत.ख्रीश्चन मिशनर्यांचे ते एक कार्यालयही होते. काळाच्या ओघात सगळंच बदलले. सध्या इथे संतोष भुवन हे उपहारगृह् आहे.
लक्ष्मी रोड ओलांडला की लागलीच उजव्या हाताला मराठे दीक्षितांचा वाडा. हा जप्तीतील वाडा इंग्रजांनी त्यांना बक्षीस दिलेला होता.
विश्रामबाग वाडा
त्याला लागुनच नाना फडणिसांचे निवासस्थान. विश्रामबाग वाडा हा वाडा आजही आपली खुण जपून उभा आहे. तिथे आता जन्म=मृत्यू नोंदणी कार्यालय असले तरीही विश्रामबाग वाड्याचे त्यावेळचे वैभव त्याचा दरारा त्याकाळी वेगळाच होता. विश्रामबाग वाड्यासमोरच 'पुष्करणीचा हौद" हा प्रसिध्द हौद होता. पेशवाईतील एक न्यायाधीश टोकेकर जोशी यांनी हा हौद बांधला. हौदाला सुंदरशी नक्षी व कारंजीही होती. या हौदाला सदाशिव हौदातुन पाणी पुरवीण्यात येत असे.
नंतर ठोसरांचा वाडा लागतो. ठोसर हे दुसर्या बाजीरावांचे शिक्षक होते. त्यांना हा वाडा नाना फडणिसांनी बक्षीस दिला होता. नंतर दिवाणबहादुर गोडबोले यांचा वाडा- या गोडबोलेंच्या वंशजांनी 'पूना गैझेटर' या जुन्या वृत्तपत्रातुन पुण्याचा इतिहास लिहिला आहे. हे गोडबोले बंधु त्यावेळी फार प्रसिध्द होते.
नातुबाग आणि पर्वती
आताची नातूबाग ही नाना फडणिसांची बागच होती. त्याला 'काळेवावर' म्हणत. या बागेत वाडाही होता. पण नाना मोठे हौशी आणि दर्दी. ही बाग म्हणजे त्यांच्या रसिकतेचे एक मुर्तिमंत प्रतीक होती. यापुढे एकदम पर्वती ही एकच ऐतिहासीक दृष्ट्या महत्वाची जागा. आता वाटेत हौसिंग सोसायट्या वगैरे झाल्यात. पण पुर्वी तिथे गवताशिवाय काहीच नव्हते.
पेशवे आणि त्यानंतरच्या काळातील काही लक्षणीय वास्तुंची ही आठवण पुणेकरांना या सर्व आता पहायलाही मिळणार नाहीत. प्रत्येक वास्तुने आता नवं आधुनीक स्वरूप प्राप्त केलंय. पण तरीही या भागात पेशव्यांच्या काळात बड्या व्यक्ती राहात, वावरत होत्या या गोष्टीला आजही एक वेगळे महत्त्व आहे.
Comments
हे वाडे वगैरे
हे वाडे होते/ आहेत ते सध्या वापरांत आहेत काय? (जी यादी दिली आहे त्यावरून इतकी विस्तिर्ण जागा ऐतिहासिक म्हणून मोकळी नसावी असे वाटते.) आपण दिलेल्या माहिती सोबत वाड्यांची सद्यस्थिती, त्यांचा आता होणारा वापर आणि फोटो मिळाले असते तर आणखी बहार आली असती.
बाकी, लेख आवडला.
+१
अगदी हेच म्हणतो.
यावरुन ठोसरपागा आठवले.
ठोसरपागा
आता येथे प्रेते पुरण्याची जागा आहे. हा बदल कधी आणि कसा झाला असावा?
सन्जोप राव
इलाही ये तूफान है किस बला का
के हाथोंसे छूटा है दामन हया का
धन्यवाद
विकीपीडियावरून फोटो साभार येथे. विश्रामबाग वाड्याचा खाली जो भाग दिसतो आहे त्याच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला असलेल्या खोल्यांमध्ये महिला किंवा ग्रामीण उद्योगातून तयार केलेल्या वस्तू विकतात. काही भाग सरकारी कार्यालयांसाठी वापरला जातो असेही वाटते.
http://commons.wikimedia.org/wiki/File:Vishrambag_Wada_Pune.JPG
नातूबाग मला वाटते पूर्वीच्या काळची खूप मोठी जागा असावी. सध्या राजा केळकर संग्रहालयाचा पत्ता नातूबाग म्हणून दिला जातो.