उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
उपक्रम गंभीर होते आहे.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
April 30, 2007 - 2:38 pm
नमस्कार,
काही दिवसापासून उपक्रम वर माहितीची जी जोरदार देवाण घेवाण चालू आहे.ती पाहता उपक्रम जरा गंभीर वाटते आहे.का हेच सर्वांना अपेक्षीत आहे.?ज्या दिशेने आपण सर्व जात आहोत ते योग्यच आहे.असे म्हणण्याचे धाडस मी करणार नाही.त्याचे कारण असे की,जो तो आप-आपल्या आवडत्या विषयावर लिहितो आहे, परंतु अजूनही उपक्रम वर बरंच काही यायचं आहे,जसे की,विनोदी लेख,काही विरंगुळा,साधना कोळीन सारखा लेख,किंवा मरणा काय तुझा तेगार,असं अजून काही वेगळेपण दिसत नाही .का मी निष्कर्षावर येण्याची घाई केली आहे ?आपणास काय वाटते ?
दुवे:
Comments
व्यासन्ग
ईथे व्यासन्गी लोक जास्त दिस्तात.
हेच् अपेक्षित आहे असे वाटते...
काही मनोरंजक, विरंगुळा म्हणून असे लिहिले की ते उपक्रमच्या धोरणात बसत नाही म्हणून कटाप केले जाते. उपक्रमला रुक्ष आणि कोरडेच् लेखन अपेक्षित आहे असे वाटते.
ऐहिक
सहमत..
काही मनोरंजक, विरंगुळा म्हणून असे लिहिले की ते उपक्रमच्या धोरणात बसत नाही म्हणून कटाप केले जाते. उपक्रमला रुक्ष आणि कोरडेच् लेखन अपेक्षित आहे असे वाटते.
ऐहिकरावांशी सहमत आहे!
तात्या.
इथे आम्ही काहीही बरळतो - http://tatya7.blogspot.com/
प्राध्यापक साहेब
अशी घाई का करता म्हणतो मी? तुम्ही उपक्रमाचे निकष वाचले नाहीत वाटते? साधना कोळीण, मरणा काय तुझा तेगार वाचायला मनोगत आहे.
(मजकूर संपादित)
-राजीव.
काय् गरज्?
हा अभ्यास करायची काय गरज? जे जसे आहे तसे स्वीकारयला जमत नाही का? जरा स्पष्टच बोललो. पण उगाच वादग्रस्त विषय सुरु करायची गरज काय?
लोणचे आणि चिक्की
काही दिवसापासून उपक्रम वर माहितीची जी जोरदार देवाण घेवाण चालू आहे.
जोरदार नव्हे. महाजालावर फेरफटका मारल्यास जोरदार कशाला म्हणावे ते आपणास कळेल.
ती पाहता उपक्रम जरा गंभीर वाटते आहे.
हो हो. गंभीर वाटते, पण ही बाब मात्र गंभीर नाही. :)
का हेच सर्वांना अपेक्षीत आहे.?
माझे मत -
मला कोणत्याही संकेतस्थळाकडून काही ठरावीक अशा अपेक्षा नाहीत. केप्र वाल्यांनी शेंगदाणा चिक्की बनवावी आणि मगनलाल ने कैरी,लिंबू,मिरची लोणचे बनवावे अशी अपेक्षा मी ठेवत नाही. माझा मतलब दोन्ही गोष्टी त्यांच्या स्वादाला जागतात तो पर्यंत त्यांचा अस्वाद घेणे इतकाच आहे. ( ही वाक्ये रूपकात्मक आहेत, केप्र आणि मगनलाल चिक्कीवाले ह्यांच्याशी माझे कोणतेही व्यावसायिक संबंध नाहीत ;))
ज्या दिशेने आपण सर्व जात आहोत ते योग्यच आहे.असे म्हणण्याचे धाडस मी करणार नाही.त्याचे कारण असे की,जो तो आप-आपल्या आवडत्या विषयावर लिहितो आहे, परंतु अजूनही उपक्रम वर बरंच काही यायचं आहे,जसे की,विनोदी लेख,काही विरंगुळा,साधना कोळीन सारखा लेख,किंवा मरणा काय तुझा तेगार,असं अजून काही वेगळेपण दिसत नाही .का मी निष्कर्षावर येण्याची घाई केली आहे ?आपणास काय वाटते ?
निष्कर्ष काढायची गरज आहे असे मला तरी वाटत नाही. स्पष्टच लिहायचे झाल्यास मनोगत, मायबोली, माझे शब्द वर जे लिखाण आहे ते, मराठीगझल, सुरेशभट.इन् वर जे काव्य आहे ते आणि या सगळ्या ठि़काणी लिहिणार्यांच्या ब्लॉग्सवरील लेख या सर्वांसाठी उपक्रम हे वन स्टॉप सोल्युशन नसल्याने प्रत्येक गोष्ट उपक्रमावर असलीच/दिसलीच पाहिजे असे म्हणणे अट्टाहास ठरेल.
(मराठी संकेतस्थळे - काल, आज आणि उद्या या विषयाला वाहिलेले मराठी संकेतस्थळ काढायला हरकत नाही. ;))
लेखनविषयक मार्गदर्शन
ह्या विषयावरची चर्चा वाचली, बरीच भितीदायक वाटली. (मी ईतर कुठल्याही मराठी साईट वर सभासद नाही, हा पहिलाच प्रयत्न होता, पण आता भिती वाटतिये !!!)
सहज म्हणून लेखनविषयक मार्गदर्शन पाहिले -
"या संकेतस्थळावर प्राधान्याने माहितीप्रधान लेखन आणि चर्चा व्हावी हा उद्देश आहे. "
"प्राधान्याने माहितीप्रधान लेख, चर्चा आणि सध्या असलेल्या (आणि भविष्यात येणाऱ्या) समुदायांच्या अंतर्गत होणारे लेखन असे या संकेतस्थळाचे स्वरूप टिकून राहण्यासाठी इतर लेखनप्रकार जसे की स्वरचित कविता, ललित स्वरूपाचे लेखन इ. इथे होणे अपेक्षित नाही. आपल्याकडून ह्या उद्दिष्टांना सुसंगत असेच लेखन होईल याची काळजी प्रत्येक सदस्याने घेणे अपेक्षित आहे. "
माझा काही हलक्या-फुलक्या लिखाणाला विरोध नाही, पण तो कदाचित ह्या संकेतस्थळाचा "मुख्य" उद्देश नाही . अर्थात, ह्याला विरोधही नाही दिसत. हलके-फुलके लिखाण होतच आहे येथे .
काय वाटते?
यथावकाश.
माझा काही हलक्या-फुलक्या लिखाणाला विरोध नाही, पण तो कदाचित ह्या संकेतस्थळाचा "मुख्य" उद्देश नाही . अर्थात, ह्याला विरोधही नाही दिसत. हलके-फुलके लिखाण होतच आहे येथे .
सहमत आहे. माझ्या मते उपक्रमावरही स्वरचित ललित लेखनाला आणि काव्य लेखनाला यथावकाश मुभा मिळेल असे वाटते. सभासदांनी थोडे सबुरीने घेतले पाहिजे असे मला वाटते.
कोणतेही संकेतस्थळ सुरू करतांना त्याच्या चालकांची काही एक प्राधान्ये ठरलेली असतात आणि ते संकेतस्थळ त्याचप्रमाणे चालावे असे जर त्याच्या चालकांना वाटले तर ते योग्यच आहे. उपक्रम हे तसे नवीनच संकेतस्थळ आहे. हळूहळू त्या त्या समुदाया अंतर्गत ते ते लेखन प्रकाशित करण्याची परवानगी येथेही दिली जाईल असे वाटते.
माधवी.
आभारी आहे...
'थोरामोठ्यांच्या सहवासात...' या माझ्या 'मनोगत्' वर प्रसिद्ध झालेल्या लेखाचा दुवा इथे दिल्याबद्दल मी राजीव ८२ यांचा आभारी आहे. तसेच हे विडंबन आवडले असे लिहिणार्या सर्वांचाही. (हे मी प्रथम उपक्रमच्या हवाली केले होते, पण् ते इथल्या धोरणात बसत नसल्याने इथे प्रसिद्ध् झाले नाही)
ऐहिक
उपक्रम गंभीर होते आहे - माझं मत!
ज्यांना निरनिराळ्या विषयावरच्या माहिती आणि विचारांच्या देवाणघेवाणीमध्ये रस आहे, त्यांच्याकरता उपक्रम हे नक्कीच 'काम की चीज है' असे वाटते.
माझ्यासारख्या मंडळींना, ज्यांना फक्त ललितलेखन, काव्य, हलकेफुलके विनोद, टाईमपास, इतर सभासदांच्या उखाळ्यापाखाळ्या, यात आणि फक्त यातच रस आहे, अश्या मंडळींकरता उपक्रम हे कदाचित गंभीर आणि बोअरिंग होत असावे, असे वाटते!
असो! उपक्रमच्या सध्याच्या ध्येयधोरणांचा एक उपक्रमी म्हणून मलाही आदरच आहे.**
आपला,
(टवाळ!) तात्या.
**(तात्या, मेल्या आदर न करून सांगशील कुणाला? ;)
इथे आम्ही काहीही बरळतो - http://tatya7.blogspot.com/
उपक्रमावरील शीर्षक ओळ आणि संकेतस्थळाचा उद्देश
नमस्कार,
मी उपक्रमावर नवीन आहे. या संकेतस्थळावरील पहिल्या शीर्षक ओळीचा म्हणजे "जरि उद्धरणी व्यय न तिच्या हो साचा हा व्यर्थ भार विद्येचा!" या ओळीचा नक्की उद्देश काय आहे?
याबाबतीत मला आलेल्या शंका-
१) कवितेतील मधलीच ओळ वर लिहिण्याचे काय प्रयोजन? लिहायचे तर संदर्भासकट पूर्ण कडवं तरी मांडावे.
२) या ओळीत जो विचार आहे, तो विचार आणि उपक्रम या संकेतस्थळाचा उद्देश यांचा काही संबंध आहे का?
३) या संकेतस्थळावर कवितांना किंवा ललित लेखनाला बंदी असल्यामुळे ही ओळ मला जास्त खटकते.
४) खरा मुद्दा असा आहे की इथे कविता किंवा ललित लेखनाला बंदी का आहे? तसे करणे योग्य आहे का, ही संपादकांची भूमिका तुम्हाला पटते का? कारण "या संकेतस्थळावर प्राधान्याने माहितीप्रधान लेखन आणि चर्चा व्हावी हा उद्देश आहे" अशी संपादकांची भूमिका आहे, पण कविता माहितीप्रधान असू शकत नाही का? शिवाय विनोद, मनोरंजन, विरंगुळा हे विषय खुले आहेतच की.
कृपया आपले मत मांडावे.
हा चर्चाप्रस्ताव जुन्या चर्चेत समाविष्ट केला आहे याची कृपया नोंद घ्यावी -संपादन मंडळ.
काही उत्तरे
उत्तर येथे मिळेल. सोप्या शब्दांत "आपल्याकडील विद्येचा उपयोग इतरांच्या उद्धारासाठी होत नसल्यास तिचा भार वाहणे व्यर्थ आहे." तेव्हा आपल्याकडील माहिती इतरांना पुरवणे हा उपक्रमाचा उद्देश आहे.
ती उपक्रमाची टॅगलाइन समजावी. टॅगलाइन ही बहुतेक करून शॉर्ट आणि स्वीट असते तशी सदर ओळ आहे. एखाद्याला पूर्ण कडवं हवं होईल तर दुसर्याला संपूर्ण कविता. त्यापेक्षा, जे आहे ते बरे आहे.
हो. उपक्रमाची धोरणे वाचल्यास अधिक माहिती कळेल.
उपक्रमावर स्वरचित कवितांना आणि ललित लेखनाला बंदी आहे. कवितांच्या रसग्रहणाला, ललित लेखनाच्या परीक्षणांना वगैरे नाही. ओळ खटकणे किंवा न खटकणे हे वैयक्तिक आहे.
तसे उपक्रमाचे धोरण आहे. हे संकेतस्थळ ललित लेखनासाठी नाही.
भूमिका पटते पण ती संपादकांची भूमिका नसून संकेतस्थळाची भूमिका आहे. कृपया, फरक समजावून घेणे.
कविता आणि ललित लेखन माहितीप्रधान असू शकते परंतु ते येथे प्रकाशित व्हावे हे उपक्रमाचे उद्दिष्ट नाही. त्यासाठी आंतरजालावर मायबोली, मनोगत, मिसळपाव, मी मराठी, ऐलपैल, ऐसीअक्षरे आणि इतर बरीच संकेतस्थळे आहेत. त्यांचीही काही धोरणे असतातच पण ती लेखनप्रकारांविषयी शिथिल आहेत. उपक्रम त्या मांदियाळीत वेगळे आहे. मी पुस्तकविश्व या संकेतस्थळावर सहसा नसते परंतु तेथेही स्वरचित कविता किंवा कथा असू नये असे धोरण असेल तर मला त्यात गैर वाटणार नाही कारण ते त्या स्थळाचे उद्दिष्ट नाही.
अधिक माहिती येथे आहे.
अवांतरः शूरशिपाई यांचा सदस्य क्र. ३९३० आहे. अशाप्रकारे उपक्रमावरील प्रत्येक सदस्याने संकेतस्थळावर काय चालते, काय नाही याची चर्चा करत बसले तर कठीण परिस्थिती होईल. त्यापेक्षा काही जुन्या सदस्यांकडे विचारणा करणे किंवा जुन्या लेखांची शोधाशोध करणे अधिक उपयुक्त ठरेल.
धन्यवाद
माझा मराठी संकेतस्थळावर येण्याचा उद्देश विरंगुळा हाच आहे. मग मी इतर संकेतस्थळे बघतो.
कारण माहितीपूर्ण लिखाण करण्या इतका वेळ माझ्याकडे नाही आणि नुसते वाचायचे ठरवले तर पाहिजे ती माहिती मिळेल याची खात्री नाही शिवाय माहिती हवी असेल तर जालावर मिळतेच.
धन्यवाद.