आकड्यांच्या गमतीजमती

अ) बहुतेकांना माहीत असलेला गणिती संबंध :
(३)चा वर्ग + (४)चा वर्ग = (५)चा वर्ग

ब) फारसा माहीत नसलेला गणिती संबंध :
(३)चा घन + (४)चा घन + (५)चा घन = (६)चा घन

क) एकाच्या गमती
(१) चा वर्ग १
(११) चा वर्ग १२१
(१११) चा वर्ग १२३२१
(११११) चा वर्ग १२३४३२१
............................
.............................
(१११११११११) चा वर्ग १२३४५६७८९८७६५४३२१

ड) पाचव्या घाताचे वैशिष्ट्य
(१) चा ५वा घात
(२) चा ५वा घात ३
(३) चा ५वा घात २४
(४) चा ५वा घात १०२
(५) चा ५वा घात ३१२
(६) चा ५वा घात ७७७
(७) चा ५वा घात १६८०
(८) चा ५वा घात ३२७६
(९) चा ५वा घात ५९०४
(१०) चा ५वा घात १००००
यावरून काय दिसते? संख्येचा एकंस्थानचा अंक व तिच्या पाचव्या घाताचा एकंस्थानचा अंक सारखे असतात.

लेखनविषय: दुवे:

Comments

वा!

वा कोर्डे साहेब,

गणिती गंमती मजेशीर वाटल्या. (मजकूर संपादित)

आपला,
रँगलर अभ्यंकर.

इथे आम्ही काहीही बरळतो - http://tatya7.blogspot.com/

घातपंचमी

श्री. शरद कोर्डे याच्या "पाचव्या घाताची वैशिष्टे " यावर आधारित एक कोडे.

.........."मी एका संख्येचा घात केला."
.........."अरेरे !"
.........."अरेरे म्हणण्याचे कारण नाही. हे गणित आहे. इथे तुमच्या बाष्कळ कोट्या नकोत. कधी कधी सं ख्यासुद्धा आपला घात करतात."
.........."ते कसे?"
.........."पाढे म्हणणारी आपली मुलगी जेव्हा विचारते 'बाबा, सत्तावीस नव्वे किती?' तेव्हा"अरेरे घात झाला.'असा विचार आपल्या मनात येतो.(आपल्या जागी दिगम्भा असले तर ते त्या संख्येच्या नावाने बोटे मोडून लगेच उत्तर देतील .पण आपल्याला तसे जमणार नाही."
****असो हे विषयांतर झाले.
........." मी एका संख्येचा पंचम घात केला.तो सहा अंकी असून त्याच्या एकक स्थानी ४ हा अंक आहे.तर मी कोणत्या संख्येचा पाचवा घात केला?"
........"एवढ्याच माहिती वरून ती संख्या सांगता येईल?"
........."हो.थोड्या विचारान्ती सहज शक्य आहे."

१४??

१४*१४*१४*१४*१४ = ५३७८२४

आपला,
(गणितात ठार कच्चा!) तात्या.

संत तात्याबा गमभन वापरतात!

१४ ??

श्री.तात्यासाहेब यांस,
स . न. वि.वि.
हो. १४च.आपले उत्तर अगदी अचूक आहे. गणित विषयात रस घेऊन आपण कोडे सोडविले . आपल्या या प्रतिसादामुळे आनंद झाला.
कळावे.
आपला ,
(आनंदित) यनावाला.

मस्त

ही माहिती वाचून करमणूक झाली.

अजून काही गमतीजमती

१ x ८ = ८ (० + ८ = )
२ x ८ = १६ (१ + ६ = )
३ x ८ = २४ (२ + ४ = )
४ x ८ = ३२ (३+ २ = )
५ x ८ = ४० (४ + ० = )

अशा प्रकारे बेरिज नेहेमीच १ ते ९ अशी येत राहिल. कितिही आकड्यापर्यन्त !!

६ x २ = १२ (१ + २ = ३)
६ x ३ = १८ (१ + ८ = ९)
६ x ४ = २४ (२ + ४ = ६)

६ x ५ = ३० (३ + ० = ३)
६ x ६ = ३६ (३ + ६ = ९)
६ x ७ = ४२ (४ + २ = ६)

हा ३, ९, ६ चा सन्च असाच पुढे सुरु राहिल. कितिही आकड्यापर्यन्त !!

मस्त!

गणिती गंमतीजमती मस्त आहेत. आवडाबाईंनीही छान उदाहरणे दिली आहेत.

ईश्वरी.

उत्तम !

शरद कोर्डे आणि आवडाबाई यांनी मांडलेल्या गमती जमती उत्तमच ! यातुन गणिता विषयी आवड निर्माण होण्यास मदतच होते. दोघांचे कौतुक !

९ चा पाढा

९ x १ = ९
९ x २ = १८
९ x ३ = २७
९ x ४ = ३६
९ x ५ = ४५
९ x ६ = ५४
९ x ७ = ६३
९ x ८ = ७२
९ x ९ = ८१

सर्व गुणाकारांची बेरीज ९च् येते. शिवाय ० ते ९ आकडे चढत्या व उतरत्या क्रमाने अनुक्रमे दशक व एकक स्थानी दिसून येतात.

पल्लवी :)

धन्यवाद

सर्व गुणाकारांची बेरीज ९च् येते.
हे लक्शात होते.

शिवाय ० ते ९ आकडे चढत्या व उतरत्या क्रमाने अनुक्रमे दशक व एकक स्थानी दिसून येतात.
हे विसरले होते. thanks for the reminder

गंमत

ही नऊची कसोटी आहे आणि ती नवाच्या पाढ्यापुरतीच मर्यादित नसून ९च्या पटीतील सर्व आकड्यांना लागू आहे.

९ * ०१ = ००९
९ * ०२ = ०१८
९ * ०३ = ०२७
९ * ०४ = ०३६
९ * ०५ = ०४५
९ * ०६ = ०५४
९ * ०७ = ०६३
९ * ०८ = ०७२
९ * ०९ = ०८१
९ * १० = ०९०
९ * ११ = ०९९
९ * १२ = १०८
९ *१३ = ११७
९ * १४ = १२६
९ * १५ = १३५
९ * १६ = १४४
९ * १७ = १५३
९ * १८ = १६२
९ * १९ = १७१
९ * २० = १८०
९ * २१ = १८९
९ * २२ = १९८
....

बघा.. येतेय ना बेरीज ९ आणि साधतेय ना ०-९ आकड्यांची चढती-उतरती भाजणी?

- वेदश्री.

अंकमूळ

आवडाबाई, पल्लवी. वेदश्री यांनी संख्येतील अंकबेरजे विषयी लिहिले आहे. त्याचे व्यापक रूप म्हणजे अंकमूळ(डिजिटल रूट )ही संकल्पना. अंकमूळा संबंधी लिहिण्यापूर्वी एका गोष्टीचा निर्देश करणे आवश्यक आहे.व्यवहारात आपण संख्येसाठी आकडा हा शब्द सुद्धा वापरतो.(जसे छतीसाचा आकडा) . पण 'आकडा' ही गणिती संज्ञा नाही. गणितात 'अंक 'शब्दच वापरला पाहिजे.श्री शरद कोर्डे यांनी हाच शब्द वापरला आहे. तोच योग्य आहे.
गणितातील दशमान पद्धतीत (१,२,३,४,५,६,७,८,९,०,)हे दहा अंक आहेत.अन्य कोणताही अंक नाही. हे अंक वापरून कोणतीही परिमेय संख्या (रॅशनल नंबर) लिहिता येते. कंसात लिहिलेल्या अंकखुणा एक अंकी संख्याही आहेत. ७३८
' ही तीन अंकी अंकी संख्या आहे.इथे ७ हा शतकांक आहे. त्याची स्थानिक किंमत ७०० आहे.
तसेच गणिता विषयी लिहिताना प्रत्येक विधान स्पष्ट आणि नि:संदिग्ध असावे.तुम्ही म्हणाल "कटकट कसली करता? आम्ही लिहू काय ते!" ठीक आहे. लिहा. लिहायलाच हवे. मी आपले माझे मत नोंदविले इतकेच. आता एक कोडे.
***येरे घना येरे घना
खालील पाच संख्यांतील एकच संक्या पूर्णघन आहे.ती कोणती ते ओळखा. तिचे घनमूळ काढा. कोडे तोंडी सोडवायचे आहे.कॅल्सी किंवा अन्य कोणतेही साधन वापरायचे नाही. अंकमूळाचे सोपे नियम महिती असतील तर सोडवता येईल.
७२१४२५
५६६१३२
४१२५६४
१४८८७७
३३९१०८

आता अंकमूळाविषयी.
अंकमूळ: संख्येचे अंकमूळ कसे काढावे? संख्येतील सर्व अंकांची बेरीज करावी.ती एक अंकी आली तर तेच अंकमूळ .बेरीज एक अंकी नसेल तर बेरजेतील सर्व अंकांची बेरीज करावी.असे एक अंकी संख्या मिळे पर्यंत करावे.शेवटी एक अंकी संख्या मिळेल तेच अंकमूळ.इथे ९ ला शून्य मानतात. म्हणजे कोणत्याही संख्येचे अंकमूळ (०,१,२,३,४,५,६,७,८,) यांपैकीच असते.
संख्येचे अंकमूळ काढणे अगदी सोपे असते. संख्येतील ९ हाअंक सोडूनच द्यायचा.तसेच बेरीज करता करता दोन अंकी आली की त्या दोन अंकांची बेरीज करून घ्यायची. जसे;८५९७३६२ चे अंकमूळ ? इथे नऊ,सात दोन ९,सहा आणितीन नऊ घ्यायलाच नको.उरलेले ८+५=१३-->१+३=४ हेच अंकमूळ.
मंकमूळा संबंधी अनेक नियम आहेत्. त्याटील काही :
** दोन अथवा अधिक पूर्णांकी संख्याचा गुणाकार केला तर त्या गुणाकाराचे अंकमूळ हे त्या संख्यांचा अंकमूळांच्या
गुणाकाराच्या अंकमूळाएवढे असते.
** बेरजे साठी असाच नियम आहे.
**कोणत्याही पूर्णवर्ग संख्येचे अंकमूळ ( ०,१,४,७) यांपैकीच असते.
**पूर्णघन संख्येचे अंकमूळ (०,१,८)याअंपैकीच असते.

आता तुम्ही वरील कोडे तोंडी सोडवू शकाल.

९?

यनावालाजी,

नजरचुकीने ९ राहून गेला का?

३ चा वर्ग = ९ अंकमूळ ९
९ चा वर्ग = ८१ अंकमूळ ९
३ चा घन = २७ अंकमूळ ९
९ चा घन = ७२९ अंकमूळ ९

- दिगम्भा

अंकमूळ

श्री.दिगम्भा यांसी, सप्रेम नमस्कार.
अंकमूळ काढताना ९ आले की शून्य धरायचे. विवेचनात मी तसे लिहिले आहे. तेव्हा अंकमूळाच्या संदर्भात ९ म्हणजे शून्य.आता कोणत्याही संख्येला ९ ने गुणले असता गुणाकाचे अंकमूळ शून्य (म्ह. ९) का येते ते स्पष्ट होते.कारण "गुणाकाराचे अंकमूळ= गुण्य गुणकांच्या अंकमूळांच्या गुणाकाराचे अंकमूळ" .
...........यनावाला

फरक पडत नाही

अंकमूळ काढतांना करण्याच्या बेरजेंत ९ हा अंक घेतला किंवा नाही घेतला तरी अंकमूळांत काही फरक पडत नाही. उदा. १४९ चे अंकमूळ काढतांना अंकांच्या बेरजेंत ९ घेतल्यास बेरीज १४ येते जिच्या अंकांची बेरीज ५ येते. ९ न घेताही बेरीज ५ येते. म्हणजे अंकमूळांत फरक पडत नाही. येथे ९ मिळवणे म्हणजे ० मिळवल्यासारखेच आहे.

वाह !

वाह ! इकडे तर मस्तच माहिती मिळतेय की. अंकमूळ आणि ९=० हे मस्तच आहे गौडबंगाल.. आवड्या !

आता आणखीन काहितरी मजा काढायला हवी अशी माहिती मिळवण्यासाठी. :-)

वेदश्री.

मस्त

अंकमूळ आवडले. घनमुळाचे उत्तर ५३.

१४८८७७

१४८८७७ घन आहे. (५३ चा). १+८=०,७+७+४=०, अंकमूळ ८, म्हणून १४८८७७ घन आहे. पद्धत आवडली!

'तो 'मराठी विकिपीडिया चा सदस्य आहे.

अंक !!

आकडा आणि अंक ह्यातला फरक कळला (खरं तर फरक आहे, हेच आत्ता कळलं)
धन्यवाद

सही

सही माहिती मिळाली - उत्तर १४८८७७ !!

अंकमूळ????????

अनिरुद्ध दातार
मुळात अंकमूळ म्हणजे काय? एखाद्या संख्येचे root काढणे म्हणजे त्याचे अंकमूळ काढणे का? अंकमुळासाठी इंग्रजी शब्द जरी सांगितलात तरी बराच अर्थबोध् होईल.
आपला,
(काहीसा इंग्रजीकडे झुकलेला) अनिरुद्ध दातार

नाइन्स रिमेंडर्

यनावालाजींनी दिलेल्या प्रक्रियेतून जो अंक (< ९) मिळतो तो त्या संख्येला नवाने भागल्यावर जी बाकी उरेल तितका असतो. म्हणून त्याला इंग्रजीत नाइन्स रिमेंडर् असे नाव आहे.
अर्थात् हे मला माहीत असलेले नाव, आणखी नावे असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
- दिगम्भा

१२३४५६७९ आणि १२३४५६७८९

१२३४५६७९ * ०९ = १११११११११
१२३४५६७९ * १८ = २२२२२२२२२
१२३४५६७९* २७ = ३३३३३३३३३
१२३४५६७९ * ३६ = ४४४४४४४४४
...

१२३४५६७८९ * ०९ + १० = ११११११११११
१२३४५६७८९ * १८ + २० = २२२२२२२२२२
....

- वेदश्री.

हाताच्या बोटांवर नवाने गुणाकार

शंभरांपैकी जवळजवळ अर्ध्या अंकांना हाताच्या बोटांचा उपयोग करून नवाने गुणता येते, कसे ते खाली पहा -
समजा आपल्याला १८ गुणिले ९ = किती ते हवे आहे.
१. दोन्ही हात समोर पसरून धरा. आता आपल्याला १० बोटे दिसत आहेत.
२. १८ मधील शेवटचा/एकंस्थानचा अंक ८. म्हणून आता आठवे बोट मुडपून धरा. म्हणजे आपल्याला डावीकडे ७ बोटे तर उजवीकडे २ बोटे दिसत आहेत.
३. आता दहंस्थानचा अंक १. म्हणून डावीकडच्या ७ बोटांपैकी १ बोट थोडे विलग करून धरा, यामुळे डावीकडील बोटांचे दोन गट झाले. एका गटात १च बोट तर दुसर्‍या गटात उरलेली ६ बोटे.
४. आता जणू काही आपण ३ आकडी संख्या वाचतो आहोत अशा प्रकारे वाचा - काय दिसते आहे? १, ६ आणि २. म्हणजे १८ * ९ याचे उत्तर आले १६२, बरोबर?

या रीतीने पुष्कळशा एक किंवा दोन आकडी संख्यांना नवाने गुणता येते. कित्येकांना अशा प्रकारे गुणता येतही नाही - त्यांना सोडून द्या.
जेवढे मिळते आहे तेवढे पदरात पाडून घ्यावे, कसें?

- दिगम्भा

युक्ती

युक्ती आवडली. कोणाला गुणता येते नि कोणाला नाही हे कसे कळणार?

एकंस्थानचा अंक दहंस्थानच्या अंकापेक्षा मोठा असेल तरच शक्य

असते ही बोटांवर गुणण्याची पद्धत.
हे आपोआपच व स्वतःलासुद्धा कळू शकते.
एकदा एकं-अंकाचे बोट मुडपले की डाव्या बाजूला निदान दहं-अंकाइतकीतरी बोटे शिल्लक असायला हवीत, तरच जमेल ना?
हेच आणखी स्पष्ट करायचं तर १ ते ९, १२ ते १९, २३ ते २९, ३४ ते ३९, इ. ना गुणता येईल.
१० ते ११, २० ते २२, ३० ते ३३, इ. ना येणार नाही.
[योगाभ्यासप्रवीण व्यक्तींनी हाता-पायाची एकूण २० बोटे शेजारी-शेजारी धरून प्रयत्न करून पहावा, जमण्याची दाट शक्यता आहे. पण जपून, काही दुखापत झाल्यास मी जबाबदार नाही बरं! ;) ]
(बोटे शिल्लक नसतील तेव्हा ० गृहीत धरायचे असते हेही ध्यानी असूद्या. उदा. २३ * ९ = २०७)

- दिगम्भा

खत्तरी

खत्तरी ! मस्तच आहे की ही ( योगाभ्यास नसल्याने किमान माझ्यासाठी तरी ) दहाबोटी नऊगुण्या पद्धत ! डिस्क्लेमर वाचून हहपुवा... येऊ द्या आणखीन युक्त्या, दिगम्भा.

मी तरी नवाने गुणायचं म्हटलं की ती संख्या * १० - ती संख्या असं करायचे.
१९ नव्वे, २९ नव्वे वगैरे अडचणीत गाठणार्‍यांना मी २० नव्वे - ९ आणि ३० नव्वे - ९ असं करून सोडवून घ्यायचे.
पाढे हळूहळू म्हणायचे म्हणजे मग ही मनोमनची आकडेमोड इतरांच्या लक्षात यायची नाही आणि सर्वांना आश्चर्य वाटायचं की मी कुठे अडकत कशी नाहिये ते. :-)

- वेदश्री.

उत्तर चुकते हो..

१८ x ९ यात तुम्ही फक्त १ आणि ८ चा (एकंस्थान आणि दहंस्थानचा) उपयोग केलात.
९ च्या जागी ईतर कोणतीही संख्या धरली तरी तुमच्या बोटाच्या हिशोबी १६२च येणार.
उदा. १८ x ६ = १६२, १८ x ३=१६२. उत्तर चुकते.

हेमंत

४ अंक चारवेळेस + गणिती क्रिया = ० ते ९ !

४ हा अंक चार वेळेस कुठल्याही उपलब्ध गणिती क्रियांसोबत योजून ० ते ९ अंक मिळवून दाखवा. ४ हा अंक् चारवेळा वापरणे जरूरी आहे. त्यामुळे

४ / ४ = १ असा युक्तिवाद चालणार नाही.

योग्य उत्तरातील एक छोटासा भाग असा असू शकतो -

४ + ४ - ४ - ४ = ०

किती प्रकारची उत्तरं मिळतात बघुया. :-)

- वेदश्री.

"अ" अंक तीन वेळेस + गणिती क्रिया = ० ते ९ !

"अ" ("अ" च्या जागी १ ते ९ पैकी कोणताही अंक घातल्यावर उत्तर बरोबर आले पाहिजे) हा अंक तीन वेळेस कुठल्याही उपलब्ध गणिती क्रियांसोबत योजून ० ते ९ अंक मिळवून दाखवा. हा अंक तीन वेळा वापरणे जरूरी आहे. त्यामुळे

अ /अ = १ असा युक्तिवाद चालणार नाही.

योग्य उत्तरातील एक छोटासा भाग असा असू शकतो -

(अ - अ) / अ = ०

किती प्रकारची उत्तरं मिळतात बघुया. :-)

(उपरोल्लेखित "उपलब्ध गणिती क्रियां"मध्ये ० ते ९ पैकी कोणताही अंक प्रत्यक्षतः आलेला चालणार नाही ही अत्यंत महत्वाची अट आहे.)

वेदश्री, कसं काय, हे बरं वाटतंय ना?

हे खरं तर एक स्वतंत्र कोडं आहे, वेळ मिळाला तर वेगळं करून चढवतो.

- दिगम्भा

मलामराठी टंकलेखन सुविधेचे अतोनात कौतुक वाटते!

मस्त !

तुम्ही ग्रेट आहात, दिगम्भा ! मस्तच आहे हे सुधारीत कोडे .. ( गोटातली गोष्ट सांगायची तर हे आता मलाही सोडवावे लागणार आहे ! कोड्याची सुधारीत आवृत्ती काढून मलाच कामाला लावलंत की तुम्हीतर ! :D करते.. करते.. सोडवायचा प्रयत्न करते. )

(उपरोल्लेखित "उपलब्ध गणिती क्रियां"मध्ये ० ते ९ पैकी कोणताही अंक प्रत्यक्षतः आलेला चालणार नाही ही अत्यंत महत्वाची अट आहे.) ही अट माझ्याही कोड्यात आहे की. लिहायला हवं हे लक्षात नव्हतं आलं. यात एक मेख आहे पण -
जर अ =२ असेल तर २ चा वर्ग / २ = २ असे समीकरण चालायला हवे कारण यात अंतर्भूत गणिती क्रियेत २ वापरला गेला असला तरी तो २ म्हणूनच गणला गेला आहे. बरोबर ना? फक्त २ चा वर्ग - २ चा वर्ग = ० असे चालणार नाही कारण यात २ हा अंक ४ वेळा वापरला गेला आहे जेव्हा की अट ३च वेळा वापर करायला सांगते आहे. बरोबर?

वेदश्री.

उत्तरे - ३ अ + गणिती क्रिया = ० ते ९ !

( अ - अ ) चा अ वा घात = ० किंवा ( अ - अ ) / अ = ० किंवा ( अ - अ ) * अ = ०
अ चा ( अ - अ ) वा घात = १
( अ + अ ) / अ = २
...

- वेदश्री.

चार चारदा

"४ हा अंक चारदा वापरून ० ते ९ या संख्या लिहा." या वेदश्री यांच्या कोड्यातील अटी पुढील प्रमाणे असाव्या : * संख्या व्यक्त करण्यासाठी जी पदावली (एक्स्प्रेशन ) असेल त्यात ४ हा अंक चार वेळा ,आणि चारच वेळा,दिसला पाहिजे.अन्य कोणताही अंक दिसता नये. **गणितातील सर्वमान्य अशी कितीही चिन्हे पदावलीत वापरता येतील. .......दुसर्‍या अटी अनुसार वर्गमूळचिह्न, दशांशचिह्न,आवर्ती दशांश, क्रमगुणित(फ़ॆक्टोरिअल!) ही चिह्ने वापरता येतील.किबहुना % या चिह्नासही प्रत्यवाय नसावा.कारण ते अटीत बसते. यानुसार ० ते १५० पर्यंतच्या सर्व संख्या लिहिलेल्या मी पाहिल्या आहेत. एवढेच कशाला सिद्धांतत: कोणतीही पूर्णांकी संख्या चारदा चार वापरून लिहिता येते असे मी वाचले आहे.
.......दिगम्भा यांच्या कोड्याचे उत्तर मात्र मला येत नाही.कारण ४/१०= .४ असे लिहिता येते . पण अ/१०= .अ असे लिहिण्याची पद्धत नाही.त्यांचे उत्तर वाचल्यावर उलगडा होईल.
...............यनावाला.

अरे देवा!

यनावालाजी,
तुम्ही मजकडून कोड्याच्या उत्तराची अपेक्षा करत आहात हे वाचून पोटात गोळा आला.
मला वाटले होते की कोडे दिले की संपली जबाबदारी.
अगदी ख‍रे सांगायचे तर ही सगळी उत्तरे मी आतापर्यंत विसरून गेलो आहे.
पण मला खात्री आहे की थोडे कष्ट घेऊन ती कोणालाही शोधून काढता येतील.
काही गोष्टी आठवत आहेत त्या सांगतो -
७ सोडून बहुतेक उत्तरे साधारण प्रक्रिया वापरून येतात, वर्गमूळ चिन्ह ही त्यातली एक खास युक्ती आहे.
७ साठी घातांक (लॉगॅरिदम्) या गोष्टीचा वापर करावा लागतो.
जरा जास्त विचार करता घातांक वापरून कोणतीही संख्या बनवता येते असा शोध लागला होप्ता तेही आठवते.
बाकी उत्साही वाचकांनीच प्रयत्न करून उत्तरे शोधणे बरे, मला सध्या जरा वेळ कमीच आहे म्हणून म्हणतो.

- दिगम्भा

मला चे कौतुक वाटते!

.अ

चालेल असे वाटते.

उत्तर

४ + ४ -४ - ४ = ०
[(४ * ४ )/४]/४ = १
(४/४) / (४/४) = २
(४ + ४ + ४) / ४ = ३
वर्गमूळ (४*४) / (४/४) = ४
वर्गमूळ (४*४) + (४/४) = ५
४ + [(४+४)/४] = ६
(४+४) - (४/४) = ७
(४*४)/४ +४ = ८
(४+४) + (४/४) = ९

माफ करा वर्गमूळ चे चिन्ह नाही जमत टाकायला
यनावाला यांनी वर्गमूळ चालेल सांगितल्यामुळे जमले नाहीतर ४ आणि ५ चे उत्तर केवळ + - * / करुन येत नव्हते

वर्गमूळ आणि ४,५

वर्गमूळ क्रिया चालणार नाही कारण त्याचा अर्थ त्या संख्येचा (१/२) वा घात असे होते. माझ्या मते ही पळवाट आहे जी वापरू नये.

४ * { ४ चा ( ४-४ ) वा घात ) } = ४ किंवा ४ / { ४ चा ( ४-४ ) वा घात ) } = ४
४ + { ४ चा ( ४-४ ) वा घात ) } = ५

ही ४ आणि ५ मिळवण्याची या क्षणी आठवलेली समीकरणे आहेत. अजुन शोधायला जाता अजुन सापडतील.

+,-,*,/ एवढ्याच क्रिया गणिती क्रिया आहेत असे नाही.

- वेदश्री.

मान्य आहे

वर्गमूळ क्रिया चालणार नाही कारण त्याचा अर्थ त्या संख्येचा (१/२) वा घात असे होते.

मान्य !! ते न वापरता काढलेले उत्तर accepted

घपला

२ साठी दिलेले उत्तर देताना किंचित घपला झालेला दिसतोय तुमचा, आवडाबाई. आला ना ध्यानात?

- वेदश्री.

आला आला

घपला ध्यानात आला !!

(४/४) + (४/४) = २

आता okay?

वोक्के

आता यकदम वोक्के हाय जी. :-)

- वेदश्री.

पण "३-अ"च्या कोड्यात वर्गमूळ चालेल

मित्रहो,
"३-अ"च्या कोड्यात मात्र वर्गमूळ, दशांशचिन्ह, इ. काहीही चालेल, किंबहुना अशा युक्त्या म्हणजे असल्या कोड्यांचा मोठा आधार आहेत. उदा. (अ + .अ)/अ = ११
यात नियम एकच - की "अ" सोडून दुसरा कोणताही आकडा सूत्रात दिसता कामा नये. म्हणून वर्गमूळ चालेल पण घनमूळ चालणार नाही, कारण त्यात ३ हा आकडा दिसतो. एकूण वर्गमूळ सोडून दुसरे कुठलेच मूळ चालण्याजोगे नाही.
- दिगम्भा

मला चे कौतुक वाटते!

घपला, पळवाट आणि ५

दिगम्भा, काय हे? तुम्हीही घपला केलात उदाहरण देताना !

एकूण वर्गमूळ सोडून दुसरे कुठलेच मूळ चालण्याजोगे नाही.

असेच काही नाही ! कारण वर्गमूळाचे वर्गमूळ म्हणजेच चौथे मूळ ! अशी युक्ती वापरून पळवाटाच पळवाटा काढता येतील. :-)

अ / ( .अ + .अ ) = ५

हे चालणार का?

- वेदश्री.

हे सर्व चालेल

अशी विचित्र कोडी सोडवायची म्हणजे सगळ्या पळवाटा त्यांच्या अंतांपर्यंत चोखाळाव्या लागतात. त्यामुळे वर्गमूळांची मालिकाही अर्थात् स्वीकारार्ह आहे.
५ मान्य.
इतर उत्तरे काढाच,
पण शेवटी माझा जनरल प्रॉब्लेमही विचारात घ्यावा -
-------------------------------------
| ३ अ वापरून कोणतीही संख्या कशी बनवायची ? |
-------------------------------------

- दिगम्भा

मला चे कौतुक वाटते!

कोणतीही संख्या !!!

| ३ अ वापरून कोणतीही संख्या कशी बनवायची ? |
-------------------------------------

बापरे ! ३ अ वापरून ० ते ९ अंक मिळवता मिळवता फॅ फॅ उडते आहे आणि आता आणिक फक्त ३ अ वापरून कोणतीही संख्या कशी बनवायची ( की मिळवायची ?) या प्रश्नाचा बॉंबगोळा येऊन पडला आहे. मला काय माहिती होतं की मी विचारलेल्या छोट्या कोड्याने असं अवघड कोडे सोडवायला लागेल ते. असो. मजा येते आहे. दिगम्भा, उत्तर सांगू नका प्लिज. सोडवायचा प्रामाणिक प्रयत्न करते या विकेंडला कारण आत्ता हापिसचे काम करणे प्राप्त आहे. :-)

- वेदश्री.

९!

(अ - .अ) / .अ = ९ !!!

- दिगम्भा

पळवाट?

कोडीलेखनाविषयी माझे मत

*** कोड्याचा जो गाभा असतो त्यातील प्रत्येक विधान नि:संदिग्ध असावे.त्याचा अर्थ एकमेव असावा. वाचकांना तो प्रतीत व्हावा.(रंजकते साठीकेलेल्या आनुषंगिक लेखनाला वरील अट लागू नाही.)
**कोड्यातील अटी सुस्पष्ट असाव्या.म्हणजे पळवाटा रहाणार नाहीत.त्या न ठेवण्याचे दायित्व कोडे देणार्‍यावर असते.काही अटी उदाहरणाने अधिक स्पष्ट कराव्या.उदा.वेदश्री यांच्या कोड्यात "वर्गमूळ चिह्न चालणार नाही "असे लिहिणे आवश्यक होते.
**कोड्यात एक अट अत्यंत महत्त्वाची आणि अन्य कमी महत्त्वाच्या असे नसते.दिलेली प्रत्येक अट पाळायचीच असते.
** मर्यादित कालावधीत(समजा २आठवडे)वाचकांनी योग्य उत्तर दिले नाही तर कोडे लिहिणार्‍याने ते द्यावे.
..........यनावाला.

काय करावं या आकड्याच्या गमती जमतीला.

वरील सर्व कोडी मी आयूष्याच्या अखेरीस सोडवेन.माझ्या सारख्या अंकगणितातील अरसिक माणसाला या आकड्यांनी या गणिती कोड्यांनी कीतीही भूरळ घातली तरीही, मी एकही सोडवणार नाही.तोपर्यंत घाता घाती चालू द्या. (गणितात काही अडचण आली तर मी येथे नक्की येईन.)

दशगुणोत्तरी संज्ञा.

श्री. सर्किट यांस
आपल्याला जी माहिती हवी होती त्यासाठी माझ्यासंग्रही असलेले एक पुस्तक धुंडाळले.(हिन्दू गणितशास्त्रका इतिहास भाग.१ ले.डॉ,बिभूषण दत्त,डी.एस्सी). त्यात पुढील माहिती मिळाली:
भारतीय गणिती श्रीधर(८वे शतक) यांनी त्याकाळी रूढ केलेल्या संख्या:- .
.........एक,दश,शत,सहस्र,अयुत,लक्ष,प्रयुत,कोटी,अर्बुद,अब्ज, खर्व,निखर्व,महासरोज,शंकू,सरितापती,अन्त्य,मध्य,परार्ध.
***भारतीय गणिती भास्कर द्वितीय(१२ वे शतक) यानी वरील संज्ञांत 'महासरोज' च्याठिकाणी 'महापद्म' आणि 'सरितापती' ऐवजी 'जलधी' असे बदल करून संज्ञा प्रचलित केल्या त्या आपल्याला परिचित असलेल्या अशा:
........एक,दश,शत,सहस्र,अयुत(द.स,),लक्ष,प्रयुत(द.ल),कोटी,अर्बुद,अब्ज,खर्व,निखर्व,महापद्म,शंकू,जलधी,अन्त्य,मध्य,परार्ध.
यांत 'एक' पुढील प्रत्येक संख्या तिच्या मागील संख्येच्या दशगुणित आहे.
शेवटची परार्ध=१० चा १७वा घात.

दशपरार्ध

श्री.सर्किट यांस,
(१०^१८) साठी तुम्ही सुचवलेला दशपरार्ध हा शब्द सार्थ तसेच सुयोग्य आहेच.
.......यनावाला

 
^ वर