आकड्यांच्या गमतीजमती

अ) बहुतेकांना माहीत असलेला गणिती संबंध :
(३)चा वर्ग + (४)चा वर्ग = (५)चा वर्ग

ब) फारसा माहीत नसलेला गणिती संबंध :
(३)चा घन + (४)चा घन + (५)चा घन = (६)चा घन

क) एकाच्या गमती
(१) चा वर्ग १
(११) चा वर्ग १२१
(१११) चा वर्ग १२३२१
(११११) चा वर्ग १२३४३२१
............................
.............................
(१११११११११) चा वर्ग १२३४५६७८९८७६५४३२१

ड) पाचव्या घाताचे वैशिष्ट्य
(१) चा ५वा घात
(२) चा ५वा घात ३
(३) चा ५वा घात २४
(४) चा ५वा घात १०२
(५) चा ५वा घात ३१२
(६) चा ५वा घात ७७७
(७) चा ५वा घात १६८०
(८) चा ५वा घात ३२७६
(९) चा ५वा घात ५९०४
(१०) चा ५वा घात १००००
यावरून काय दिसते? संख्येचा एकंस्थानचा अंक व तिच्या पाचव्या घाताचा एकंस्थानचा अंक सारखे असतात.

लेखनविषय: दुवे:

Comments

परार्धानंतर..

जैन (आणि बौद्ध ?) वाङ्‌मयात(अणुयोगद्वार सूत्र) दहाच्या १४०व्या घातापर्यंत संख्या आहेत असे म्हणतात. त्यांतल्या १०‍^५३ पर्यंत अशा:--
परार्ध, दशपरार्ध, निवाह, दशनिवाह(१०^२०), उत्संग, दशउत्संग, बहुल. दशबहुल, नागबाल(१०^२५), दशनागबाल, तितिलंब, दशतितिलंब, व्यवस्थानप्रज्ञप्ति, दशव्यवस्थानप्रज्ञप्ति(१०^३०), हेतुहील, दशहेतुहील, करहु, दशकरहु, हेत्विन्द्रीय(१०^३५), दशहेत्विन्द्रीय, समाप्तलम्भ, दशसमाप्तलम्भ, गणनागति, दशगणनागति(१०^४०), निरवद्य, दशनिरवद्य, मुद्राबाल, दशमुद्राबाल, सर्वबाल(१०^४५), विषमज्ञगति(१०^४७), सर्वज्ञ(१०^४९), विभुतंगमा(१०‍^५१) आणि तल्लाक्षण(१० ^५३).----वाचक्‍नवी

ट्याग

ट्याग बंद केला आहे.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

इथे पाहा

ही घ्या माहिती.

~~ 'तो ' सध्या 'हे' वाचत आहे! ~~

किचित् सुधारणा

श्री.सर्किट आणि तो यांस
१००० या संख्ये साठी 'सहस्त्र'(sahastra) असा शब्द नसून तो 'सहस्र' (sahasra) असा आहे.त्यात 'टी'नको. काही उदाहरणे:
'टी' असलेले शब्दः....सशस्त्र, शास्त्रशुद्ध, अस्त्रविद्या, शिरस्त्राण, वस्त्रहरण,स्त्रीधन,परस्त्री,स्त्रैण,इ.
'टी' नसलेले शब्दः....सहस्रावधी,सहस्रनाम, सहस्रबुद्धे,भस्रिका, स्रोत, स्रग्धरा,रक्तस्राव,स्रष्टा,इ.

.............यनावाला.

स्त्र आणि स्र

श्री.सर्किट यांस
' स्त्र' आणि 'स्र' ही दोन भिन्न जोडाक्षरे आहेत. ज्या शब्दात जे अक्षर असेल त्याप्रमाणे तो शब्द लिहायचा. कोणत्या शब्दात 'स्त्र' आणि कोणत्यात' स्र' यासाठी काही विशिष्ट नियम असेल असे वाटत नाही. 'स्त्र' अक्षर असलेले तुम्ही दिले आहेत त्याहूनही आणखी शब्द असू शकतील. चटकन आठवत नाहीत.
.......यनावाला.

 
^ वर