ओपन ऑफिसमधील टंकन साहाय्य - भाग ३ (रुपांतर)

फायरफॉक्समध्ये मराठीत टंकलेखन करण्यासाठी बरेच पर्याय उपलब्ध आहेत. पण ओपन ऑफिसमध्ये जर काही टाईप करायचे असेल तर अजूनतरी बरहा हाच एक बरा पर्याय होता. पण आता सी-डेकने "रुपांतर" म्हणून एक एक्स्टिंशन उपलब्ध करून दिले आहे. ते येथून उतरवून घेता येईल.
http://extensions.services.openoffice.org/project/rupantar

तसे पाहिले तर "एक्सलिट हिंदी" (१) व "गुगल ट्रान्सलिटरेट" (२) असे दोन पर्याय आधीही उपलब्ध होतेच. पण त्यासाठी इंटरनेटची जोडणी आवश्यक होती तसेच त्यात बरेच बग्सही होते. त्यामुळे त्यांना बरहा सारखी प्रसिद्धी मिळाली नाही. रुपांतरदेखील फोनेटिक की-बोर्ड वापरत नसल्यामुळे मला त्याचा तसा फारसा फायदा नाही. पण ज्यांना त्यात टंकलेखन करता येते त्यांना ओपन ऑफिसच्या सर्व सुविधा अगदी स्पेलचेक सकट(३) वापरता येतील.

१) एक्सलिट हिंदी
२) गुगल ट्रान्सलिटरेट
३) मराठी स्पेलचेक

Comments

मराठी टंकलेखन

ओपन ऑफिसमधे मराठी टंकलेखन करण्यात अडचण काय येते? ते मला समजले नाही. जर आपल्या संगणक प्रणालीमधे मराठी लेखनाच्या फाईल्स असतील तर ओपन ऑफिसला बाकी काहीच करावे लागत नाही. फक्त मराठी आयएमई कीबोर्ड इनस्टॉल करून घ्यावा लागतो आपला मुद्दा जरा जास्त विशद करून सांगू शकाल काय?
चन्द्रशेखर

मराठी स्पेलचेक

वरील दुव्यातील मराठी स्पेलचेक आवडला. यापूर्वी मी तो उतरून घेतला होता. पण त्याप्रमाणे काम नीटसे झाले नव्हते. आताचा स्पेलचेक लगेच काम करू लागला.
नंतनू अनेक धन्यवाद.
माझ्या कडे जमा झालेला कोश दुसर्‍याला कसा देता येईल याचे मार्गदर्शन व्हावे.

प्रमोद

स्पेल चेक डिक्शनरीला आपले योगदान

आपण आपली डिक्शनरी बॅक-अप घेऊन ठेऊ शकता तसेच ते शब्द माझ्याकडे पाठवले तर मी ते मूळ लिस्ट मध्येही जमा करीन. म्हणजे हे नवीन शब्द सर्वांना पुढील आवृत्तीपासून उपलब्ध होऊ शकतील. यासाठी माझ्या ब्लॉगवरील ही पोस्ट पहा.

http://shabdasampada.blogspot.in/2012/12/blog-post_19.html

 
^ वर