मराठी साहित्य?
सहजच मराठीतली नेहमीची स्थळे चाळत असताना मला खाली दिलेली यादी सापडली आणि धक्काच बसला.
मटामध्ये प्रसिद्ध झालेली २००५ सालातल्या सर्वाधिक खपाच्या पुस्तकांची यादी
माणसं जोडावी कशी? - शिवराज गोर्ले
ताठ कणा - डॉ. पी. एस. रामाणी
ही आपलीच माणसं - मंगला खाडिलकर
इजिप्तायन - मीना प्रभू
बाकी शून्य - कमलेश वालावलकर
बापलेकी - संपादित (मौज प्रकाशन)
हिंदुत्व - नीलकंठ खाडिलकर
नातिचरामि - मेघना पेठे
खटलं आणि खटला - शिरीष कणेकर
देशोदेशीचे - शिवाजीराव भोसले
महामानव आईनस्टाईन - डॉ. विद्यासागर पंडित
अवनत होई माथा - डॉ. संजय ओक
चित्रायन - साधना बहुळकर
एका खेळीयाने - दिलीप प्रभावळकर
गाणी बजावणी - अभिजीत देसाई
चकवाचांदणं - मारूती चितमपल्ली
बिनचेहऱ्याची माणसं - अशोक बेंडखळे
एक होता गोल्डी - अनिता पाध्ये
ही श्रींची इच्छा - श्रीनिवास ठाणेदार
सुंदर ते मन - कमलिनी फडके
साहित्यिकांचे अंतरंग - रत्नप्रभा जोशी
ओमेता - अनिल काळे
प्रज्ञावंतांची दैनंदिनी - संपादित (निहार प्रकाशन)
पैठणी - विजया वाड
गोष्टी माणसांच्या - सुधा मूर्ती
धनंजय - राजेंद्र चेर
फॅमिली डॉक्टर - डॉ. बालाजी तांबे
शाळा - मिलिंद बोकील
भयंकर सुंदर मराठी - डॉ. द.दि.पुंडे
द अल्केमिस्ट - (अनुवाद) नितीन कोतापल्ले
बॅरिस्टरचं कार्ट - हिंमतराव बाविसकर
मजेत जगावं कसं - शिवराज गोर्ले
जगण्यातील काही - अनिल अवचट
दिसलं ते - अनिल अवचट
संभाजी - विश्वास पाटील
ब्र - कविता महाजन
मौनाची भाषांतरे - (कवितासंग्रह) संदीप खरे
ही वाचून एकच प्रश्न मनाता आला..
मराठी साहित्याला इतकी दैन्यावस्था आलेली आहे का?
एखाद्याला पुस्तके सुचवण्यासाठी ही यादी उपयुक्त आहे का? उपक्रमींचे मत जाणून घ्यायला आवडेल.
Comments
अर्थात :)
बरं-वाईट असं सगळंच वाचल्यावर बहुधा चांगल्या पुस्तकांचं अप्रूप वाटत असावं. बरंचसं हेच आंतरजालीय लेख/चर्चांबद्दलही म्हणता येईल :)
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
यादी
श्री लिमये, यादी सर्वाधिक खपाच्या पुस्तकांची आहे. त्यात ललित व ललितेतर अशी बरीच पुस्तके आहेत. कुठल्याही भाषेत सर्वाधिक खपाच्या पुस्तकांची यादी घेतली तर अशाच पुस्तकांचा भरणा आढळतो. त्यावरून मराठी साहित्याला दैन्यावस्था आली आहे का? या प्रश्नाचे उत्तर देता येईल, असे वाटत नाही.
एखाद्याला कुठल्या प्रकारची पुस्तके आवडतात यावर ही यादी उपयुक्त ठरेल किंवा नाही हे ठरवता येईल. यादी वृत्तपत्रात आणि नुकतीच एका संकेतस्थळावर आलेली आहे. वृत्तपत्र वाचणार्या आणि संकेतस्थळावर जाणार्या लोकांच्या आवडीनिवडी निरनिराळ्या प्रकारच्या असतात. कोणाकोणाला लोकप्रिय पुस्तके आवडू शकतात. कमीत कमी अशा लोकांकरता तरी ही यादी उपयुक्तच वाटते. त्यात माझ्या एका मित्राने अनुवादीत केलेल्या पुस्तकाचे नाव (द अल्केमिस्ट* - (अनुवाद) नितीन कोतापल्ले) आहे, हे पाहून तर खूपच बरे वाटले.
*हे पुस्तक मला फारसे आवडलेले नाही.
________________________________
माझा प्रतिसाद या मार्गदर्शक सूचनांशी सुसंगत आहे का? नसल्यास कृपया खरड अथवा व्यनिने कळवा.
कल्पना आहे
हो मला कल्पना आहे. पण पुस्तक वाचनाची आवड असणारे लोक बहुवाचनाने (इतरांच्या तुलनेत) थोडे जास्त प्रगल्भ असतात असे मला वाटायचे. ह्या माझ्या गृहितकाला तडा गेला. ह्या यादीवर 'खल्लास', 'काम तमाम', 'वाचनखूण साठवतो' अश्या प्रतिक्रिया काही आदरणीय सभासदांकडून आल्याने आणखीनच वाईट वाटले.
तिकिटबारीवर जोरात चाललेल्या सिनेमांची यादी दिली तर त्यात (बरेचसे) सुमार रद्दी चित्रपट दिसतील हे मान्य आहे, पण पुस्तकांच्या बाबतीत माझा भाबडा आशावाद होता. कमलेश वालावलकर, मीना प्रभू, दिलिप प्रभावळकर, बालाजी तांबे, अभिजीत देसाई इ.इ. थोर साहित्यिकांची नावे ऐकून 'खल्लास, काम तमाम' असे चित्कार ऐकू येत असतील तर काय बोलायचे.
वसुलि
वसंत सुधाकर लिमये
खुलासा करावा...
>>> यादीवर 'खल्लास', 'काम तमाम', 'वाचनखूण साठवतो' अश्या प्रतिक्रिया काही आदरणीय सभासदांकडून आल्याने आणखीनच वाईट वाटले.
ज्या ज्या आदरणीय सदस्यांनी 'खल्लास' 'काम तमाम' 'वाचनखूण साठवतो' अशा प्रतिक्रिया दिल्या असतील त्या त्या आदरणीय सदस्यांनी वेळ मिळेल तेव्हा अशा प्रतिक्रिया देण्यामागचा खुलासा करावा असे वाटते. त्यामुळे चर्चा प्रस्तावकास जे 'वाईट' वाटले आहे. त्या वाईट वाटण्याची तीव्रता कमी होईल असे वाटते :)
-दिलीप बिरुटे
रिकामा उपक्रमी अवांतराचा भार वाही.
यादीतली काही पुस्तके वाचण्यायोग्य असावीत
अन्य संकेतस्थळावर अशी काही चर्चा होत आहे. तिथे मी वाचनखूण साठवलेली आहे. (आणखी कोणी साठवली आहे का? असेल.)
पुस्तकांची यादी लांब आहे, आणि त्यातले प्रत्येक पुस्तक वाचायला मला जमणार नाही. मात्र काही पुस्तके (त्यातल्या त्यात आवडतील अशी) वाचायचा प्रयत्न करीन. पुस्तकांची खरेदी अनेक महिने तरी करता येणार नाही, निवडलेल्या थोड्या पुस्तकांबाबतही माझी स्मृती स्खलनशील आहे, म्हणून वाचनखूण साठवलेली आहे. स्मृती स्खलनशील असण्याबद्दल मलाही वाईट वाटते.
पैकी कुठली पुस्तके मी निवडून वाचणार आहे? निवडलेली पुस्तके श्री. लिमये यांच्या मतानुसार हिणकस आहेत की दर्जेदार? मी निवडेन त्या थोड्या पुस्तकांचा दर्जा यादीच्या सरासरी दर्जाशी मिळताजुळता आहे का? मला ठाऊक नाही. मी निकृष्ट पुस्तके निवडेन, असा ठाम निष्कर्ष श्री. लिमये करू शकतात, कारण त्यांनी माझ्या लेखन-वाचनाचे परिशीलन केलेले आहे. वाचनखूण साठवणार्यांची निकृष्ट निवड अचूक ओळखल्यामुळे त्यांना वाईट वाटले, हे त्यांच्या उदार कणवेचे द्योतक आहे.
---
वेगळा मुद्दा :
हल्ली नरहर कुरुंदकरांचा "धार आणि काठ" निबंधसंग्रह वाचत आहे. त्यात त्यांनी काही निकृष्ट पण लोकप्रिय मराठी कादंबर्यांची चर्चा केलेली आहे. त्यांच्या निबंधांतून असे स्पष्ट जाणवते, की त्या कादंबर्या त्यांनी स्वतःहून पूर्ण वाचल्या असाव्या. हे जर अप्रगल्भतेचे लक्षण आहे, तर याही उदाहरणात बहुवाचनाने प्रगल्भता येत नाही. असे असल्यास कुरुंदकरांच्या बाबतीततरी श्री. लिमये यांच्या वाईट वाटण्याशी सहमत व्हावे लागेल.
परंतु "निकृष्ट साहित्यही वाचणे म्हणजे प्रगल्भतेचा अभाव" या गृहीतकाशी मी असहमत आहे. त्यामुळे मला कुरुंदकरांच्या बहुवाचनाबद्दल/अप्रगल्भतेबद्दल फारसे वाईट वाटत नाही.
"निकृष्ट साहित्यच वाचणे म्हणजे प्रगल्भतेचा अभाव" असे काही गृहीतक असल्यास मी सहमत आहे. पण श्री. लिमये यांच्या लेखातून तसे गृहीतक असल्याचे स्पष्ट होत नाही.
उत्कृष्ट प्रतिसाद
उत्कृष्ट प्रतिसाद.
वाचनखूण साठवणार्यांची निकृष्ट निवड अचूक ओळखल्यामुळे त्यांना वाईट वाटले, हे त्यांच्या उदार कणवेचे द्योतक आहे.
हाहाहाहा.. उत्कृष्ट वाक्य.
बहुधा वाईट साहित्य वाचल्याशिवाय चांगले काय ते कळत नसते. सगळ्या प्रकारचे साहित्य वाचायला हवे असे मलाही वाटते. त्यामुळे वाचनखूण साठवणे योग्यच. श्री. वसंत सुधाकर लिमये ह्यांचा आक्षेप यादीवर नसावा. त्यांचा आक्षेप यादीवरील प्रीमॅच्युअर चित्कारावर असावा आणि असे चित्कार देण्यासाठी लागलेल्या अहमहमिकेवर असावा, असे मला वाटते आहे.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
धन्यवाद!
धनंजय, प्रतिसाद आवडला. मुद्द्यातील भावनांना समजून घेउन वैयक्तिक न घेता अतिशय योग्य स्पष्टीकरण दिलेले फार आवडले. असो. माझ्यासाठी हा विषय संपला.
थोडे 'वेगळ्या' मुद्याविषयी:
नाही हे अप्रगल्भतेचे बिल्कुल लक्षण नाही. पण कुरुंदकर त्यांच्या 'आवडत्या' पुस्तकांची यादी देत नाही आहेत. किंवा ह्या कादंबर्या वाचून 'काम तमाम' असा चित्कारही करत नाहीयेत हे लक्षात घ्या.
वसुलि
वसंत सुधाकर लिमये
यादी
पाच वर्षांपूर्वीची दिलेली पुस्तकांची यादी आणि "मराठी साहित्याला इतकी दैन्यावस्था आलेली आहे का?" आणि
"एखाद्याला पुस्तके सुचवण्यासाठी ही यादी उपयुक्त आहे का? " या प्रश्नांचा (ज्याचा उल्लेख "एकच" प्रश्न असा मूळ धाग्यात केला गेला आहे ) सबंध काय ते कळले नाही बॉ. थोडे अधिक संदर्भ दिले तर काही पत्ता लागेल असे वाटते.
भयंकर सुंदर मराठी - डॉ. द.दि.पुंडे
या यादीतील भयंकर सुंदर मराठी भाषा हे डॉ. द.दि.पुंडे यांचे पुस्तक छान आहे. शाळाही आवडले होते. (मात्र शाळाच्या तुलनेत बोकीलांची इतर पुस्तकेही फार चांगली आहेत)
बाकीची बहुतेक पुस्तके वाचलेलीच नाहीत.
अवांतरः बाकी शून्य हे अगदी नवेकोरे पुस्तक सवलतीच्या दरात (थ्रोअवे प्राईस) माझ्याकडे विकत मिळेल. इच्छुकांनी ajanukarna@gmail.com वर संपर्क साधावा.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
२००८-०९ ची पुरस्कारप्राप्त पुस्तके
महाराष्ट्र सरकारची २००८-०९ ची पुरस्कारप्राप्त लेखकांची नावे त्यांच्या पुस्तकासह : ३-१२-२००९ रोजी प्रसिद्ध झालेली यादी.:
काव्य -
डो. यशवंत मनोहर(स्वप्रसंहिता), अशोक कोतवाल (कुणीच कसे बोलत नाही),
ऋख्विज सतीश काळसेकर (काळोखाच्या तळाशी),
कविता महाजन (मृगजळीचा मासा),
नाटके -
चंद्रकांत प्रभाकर देशपांडे (बुद्धिबळ आणि झब्बू)
चंद्रशेखर फणसळकर (खेळीमेळी),
जगतकुमार आ. पाटील (आसाचा फेरा),
ज्ञानेश महाराव (जिंकू या दाही दिशा)
कादंबरी -
अंबिका सरकार (अंत ना आरंभही),
संजय भास्कर जोशी (श्रावणसोहळा) आणि शरणकुमार लिंबाळे (झुंड)
राजा कदम (अवशेष),
बाळाजी मदन इंगळे (झिम पोरी झिम)
लघुकथा -
अनिल रघुनाथ कुलकर्णी (तळ्याकाठच्या सावल्या)
वसू भगत (प्रकाशाची झाडे)
सदानंद देशमुख (खुंदळघास),
ललित गद्य -
जोंधळे (किरण पाणी), विश्वास पाटील (नॉट गॉन विथ द विंड)
प्रकाश गोविंद कुलकर्णी (नव्या क्षितिजाच्या प्रदेशात)
सौ. सुप्रिया अनिल वकील (पॉप कॉर्न)
एकांकिका -
डॉ. विनिता परांजपे (रहस्यभेदी)
अविनाश नारायण चिटणीस (बादशाह आणि इतर)
डॉ. सतीश साळुंके (अवस्थ तरीही)
विनोद -
डॉ. शरद बर्वे (झुळूक अमेरिकन तार्याची)
श्रीकांत बोजेवार (दोन फूल एक हाफ)
संकीर्ण -
गिरीश कुबरे (अधर्म युद्ध)
विदूर महाजन (मैत्र जिवाचे)
ललित विज्ञान -
डॉ. प्राची साठे (जीवन मृत्यूच्या सीमारेषेवरून)
सौ. सुधा रिसबूड (कल्पित अकल्पित)
डॉ. अजित पाटील (देशोदेशीचे विज्ञानेश्वर)
चरित्र -
यशवंत रांजणकर (वॉल्ट डिस्ने)
सुमेध वडावाला (मनीश्री),
आत्मचरित्र -
शरद जोशी (अंगार मेळा)
आशा दस्तगीर अपराध (भोगले जे दुःख त्याला),
समीक्षा आणि सौंदर्यशास्त्र -
अशोक रामचंद्र केळकर (रुनुवात),
डॉ. अशोक रानडे (संगीत विचार)
डॉ. आनंद पाटील (टीका वस्त्रहरण)
श्रीमती किशोरी आमोणकर (स्वरार्थरमणी)
इतिहास -
के. के. चौधरी (झुंजार पुणे-)
डॉ. साहेब खंदारे (मराठ्यांचा सामाजिक सांस्कृतिक इतिहास खंड-1)
अर्थ शास्त्र -
सी. पं. खेर (नवप्रवर्तन सूत्र आर्थिक विकासाचे)
यशवंत अनंत पंडितराव (आधुनिक अर्थशास्त्राचे निर्माते)
राज्यशास्त्र व समाजशास्त्र -
डॉ. सुधाकर देशमुख (राष्ट्र आणि राष्ट्रवाद)
न्या. नरेंद्र चपळगावकर (विधिमंडळे आणि न्यायसंस्था- संघर्षाचे सहजीवन)
तत्त्वज्ञान व मानसशास्त्र -
राजीव साने (नवपार्थ हृदयगतः
शिक्षण शास्त्र -
डॉ. जनार्दन वाघमारे (बदलते शिक्षण स्वरूप आणि समस्या)
भाषाशास्त्र व व्याकरण -
डॉ. हरिश्चंद्र बोरकर (भाषिक भ्रमंती)
भौतिकशास्त्र व तंत्रविज्ञान -
विनोद कुमार सोनावणे व सुधाकर आगरकर(कृतिप्रधान विज्ञान अध्यापन)
डॉ. रामचंद्र नर्हे व डॉ. सुलभा कुलकर्णी
(निसर्गातील नॅनो रचना विज्ञान व तंत्रज्ञान)
दलितांवरील साहित्य -
डॉ. माहेश्वरी गावित (आदिवासी साहित्य विचार)
अनुवादित -
चंद्रकांत पाटील (कवितांतरण)
प्रा. पुरुषोत्तम देशमुख (द डार्क होल्डस नो टेरर्स)
संपादित -
हेरंब कुलकर्णी (परीक्षेला परीक्षा काय? )
अविनाश पाठक (मराठी वाङ्मय व्यवहारः चिंतन आणि चिंता)
आधारित -
डॉ. विठ्ठल वाघ (म्हणी कांचन)
संशोधन -
भिवाजी शिवाजी शिंदे (तमाशातील सोंगाड्या)
ललितकला आस्वाद -
माधव वझे (रंगमुद्रा)
विजय पाडळकर (गंगा आये कहा से गुलजार एका दिग्दर्शकाचा प्रवास)
शेती -
डॉ. राजेंद्र देशमुख (अशी फुलवा परसबाग)
श्यामराव करम (पाणलोट विहिरी)
शेतीपूरक व्यवसाय -
कॅप्टन लक्ष्मीकांत कलंत्री, डॉ. अधिकराव जाधव, संजय धामणे (किमया रेशीम शेतीतून लक्षाधीश होण्याची)
क्रीडा विभाग -
नंदू नाटेकर (क्रीडागाथा)
संगणक, इंटरनेट -
प्रा. सुभाष, पवार (किमया फोटोशॉपची)
पर्यावरण -
अरुणा अंतरकर (कथा आधुनिक दंडकारण्याची)
बृहन्महाराष्ट्र पुरस्कार -
देवेंद्र कांदोलकर, गोवा (सागरशाळा),
पांडुरंग गावकर, गोवा (नंतर)
आणि काही बालवाङ्मयासाठीचे पुरस्कार.
यातली किती पुस्तके दर्जेदार असतील?--वाचक्नवी
रुजुवातचे परीक्षण
डॉ. अशोक केळकर ह्यांच्या रुजुवातचे परीक्षण इथे वाचता येईल:स्तिमित करणारा बौद्धिक आवाका
रुजुवात उत्तम पुस्तक
रुजुवात हळूहळू वाचतो आहे. स्तिमित करणारा बौद्धिक आवाका आहे, हे खरेच आहे.
काही मते पटली नाहीत (अशी थोडीच आहेत) तरी दुर्लक्ष करता येत नाही.
प्रश्न कळला नाही
मराठी साहित्याला इतकी दैन्यावस्था आलेली आहे का?
वरील यादीत सर्वाधिक खप होणारी पुस्तके आहेत त्या अर्थी त्या पुस्तकांचा वाचक हा अधिक आहे, असावा. पण, वरील यादीवरुन साहित्याची दैन्यावस्था कशी प्रकट होते ते काही कळले नाही.
समजा, काही वाचकांनी वरील सर्व पुस्तके वाचलेली आहेत. आणि वरील सर्व पुस्तके वाचून ते सर्व या निष्कर्षावर आले की, वरील पुस्तकांमधे साहित्य वैशिष्ट्यांसहीत कोणताच दम नाही, किंवा नाविन्य नाही, तेव्हा प्रकट होणारी दैन्यावस्था समजून येईल. पण, मराठी साहित्याला 'दैन्यावस्था' सिद्ध करण्यासाठी काहीएक आधार असला पाहिजे असे मला वाटते.
एखाद्याला पुस्तके सुचवण्यासाठी ही यादी उपयुक्त आहे का?
हम्म, याबाबत मतभेद होऊ शकतात. वाचकाची आवड काय त्यावर बर्याचदा पुस्तके सुचविण्याबाबत मत-मतांतरे होऊ शकतात तेव्हा वरील यादी उपयुक्तच असेल असे होणार नाही.
-दिलीप बिरुटे
दैन्यावस्था
प्राध्यापक महोदय,
ह्या पुस्तकांचे साहित्य मूल्य किती हे तुम्हीच आम्हा सर्वांना दाखवून द्या.
वसुलि
वसंत सुधाकर लिमये
काही मजकूर संपादित.
मूल्य म्हणजे काय ?
>>पुस्तकांचे साहित्य मूल्य किती हे तुम्हीच आम्हा सर्वांना दाखवून द्या.
एखादी वस्तू चांगली किंवा वाईट वाटण्यामागे आपल्या स्वतःच्या आवडीनिवडीचाही भाग असतो.
आता या आवडीनिवडीमागे एखादा ठराविक तर्क असतोच असे नाही. मला वाटलेली एखादी मौल्यवान गोष्ट सर्वांनाच मौल्यवान वाटावी असे असेल तर आपल्याला त्यातील 'मूल्यातत्मकता' पटवून देता आली पाहिजे. आणि असे करत असतांना आपल्याला काही निकषांची गरज भासते.
तेव्हा 'उत्कृष्टतेचे निकष' म्हणजे मूल्य . आता या निकषांमधे आपल्याला कशा- कशाचा किंवा कोणता विचार केला पाहिजे. तर मी म्हणेन आस्वाद, आकलन, आणि समीक्षेचा विचार केला पाहिजे. कमीत कमी या निकषांवर तरी आपल्याला त्या त्या कलाकृतींचे मूल्य ठरवता आले पाहिजे. ठरवता येईल.
दुसरे असे की, जेव्हा आपण साहित्याचे मूल्यमापन करतो तेव्हा कोणाशी तरी त्याची तुलना करीत असतो. तुलना करुनच काही एक निष्कर्षावर आपल्याला पोहचता येईल. तेव्हा तुलना करीत असतांना काही समान तत्त्व आपल्याला शोधावी लागतील तरच आपल्याला वरील यादीतील साहित्यिक मूल्यांचा शोध घेता येईल. आता वरील पुस्तके आम्ही वाचलेली नसल्यामुळे त्यातील साहित्यिक मूल्यांच्या बाबतीत आपणास आम्हाला मार्गदर्शन करता येणार नाही. तेव्हा भविष्यात काही पुस्तके वाचून आपल्याला वरील पूस्तकांच्या मूल्यांच्या बाबतीत अधिक काही सांगता आले तर तसा पुढे प्रयत्न करीन. धन्यवाद...!
-दिलीप बिरुटे
अरे हे काय चाललंय काय?
मूळ चर्चेला थंडगार प्रतिसाद - आणि इथे - त्याच चर्चेवरची चर्चा गाजतेय! संस्थळांच्या भिन्न पकृतींविषयी यातून काही बोध होतो का? आम्ही तक्रार नाही करावी, तर मग काय करावं?
स्वत:साठी मनातल्या मनात केलेली खरड : "मराठी साहित्याला इतकी दैन्यावस्था आली, अं?" ला प्रतिसाद उत्तम मिळतो. आधीच्या हापटबारांच्या यादीत भर.
राजेश
द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी
हे वाचून
ही चर्चा वाचून मला एकदम गदीमांच्या गाण्यातील आणि माणिक वर्मांनी सुरेल आवाजात गायलेल्या ओळी आठवल्या:
बहरला पारीजात दारी,फुले कां पडती शेजारी? :-)
असो. ह,घ्या. प्रत्येकाची आवड असते. जितके वैविध्य तितका समाज (अगदी भांडला तरी) प्रगल्भ होतो असे वाटते.
--------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
मराठी साहित्य
मराठी साहित्य माझ्याकडून फारसे वाचले जात नाही त्याचा खेद व्हायला हवा होता पण तसे काही झाले नाही खरे या अशा चर्चा वाचून. चालू द्या.
चक्क खेद वाटत नाही. :(
मराठी साहित्याचं क्षेत्र खूप समृद्ध आहे. [पूर्वीच्या काळातील लेखन सोडून द्या] पण, दोनशे वर्षाच्या काळात वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य लिहिल्या गेले, लिहिल्या जात आहे. कविता,कथा,कादंबरी,नाटक, वैचारिक लेखन,चरित्र-आत्मचरित्र अशा अनेक प्रकारांनी आणि विविध अशा साहित्य प्रवाहांनी, स्त्रीवादी,जनवादी, दलित, अदिवासी, मुस्लीम मराठी, अशी अनेक प्रकार,प्रवाहांनी साहित्याची दालने वाचकांसाठी खूली आहेत. आपण वाचकांनी अजून जुनेच वाचून संपवलेले नाही. नवीन लेखकांचे लेखन वाचत नाही, वाचलेले नाही आणि साहित्याला दैन्य अवस्था प्राप्त झाली आहे अशी निष्कर्ष काढून मोकळे होतो. तेव्हा अशा न वाचलेल्या साहित्याबद्दल एक वाचक म्हणून मला तरी खूप खेद वाटतो. ग.ना. जोगळेकर म्हणतात-
'' प्रत्येक कालखंड गाजविणार्या लेखकांची आणि साहित्यकृतींची नव्या अभ्यासकाला चांगली ओळख झाली तर वाड्मयेतिहासाच्या विस्तृत दालनात रमावेसे वाटेल. प्रत्येक कालखंडाच्या वाङ्मय निर्मितीला अनेक राजकीय,सामाजिक,सांस्कृतिक घडमोडी कारणीभूत होत असतात. अशा घडामोडींची ओळख होणे वाड्मयाची जाण वाढीस लागण्यासाठी इष्ट ठरते. ''
सांगण्याचा मुद्दा असा की, आपण वाचतो कमी आणि खूप बोलून निष्कर्षही काढतो. तेव्हा प्रत्येकाने मिळेल त्या साहित्याचा आस्वाद घेतला पाहिजे. मराठी साहित्य लेखनात अजून खूप कच्ची 'खनिज संपत्ती ' आहे. अजून ती आपल्यासमोर यायची आहे. मनाचे पोषणासाठी उत्तम वाचलं पाहिजे, चिंतन मनन केले पाहिजे, नव-नव्या लेखनाची वाट पाहिली पाहिजे. तरच अधिक प्रगल्भता येईल. तेव्हा अशा अनेक गोष्टी आपल्यापासून दूर आहेत आणि आपल्यासारख्या समृद्ध वाचकाला तरी त्याचा खेद वाटला पाहिजे.
-दिलीप बिरुटे
नाही बरं का!
नाही बरं का! मी असे काहीही निष्कर्ष कोठेही आणि कधीही काढलेले नाहीत. मराठीतील सामाजिक,विनोदी, गंभीर, कविता,नाटक, वैचारिक लेखन,चरित्र-आत्मचरित्र वगैरे मी अनेक वर्षांत वाचलेले नाही किंवा यांतील काही साहित्य वाचण्यात फारसा रस उरलेला नाही एवढेच.
तसे वरील यादीतील मी इजिप्तायन वाचेन परंतु मीना प्रभू खूप काही ग्रेट लिहितात असे मला वाटत नाही.
मराठी पुस्तकांची विक्री
माझे एक स्नेही पुस्तक प्रकाशनाच्या व्यवसायात आहेत.त्यांच्याकडून मला मिळालेली माहिती अशी आहे.
मराठी पुस्तकांची प्रत्यक्ष विक्री(रिटेल सेल) ही अत्यंत अल्प असते. पुस्तके मुख्यत्वे खरेदी केली जातात ती जिल्हा आणि तालुका निहाय असलेल्या पुस्तकालयांकडून. ही सर्व पुस्तकालये सरकारी मदतीवर अवलंबून असतात. यातल्या बर्याचशा पुस्तकालयाना महाराष्ट्र सरकारच्या सांस्कृतिक विभागाकडून पुस्तके खरेदी करून पाठ्वली जातात. या विभागाचे कार्यालय नवी मुंबईत आहे. या ठिकाणी बल्क मधे पुस्तके खरेदीच्या ऑर्डर्स निघतात. येथल्या अधिकार्यांच्या मर्जीतील आणि त्यांना सहकार्य करण्यास इच्छूक असलेल्या प्रकाशकांना बहुदा ऑर्डर्स मिळतात. पुस्तकाच्या गुणवत्तेवर ऑर्डर्स अवलंबून नसतात. या शिवाय हा विभाग इतर ग्रंथालयांना कोणती पुस्तके विकत घ्यावी या संबंधी मार्गदर्शक यादी दर वर्षी पाठवतो. या यादीत पुस्तक येण्यासाठी परत प्रकाशक आणि सांस्कृतिक विभागाचे अधिकारी यांच्यातले संबंध महत्वाचे असतात. पुस्तकाची गुणवत्ता नव्हे.ज्या पुस्तकालयाना प्रत्यक्ष पुस्तक खरेदीचे अधिकार आहेत ती पुस्तकालये बहुदा या यादीतीलच पुस्तके खरेदी करतात.
यावरून हे लक्षात यावे की सर्वाधिक खपाची पुस्तकांची यादी आणि मराठी साहित्याचा दर्जा याचा तसा काही प्रत्यक्ष संबंध असणे संभवनीयच नाही. श्री लिमये यांना ही यादी बघून खेद करण्याचे काहीच कारण दिसत नाही.
चन्द्रशेखर
अवचटांचे पातळ वरण
वाव्वा! अवचटांच्या सहज ओघवत्या पातळ वरणाला खरेच पर्याय नाही. आम्हाला फार आवडते त्यांचे वरण.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"