विज्ञानातिल् चालु घडामोडि (क्र् पया मार्ग् दर्श् न् करावे )

मला विज्ञान दिनाला विज्ञानातिल् चालु घडामोडि या विषयावर शाळेत भाषण करायचे आहे. त्यात कोणता विषय निवडु?? मला आपल्या पैकि कोणी मदत करेल का??
आपली,
म्र् दु ला

लेखनविषय: दुवे:

Comments

पाहिजे तेवढे

नॅनो विज्ञान, क्लोनिंग, जगाचे वाढते तपमान, वितळणार्‍या हिमनद्या, समुद्राची पातळी वाढली तर मुंबईवर होणारा परिणाम
चुकीचे खाद्य निवडल्याने होणारे दुष्परिणाम (जंक फूड), काहीही निवडा. जालावर भरपूर माहिती मिळेल.
शरद

+१

हे विषय उत्तम आहेत. +१

निवडताना "स्वतःला आवडणारा/उत्साह वाटणारा/विषाद वाटणारा" असा विषय निवडण्यास प्राधान्य द्यावे. भाषणात माहिती पाहिजेच, पण मनापासून जोशही असल्यास वक्तृत्व अधिक प्रभावी होईल.

+२

+२

शिवाय भाषणं नुसते पाठ करू नये.विषय समजून घेऊन भाषण करावे. म्हणजे भाषणानंतर कुणी प्रश्न विचारले तर काहीतरी उत्तरे देता येतील.

नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)

+३

कोणी प्रश्न विचारणार नसेल तरीही विषय नीट समजून घेण्याचा प्रयत्न करावा.
________________________________
वरील प्रतिसाद या मार्गदर्शक सूचनांशी सुसंगत आहे का? नसल्यास कृपया खरड अथवा व्यनिने कळवा.

१ ८०० नंबर...

वरील प्रतिसाद या मार्गदर्शक सूचनांशी सुसंगत आहे का? नसल्यास कृपया खरड अथवा व्यनिने कळवा.

देखील टाकायला हरकत नाही. ट्रकच्या मागे असतो 'माझं ड्रायव्हिंग कसं काय आहे, या नंबरावर कळवा' तसा... :-)

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

तीच प्रेरणा

ट्रकच्या मागे असतो 'माझं ड्रायव्हिंग कसं काय आहे, या नंबरावर कळवा' तसा

तेथुनच कल्पना सूचली.
________________________________
वरील प्रतिसाद या मार्गदर्शक सूचनांशी सुसंगत आहे का? नसल्यास कृपया खरड अथवा व्यनिने कळवा.

विज निर्मीती

विज निर्मीती आणि नविन तंत्रज्ञान हाही उत्तम विषय आहे. आनंद घारेंनी नुकताच लिहिलेला लेख संदर्भाला घेता येईल. तिथून सुरूवात करुन अणू उर्जा त्याचे फायदे तोटे ह्यावर बोलता येईल. अणूकचर्‍याचा विनीमय करण्यासाठी पुढे येत असलेले 'ज्वालामू़खीत टाकणे' ह्यासारखे अभिनव उपाय, अशा अनेक गोष्टींद्वारे चालू घडामोडींचा परामर्श घेता येईल.

भाषणासाठी शुभेच्छा! इथे बर्‍याच कल्पना सापडतील.

वसुलि
वसंत सुधाकर लिमये

वेगळ्या घडामोडी

ऐशी टक्के भाषणं ग्लोबल वार्मिंग, क्लोनिंग, सौर ऊर्जा वगैरेवर होतील. ती खूप कष्ट करून केलेली असली तरी परीक्षकांना तेच तेच ऐकून कंटाळा येतो.

मी म्हणेन की कुठची तरी एक हृदयस्पर्शी घटना घ्या - ती तुम्हाला स्वत:ला महत्त्वाची वाटत असली पाहिजे. उदा. एखाद्या लहान मुला वा मुलीवर आलेली दुर्घटना. व विज्ञानामुळे ती कशी टळली हे सांगा. त्या अनुषंगाने त्या विशिष्ट वैज्ञानिक प्रगतीचे वेगवेगळे टप्पे सांगा. व जाता जाता शेवटी पुन्हा मूळ घटनेशी दुवा जोडा.

खूप वर्षांपूर्वी अपघातात पूर्ण नष्ट झालेला ८ वर्षाच्या मुलीचा चेहेरा डॉक्टरांनी पुन्हा तयार केला होता. त्याची आठवण झाली.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

धन्यवाद्!!

मी क्लोनिंग , स्टेम सेल्स या विशयावर करिन.
(भाशणाची स्पर्धा नाहिये.) हा विशय माझ्याकरिता नविन आहे व interesting वाटला.

 
^ वर