स्त्रियांची धर्मनिष्ठता

जगातील सर्व प्रमुख धर्मांनी स्त्रियांना हीन लेखले आहे.त्यांचा छळ केला आहे.आपल्याकडे तर धर्मरूढींच्या नावाखाली निरपराध विधवांचे केशवपन करून त्यांना विद्रूप बनवले . जिवंतपणी सरणाच्या आगीत होरपळवून शेकडो स्त्रियांना मारले .अशा प्रसंगाचे चित्र डोळ्यांपुढे आणले की अंगावर काटा उभा रहातो. पण माणसाने धर्माच्या नावे अशी निर्घृण कृत्ये आनंदाने करून त्यात धन्यता मानली आहे.
असे असून आजही जगातील सर्वच प्रमुख धर्मांच्या स्त्रिया पुरुषांपेक्षा अधिक धार्मिक आहेत.अधिक रूढिप्रिय आहेत. धार्मिक परंपरा जपणार्‍या आहेत. याचे कारण काय असावे?
या प्रश्नासंबंधी एक लेख रिचर्ड डॉकिन्स् डॉट् नेट या संस्थळावर वाचला होता. लेखाचे शीर्षक तसेच लेखकाचे नाव स्मरणात राहिले नाही.पुन्हा शोध घेणे जमले नाही. लेखातील विचार सलग आणि प्रभावीपणे मांडले नव्हते.त्यामुळे समग्र आकलन झाले नाही. लेखाचा आशय काहीसा असा होता:
**आपल्या जनुकांचे सातत्य राखावे अशी प्रत्येक सजीवाची नैसर्गिक ऊर्मी(नॅचरल इंस्टिंक्ट) असते.हे जनुकसातत्य प्रजोत्पत्तीतूनच शक्य असते.
** मादीची अपत्य निर्मितीची क्षमता अगदी मर्यादित असते.(स्त्रीच्या बाबतीत आयुष्याच्या ठराविक कालावधीत साधारणत: दोन वर्षांत एक अपत्य)तर नराची अपत्यनिर्मिती्क्षमता मादीच्या तुलनेत अनेक पटींनी अधिक असते.तो अन्य नरांशी स्पर्धा करून अनेक माद्यांच्या ठिकाणी अपत्य निर्मिती करू शकतो.त्यामुळे जनुकसातत्याची त्याला विशेष चिंता वहावी लागत नाही.
** स्त्रीच्या उदरातून जन्मलेली अपत्येच तिच्या जनुकांची वाहक असू शकतात.पुरुषाच्या बाबतीत तसे नसते.त्यामुळे स्त्री अपत्यांचे जीवापाड रक्षण करते.पुरुष त्यामानाने उदासीन असतो.
(या उदासीनतेच्या संदर्भात ज्ञानेश्वरीतील दोन ओव्या अशा: ..आणि प्रजा जे जाली। ते वसती कीर आली। गोरुवे बैसली रुखातळी॥..एर्‍हवी दारागृहपुत्री।नाही जया मैत्री।तो जाणपा धात्री।ज्ञानासि गा।(अ.१३.५९६,५९९)
**मी टोळी प्रमुखाचे ऐकले,टोळीतील बहुसंख्य वागतात तशी वागले, तर मी आणि माझी अपत्ये जिवंत राहाण्याचा आणि पर्यायाने जनुकसातत्य राखण्याचा, संभव अधिक हे स्त्रीला अनुभवाने उमगलेले असते.
**टोळीतील बहुसंख्यांचे विचार परंपरागतच असतात.स्त्री त्यांच्यांशी जुळवून घेते.त्यांचे विचार रुचले नाहीत, नवीन विचार सुचले तरी बंड करीत नाही. कारण जनुकसातत्य राखण्याची प्रेरणा तीव्र असते.
** वरील कारणांमुळे स्त्री अधिक धर्मनिष्ठ असते.
...इथे आदिम नैसर्गिक ऊर्मीच्या संदर्भात पाहिले पाहिजे.आजच्या स्त्रीचे विचार भिन्न असतील-आहेतच.पण मूलभूत नैसर्गिक ऊर्मी तशीच असावी.अर्थात या सर्वांवर मात करून परंपरा झुगारून देणार्‍या स्त्रिया पूर्वी होत्या. आजही आहेतच.पण परंपरांविरुद्ध बंड करणार्‍या पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांची संख्या जगभर खूपच कमी आढळते.

लेखनविषय: दुवे:

Comments

स्त्रियांची रूढीप्रियता

आपल्या मताला कोठून तरी ओढून ताणून पुरावा आणण्याचा हा प्रकार वाटतो. स्त्रिया जास्त धार्मिक असतात कारण त्यांचे जनुक त्यांना तसे करण्यास भाग पडतात हे मला पटत नाही. स्त्रियांची धार्मिकता ही वर्षानुवर्षे पुरुषांनी त्यांच्यावर लादलेली आहे. त्यांना आर्थिक स्वातंत्र्य नसल्याने त्यांना पुरुषांवर आवलंबून रहावे लागत असे व त्यामुळे पुरुष सांगतील त्या गोष्टी त्यांना कराव्या लागत. आधुनिक अर्थार्जन करणारी स्त्री पुरुषाप्रमाणेच धार्मिक किंवा अधार्मिक आहे. लहानपणापासून झालेले संस्कार, आजूबाजूचे वातावरण याचा तो परिणाम आहे. त्याला उगीच जैविक (बायालॉजिकल) कारणे देत बसण्यात अर्थ नाही.

चन्द्रशेखर

गेम थिअरी

आपण थोडक्यात व चपखलपणे दिलेली कारणपरंपरा पटण्यासारखी आहे.
अनेक वागण्याचे पैलू , जे पूर्वी संपूर्णपणे समाज व मानसशास्त्राच्या कक्षेतले समजले जायचे, ते अशा प्रकारची कारणपरंपरा वापरून जीवशास्त्राच्या कक्षेत येत आहेत. (उत्तम उदाहरण म्हणजे गरोदर असताना उलट्या का होतात - फ्रॉईडचे म्हणणे - स्त्रीला नको असलेला गर्भ ती बाहेर टाकण्याचा प्रयत्न करते. जीवशास्त्र म्हणते की ती सुरक्षा यंत्रणा आहे, गर्भाला अपाय होऊ नये म्हणून अधिक काळजी)

मादीची अपत्य निर्मितीची क्षमता अगदी मर्यादित असते.......पुरुष त्यामानाने उदासीन असतो.

यात मी थोडी अशीही भर घालेन की नुसती क्षमता मर्यादित असते असं नाही, तर शारीरिक गुंतवणुक खूप अधिक असते. दुसरा भाग असा आहे की अपत्याची आई कोण हे निश्चित असते पण पितृत्वाची शाश्वती नसते. त्यामुळेही अपत्याची काळजी घेण्याचे काम करणे हे आईच्या दष्टीने गुणकांच्या गणितात जितके फायद्याचे असते तितके पुरुषाच्या दष्टीने नसते. हेही त्या उदासीनतेच्या 'धोरणा'मागचं (गेम थिअरीची स्ट्रॅटेजी) एक कारण आहे. त्यातून पुरुषाने अन्न मिळवण्याचा प्रयत्न करणे, व स्त्रीने मुलांची काळजी घेणे अशी विभागणी होते. एकदा ती विभागणी झाली की ध्रुवीकरण होऊन स्त्रीचं परावलंबित्व वाढतं. त्यातून बायकांची 'चालवून घेणे' व पुरुषांची 'सत्ता चालवणे' या गेम थिअरीच्या अर्थाने परस्परपूरक स्ट्रॅटेजी किंवा धोरणं तयार होतात.

ही कारणं सर्वसाधारणपणे स्त्री ही समजूतदार व पुरुष आक्रमक असण्यासाठी योग्य आहेत. आपण म्हटल्याप्रमाणे धर्माच्या बाबतीही याचा मोठा हातभार आहे हे निश्चित. पण तो किती टक्के व संस्कारांचा हिस्सा किती हे निश्चित सांगता येईल असे नाही. तरीही स्त्री-पुरुषांच्या सामाजिक भूमिकांमधल्या भेदांना जीवशास्त्रीय कारणं असू शकतात हा गेल्या काही दशकांतला विचार आहे. असं विचारता येईल की या नैसर्गिक ऊर्मींवर मात करून समानतेच्या पातळीवर आणण्याइतकी संस्कारांमध्ये शक्ती आहे का? (मला हो, आहे अस वाटतं)

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

उर्मी विरुद्ध् संस्कार

असं विचारता येईल की या नैसर्गिक ऊर्मींवर मात करून समानतेच्या पातळीवर आणण्याइतकी संस्कारांमध्ये शक्ती आहे का? (मला हो, आहे अस वाटतं)

यातुन उर्मी पक्षी:प्रेरणा ही संस्कारापेक्षा अधिक प्रभावी आहे कि प्रेरणा. जर संस्कार अधिक प्रभावी ठरले कि म्हणणार कालौघात झालेला जनुकिय बदल. नाही ठरली तर म्हणणार याचा बीजे ही जनुकिय इतिहासात.
शास्त्रज्ञांना देखील ठाम उत्तर देणे अवघड वाटते.
कुत्रा गादीवर बसताना देखील स्वतःभोवती गोल फिरताना दिसतो. याची बीजे नेमकी कशात आहेत?

प्रकाश घाटपांडे

प्रश्न नीट कळले नाहीत.

जर संस्कार अधिक प्रभावी ठरले कि म्हणणार कालौघात झालेला जनुकिय बदल. नाही ठरली तर म्हणणार याचा बीजे ही जनुकिय इतिहासात.

संस्कार प्रभावी ठरण्याने जनुकीय बदल कालौघात झाला आहे हे कसं सिद्ध होतं? कालौघात नष्ट झालेला? काही तरी टाईप करण्यात दोष झाला असावा असं वाटतं.

दुटप्पीपणाचा फायदा शास्त्रज्ञ घेताहेत असं म्हणायचं आहे असं वाटलं. एका घटनेला दोन कारणं जबाबदार असणं ही काही नवीन बाब नाही. त्यांचं नक्की प्रमाण माहिती नसणं हेही काही नवीन नाही. दहा हजार वर्षापूर्वीच्या एका शेतकऱ्याने म्हटलं की पाणी असलं की पीक चांगलं येतं. दुसरा म्हणाला नाही सूर्यप्रकाश असायला लागतो. तिसरा म्हणाला शेळ्या बसवाव्यात. आता या तिन्हींचं 'प्रमाण' माहिती नसताना कोणी 'या तिन्ही आवश्यक आहेत' म्हटल्याने तिटप्पीपणा होत नाही. ठाम उत्तर देणं अवघड आहे यात वादच नाही. काही वेळा या गोष्टी इतक्या गुंतलेल्या असतात की ७०% हे आणि ३०% ते असं वेगळं काढताही येत नाही. पण काही वर्षांपूर्वी जनुकांचा या बाबतीत काही संबंध असेल अशी कोणी कल्पनाही केली नव्हती. आता काही सबळ कारणं सापडलेली आहेत.

कुत्रा गादीवर बसताना देखील स्वतःभोवती गोल फिरताना दिसतो. याची बीजे नेमकी कशात आहेत?

हा प्रश्न ऱ्हेटॉरिकल आहे हे कळलं, पण प्रयोजन कळलं नाही. खुलासा करावा.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

कार्यकारणभाव

उत्क्रांतीत गरज नसलेली गोष्ट हळु हळु नामशेष होते यासाठी माकड ते माणसाच्या प्रवासातील शेपटीचे उदाहरण दिले जाते.मनुष्य हिंस्त्र श्वापदासारखे वागतो त्यावेळी तो मूळ श्वापदच आहे मेंदु व संस्कार विकसित होत आजचा माणुस बनला अशी देखील मांडणी केली जाते. श्रीराम लागु ही मांडणी करत असतात. कार्यकारण भाव शोधण्याच्या प्रयत्नात हा संस्कार कि पिंड अशा चर्चा होतात. सैद्धांतिक बाबी त्रिकालाबाधीत सत्य असतात असे मानणे अवैज्ञानिक ठरेल.
कुत्र्याबाबत मी ऐकलेले स्पष्टीकरण असे की ही कुत्रा हा रानावनात फिरतान पालापोचोळा असायचा व तो गोल फिरल्याने एक सुरक्षित चाचणी होते हे कुत्र्यांच्या पिंडाचा भाग आहे तोच पुढे जनुकिय प्रवृत्ती म्हणुन संक्रमित् होत गेली. अधिक माहिती / मते जाणुन घेण्यासाठी हा प्रश्न. यात प्रयोजन वगैरे काही नाही. उपक्रमावर चर्चा करण्याचे जे प्रयोजन असेल तेच इथे फारतर म्हणता येईल
प्रकाश घाटपांडे

पिंड की संस्कार

कुत्रा हा रानावनात फिरतान पालापोचोळा असायचा व तो गोल फिरल्याने एक सुरक्षित चाचणी होते हे कुत्र्यांच्या पिंडाचा भाग आहे तोच पुढे जनुकिय प्रवृत्ती म्हणुन संक्रमित् होत गेली.

कुत्रे असं वागतात हे , व त्याच्या स्पष्टीकरणाची ही मांडणी मला माहीत नव्हती. धन्यवाद. मी त्या वाक्यातनं 'असल्या गोष्टींचा काथ्याकूट करण्यात काय अर्थ आहे' असा चुकीचा अर्थ काढला होता. क्षमस्व.

कार्यकारण भाव शोधण्याच्या प्रयत्नात हा संस्कार कि पिंड अशा चर्चा होतात. सैद्धांतिक बाबी त्रिकालाबाधीत सत्य असतात असे मानणे अवैज्ञानिक ठरेल.

हे दोन्ही खरं आहे. बऱ्याच वेळा 'ही अमुक वागणुक हे वाईट संस्कारांचं द्योतक आहे का - ते सुधारण्यासाठी समाजात, संस्कारात काय बदल करायला हवेत' या हेतूने हे शोध घेतले जातात. संस्कार की पिंड - एक अथवा दुसरं टोक शोधणं हे खूप बाळबोध वाटतं. दुखापत झाल्यावर वेदना होणं ही पूर्ण पिंडाची बाब आहे. ती वेदना होत असताना लढणं की रडत बसणं - हे थोडं पिंड पण बरंच संस्कारांनी ठरतं. या दोहोंच्या परिणामातून वागणूक कशी घडते हे पाहाणं महत्त्वाचं. आजकाल जैविक कारणांचं योगदानदेखील आहे हे अधिक स्पष्ट होत चाललेलं आहे.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

जनुकांचा संबंध

जनुकांचा संबंध स्त्रियांच्या धर्मनिष्ठेशी लावणे रोचक वाटले. सध्या ते चूक की बरोबर हे मी माझ्या या विषयातील अत्यल्प ज्ञानामुळे ठरवू शकत नाही.

स्त्रीच्या उदरातून जन्मलेली अपत्येच तिच्या जनुकांची वाहक असू शकतात.पुरुषाच्या बाबतीत तसे नसते.त्यामुळे स्त्री अपत्यांचे जीवापाड रक्षण करते.

स्त्रिया अनेकदा इतरांच्या अपत्यांचा सांभाळही अतिशय प्रेमाने करतात आणि त्यांचे जीवापाड रक्षण करतात असे दाखले दिसतात. पन्नादाई, महम अंगा, धाराऊ अशा अनेक व्यक्ती इतिहासात आणि त्यांच्यासारख्या व्यक्ती वर्तमानातही आढळतील. त्यामुळे स्त्रिया आपल्या अपत्यांचे रक्षण जिवापाड करतात हे १००% पटले नाही. स्त्रियांची नैसर्गिक प्रवृत्तीच तशी असावी असे आपले मला वाटते.

अवांतरः

मी टोळी प्रमुखाचे ऐकले,टोळीतील बहुसंख्य वागतात तशी वागले, तर मी आणि माझी अपत्ये जिवंत राहाण्याचा आणि पर्यायाने जनुकसातत्य राखण्याचा, संभव अधिक हे स्त्रीला अनुभवाने उमगलेले असते.

टोळीप्रमुखावरून आठवले. टारझनच्या गोष्टीत टोळीप्रमुख करचॅकच्या विरुद्ध जाऊन काला मानवपुत्राचा सांभाळ करते. ;-)

अतिअवांतरः

एडगर राईस बरोच्या मूळ कथानकाची ऐशीतैशी करून डिस्नेपटात काला करचॅकची बायको दाखवली आहे. ती खरे तर, टबलटची बायको आणि करचॅकहा टारझनच्या आईवडिलांचा मारेकरी.

सूचना: अवांतर आणि अतिअवांतर वेळ होता म्हणून उगीच लिहिले आहे. टारझनविषयी अधिक माहिती हवी असल्यास खरडवहीत प्रश्न विचारावे किंवा ती माहिती इतरत्रही ;-) मिळेल.

स्त्रिया अधिक धर्मनिष्ठ?

मला नाही वाटत.
धर्मनिष्ठेबद्दल बोलताना भोळेपणा आणि श्रद्धा/अंधश्रद्धा बाजूला ठेवू.

पण काही एक ठराविक नियम (रूटीन म्हणून) पाळणे हे बर्‍याचजणांना सुखकर होते असे दिसते.
यात स्त्रिया आणि पुरूष दोन्ही आले.
उदा. उपास करणे. काकड-आरतीला जाणे. इ. इ.
लहान मुलांनाही रूटीन असावे असे म्हणतात. बर्‍याचदा रूटीन नसलेल्या गोष्टी मुलांना आवडतातच असे नाही, पण ठराविक आनंददायक रूटीन नक्कीच आवडते.
ही प्रेरणा लहान मुली आणि मुले या सर्वांत समान असावी असे वाटते.

यात जनुकांचा संबंध लागत असेलही, त्याबद्दल माझे काही म्हणता काही वाचन नाही.
पण स्त्रिया अपत्यांच्या सांभाळासाठी, संरक्षणाच्या प्रेरणेतून धर्मनिष्ठ असतात हे बरोबर वाटत नाही.
माझ्या मते धर्माचे जे मूळ कारण आहे की माणसाला समूह करून राहणे आवडते, त्यात त्याला सुरक्षित वाटते, तर ते येथे येते. स्त्रियांना त्यातून वेगळे काढता येणार नाही.
रोज सकाळी अनेक शहरांमध्ये चालणारे लाफ्टर क्लबचे मेंबर, सकाळी व्यायामानंतर मग रूपाली-वैशालीत जाऊन एकत्र बसून इडली-डोसा खाणारे पुणेकर मित्र (अर्थात हे हल्ली चालत नसले तर माझे पुण्यातल्या हल्लीच्या "इन" (बरिस्ता?) ठिकाणांची कल्पना नाही असे म्हणा!), या सर्वांना एकप्रकारचे (वेगळ्या चालिरीती सांभाळणारे (धर्म पाळणारे?) समूहच मानले पाहिजे. त्यात समूहाच्या चालिरीती पाळण्याची इच्छा दिसते. ती स्त्रिया व पुरूषांमध्ये सारखीच असावी असे माझे मत आहे!

समूहप्रियता हीच जनुकीय सातत्यास पोषक, असे काही म्हणणे

मानवाची समूहप्रियता जनुक-सातत्याशी (वंशसातत्याशी) संबंधित आहे, असे काही गृहीतक घेतल्यास वरील विरोध काही प्रमाणात विरोधाभास झाल्याचे दिसते.

स्त्रीला आणि पुरुषाला मांसाच्या गोळ्याला जन्म देण्यात निश्चित भिन्न प्रकारचे श्रम घ्यावे लागतात. (आणि कदाचित शिशुसंगोपनातही). काही वर्षांसाठी माता हीच बालकाचा समूहाशी दुवा बनून राहाते. म्हणून समूहाशी स्त्री-पुरुषांचे संबंध वेगवेगळ्या प्रकारचे असू शकतील, समूहप्रियतेचे प्रकटन वेगवेगळ्या प्रकारे होऊ शकत असेल...

- - -

नर आणि माद्यांच्या सामाजिक वागणुकीमध्ये फरक असतो. वंशसातत्याच्या वेगवेगळ्या धोरणांमुळे वागणूक भिन्न असते, असे काही जनावरांमध्ये आणि सूक्ष्मप्राण्यांमध्ये दाखवले गेले आहे. (लंगूर नर वेगळ्या नराच्या अपत्यांना मारून टाकतो, माद्या मात्र एकमेकांच्या अपत्यांची काळजी घेतात, वगैरे.) मनुष्यांच्या वागणुकीतही स्त्री-पुरुष यांच्यात समाजात प्रचंड भेद दिसतात. त्यांच्यापैकी कित्येक भेद जीवशास्त्रीय असावेत. पण कित्येक भेद जीवशास्त्रीय नसून केवळ बदलत्या रूढी आहेत, हेसुद्धा खरे.

परंतु अमुक एक भेद (उदाहरणार्थ - धार्मिकतेमधला भेद) जीवशास्त्रीय आहे, हे मनुष्यांमध्ये प्रायोगिकरीत्या सिद्ध करणे नैतिकदृष्ट्या शक्य नसते. वरील लेखातल्या कल्पना रोचक आहेत, पण त्या पूर्णपणे पटणे-पटवणे कठिण आहे.

विरोधाभास होतो आहे हे खरे,

पण आधी मुळात प्रश्न असा विचारायला हवा आहे की स्त्रिया अधिक धार्मिक असतात हे सिद्ध झालेले आहे का?!
मला तर पुरूषच अनेकदा अधिक रूढीप्रिय दिसलेले आहेत! घरातल्या कामांचे विभाजन झाल्याने घरगुती धार्मिक कामे स्त्रिया करतात असे दिसते, त्यात स्त्रियांना अधिक धार्मिक म्हणायला नको.
स्त्रियांचे पॅसिव्ह वागणे हे इतरही बर्‍याच बाबतीत असले, तर ते केवळ धार्मिक बाबतीत वेगळे काढता येणार नाही असे मला वाटले, एवढेच.

डर्विनवादानुसार विश्लेषण

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.चन्द्रशेखर म्हणतात"प्रत्येक गोष्टीसाठी उगीच जैविक कारणे शोधत बसण्यात अर्थ नाही." त्यांचे हे म्हणणे ठीकच आहे. प्रत्येक बाबतीत अशी कारणे शोधणे व्यर्थ ठरेल हे खरे. परंतु संपूर्ण मानव समाजात अथवा जीव सृष्टीत जेव्हा समाईक गोष्टी आढळतात आणि त्याचे अन्य् समाधानकारक स्पष्टीकरण सापडत नाही तेव्हा डार्विनवादाकडे वळणे इष्ट ठरते.आता माणसाच्या अनेक वर्तणूकप्रकारांचे विश्लेषण उत्क्रांतीच्या सिद्धान्तानुसार करता येते. संपूर्ण मानव समाजावर देव आणि धर्म यांचा एव्हढा प्रभाव का? विज्ञानात मोठी प्रगती होऊनही तो प्रभाव प्रदीर्घकाळ कसा टिकला? खरे तर देव धर्म या गोष्टी तर्काधिष्ठित नाहीत. डार्विनच्या सिद्धान्तात याचे उत्तर मिळू शकते. आज तसे प्रयत्न चालू आहेत.
स्त्रिया आणि पुरुष या सर्वांवर धर्मरूढींचा प्रभाव आहेच. पण स्त्रियांवर तो अधिक प्रमाणात दिसतो. त्याचे एक संभाव्य कारण शोधण्याचा प्रयत्न या लेखात आहे. श्री. राजेश घासकडवी म्हणतात त्याप्रमाणे हे प्रश्न व्यामिश्र आहेत.एकच एक कारण नसते. अनेक कारणांतील एक संभाव्य कारण हे.
श्री.राजेश घासकडवी यांनी त्यांच्या"सरलतेतून क्लिष्टतेकडे " या त्यांच्या अप्रतिम लेखमालेच्या ४थ्या भागात लिहिले आहे:"... स्वतः टिकून राहाण्यासाठी त्यांनी बनवलेली यंत्रं म्हणजे आपण आहोत. मनुष्य पुनरुत्पादनासाठी गुणसूत्र वापरतो हे... खोटं आहे. गुणसूत्र पुनरुत्पादना साठी मनुष्याला वापरतात. आपल्याला त्यांनी बनवलं. आपल्या असण्याचं कारण तेच आहेत. निमित्त तेच आहेत. "
हे पटण्यासारखे आहे. त्यमुळे मूलकारणाच्या शोधार्थ डार्विनवादाचा आधार घेणे स्वाभाविक आहे.

रोचक्

विषय रोचक आहे.
प्रबोधन जितके जास्त होईल तितका धर्माचा पगडा कमी होत जाईल. समाजातल्या शोषित वर्गावर, शैक्षणिक आणि पर्यायाने आर्थिक दृष्ट्या निम्नस्तरीय वर्गावर धर्माचा पगडा जास्त असतो असे मला वाटत आलेले आहे. (या वाटण्याला कसला आधार आहे हे सांगता येणे कठीण आहे. )

वरील गृहीतके ग्राह्य धरली तर स्त्रियांच्यावरील धार्मिक प्रभावाचा विचार , या सामाजिक असमतोलाच्या अनुषंगाने करता येणे शक्य आहे. एकाच घरातल्या मुलांमधल्या मुलग्यांना शिकण्याच्या , जगाचा अनुभव घेण्याच्या संधी जास्त मिळतात. सगळा असमतोल तिथूनच सुरू होतो.

मात्र, या सामाजिक पॅटर्नचे जनुकीय स्पष्टीकरण देणे रोचक वाटले.

सिंहांचा दाखला

सिंहाचा दाखला
सिंहाच्या टोळीत एक नर सिंह व अनेक माद्या असतात.सर्व माद्या ब‍याचवेळी एकमेकांच्या आया, मावश्या, बहिणी अशाच असतात. छावकांमध्ये नर-मादी दोनही असतात. नर मोठे झाले म्हणजे त्यांना टोळीतून हाकलून दिले जाते. माद्या टोळीतच रहातात. सर्व माद्या एकमेकींची पिल्लांची
मायेने देखभाल करतात. सिंह नर म्हातारा झाला वा दुर्बळ झाला तर बाहेरचा नर सिंह येऊन याला मारतो वा हाकलून देतो. आता टोळीतल्या माद्या या नवीन प्रमुखाशी जुळवून घेतात.इथे एक महत्वाची गोष्ट घडते म्हणजे नवीन नर टोळीतल्या सर्व लहान छावकांना ठार मारतो. याचे कारण असे दिले जाते की आपली पिल्ले लहान आहेत तो पर्यंत मादी नवीन नराबरोबर मिलनास उत्सुक नसते.मात्र तीची पिल्ले नवीन नराने मारली तर ती नवीन नराबरोबर मिलनाला तयार होते. नर पहिली पिल्ले मारतो कारण त्याला स्वत:चा वंश वाढवावयाचा असतो, पहिल्या नराचा नव्हे तर मादीला पिल्ले वाढवावयाची असतात, कोणत्या नराची याचे तीला मह्त्व नसते. ( सिंहात "धर्म" नसावा !)
यावरून नित्कर्ष काय काढावयाचा ?
शरद

सिंहसमूहाचे वर्तन

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.शरद यांनी सिंहसमूहाच्या वर्तनाविषयी लिहिले आहे ते निरीक्षणसिद्ध सत्य आहे.त्यामुळे चर्चा प्रस्त्तावातील विचाराला पुष्टीच मिळते.मात्र "सिंहाला धर्म नसावा " असे लिहिले आहे त्याचा संबंध समजला नाही. स्वजनुकसातत्याची नैसर्गिक प्रेरणा धर्मामुळे निर्माण होत नाही. ती सर्व सजीवांत स्वाभाविकपणे असते. धार्मिकतेचा स्वीकार जनुकसातत्य टिकविण्यास सहाय्यभूत ठरत असेल तर स्त्री तिच्या बुद्धीला पटत नसून सुद्धा धर्माज्ञा आणि धर्मतत्त्वे यांचा स्वीकार करते असे चर्चालेखात प्रतिपादन आहे.

संबंध

सिंहाला धर्म नसावा
याचा संबंध माझे निरिक्षण थोडेसे अवांतर आहे त्याच्याशी आहे.चर्चा विषय आहे मानवी स्त्रीबद्दल व धर्म.तमाम जनावरांच्या माद्यांबद्दल नव्हे. जेंव्हा जनुकाबद्दल उल्लेख येतो तेव्हा तो फक्त मानवी स्त्रीबद्दल न रहाता सर्व जनावरांबद्दल येतो. तेव्हा मानवी स्त्री व सिंहीण यांची तुलना करणे योग्य आहे की नाही, व काही नित्कर्ष काढावयास हा संदर्भ उपयोगी आहे का ? हे मी विचारले आहे.
शरद

वंश

मागे कोठेतरी वाचलेले...
प्रत्येक पुरुषात/नरात क्ष आणि य गुणसूत्रे असतात. त्यापैकी य गुणसूत्रे बापाकडून येतात आणि ती बापाकडून जशीच्या तशी येतात. या वस्तुस्थितीमुळे प्राण्यंमध्ये आणि मानवांमध्ये नराची माझा वंश ही भावना असते. तशी भावना माद्यांमध्ये नसते. म्हणून नवा नर जुन्या नर बछड्यांना पिल्लांना मारतो.
हे खरे आहे का?

नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)

क्ष व य

जर य पुरुषाकडे बापाकडून जसेच्या तसे आलेले असले तर क्ष हे आईकडून जसेच्या तसे आलेले असते... मुलीमध्ये दोन्हीकडून क्ष येतात. पण त्याचा संबंध 'माझा वंश'शी लावणं तितकंसं बरोबर नाही. क्ष व य हे जरी आई व बापाकडून स्वतंत्र आले असले तरी मुलाच्या लैंगिक जडणघडणीत दोन्हीचा हातभार असतो. उदाहरणार्थ - मुलाच्या जननेंद्रियाची लांबी ही त्याच्या "आईकडून" आलेली असणं शक्य असतं. म्हणजेच क्ष चा त्यात हातभार असतो. गुणसूत्रं ही तशी गमतीदार असतात.

नवा नर जुन्या बछड्यांना मारतो कारण ते उघड उघड दुसऱ्या नराचे असतात. जर तो व ती मादी नवीन जीव उत्पन्न करणार असतील तर त्यांना स्पर्धा नको हेच केवळ कारण असतं.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

डिट्टो

क्ष गुणसूत्र जसेच्या तसे येत नाही असे वाचले होते.
दोन सख्ख्या भावांची क्ष गुणसूत्रे (म्हणजे क्ष गुणसूत्रांचा भाग) वेगवेगळी पण य गुणसूत्रे तंतोतंत सारखी आणि ती वडिलांप्रमाणे असतात असे वाचले होते.

नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)

क्ष व य

Each person normally has one pair of sex chromosomes in each cell. Females have two X chromosomes, whereas males have one X and one Y chromosome. Both males and females retain one of their mother's X chromosomes, and females retain their second X chromosome from their father. Since the father retains his X chromosome from his mother, a human female has one X chromosome from her paternal grandmother (father's side), and one X chromosome from her mother.
विकीपीडियातून

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

क्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्ष
क्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्ष
क्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्ष
क्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्ष
क्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्ष
क्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्ष

चांगली चर्चा

समाजसुधारणांच्या चळवळींमुळे, विचारांमुळे , स्त्रियांनी बंड केले असे समजत होतो. स्त्रीला मिळालेले दुय्यम स्थान यातून तिचा पुढे येण्याचा मार्ग तिने शोधला असे वाटायचे. मात्र, धर्मातील आचार विचार पाळण्याचा संबंध 'जनुकीय' असेल तर परंपरेच्या बंडाला मर्यादा आली असती असे वाटते.

बाकी चर्चाप्रस्ताव आणि प्रतिसाद माहितीपूर्ण आहेत.

-दिलीप बिरुटे

स्त्रियांची धार्मिकता

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
"स्त्रिया आणि धर्मनिष्ठ ?"असा प्रतिप्रश्न चित्रा यांनी विचारला आहे.या प्रश्नाचे गर्भित उत्तर "स्त्रिया धर्मनिष्ठ नसतात" असे येते.अर्थात हे कोणाला मान्य होईल असे वाटत नाही. चर्चाप्रस्तावातील धर्मनिष्ठ हा शब्द कदाचित योग्य नसेल. धार्मिक, धर्मरूढीप्रिय,धार्मिक परंपरांचे जतन करणार्‍या असे शब्द अधिक समर्पक ठरले असते. पण जगभरात स्त्रिया या पुरुषांपेक्षा अधिक धार्मिक असतात असे मत प्रचलित आहे. ते साधार असावे.
"स्त्रियांप्रमाणे पुरुषही धार्मिक असतात" असे चित्रा म्हणतात ते खरेच आहे. जगात देव धर्म न मानणार्‍यांची संख्या २०% च्या आसपास आहे. पुरुषापेक्षा स्त्री अधिक धार्मिक असते याचा अर्थः जगातील
( धार्मिकस्त्रीसंख्या/(एकूण स्त्रीसंख्या)>( धार्मिकपुरुषसंख्या/(एकूण पुरुषसंख्या)
असा आहे.

आपल्या समजण्यात गोंधळ होतो आहे.

"स्त्रिया आणि धर्मनिष्ठ ?"असा प्रतिप्रश्न चित्रा यांनी विचारला आहे.

मी असे विचारले नसून "स्त्रिया अधिक धर्मनिष्ठ?" असे विचारले आहे. आपण लिहीलेल्या "आणि" मुळे अर्थ बदलतो, हे मान्य व्हावे.

पुरूषांपेक्षा स्त्रिया अधिक धर्मनिष्ठ (आपण म्हटलेले सर्व अर्थ धरून) नसाव्यात असे मला वाटते. (माझ्या अनुभवांवरून) - त्याबद्दल आपले मत वेगळे आहे पण त्याचा आदर आहे.

व्यक्तिगत...

चित्रा यांचा हा व आधीच्या प्रतिसादातला आक्षेप बरोबर आहे.
मूळ लेखात "असे असून आजही जगातील सर्वच प्रमुख धर्मांच्या स्त्रिया पुरुषांपेक्षा अधिक धार्मिक आहेत.अधिक रूढिप्रिय आहेत. धार्मिक परंपरा जपणार्‍या आहेत. " हे वाक्य पुराव्याशिवाय, आकडेवारीशिवाय येते. आपण जी आपल्याला अपेक्षित गुणोत्तराची तुलना दाखवली आहे ती काही पद्धतीने सिद्ध करता येत नाही तोवर ते व्यक्तिगत मत आहे असे गृहित धरणे भाग आहे. त्यामुळे लेखाचा गाभा "स्त्रिया सोशिक असतात, हे सर्वमान्य असावे. त्या धार्मिक बाबतीतले अन्याय सहन करतात. अन्याय चालवूनही धर्म पाळण्यामागे ही जैविक कारणे असू शकतील". अधिक त्रास - पण समान रुढीप्रियता हेही कारण देण्यालायक आहे.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीराय
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

धर्मनिष्ठा

धर्मनिष्ठा म्हणजे नेमके काय याचा आधी खुलासा व्हायला हवा. त्याचा अर्थ धर्माचा सखोल अभ्यास करून त्याने प्रतिपादन केलेल्या तत्वांचे निष्ठेने पालन करणे असा घ्यायचा की समूहाच्या बरोबर रहायचे एवढाच घ्यायचा?

माझे असे निरीक्षण आहे की प्रस्थापित नियम ( मग ते धार्मिक/ नैतिक असोत किंवा इतर बाबतीतले असोत) मोडायला स्त्रिया फारशा उत्सुक नसतात. एकंदरीतच त्यांची धोका पत्करायची कमी तयारी असते. त्याला वाटले तर सावधगिरी म्हणावे नाही तर भित्रेपणा. त्या मानाने पुरुष अधिक बिन्धास किंवा बेपर्वा असतात. कदाचित त्यांचे स्टेक्स कमी असतील. यां नैसर्गिक वृत्तीचा जनुकाशी संबंध असू शकेल. पण जनुकसातत्य वगैरे तर्क ओढून ताणून आणल्यासारखे वाटतात.

 
^ वर