इस्लाम -धर्म की राजकीय विचारसरणी?

डच मेंबर ऑफ् पार्लमेंट् गिर्ट् विल्डर्स् यांनी काही वर्षांपूर्वीच्या आपल्या "मुक्त लोकशाही युरोपियन् जगतातील मुस्लिम उपद्रव" यावर भाषण करताना असं म्हंटलं होतं की इस्लाम हा धर्म आहे या भ्रमात कोणी राहू नये. त्यात देव व इतर संबंधित संकल्पना आहेत हे खरं. पण खर्‍या अर्थानी इस्लाम ही एक राजकीय विचारसरणी आहे. ती एक अशी व्यवस्था आहे जिच्यात प्रत्येक व्यक्ति व समाजासाठी अगदी बारीक सारिक नियमही घालून दिलेले आहेत. तिला मानवी जीवनाच्या प्रत्येक अंगावर ताबा ठेवायचा आहे. शारियासाठी झटणार्‍या इस्लामचं व्यक्तिस्वातंत्र्य व लोकशाही यांच्याशी जुळण्यासारखं नाही. इस्लामची कशाशी तुलनाच करायची असेल तर ती एकपक्षीय हुकुमशाहीचा पुरस्कार करणार्‍या कम्युनिझमशीच होऊ शकते.

१३ जानेवारी २०१० च्या टाइम्स् ऑफ् इंडियात मुस्लिम गटाच्या निषेध मोर्चावर ब्रिटननी बंदी घातली या शीर्षकाची बातमी प्रसिद्ध झाली होती. त्यात असं म्हंटलं होतं की हा गट मुस्लिम म्हणून ब्रिटनचे कायदे आपल्यावर बंधनकारक नाहीत असं मानतो आणि त्याचा ओसामा बिन् लादेन आणि अल् कायदा यांना पाठिंबा आहे.

वरील बातमी आणि जगभरातल्या बिगर इस्लामी राष्ट्रातील मुस्लिमांचा पर्सनल् लॉ विषयीचा हेकेखोरपणा गिर्ट् विल्डर्स् यांचं म्हणणं अधोरेखित करीत नाहीत काय?

आपणास काय वाटतं?

लेखनविषय: दुवे:

Comments

प्रतिनिधित्व

एखादा मुस्लीम गट हा सगळ्या मुस्लिम जगताचे प्रतिनिधित्व करतो असे मानण्याचे कारण नाही.
प्रकाश घाटपांडे

असा गट आहे का?

बिगर-मुस्लिम राष्ट्रात कालबाह्य रूढी / शारिया आम्हाला नको किंवा समान नागरी कायदा हवा म्हणून जाहीरपणे सांगणारा (व त्यासाठी मोर्चा काढणारा) एखादा मुस्लिम गट अस्तित्वात आहे काय? बहुसंख्य मुस्लिम याबाबतीत मतलबी मौन बाळगून आहेत असं वाटतं.

"मुक्त लोकशाही युरोपियन् जगतातील मुस्लिम उपद्रव"

वरील बातमी आणि जगभरातल्या बिगर इस्लामी राष्ट्रातील मुस्लिमांचा पर्सनल् लॉ विषयीचा हेकेखोरपणा गिर्ट् विल्डर्स् यांचं म्हणणं अधोरेखित करीत नाहीत काय?

हो १००%....पण आपण काहि बोलु शकतो का? आपण हे भारतात सागु शकत नाहि...

दहशतवादविरोधी फतवा

प्रसिद्ध मुस्लिम अभ्यासक डॉ. ताहीर अल् काद्री यांनी २ मार्चला दहशतवादविरोधी ६०० पानी फतवा जाहीर केला. मुस्लिम धर्मीय दहशतवादाचा तीव्र विरोध करत नाही, कुराणात हिंसाचारास वैध मानले आहे असे आरोप वारंवार केले जातात. या पार्श्वभुमीवर हा फतवा महत्त्वपूर्ण ठरावा. डॉ. काद्री यांनी अतिशय स्पष्ट शब्दात धर्माच्या नावाखाली होणार्‍या हिंसाचाराचा कुराणातील दाखले देवून विरोध केला आहे. त्यांचे ८० मिनिटांचे भाषण मूळापासून ऐकण्यासारखे आहे. येथे पहिला भाग देऊन इतर भागांचे दुवे देत आहे.

भाग २
भाग ३
भाग ४
भाग ५
भाग ६
भाग ७
भाग ८

________________________________
माझा प्रतिसाद या मार्गदर्शक सूचनांशी सुसंगत आहे का? नसल्यास कृपया खरड अथवा व्यनिने कळवा.

 
^ वर