मराठीपुस्तके.ओर्ग या या उपक्रमाबद्द्ल
मराठीपुस्तके.ओर्ग या www.marathipustake.org या उपक्रमाबद्द्ल.
माझा मित्र राहुल प्रकाश सुवर्णा व मी यांनी साधारण वर्षभरापूर्वी हा उपक्रम सुरु केला. तत्पूर्वी साधारण वर्षभर माझ्या मनात याबद्दलची कल्पना आली होती. राहुलने हो म्हटल्यावर त्याला मूर्त स्वरुप आले. यामागील पार्श्वभूमी थोडिशी ऍतिहासिएक आहे. युरोपात गुटेनबर्ग नावाचा एक माणूस होऊन गेला. सध्या आंतरजालाने जी माहिती तंत्रङ्यानात (हे काय झाले? संपादकहो चूक सुधारा) जी क्रांती झाली तशीच किंवा त्यापेक्षा जास्त मोठी क्रांती गुटेनबर्गने पहिला (?) छापखाना टाकून केली. युरोपाने जगापुढे धाव घेतली त्यास गुटेनबर्गचा छापखाना आणि त्याने बाहेर काढलेले ङ्यान हे एक महत्वाचे कारण मानले जाते. या ङ्यान क्रांतीला अरब लोकही तितकेच जबाबदार होते. अरबांनी जगभरचे ङ्यान एकत्र केले, उत्तमोत्तम ग्रंथांचामा आपल्या भाषेत अनुवाद केला. हे सर्व ग्रंथ त्यांनी एका पुस्तकालयात ठेवले होते. यादरम्यान एका लढाईत त्यांचा पराभव झाला आणि हे पुस्तकालय युरोपच्या हाती लागले. यात गुटेनबर्गची भर पडली आणि उत्तम ङ्यान युरोपात खुले झाले. हे सगळे साधारण साताआठशे वर्षांपूर्वी
झाले. आता माहितीजाल आल्यानंतर काही जणांनी गुटेनबर्गचा वारसा चालवायचे ठरवले. यातून www.gutenberg.org या महत्वाच्या उपक्रमाची भर पडली. या उपक्रमात आज २५०००वर पुस्तके आहेत.
मराठीत असे काही घडावे याबद्दल मला वाटायचे. पण ते काही एकट्याचे काम नाही. थोड्याशा वॅयक्तिक ओळखीतून आम्ही हे सुरु करायचे ठरवले. सुदॅवाने आमचे पाठीराखे चांगले खमके निघाले. ज्यावेळी आमच्याकडे चारपाच पुस्तके जमा झाली त्यावेळी आम्ही या संकेतस्थळाची सुरुवात केली. काही मिळाले काही गळाले असे करत आम्ही थोडीफार वाटचाल केली आहे. मराठी साहित्याचा आवाका पाहिला तर डोंगराएवढे काम दिसते आहे. कदाचित हळुहळु पण नेटाने काम करणारे आम्हाला लागतात. याबद्धलची माहिती आमच्या संकेतस्थळावर आहेच.
हे काम क्ररताना आम्ही काही नियम केले. एक म्हणजे काम युनिकोड मधे करायचे , दुसरे स्वामित्व हक्काचा भंग करायचा नाही, तिसरे म्हणजे स्क्यान न करता टंकन करायचे (म्हणजे मेमरी कमी लागते व अंतर्गत शोध घेता येतो.)
'उपक्रम' ची सदस्य मंडळी तंत्रविषयक पुढारलेली आहेत असे वाटले. म्हणून त्यांच्या साठी खालील आर्जव.
मराठी स्पेल चेकर मिळाला तर आमचे काम खूपसे सुकर होईल.
विविधलोकांनी आपल्या वॅविध्यपूर्ण शॅलीत आपापले फॉटस तयार केले आहेत त्यासर्वाना एकतत्रित आणणारी प्रणाली (स्वस्त, टिकाऊ व सर्वव्यापी) मिळणे. यामुळे गावगन्ना टंकन करणारे आम्हाला उपलब्ध होतील.
अम्हाला मोठ्या प्रमाणात अंधशाळांकडून अशी मागणी आहे की ही पुस्तके युनिकोड ब्रैल मधे तयार करा. तर त्यासाठी लागणारा मराठी युनिकोड ते मराठी व्रैल युनिकोड कनवर्टर मिळवणे.
आपण सर्वजण चांगले सुविद्य आहात. कित्येकांकडे चांगला पुस्तक संग्रह असावा. तर चांगली पुस्तके सुचवा पण कृपया स्वामित्व हक्काचा विचार करून सुचवा. स्वामित्व हक्काचे एक साधे गणित आहे पुस्तक कर्ता मृत होऊन साठ वर्षे व्हावी लागतात.
अम्हाला स्वामित्व हक्कातून सूट देणारे पण भेटतात. (सध्या आमच्या संकेतस्थळावर रघुवीर साम्ंतांची तशी दोन बुस्तके आहेत.) असेही सुचवले तरी चालेल पण तशी परवानगी मिळवावी लागेल.
धन्यवाद
प्रमोद् सहस्रबुद्धे
Comments
लेखक/कवी
आपला उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. टंकलेखन सोपे करू शकलात तर मी त्यासाठीही मदत करू शकेन. आपण ओ.सी.आर. विषयी काही चौकशी केलेली आहे का?
जुन्या - म्हणजे संतकवी वगैरे सोडून - लेखक/कवींमधली खालील नावे सुचतात (अर्थात यातली बरीच तुम्ही विचारात घेतली असतीलच)
लक्ष्मीबाई टिळक
बालकवी
हरी नारायण आपटे
राम गणेश गडकरी
मर्ढेकर (अजून ६ वर्षांनी)
बहिणाबाई (अजून १ वर्षाने)
राजेश
अरे देवा....
मराठी पुस्तके . ऑर्ग वर Reported Attack Site असा संदेश येत आहे.
This web site at www.marathipustake.org has been reported as an attack site and has been blocked based on your security preferences.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
==================
खरंय
मलाही हाच अनुभव आला.
सेम अनुभव्
एरर येतोय :(
-दिलीप बिरुटे
ब्लडहाउंड वायरस
ब्लडहाउंड वायरसने बाधीत आहे ही साईट. तरीही हा प्रकार नवा वाटतो कारण या आधी मी हे संकेतस्थळ वापरले आहे आणि त्यावेळी असा अनुभव आला नाही.
थोडे अधिक (महत्वाचे)
सर्वप्रथम या प्रकल्पास मनःपुर्वक शुभेच्छा!
अजून मला देखील हे संकेतस्थळ पाहण्याची उत्सुकता रोखून ठेवावी लागली आहे. वर सौरभदांनी लिहीलेल्या प्रतिसादात थोडे अधिक गुगलच्या माहीतीनुसार:
यातील काही गोष्टींचे स्त्रोत देताना चीनचेच (.सीएन) दिले आहेत फक्त एक स्त्रोत .इन चा दिसला...
मात्र त्याच बरोबर खालील वाक्ये दिलासा देणारी आहेतः
थोडक्यात हा साईटच्या बाहेरून हल्ला आहे. कदाचीत मायक्रोसॉफ्ट सर्वर/सॉफ्टवेअर जर वापरत असाल तर असे होण्याची शक्यता अधिक असेल असे थोड्याफार माहीतीवरून वाटते...
तेंव्हा आपल्या प्रकल्पाच्या संकेतस्थळाची काळजी घ्या आणि एकदा का हा प्रश्न सोडवलात की येथे कळवा ही विनंती.
परत एकदा मनःपुर्वक शुभेच्छा!
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.सर्वप्रथम या प्रकल्पास मनःपुर्वक शुभेच्छा! प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.सर्वप्रथम या प्रकल्पास मनःपुर्वक शुभेच्छा! प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.सर्वप्रथम या प्रकल्पास मनःपुर्वक शुभेच्छा! प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वाप्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.सर्वप्रथम या प्रकल्पास मनःपुर्वक शुभेच्छा! परू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.सर्वप्रथम या प्रकल्पास मनःपुर्वक शुभेच्छा! प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.सर्वप्रथम या प्रकल्पास मनःपुर्वक शुभेच्छा!
--------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
छान!!!
मला दिसले. छान स्थळ आहे. आधी एकदा बघितल्यासारखे वाटते आहे. 'सभासदाची बखर' उतरवून घेतली आहे.
बिपिन कार्यकर्ते
शुभेच्छा
गेल्या आठवड्यात डिएन्ए मधे बातमी वाचली होतीच. साईट आणि कल्पना स्तुत्य आहे. तांत्रिक मदत करण्यास असमर्थ असलो तरी प्रकल्पास मनापासून शुभेच्छा व प्रुफे तपासण्यास गरज असेल तर मदतीस तयार आहे! (व्यनीवर बोलु)
ऋषिकेश
------------------
भ्रष्टाचार संपविण्याचा सर्वोत्तम आणि सर्वात सोपा(?) उपाय म्हणजे त्यात स्वतः सहभागी न होणे
सावध शुभेच्छा
कल्पना अतिशय उत्तम असली तरी काही धोक्याचे कंदील दाखवावेसे वाटतात.
अशी साईट स्वतःच्या पैशाने दीर्घकाळपर्यंत चालवणे / वाढवणे खरोखरच फार कठीण असते. जागतिक स्तरावर चाललेल्या विकीबुक्स प्रकल्पाबाबत आपले काय मत आहे?
http://mr.wikibooks.org
तिथे काही पुस्तके पूर्वीपासून उपलब्ध आहेत.
वर बर्याच लोकांनी उल्लेख केलेल्या सुरक्षाविषयक बाबींची दक्षता घेणे, साईट हॅक होण्यापासून रोखणे, लोकांच्या वाढत्या डिमांड पुर्या करणे, त्यांच्या अपेक्षांना पुरे पडणे, आपण स्वतःहून दिलेली आश्वासने पुरी करणे अशा या कधीच न संपणाऱ्या यादीचा पुढे बोजा वाटू लागतो.
जर काही विशेष हरकत नसेल तर शक्यतो विकी प्रकल्पात आपले योगदान द्यावे. अशा प्रकल्पांना मिळणारे मर्यादित सहकार्य पाहता स्वतंत्र चूल मांडणे सर्वांच्याच द्दष्टीने हितकारक वाटत नाही.
सहमत
मी शंतनू यांच्या मताशी पूर्ण सहमत आहे. विकी बुक्स बरोबरच 'माय ई-बूक्स' हे असेच एक उत्तम संकेतस्थळ आहे. मी लिहिलेली व संकलित केलेली काही पुस्तके(मराठी व इंग्रजी) या संकेत स्थळावर ठेवली आहेत. सहा ते आठ महिन्यात या संकेतस्थळावर, माझ्या पुस्तकांना 25000 पासून 75000 पर्यंत व्ह्यूज मिळाले आहेत. त्याचप्रमाणे SCRIBD च्या संकेतस्थळावरही मराठी पुस्तके ठेवता येतात. व्ह्यूज बरे मिळतात.
चन्द्रशेखर
धन्यवाद
मिळालेल्या प्रतिसादातून खूप शिकायला मिळाले.
पहिले: व्हायरसबद्दल. दिलेल्या सूचनेनुसार आम्ही सर्वर बदलण्याचा प्रयत्नात आहोत. यापूर्वीचे आमचे प्रयत्न फसले होते. आशा आहे की हे प्रयत्न सफल होतील.
दुसरे: क्षमतेबद्दल: "अशी साईट स्वतःच्या पैशाने दीर्घकाळपर्यंत चालवणे / वाढवणे खरोखरच फार कठीण असते." हे खरेच आहे. बघुया कितपत जमते ते. नाहीतर विकीबुक्स/गुटेनबर्ग आहेच.
तिसरे: "जागतिक स्तरावर चाललेल्या विकीबुक्स प्रकल्पाबाबत आपले काय मत आहे?" प्रकल्प उत्तमच आहे. पण सध्याची स्थिती पाहिली तर मी गुटेनबर्गला वरचा क्रमांक देईन. या प्रकल्पांच्या व्यापाबद्दल व मिळालेल्या प्रतिसादाबद्दल जेवद्गे कौतुक करावे ते थोडेच आहे. मला फक्त एवढेच वाटले की मराठी नाव असेल आणि मराठी लोक चालवत असतील तर स्वाभिमानी मराठी माणूस जरा पटकन धाऊन येईल. अर्थात मला बाटते ते खरे असेल असे नाही. विकीबुक्स (मराठी विभागाचे) काही खटकले. एकतर पुस्तकांचे विस्कळीत व अपुरे भाग तिथे भरपूर आहेत. (गुटेनबर्ग मधे तसे नाही.) दुसरे म्हणजे स्वामित्वहक्काची (कॉपीराईट) पायमल्ली होत असावी असा संशय येतो.
चौथे: लेखकांच्य्ता निवडीबद्दल: दिलेल्या सूंचानांबद्दल आभार. अशाच अनेक सूचना करत जाव्यात.
प्रमोद सहस्रबुद्धे