आळवार संत, तामिळनाडू

आळवार

तामिळनाडूमध्ये वैष्णव पंथात दोन भेद आहेत. एक आचार्य परंपरा मानतो तर दुसरा आळवार परंपरा मानणारा. आळवार हे प्राचिन वैष्णव संत आणि कवी. आचार्य अनेक आहेत पण आळवार फक्त बारा. त्यांची नावे कालानुक्रमे
१. पोयगई
२. भूततार
३. पेय
४. तिरुमळिसै
५. नम्म
६. मधुरकवी
७. कुलशेखर
८. आंडाळ
९. पेरी
१०. तोंडरडिपोडी
११. तिरुप्पाण
१२. तिरुमंगयी.
तामिळ ग्रंथांनुसार यांचा काल इ.स.पूर्व ४२०० ते इ.स.पूर्व २७०० पण ऐतिहासिक पुराव्यांवरून यांचा काळ इ.सनाचे ४ थे ते ९ वे शतक असावे. पहिले चार प्राचीन, नंतरचे पाच मध्ययुगीन व शेवटचे ती ऐतिहासिक समजले जातात. हे सर्व जाती-जमातीतील असून आंडाळ ही स्त्री आहे.
नालायिर दिव्य प्रबंधम् या तामिळ ग्रंथात सर्व आळवारांच्या गीतांचा संग्रह झाला असून, जवळजवळ ४००० पदांच्या ह्या संग्रहात तिरुमंगई याची १३६१ पदे आहेत. प्रबंधम् ला तामिळनाडूमधील वैष्णव पंथात गीते इतकाच मान आहे.
संपूर्ण शरणागती ही आळवारांनी भक्तीला दिलेली दिशा. पांचरात्र ह्या भक्ती संप्रदायात वासुदेव, व्युह, त्रिभव, अंतर्यामी व अर्च ही पाच रुपे मानली आहेत. आळवारांचा भर अर्चवर आहे. त्यांनी वेद व आगम यांचा समन्वय साधला आहे. सर्वभावे शरण जाणे हा मार्ग सोपा वाटला तरी दुष्कर आहे. त्याला बुद्धीचीही जोड लागते. हा भक्तीमार्ग सामाजिक आहे. तो जातीभेद वा वर्णाश्रम मानत नाही. शरण येणार्‍याला ईश्वर तारतो एवढेच त्यांचे मानणे.
रामानुजाचार्यांनी आळवारांची संपूर्ण शरणागती आपल्या प्रपत्तीच्या तत्वज्ञानात स्विकारली आहे.भक्तीयोगात वर्ण आणि आश्रम यांच्या मर्यादा आहेत पण प्रपत्तीत त्या नाहीत. प्रपत्ती मानवाला केवलज्ञानी बनवते व जळी-स्थळी त्याला ईश्वराच्या साक्षात्काराचा आनंद मिळवून देते.

शरद

लेखनविषय: दुवे:

Comments

वैष्णव-शैव

तामिळनाडूमध्ये वैष्णव शैव हाही वाद खूप तीव्र आहे असं ऐकलं होतं..त्याबद्दल काही माहिती मिळेल का?

अभिजित यादव
ता. कर्‍हाड जि. सातारा

 
^ वर