एसटीची इंटरनेटद्वारे तिकिट बुकिंग सेवा

मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते इंटरनेटद्वारे तिकीट बुकिंग सेवेची नुकतीच सुरुवात झाल्याची बातमी बर्‍याच जणांनी वाचली असेल. प्रवाशांना मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर आणि पंढरपूर या शहरांतील एकूण २७ बसस्थानकांतून सुटणाऱ्या २,३८३ बसेसचे आरक्षण या सेवेच्या माध्यमातून करता येईल. नोव्हेंबर २०१० पर्यंत एसटीच्या राज्यभरातील ३२७ बसस्थानकांतून सुटणाऱ्या सर्व बसेसचे आरक्षण या सेवेद्वारे करता येईल. या सेवेमुळे प्रवाशांना घरबसल्या एसटीच्या तिकिटांचे बुकिंग करता येईल. अमेरीकेतील बसेसचे आरक्षण भारतातूनच करता येऊ शकते असे तिकडे जाऊन आलेल्यांकडून मी ऐकले होते. एसटी चा ग्राहक वर्ग पाहता हे आरक्षण "युजर फ्रेंडली" असणे आवश्यक आहे.

http://msrtcors.com

मी वापरून पाहिले आणि मला तरी काही दोष दिसत नाही. आपल्यापैकी कोणी प्रत्यक्ष तिकीट काढून पाहिले आहे का?

Comments

चांगली वाटली

बातमी वाचली होती. आज आयती लिंक मिळाअल्याने नवी सुविधा बघितली.. दुवा दिल्याबद्द्ल आभार.
युजरनेम बनविले आहे. मात्र रात्रीचे ८ वाजून गेल्याने फार जास्त पुढे जाऊन बघता आले नाहि. मात्र जितके आहे तितक्या सुविधा / वावर / तपशील समाधानकारक वाटले.

एक मोठे व आवश्यक काम केल्याबद्दल यष्टीचे मनःपूर्वक आभार आणि अभिनंदन

ऋषिकेश
------------------
भ्रष्टाचार संपविण्याचा सर्वोत्तम आणि सर्वात सोपा(?) उपाय म्हणजे त्यात स्वतः सहभागी न होणे

चांगली सोय..!

एसटीची बुकींगची सुविधा चांगली असली तरी एसटीचे वेळापत्रक तिथे दिसत नाही.
प्रवास भाडे किती ते दिसत नाही.

-दिलीप बिरुटे

हे बघा चालेल का?

फ्रॉम टू टाका आणि सर्च करा --> मग येणार्‍या गाड्यांपैकी एक निवडा --> मग खाली भाडे बघण्यासाठी गेट फेअर वर क्लिक करा
शिवाय सर्च करते वेळी मधे वेळ टाका म्हणजे त्या वेळेच्या आसपास मिळणार्‍या गाड्या दिसतात. पूर्ण वेळापत्रक देता येईल की नाहि शंका आहे. मात्र प्रत्येक गाडीचे थांबे दिलेले आहेत

ऋषिकेश
------------------
भ्रष्टाचार संपविण्याचा सर्वोत्तम आणि सर्वात सोपा(?) उपाय म्हणजे त्यात स्वतः सहभागी न होणे

नै ना राव...!

>>फ्रॉम टू टाका आणि सर्च करा -->
AWBCBS(AURANGABAD) टू MUMBAI(MUMBAI)
दिनांक ११ जाने.२०१० केले. बस सर्वीस टाईप 'नाइट' केले.
निघण्याची वेळ २२:०० केले आणि सर्च केले. [वेळा बदलून पाहिल्या]

सर्चड् बस सर्वीस नॉट अव्हीलेबल येत आहे. :(

-दिलीप बिरुटे

बसचा प्रकार

रातराणी म्हणून जी साधी बस धावते तशी बस औ-मुं नसावी. सेमी लक्झरी टाकले असता २०.१५ ची बस दाखवते. भाडे ३१० रु + ७ रु आरक्षण शुल्क दाखवते. ३१ जनरल् + ६ महिला आसने उपलब्ध असल्याचेही दाखवते. :)

पण मेक पेमेंट वर क्लिक केल्यावर 'इनव्हॅलिड इनपुट' अशी एरर आली. त्यामुळे पेमेंट क्रेडिट कार्डावर की नेटबँकिंग मधून आहे ते कळले नाही. नेटबँकिंग असेल तर कोणत्या बँका ते कळले नाही. :(

नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)

पब्लिक सब्-डोमेन वरून पेमेंट

खाली दिलेल्या लिंकवरून लोग इन केल्यास पेमेंट करता येत आहे. वर मी दिलेल्या पत्त्यात काहीतरी घोटाळा आहे बहुतेक.

http://public.msrtcors.com/

दोन्ही डोमेन नेम दिसायला सारखे असले तरी "पब्लिक" या नावाचे जे सब-डोमेन आहे तेच फक्त पेमेंटसाठी (आतातरी) वापरता येत आहे. मी संबंधितांशी संपर्क साधून दोन्ही डोमेन वरून पेमेंट होईल अशी सोय करण्याची विनंती केली आहे.

खाते बनवले आहे

खाते बनवले आहे. बुकिंग करण्याची सुविधा चांगली वाटली. मला वाटतं की बरेच जण या सुविधेचा फायदा घेतील.






इन्वॅलिड इनपुट एरर

तिकिट बुक करताना सर्व माहिती भरल्यावर बिलडेस्कला कॉल ट्रान्सफर होताना इन्वॅलिड इनपुट एरर येते...

बाकी सर्व ठीक आहे..पण तिकिट काढता येणं महत्त्वाचं आहे..

अभिजित यादव
ता. कर्‍हाड जि. सातारा

अजून एक

अजून एक म्हणजे प्रत्येक थांब्यावर बस अंदाजे किती वाजता पोहोचेल ते कळत नाहि. कारण मधेच बस पकडायची असली तरी सर्च मात्र सुटायच्या वेळेवरच घेतला जातो.
आणि आय्.सी.आय्.सी.आय्. बँक नेट बँकिंगमधे नाहि आहे :(
हे कुठे कळवायचे?

ऋषिकेश
------------------
भ्रष्टाचार संपविण्याचा सर्वोत्तम आणि सर्वात सोपा(?) उपाय म्हणजे त्यात स्वतः सहभागी न होणे

ऑनलाईन आरक्षण आणि प्रवास: मिशन यशस्वी

मित्रहो..

वर दिलेल्या संकेतस्थळावरून आरक्षण करून यशस्वीरित्या पुणे ते कराड हा प्रवास करून आलो.

वाहकाजवळ असलेल्या प्रिंटवर माझे नाव होते. ट्रान्झॅक्शन आयडी वगैरे होता. ते माझ्याकडील इ-तिकिटाबरोबर जुळल्यावर त्याच्या कपाळावर समाधानाची रेघ उमटली.

जय महाराष्ट्र..

अभिजित यादव
ता. कर्‍हाड जि. सातारा

 
^ वर