देव म्हणजे कोण ?

देव म्हणजे कोण ?
???
???
नुकतेच माझ्या वाचनात बाळ भागवत यांच " देव छे | परग्रहावारील अंतराळ वीर " हे पुस्तक आले. पुस्तक वाचल्यावर डोक्यात गोंधळ माजला. हे अस होऊ शकत. एरिख फ्वोन डेनिकें यांचा असा सिधांत आहे की " आपण जय देव मानतो ते देव वैगरे कोणी नसून प्राचीन काळात ज्या परग्रहावारील अंतराळ वीरानी पृथ्वी ला भेटी दिल्या त्यानाच आपले पूर्वज देव मानायला लागले. " त्यासाठी डेनिकें यानी अनेक उदाहरने दिली आहेत. आणि ते आपल्या मतावर ठाम आहेत. त्यातील भरपूर उदाहरने मनाला अगदी सहज पटतात. आणि डोक्यात गोंधळ होतो.

मित्रहो तुम्हाला काय वाटत. देव म्हणजे कोण.........?????????

लेखनविषय: दुवे:

Comments

एक जुनी चर्चा आठवली

येथे वाचा.

एरिख फ्वोन डेनिकें हे आमचे आवडते एरिक व्हॉन डॅनिकेन असावेत. :-) त्यांच्याबद्दल नेटावर रकानेच्या रकाने भरलेले आहेतच. थोडी माहिती येथेही मिळेल.

बाकी राहिला प्रश्न देव म्हणजे कोण?

तर जगातील आपल्याला चांगली वाटणारी, आवडणारी, पटणारी, अडचणीच्या वेळेस कामास येणारी, ज्यावर आपण विश्वास ठेवून विसंबून राहू शकतो अशी व्यक्ती देव मानण्यास हरकत नसावी.

स्वतःला ___ व्हॉन हैनिकेन असे म्हणून घेणार्‍या एका जुन्या सदस्याचीही आज आठवण झाली. :-) चीअर्स!

एरिक व्हॉन डॅनिकेन

"एरिख फ्वोन डेनिकें हे आमचे आवडते एरिक व्हॉन डॅनिकेन असावेत."
असावेत नाही तेच ते .लिहिण्यात चुक झाली.
"पृथ्वीवर माणुस 'उपरा'च?" हे सुद्धा पुस्तक च आहे न...? चर्चा छान आहे. धन्यवाद् .
मला मराठी मध्ये एरिक व्हॉन डॅनिकेन यांच्याबद्दल नेटवर आणखी माहिती कुठे मिळेल ?

उपरा

>> पृथ्वीवर माणुस 'उपरा'च

हे पुस्तक वाचलेले नाही, नुसते नाव ऐकले आहे. परंतु केवळ माणूस उपरा असणे शक्य नाही. संपूर्ण पृष्ठवंशीय (व्हर्टिब्रेट) प्राण्यांचा वर्गच उपरा म्हणावा लागेल तरच माणूस उपरा म्हणता येईल. कारण सर्व पृष्टवंशीय प्राण्यांच्या आणि माणसांच्या स्ट्रक्चरल डिझाईनमध्ये प्रचंड साम्य आहे.

नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)

सहमत

तर जगातील आपल्याला चांगली वाटणारी, आवडणारी, पटणारी, अडचणीच्या वेळेस कामास येणारी, ज्यावर आपण विश्वास ठेवून विसंबून राहू शकतो अशी व्यक्ती देव मानण्यास हरकत नसावी.

काहीच हरकत नाही.

देव माझा लाडका ...

>>मित्रहो तुम्हाला काय वाटत. देव म्हणजे कोण.........?????????

इतके सुंदर | जग तुझे जर
किती तू सुंदर |असशील

देवा तु चराचर सृष्टीत इतके सुंदर सुंदर आकार दिलेत तु किती सुंदर असशील. परमेश्वरा, चराचरसृष्टीतलं तुझं अद्भुत वैभव पाहिलं की देवा तु काय आहेस त्याची कल्पना येते. देव म्हणजे परग्रहावरील लोक आहेत, अशा चर्चा वाचल्यावर देवा तुही हसत असशील. कोण्या एका कवीनं म्हटलं आहे की, 'घड्याळाची टकटक अतिशय बारीक असते; पण हा छिन्नीचा आवाज असतो. प्रत्येक बारक्या प्रहाराबरोबर घड्याळाची टकटक भविष्यकाळातीअल एकेक अणू उडवीत असतो'. मला मात्र प्रत्येक घटकेला जगरहाटीतील तुझ्या चमत्काराचे रुप नजरेला येते. खरं म्हणजे-

तुज सगुण म्हणू की रे निर्गूण रे
सगुण निर्गूण एकुचि गोविंदु रे

तुला सगुणरुपात पाहावं की, निर्गुण रुपात असा प्रश्न पडतो. संतानी दोन्ही रुपात पाहण्याची शक्ती दिली. स्थूल, सुक्ष्म,साकार,निराकार,व्यक्त आणि अव्यक्त या सा-याच रुपात आम्ही भक्त आपल्याला पाहतो. देवा तुझ्याशी -हदया -हदयी संवाद होतो. देवा तुला शोधण्याची फारशी गरज नाही.
कोणी संत म्हणून गेले की, 'देव जवळी असता जासी अनातीर्था’ आपल्यात असलेला 'आत्मारामाचा’ विसर पडतो.

अरे आमच्या नामदेवानं देवळात नैवद्य घेवून गेल्यावर जेव्हा विठ्ठल नैवद्य खाईना तेव्हा नामदेव डोके आपटू घ्यायला लागला तेव्हा नामदेवाचा हातचा नैवद्य विठ्ठलानं खाल्ला. ही आख्यायिका असली तरी, देवा तू कोणत्या तरी स्वरुपात भक्ताचे लाड पूर्ण करतो यावर आमचा विश्वास आहे.

विसोबा खेचर [संकेतस्थळावरील नव्हे] जेव्हा पिंडीवर पाय ठेवून होते तेव्हा, देव नसलेया जागेवर पाय उचलून ठेव असा संदेश विसोबा नामदेवाला देतो. त्याचा अर्थच असा की, तु सर्वत्र आहे. च्यायला, ज्यांचा अवघा प्रपंच देवमय झाला होता. त्या संत लोकांच्या देवावरील प्रेमाची आम्हा भक्ताला लै कमाल वाटती. 'कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी’ तसेच 'झाडलोट करी जनी, केर भरी चक्रपाणी’ अहाहा ! देवा, तु किती लहान-सहान कामे करतोस रे...झाडलोट करणा-या जनीला कचरा टाकायला मदत करतोस.

'केनोपनिषद' नावाच्या ग्रंथाची सुरुवात अशी प्रश्नानेच होते. 'केनेषितं पतति प्रेषितं मन: केन प्राण:....... अशी कोणती सत्ता आहे की, जिच्याने हे शरीर चालते ? प्राण तेवतो ? इंद्रिये कार्यान्वित होतात ? .......

माणसाच्या इंद्रियांवर ज्याची सत्ता चालते, ज्यामुळे इंद्रिये, प्राण, मन, बुद्धि, काम करतात ते एक तत्व चालविणारा असलाच पाहिजे असे आम्ही समजतो. अरे हा प्रतिसाद लिहितांना माझ्या मनातील इतर सर्व विचार ' काही क्षणासाठी लपवले गेले’ देवा तुझी सिष्टीम लैच भारी आहे. अरे देवा, तुकाराम महाराजही सांगून गेले की, 'आपुलिया बळे नाही बोलवत, सखा कृपावंत वाचा त्याची’ मी बोलत नसून माझ्या आत असलेली भगवत-शक्ती बोलते अशी समज निर्माण व्हायला हवी.

''आपल्या शास्त्रकारांनी तीन प्रमाणे सांगितली आहेत १) प्रत्यक्ष प्रमाण २) अनुमान प्रमाण ३) शब्दप्रमाण. कित्येक गोष्टी माणसाला प्रत्यक्ष पाहिल्यावर कळतात. पण ज्या गोष्टी प्रत्यक्ष समजत नाही. त्या अनुमानाने समजून घ्यायला हव्यात''.

असो, देव म्हणजे कोण यावर हजारो वर्षापासून काथ्याकूट होतोय. ज्यांना तु जन्माला घातलेस ते सर्व प्रश्न विचारणारे उत्तरे देणारे निघून गेले. पण, देवा तुझ्याबद्दल जन्मोनजन्मी संशोधन चालणार आहेत. कोणत्या तरी जन्मांतरीचे सुकृत कामाला येईल आणि देवा तुझे दर्शन होतील यावर आमचा विश्वास आहे.

सारंश; उपनिषदांचाही आग्रह आहे की, तुम्ही भगवंताला बाहेर न मानता स्वतःच्या आत आहे असे माना. गीता म्हणते 'सर्वस्यचाहं हृदि सन्निविष्टो..... ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः...... तु माझा अंश आहेस. प्रत्येकात इश्वराचा अंश भरलेला आहे. त्याला शोधायची गरज नाही.

संदर्भ १. केनोपनिषद् : पांडुरंगशास्त्री आठवले यांची प्रवचने, प्रकाशक: 'सद्विचार दर्शन्' निर्मल निकेतन मुंबई. प्रास्ताविक

२. तत्रैव पृ.क्र. ७७

-दिलीप बिरुटे
[देव भोळा आणि धार्मिक ]

देव

जे का रंजले गांजले । त्यासि म्हणे जो आपुले
तो चि साधु ओळखावा । देव तेथे चि जाणावा

सहमत

सहमत आहे.

देव रोकडा सज्जनी ||

सहमत.

तीर्थी धोंडा पाणी ||
देव रोकडा सज्जनी ||

मला माहीत नाही पण...

एरिख फ्वोन डेनिकें यांचा असा सिधांत आहे की " आपण जय देव मानतो ते देव वैगरे कोणी नसून प्राचीन काळात ज्या परग्रहावारील अंतराळ वीरानी पृथ्वी ला भेटी दिल्या त्यानाच आपले पूर्वज देव मानायला लागले. "

वरील वाक्यावरून खालील चित्रपट आठवला :-)

बाकी एरिख फ्वोन डेनिकें यांच्याच एका सिद्धांतावरून का जायचे? बाकी तशाच अर्थाची एक विज्ञानकादंबरी, "देवाशी जीवे मारीले" ही वाचल्याची आठवली. छान लिहीली होती...

तसेच आठवले : नरेन्द्र दत्त नामक विद्यार्थ्याने त्याच्या तत्वज्ञान शिकवणार्‍या एका ब्रिटीश प्राध्यापकास, तुम्ही देव पाहीला आहे का म्हणून प्रश्न विचारला. (हा प्रश्न त्याने सर्वच धर्मातील अनेक ज्येष्ठांना विचारला होता). प्राध्यापक महाशय म्हणाले, मी पाहीलेला नाही पण मला माहीत आहे कोण "पाहीला आहे" असे खात्रीने म्हणू शकेल ते. दक्षिणेश्वर मंदीराचा पुजारी - स्वामी रामकृष्ण परमहंस.

जाता जाता देव कोण यावर माडगुळकरांची प्रत्यक्ष नाही पण अप्रत्य़क्ष कविता पण छान आहे:

--------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

का जायचे?

"बाकी एरिख फ्वोन डेनिकें यांच्याच एका सिद्धांतावरून का जायचे?"
झाल. इथेच घोड़ पेंड खातय. अहो अगोदर पुस्तक तर वाचा. त्यानी असा सिधांत मांडला म्हणजे म्हणजे त्यांच्याकडे पुरावा नक्कीच असणार ना.....

वाचन

इथेच घोड़ पेंड खातय. अहो अगोदर पुस्तक तर वाचा. त्यानी असा सिधांत मांडला म्हणजे म्हणजे त्यांच्याकडे पुरावा नक्कीच असणार ना.....

अहो मी त्याचे पुस्तक नाही पण थोडेफार वाचले आहे. तसेच मी इतरही वाचले आहे. म्हणूनच मी कुणाच्याच विरुद्ध लिहीले नाही हे नीट वाचल्यास समजायला अवघड जाऊ नये. फक्त जे देवाच्या बाजूने सिद्धांत मांडतात त्यांचेपण वाचून अभ्यास करायला हवा ना? म्हणजे दोन्ही बाजू कळल्यावर तुलनात्मक अभ्यास होऊ शकतो. :-)

--------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

गदिमा

देव अंतरात नांदे, देव दाही दिशी कोंदे
देव आभाळी सागरी, देव आहे चराचरी
देव शोधूनिया पाही, देव सर्वाभूतां ठायी

देव मूर्तीत ना मावे, तीर्थक्षेत्रात ना दावे
देव आपणात आहे, शीर झुकवोनिया पाहे
तुझ्या माझ्या जड देही देव भरूनिया राही


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

एरिक व्हॉन डॅनिकेन

एरिक व्हॉन डॅनिकेन हे लेखक आपल्या वर्तक, ओक वगैरेंच्या पठडीतील लेखक आहेत. त्यांची पुस्तके सत्य शोधत जाणारी कधीच नसतात. पुस्तकाचा शेवट हा आधीच ठरवलेला असतो. त्या शेवटाच्या अनुषंगाने इतिहास व निरनिराळी निरिक्षणे ही फिरवून (ट्विस्ट करून) ते मांडत जातात. त्यामुळे वाचकांच्या मनात या सर्व लेखकांनी लिहिलेल्या पुस्तकांच्या विश्वासाहर्तेबद्दल नेहमीच शंका रहाते.
पेरू देशातील नाझ्का वाळवंटात मोठमोठ्या रेषा आखलेल्या दिसतात. उपग्रह किंवा विमानातून बघितल्यास माकड, मासे, पक्षी यांची ती चित्रे आहेत हे लक्षात येते. हा चित्रे कशासाठी काढली असावीत? याबद्दल अनेक सिद्धांत मांडलेले आहेत. त्यापैकी आकाशात दिसणार्‍या तारकासमूहांचे हे रेखाटन असून वसंतसंपात किंवा शरद संपात दिन अचूकपणे ठरवता यावा म्हणून ते रेखाटन केले असावे असा सिद्धांत तिथे अनेक वर्षे संशोधन करणार्‍या कै. मारिया राइशे यांनी काढला आहे.
एरिक व्हॉन डॅनिकेन मात्र या रेषा म्हणजे परग्रहावरून येणारी याने उतरवता यावी म्हणून तो एक स्पेसपोर्ट आहे असे म्हणतात. त्यांची विचारसरणी कशी चालते यासाठी हे एक उदाहरण.
चन्द्रशेखर

सिद्धांत

तुम्हाला काय म्हणायच की आपल्या पुस्तकांचा खप वाढवन्यासाठी हे असे लेखक उगाच काहीतरी लिहितात . जसा सिद्धांत तिथे अनेक वर्षे संशोधन करणार्‍या कै. मारिया राइशे यांनी काढला आहे. तसा एरिक व्हॉन डॅनिकेन यांनी सुद्धा आपला सिद्धांत त्या त्या ठिकाणी अनेक वर्षे संशोधन करुनच काढला आहे.आणि कदाचित त्या रेषा म्हणजे परग्रहावरून येणारी याने उतरवता यावी म्हणून तो एक स्पेसपोर्ट
असेल ही.......मला तरी पुस्तक वाचून अस असुही शकेल अस वाटतय.

एरिक व्हॉन डॅनिकेन, वर्तक, ओक

मला या लेखकांबद्दल काहीच म्हणायचे नाही. मी फक्त हे सर्व एका पठडीमधले आहेत एवढेच म्हणतो आहे. त्या लेखकांना त्यांचे वाचक आहेत. या वाचकांना त्यांची पुस्तके आवडतात व पटतात.
चन्द्रशेखर

मी आणि माझा देव

मी आणि माझा देव हे वि.शं. चौघुले संपादित पुस्तकात प्रत्येकाला भावलेले देव दिले आहेत.
प्रकाश घाटपांडे

एरिक व्हॉन डॅनिकेन, वर्तक, ओक...

मी एरिक व्हॉन डॅनिकेनचं पुस्तक असल्या कल्पनांनी भारून जायच्या वयात वाचलं आणि मग काही वर्षांनी थोडी जाण आल्यानंतर वाचलं. तेव्हा मला कळलं की "संपले बाळपण माझे...". त्याने शून्य पुराव्यांनिशी त्याला दिसलेल्या चित्रांचा, चिह्नांचा एकांगी अर्थ लावला आहे. विज्ञानकथा म्हणूनच ती कल्पना चांगली आहे. निदान एके काळी तरी होती - एव्हाना ती सुद्धा चावून चोथा झालेली आहे.

असो. देवाविषयी माझं मत विचाराल तर निसर्गात विज्ञानाचे नियम पाळले जातात ही कल्पना म्हणजेच देव...

राजेश

मी आणि माझा देव

जय श्री राम,
मी देखिल " देव छे | परग्रहावारील अंतराळ वीर " हे पुस्तक वाचले आहे, मी देखिल खुप भरकटले होते.
पण 'श्रीमद् भगवद् गीता' वाचली आणि सर्व शंकांचे निरसन झाले.
देव म्हणजे काही व्यक्ती वा जीव वा वस्तू नव्हे तर देव म्हणजे चैतन्य होय, देव म्हणजे अव्यक्त शक्ती होय,
तोच देव युगानुयुगे समस्त प्राणीमाञांच्या कल्याणासाठी अवतार घेत असतो.
म्हणजे तोच श्री राम होता, तोच श्री कृष्ण होता, तोच संत म्हणून अवतरला, आणि आजही तो अनेक ठिकाणी मनुष्य रूपात कार्यरत आहे.
हे आत्म्याचे शास्त्र आहे, पण ज्यांना केवळ मन, बुध्दी आणि देहच ठाऊक आहे ते वादच करत राहतील.
असो, धर्मग्रंथाचा आधार सुटला तर समाज भरकटतो, सध्याचे चित्र असेच होत आहे,
म्हणून धर्मग्रंथांचे जतन, श्रवण, मनन, आचरण करावे, हेच तारक आहे.

अंतराळवीर म्हणजेच देव

या सर्व संशोधकांनी एवढे संशोधन करून हे मांडले आहे, त्यात काही तरी तथ्य असेल की. आणि अपोलो मोहिमेतील अंतराळवीरांनी हे मान्य हि केले होते की चंद्रावर मोठी मोठी याने होती आणि कितीतरी प्रगत. आजही पिरामिड चे रहस्य मानवाला उकललेले नाही. एवढी मोठी बांधकामे व त्याचा कालखंड बघितला तर असे वाटते की, तशी बांधकामे करणे त्या वेळच्या मानवाला काय पण आज हि शक्य नाहीत. मग विचार करायला लावते की हे सगळे कोणी आणि का केले?
ज्यांना काही शंका आहे त्यांनी Allex Collier यांचे Defending Sacred Ground हे पुस्तक वाचा.

देवाची व्याख्या.

स्वर्गलोक, पुथ्वीलोक, पाताळलोकावर जो राज्य करतो तोच देव आहे, प्रथम तो ब्रम्हा, विष्णू, महेशची निर्मीती करुन प्रुथ्वीचा सर्व कारभार त्यांच्या स्वाधीन करतो. या व्यतिरीक्त जे काही असेल त्यांचे विमान भरकटलेले आहे....

 
^ वर