गोमुत्राचा उपयोगाबद्दल काही प्रश्न

हिंदू मान्यतेप्रमाणे 'गाय' या प्राण्याच्या अंगी अनेक दैवी शक्ती आहेत. त्यामानाने बैल मात्र मागे पडलेला दिसतो. असो.
गोमुत्राचा अनेक ठिकाणी उपयोग केला जातो. कदाचित त्यावर संशोधन झाले असावे वा होत असेल.

महाराष्ट्रात भंडारा येथे एका शाळेत दलित विद्यार्थ्यांच्या आणि शाळेच्या शुद्धीकरणासाठी गोमुत्राचा वापर करण्यात आला.

http://www.ibnlive.com/news/cow-urine-used-to-purify-kids/38918-3.html

खरोखरच गोमुत्रामूळे दलितांचे आणि शाळेचे शुद्धीकरण करता येते का?
गोमुत्रातल्या कोणत्या घटकामुळे असे शुद्धीकरण होते?
गोमुत्र उपलब्ध नसेल तर शुद्धीकरणासाठी काय वापरावे?

Comments

गोमुत्र आणि शुध्दीकरण

हिंदू धर्मात गाय पवित्र मानल्या जाते त्याला कारण तीच बहूपयोगीपणा. तीला काम धेनू म्हटल्या जातं ते तीच्या प्रत्येक अवस्थेत कामात येणार्‍या गुणांमुळे. गायी मधे देव राहतात यावर माझा विश्वास नाही. मात्र शेतीप्रधान भारतात जेथे हजारो वर्षांच्या सांस्कृतीक अभिसरणातून हा हिंदू धर्म तयार झाला त्या देशात कामात येणारा मित्र आणि उपकार करणारा देव अशी विचारधारा होती त्या देशात गायीला अनन्यसाधारण महत्व येणं अजिबात अनैसर्गीक नाही.

गायीचं दूध, गोमय आणि गोमुत्र ही आपल्या घरात सहज असणार्‍या बाबी असत. गायीच्या गोमयाच्या सारवणाने घरात वातावरण निर्मीती होते, गोमुत्राच्या आरोग्याविषयीच्या योगदानाला आता आधुनिक आरोग्यशास्त्र सुध्दा सलाम करतंय.
हे सगळं खरं आहे मात्र वर उल्लेख झालेली घटना म्हणजे शुध्द मुर्खपणा आहे. गोमुत्र हे औषध असेल ते माणसाच्या व्याधी दूर करेल मात्र शुध्दी नावाच्या प्रकाराशी गोमुत्राचा काहीही संबंध नाही. मला शुध्दी म्हणजे साबण किंवा राख मळून आपण जी शुध्दी करतो ती अपेक्षीत आहे. अन्य प्रकारची कसलीहीं धार्मीक शुध्दी मला मान्य नाही. मुळातच मानुस शुध्द आहे असं माझा धर्म मला सांगतो.
वर घडलेल्या प्रकाराचा निषेध असो. अश्या कुठल्याही प्रकाराचा आणि माझ्या धर्माचा संबंध नाही. हा प्रकार म्हणजे कुजक्या आणि असुरक्षीत मानसिकतेतून झालेला प्रकार आहे.

नीलकांत

अतिरेक

नीलकांत यांनी सांगितल्या प्रमाणे, गाय बहुपयोगी (हिंदू गोमांस खात नाहीत पण इतर धर्मात, गाय या कारणासाठी पण वापरली जाते.) आहे म्हणून तिचे महत्व. पूर्वी शास्त्रीय मुद्दे न समजावता ते आत्मसात व्हावेत या हेतुने पवित्र अपवित्र गोष्टी आल्या अन् त्यांचा अतिरेक झाला. प्रसिद्धी माध्यमे त्याचा आणखी अतिरेक करतात.
गाय या प्राण्याचे अनेक् उपयोग अन त्यावर अनेक संशोधने झालेली अहेत. माहिती मिळवायला जमल्यास लेख लिहायला नक्की आवडेल.

नीलकांत ह्यांच्याशी सहमत!

'गाय हा एक उपयुक्त पशू आहे ' असे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी एका ठिकाणी म्हटलेले आहे तेच खरे आहे. गोमुत्रामधे काय गुणधर्म आहेत किंवा नाहीत ह्याची शास्त्रीय पडताळणी केल्यास ते कळून येईलच.

महाराष्ट्रात भंडारा येथे एका शाळेत दलित विद्यार्थ्यांच्या आणि शाळेच्या शुद्धीकरणासाठी गोमुत्राचा वापर करण्यात आला .
हे विधान म्हणजे अज्ञानाचा आणि नीचपणाचा कळस आहे. अशा गोष्टींचा सार्वत्रिक निषेध व्हायला हवा आणि संबंधितांवर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे असे माझे ठाम मत आहे. जातीयवादाचे भूत गाडायचे असेल तर असला खुळचटपणा अजिबात सहन करता कामा नये!

गोमूत्र

'दलितांचे शुद्धीकरण' आदी प्रकार तद्दन मूर्खपणा आणि हीनपणा आहेत. पण गोमूत्राचे चांगले गुणधर्म सिद्ध झालेले आहेत. (रक्तातील साखर आटोक्यात ठेवण्यासाठी रोज एक चमचा गोमूत्र सेवन करावे असे ऐकले आहे.)
'संस्कारधन' या पुस्तकात शेणाच्या निर्जंतुक गुणधर्मांविषयी माहिती आहे. शेणातील फॉर्मलडीहाइड हे फिनेल वा डेटॉलसारखे काम करते असे वाचल्याचे आठवते.(कोणाकडे 'संस्कारधन' असल्यास वाचून खुलासा करावा.)
(डिसक्लेमर': सदर माहित्या ऐकीव व आठवणीतल्या, अधिक लेखी माहिती मिळाल्यावर विस्ताराने लिहेन.)
http://www.business-india.in/articles.php?file=gomutra.php
http://www.indiatraveltimes.com/frontpix/fp2005/fpmay05/cow_cosmetics.html

भरकटणे-भरकटवणे

सर्किट, चर्चा गोमुत्रा विषयी आहे. उद्या या बद्दल अमेरिकेतील या या विद्यापीठात असे असे संशोधन झाले म्हणून गोमुत्र असलेलीच औषधे घ्या असे सांगायला काही लोक कमी करणार नाहीत? कशाला उगाच चर्चा भटकवायची?

आयुर्वेदावर बंदी घालणारे ब्रिटीश आज त्याचा वापर करत आहेत हे आपल्याला माहीत नाही का? मुंबई मध्यल्या झोपड्यांचे फोटो काढून धिस इस इंडिया असे दाखवणारेच आज् सिक्स सिग्मासाठी तिथल्याच डबे वाल्यांचे कौतुक करतात.

वरिल उदाहरणे चर्चा विषयाला धरून नाहीत. त्या बद्दल क्षमस्व. पण उगाच सुतावरून स्वर्ग गाठू नका. नाहीतर असे हि म्हणाल कि रासायनीक प्रकिया महत्वाची म्हणून सगळे धान्य खावा अन शरीराचे तापमान वाढवा. ते शिजेलच...

अतिरेक - अंधानुकरण

कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वा अंधानुकरण वाईटच.
इतर (कदाचित हानीकारक) रसायने असलेले गोमुत्र प्राशन का करावे ? हा मुद्दा बरोबर आहे. पण त्यासाठी बेडुक मध्ये आणायची काय गरज? आपल्याला गाय आणि बेडकाची गोष्ट माहित असेलच. असो..

मुंबईतल्या झोपड्याअंचा येथे काय संबंध आहे, किंवा मिस इंडियाचा, किंवा सिक्स सिग्माचा, किंवा डबेवाल्यांचा, किंवा शरीराच्या तपमानाचा, ते कळले नाही. कृपया अधिक तपशीलाने सांगावे. यात मिस इंडिया कुठुन आली? हे व्यनि ने सांगा. हा विषय गोमुत्र या मुद्यावरच राहु देत.

शेण खाणे?

मी 'शेण खा' आदी बोलले नाही हो. (लहानपणी भांडण झाल्यावर करायचो तसे 'माझी मूठ उघडा!')
शेण जमिन सारवण्यासाठी व निर्जंतुकीकरणासाठी चांगले.
फॉर्मल डीहाइड चाटून पाहिले नाही कधी, पण त्याचे पुष्कळ विरलन केल्यास प्यायलाही उपयुक्त होईल असे वाटते.

फॉर्मलडीहाइड

'शेणात फॉर्मलडीहाईड असते' या विधानाचा अर्थ 'शेणात फॉर्मलडीहाइड व बरोबरच इतर काही उपयुक्त/काही उपद्रवी घटक असतात,ज्यांचा एकत्रित परीणाम म्हणून व फिनेल डेटॉलची ऐपत/शोध आलेला नसताना शेण जमिन सारवायला लोक वापरत. ' असा मी तरी घेते. शेण/गोमूत्र गुणकारी असेल तर अगदी शेणासारखे/अगदी गोमूत्रासारखे रसायन प्रयोगशाळेत बनवून ते चाटण्यास/जमिन सारवायला घेण्यास आमची हरकत नाही. ज्यांना शेण/गोमूत्र सोपेपणाने उपलब्ध होते/किंमत परवडत होती/जवळच मिळत होते/अँटीबायोटीक्स/ऍलोपाथीचे साइड इफेक्ट शरीराला झेपत नव्हते त्यांनी 'गोमूत्र आणि शेण हे अमृत आहे' असं म्हटलं तर त्यांची काय चूक? आणि त्याज्य पदार्थ म्हणाल तर्, कित्येक अँटीबायोटीक्सचा वास त्याहूनही भयंकर असतो. त्याज्य पदार्थ म्हणाल तर 'मंकी ब्रँड कॉफी' म्हणजेच माकडांनी कॉफीच्या बिया सेवन करुन् टाकलेली विष्ठा स्वच्छा करुन काढलेल्या कॉफीच्या बिया हा शोध चिकमंगळूर सफरीत लागला. शिवाय हा दुवा पाहिल्यावर कळते की सुगंधासाठी वापरला जाणारा हा पदार्थ व्हेलच्या आतड्यातून मिळतो.
http://en.wikipedia.org/wiki/Ambergris
http://en.wikipedia.org/wiki/Perfume#Animal_sources
http://www.profumo.it/perfume/aromatherapy/essential_oils/animals.htm
जर प्रत्येक गोष्टीमागचा आणि संस्करणामागचा उगम शोधत गेलो तर अनेक साधे खाद्यपदार्थ व प्रसाधने वापरणे मनाला त्याज्य वाटू शकेल.

शास्त्रज्ञ

आम्ही शास्त्रज्ञ नाही आणि रसायनशास्त्रात कामही करत नाही. तुम्ही म्हणता तसे शेणापासून रासायनिकरित्या फॉर्मलडीहाईड निर्माण झाले आणि आमच्या पर्यंत स्वस्तात पोहचले(ज्यांच्याकडे गाई आहेत त्यांना शेण फुकटात पडते!) तर तेही वापरु. जुने तेच सोने हा आग्रह नाही, पण जुना तो सर्व मूर्खपणा हा अट्टाहासही नाही.
१६०० साली ते का वापरले जात होते ही माहिती अद्याप आंतरजालावर मिळाली नाही, पन शोध अपघातानेच लागला असावा हा कयास आहे. ज्याच्या जमिनीवर शेण पडलेले असेल त्याच्या घरातील माणसांना तुलनेने कमी रोग आदी निरीक्षणातून. अधिक माहिती मिळाल्यावर कळवतो.
http://en.wikipedia.org/wiki/Cow_dung

वाद

"अहो, तुमच्याशी सहमत असताना (चांगले शीर्षकात 'अगदी बरोबर' असे लिहिले आहे) तुम्ही माझ्याशी वाद का घालताय हेच कळत नाही !:-)"
तुम्ही गोमूत्राचे गुण सांगणार्‍यांना मूर्खात काढून बेडूक आदी खायचे सल्ले देताय म्हणून!!! ह. घ्या.
(तसे वाद घालण्यात आम्ही भयंकर कच्चे आहोत. आता इथे वाद घालणे/प्रतिवाद घालणे हे म्हणजे उगीच जरा वेळ होता म्हणून..)गोमूत्र वापरणार्‍यांनी वापरा, न आवडणार्‍यांनी फॉर्मलडीहाईड थेट प्राशन करा, आमची काहीही हरकत नाही!!
(तुलसी लीफ ऑन द हाऊस ऑफ स्वीट मेकर!)

याचा तर खरं म्हणजे प्रशासकांनीच समाचार घ्यायला हवा होता.

अहो! मुळ चर्चेवर या!

मुख्य मुद्यात प्रश्न,
"खरोखरच गोमुत्रामूळे दलितांचे आणि शाळेचे शुद्धीकरण करता येते का?
गोमुत्रातल्या कोणत्या घटकामुळे असे शुद्धीकरण होते?
गोमुत्र उपलब्ध नसेल तर शुद्धीकरणासाठी काय वापरावे?"

म्हणजे याचे सामजिक परिणाम वगैरे विषयी लेखकाला काही घेणेदेणे दिसत नाही.
या प्रश्नातून असेही ध्वनीत होते जणूकाही असे करणे योग्यच आहे.

निर्लज्ज पणे "गोमुत्र उपलब्ध नसेल तर शुद्धीकरणासाठी काय वापरावे?" असा प्रश्न विचारला गेला आहे.
याचा तर खरं म्हणजे प्रशासकांनीच समाचार घ्यायला हवा होता.

मला खात्री आहे, चर्चा अजूनही याच प्रकारे पुढे गेली तर प्रशासक उपक्रम परत पवित्र करण्यासाठी "संपादनाचे गोमुत्र" शिंपडल्या शिवाय रहाणार नाहीत.

काय तात्या बरोबर ना?

"जय उपक्रम शुद्धीकरण!"

आपला
(अशुद्ध आणि अपवित्र) गुंडोपंत

मस्त रे!

"उगाच वाटी घेऊन गायीमागे फिरून तिची मनस्थिती बिघडवण्यापेक्षा, सरळ नळाचे किंवा विहीरीचे पाणि घ्यावे,आणि काय शुद्धी करायची आहे ती करावी. आम्ही तरी रोज आमच्या शुद्धीसाठी पाणीच वापरतो."

झकास!

आणी आम्ही कधी कागद कधी पाणी! (कागद बनवताना गायीचे शेण घालतच असणार!)
एकदम शुद्ध!
हा हा हा!

- गुंडोपंत

कशाला फिरता?

"उगाच वाटी घेऊन गायीमागे फिरून तिची मनस्थिती बिघडवण्यापेक्षा," गायीमागे कशाला फिरता? हल्ली पुण्यात बंद कुप्यांमधे सुद्धा मिळते विकत:-)

आणि एक प्रश्न

आपण एखाद्याला काही समजले नाहीतर मराठीत म्हणतो "अरे बैला, तुला काही कळते कि नाही?" मग एखादीला "अग गाये तुला काही कळते की नाही?" का म्हणत नाही?

अनेक पाश्चात्य लोकांना भारत म्हणजे फक्त भिकारी, अस्वच्छता अन असेच काही लहानपणा पासून शिकवले जाते, जात होते. जर एखाद्याला लहानपणापासून डोक्यात ठासून भरवले असले तर ते गायच का? काहीही असु शकते. विषय गोमुत्रासाठी सुरू आहे. आपल्याला काय नवल वाटते काय नाही या अभ्यासासाठी सुद्धा येथे चर्चा चालत असतील तर ते आमच्यासाठी नवीन आहे. उपक्रमाच्या धोरणात असे काही आहे का?

यु काउ!

"अग गाये तुला काही कळते की नाही?"
हो असं वापरले जाते!
अनेकदा मी मुर्खपण विषयी मुलीला/बाईला उद्देशून
'यु काउ' अस शब्दप्रयोग ऐकला आहे!

मराठी

अहो आम्ही मराठी बद्दल बोलतो आहोत. आमच्यासाठी "यु काउ" म्हणजे लहान मुल कावळ्याला बोलावते आहे असे वाटते.

कुमार अंगराग

अकोल्याच्या आदर्श गोरक्षण संस्थेने गेल्या आठ वर्षांपासून गायीच्या शेणापासून साबण बनवून त्याची विक्री केलेली आहे . त्याचे नाव कुमार अंगराग , ते आजही विक्री करताहेत. गोमय , मुलतानी माती आणि कडूलिंबाचा अर्क आदी नैसर्गीक सामग्री त्यात ते वापरतात. वरच्या पाकीटावर गायीचे चित्र असते आणि आत एक माहितीपत्राचा कागद ज्यात साबण कश्यापासून बनलेले आहे, ते कश्या कश्यावर गुणकारी आहे आदींची माहिती असते. असा कुठलाही कागद कुठल्याही बहुराष्ट्रीय कंपण्यांनी दिलेला आठवत नाही आणि त्यांच्यावर या विषयी दावा ठोकण्याचा विचारही कधी करण्यात आला नसेल. मात्र कुणाला गोमुत्र आणि मुळातच गायीविषयी माहिती हवी असेल तर
आदर्श गौरक्षण संस्था , माधव नगर , म्हैसपूर फाटा , अकोला . या पत्त्यावर संपर्क साधावा अनेक पुस्तके माहिती पत्रके आणि देशभर चालणार्‍या संशोधनाची माहिती येथे मिळेल.

हा विषय भरकटतोय हे खरं आहे. मात्र मुळ विषयावरील माझी प्रतिक्रिया मी आधीच दिलेली आहे. पण खरं सांगायचं तर 'आमचं' आहे म्हणून सगळंच डोक्यावर घ्यायचं , किंवा 'जुणं' आहे म्हणूनच सर्व ताज्य ह्या दोन्ही भुमिका योग्य नाहीत असं माझं मत. आपला धर्म आपल्या विवेकाला अधिष्ठाण मानायला सांगतो. तर् सुध्दा आम्ही पुरोगामी किंवा प्रतिगामी विचारधारेचं बिरूद लाऊन एकाच रंगाने जग पाहने कधी थांबवनार आहोत?

मी या आधीही हे बोललो आहे की कुठल्याही मानसाचे अथवा घटनेचे मुल्यमापन करतांना काळ हा फार महत्वाचा मुद्दा आहे. हिंदू समाजात जेथे शेती प्रमुख व्यवसाय होता तेथे सहज उपलब्ध असलेले शेण सोडून ही प्रयोगशाळेतील रसायने, खुप आधीचा विचार नको किमाण पन्नास वर्षे आधी तरी उपलब्ध होती का? मग हे नैसर्गीक अवस्थेत उपलब्ध असलेले शेण का वापरू नये? आणि हो जुण्या काळी मातीची घरे असायची तेथे सारवण नावाचा प्रकार असे. शेणात एक प्रकारचा चिकटावा असे जो या भिंतींच्या बाह्य आवरणाचे विदारण थांबवित असे. त्यामुळे शेणाचा उपयोग आधी खुप होता. आता काळ बदलला आज कुणीही हिंदू आपल्या सदनिकेत शेणाचे सारवण करनार नाही तो वर सांगीतल्या प्रमानेच दुकाणातून कुठलंतरी रसायण आणेल आणि शिंपडेल.

मुख्य फरक आहे तो काळाचा. मुळात जी घटना झालेली आहे. ती सुध्दा अश्याच सोळाव्या शतकातील मानसिकतेमुळे घडलेला प्रकार आहे. मात्र आपण आज त्यांना सोळाव्या शतकातील शिक्षा नाही देऊ शकत. आपण आजच्या काळातच रहायला हवं.

नीलकांत

मान्य

"हा विषय भरकटतोय हे खरं आहे. मात्र मुळ विषयावरील माझी प्रतिक्रिया मी आधीच दिलेली आहे. पण खरं सांगायचं तर 'आमचं' आहे म्हणून सगळंच डोक्यावर घ्यायचं , किंवा 'जुणं' आहे म्हणूनच सर्व ताज्य ह्या दोन्ही भुमिका योग्य नाहीत असं माझं मत."

हे १००% मान्य रे नीलकांता! पण एकदा एक भुमिकेचा चष्मा घातला, की तो काढायचा धीर होत नाही ना!

विषय भरकटतोय हे तर मी म्हणतोच आहे!
आपला
(चस्मिस) गुंडोपंत

सहमत

नीलकांत तुमच्याशी सहमत...

सहमत

मी सगळ्यांशीच सहमत आहे.
:)
पल्लवी

आमचं तुमचं..

पण खरं सांगायचं तर 'आमचं' आहे म्हणून सगळंच डोक्यावर घ्यायचं , किंवा 'जुणं' आहे म्हणूनच सर्व ताज्य ह्या दोन्ही भुमिका योग्य नाहीत असं माझं मत.

केवळ 'आमचं' आहे म्हणून डोक्यावर घेणे चूक असेल तर इतर देशोदेशींच्या प्राचीन संस्कृतींना आणि परंपरांना पण विचारात घेता का? आपल्या पेक्षा आरोग्यद्रुष्ट्या कितीतरी सरस असणार्‍या (आयुर्मर्यादा, बालुममृत्यू निकषांवर) जपान्यांचा संस्कृतीमध्ये बेडकाचे ताजे हृदय जे बेडकातुन विलग केले तरी कही काळ धडधडत असते ते जसे च्या तसे आतल्या रक्तासहीत खातात. आरोग्यदृष्ट्या ते अत्यंत गुणकारी देखिल समजले जाते. गोमुत्राचा प्रचार आणि प्रसार करणर्‍यांचे ह्याविषयी मत ऐकायला आवडेल. केवळ आमच म्हणून डोक्यावर घेण्याची कोती मनोवृत्ती नसणार्‍यांनी हे धडधडणारे रक्ताने भरलेले हृदय जरूर चाखून पाहावे.

बरोबर आहे

सर्किट रावांचा मुद्दा विचार करण्याजोगा आहे खास !
रम्या

चर्चा भरकटतेय

एकुणच प्रतिसाद पाहता चर्चा भरकटतेय असे वाटते. तीन अगदी साधे प्रश्न होते. त्यांची उत्तरे देण्याएवजी "सामाजीक परिणाम, माझे अज्ञानाचा आणि नीचपणाचा, माझा निर्लज्जपणा" यांचीदेखिल चर्चा झाली. एकूणच तज्ञांचा आभाव या चर्चेमध्ये दिसून येत आहे.

माझे प्रश्न असे होते:
१. खरोखरच गोमुत्रामूळे दलितांचे आणि शाळेचे शुद्धीकरण करता येते का?
२. गोमुत्रातल्या कोणत्या घटकामुळे असे शुद्धीकरण होते?
३. गोमुत्र उपलब्ध नसेल तर शुद्धीकरणासाठी काय वापरावे?

गुंडोपंत :
"म्हणजे याचे सामजिक परिणाम वगैरे विषयी लेखकाला काही घेणेदेणे दिसत नाही.
या प्रश्नातून असेही ध्वनीत होते जणूकाही असे करणे योग्यच आहे.
निर्लज्ज पणे "गोमुत्र उपलब्ध नसेल तर शुद्धीकरणासाठी काय वापरावे?" असा प्रश्न विचारला गेला आहे."

वर उल्लेखलेली घटना हि महाराष्ट्रात घडलेली आहे, आणि महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य असल्यामुळे जातीवाचक किंवा त्यास्वरूपाचे प्रकार महाराष्ट्रात घडत नाही असे माझे ठाम मत आहे. बरेचसे मनोगती उपक्रमाचेही सदस्य आहेत ते याला दुजोरा देतील.
त्यामुळे वरील घटनेकडे मी एक निंदाजनक वा नीचपणाची घटना म्हणून मी पाहत नाही.
दलिंताचे शुध्दीकरण करणार्‍या त्या शिक्षकांकडे मी आदराने पाहतो. जर खरोखरच त्यांच्या या कृतीमुळे दलितांचे शुध्दीकरण होत असेल तर त्याला विरोध कशाला? मग गोमुत्र काय कुणाची विष्ठा वापरली तरी इतरांचीच काय दलितांची देखिल हरकत नसावी.
मात्र शुध्दीकरणाची हमी द्यायला हवी म्हणजे "आतापासुन २ वर्षे तुम्ही शुध्द झालात, किंवा दररोज याचा वापर करावा लागेल अथवा आयुष्यभरासाठी शुध्दीकरण..."

अत्त्यानंद :
"महाराष्ट्रात भंडारा येथे...." हे विधान म्हणजे अज्ञानाचा आणि नीचपणाचा कळस आहे.
माझ्या विधानात अज्ञान व नीचपणा काय आहे हे मला समजले नाही. ती एक बातमी होती व तीच्या अनुषंगाने मी काही प्रश्न विचारले होते, मी विचारलेल्या प्रश्नात कदाचीत अज्ञान असू शकेल, कदाचीत म्हणूनच प्रश्न विचारले आहेत. परंतू माझ्या विधानात अज्ञान व नीचपणा काय आहे हे समजले तर बरे होइल.

चर्चा भरकटतेय

हेच तरी मी कधी पासून टाहो फोडून सांगतो आहे..

खैरलांजी विसरलात वाटते?

"वर उल्लेखलेली घटना हि महाराष्ट्रात घडलेली आहे, आणि महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य असल्यामुळे जातीवाचक किंवा त्यास्वरूपाचे प्रकार महाराष्ट्रात घडत नाही असे माझे ठाम मत आहे. बरेचसे मनोगती उपक्रमाचेही सदस्य आहेत ते याला दुजोरा देतील."

वा! काय स्वतःची (महाराष्ट्राची)पाठ थोपटून घेताय!
खैरलांजी विसरलात वाटते? का ते दिले मध्यप्रदेश ला?
आणी? दलितांचे शुद्धीकरण करणारे हे कोण? ते कशावरून शुद्ध?
दलित कशावरून अशुद्ध?
कोणाचे शुद्धीकरण व्हायला हवे आहे ते दिसतेच आहे.
जरा नीट विचार करा, मगच लिहा!

(संतापलेला) गुंडोपंत

गैरसमज!

मी दिलेल्या प्रतिक्रियेतील रोख हा 'पंकज' ह्यांच्यावरचा नसून 'दलितांना अशा प्रकारे शुद्ध करणे' असा जो त्या बातमीतल्या 'विधानाचा' सूर आहे त्याबद्दलचा आहे. पंकज ह्यांनी कृपया त्यांच्या मनातील गैरसमज दूर करावा ही विनंती!

मुळात माणूस म्हणून आपली सर्वांची ही जबाबदारी आहे की दलित आणि सवर्ण असा भेद न मानणे. सवर्ण हा शुद्ध आणि दलित हा अशुद्ध असे मानणे म्हणजे नीचपणा आहे असे मला म्हणायचे आहे.
माणूस शुद्ध अशुद्ध ठरू शकतो;पण तो त्याच्या कृतीने म्हणजेच चारित्र्याने! जन्माने नव्हे!
सर्वांच्या प्रति प्रेम,बंधुभाव आणि सामंजस्य बाळगणार्‍या कोणत्याही व्यक्तीला शुद्ध मानले पाहिजे. तिथे जात आणि धर्म पाहायचा नसतो. आणि जे लोक दुसर्‍याचा दुःस्वास करतात,त्यांच्यावर सतत अन्याय अत्याचार करतात आणि ढोंग-लबाडी करतात ते खरे अशुद्ध आहेत .खरे तर त्यांना शुद्ध करायला हवे आहे. मग ते कोणत्याही जाती धर्माचे असोत.
गंगेत स्नान केले की माणूस शुद्ध होतो; गोमूत्र शिंपडले की माणूस शुद्ध होतो हे पूर्वापार आलेले सोयीस्कर गैरसमज आहेत. अशा तर्‍हेने माणूस शुद्ध होत असता तर गंगेच्या काठी राहणारे आणि रोज तिथेच सगळी आपली आन्हिके उरकणारे लोक हे शुद्धच ठरले असते. ह्या सगळ्यांना शुद्ध करता करता गंगाच अशुद्ध झालेय.

चर्चा

१. खरोखरच गोमुत्रामूळे दलितांचे आणि शाळेचे शुद्धीकरण करता येते का?
- नाही मुळीच नाही , मुळातच असं शुध्दीकरण हा मुर्खपणा आहे. अत्यानंद यांचे शब्द वापरतो की हा नीचपणा आहे.

२. गोमुत्रातल्या कोणत्या घटकामुळे असे शुद्धीकरण होते?
- वरील उत्तरात सर्व आले आहे असे वाटते.

३. गोमुत्र उपलब्ध नसेल तर शुद्धीकरणासाठी काय वापरावे?
- वरील उत्तरात सर्व आले आहे असे वाटते.

पंकज,
खरं तर ह्या तीन प्रश्नांवर चर्चा व्हावी असं तुम्ही म्हणता आहात तर हे प्रश्न असेच पहिल्या प्रतिसादात उडाले असं समजा. कुणी ह्या प्रकाराचं समर्थन करीत असेल तर मात्र चर्चा पुढे जाईल.

मात्र या अनुशंगाने गोमुत्र आणि एकंदरीतच गायीचे आपल्या जीवनातील महत्व यावर चर्चा झाली. हे चांगलेच झाले. अहो गाय हे फक्त एक उदाहरण आहे , आपल्या धर्मातील अश्या अनेक संकेतांचं असंच झालेलं आहे , मुळ हेतू वेगळाच आणि आपण ती कृती करतो त्याची प्रेरणा वेगळीच असते.

गाय ही शेतीप्रधान देशात खुप महत्वाची होती हे सांगायलाच नको. आर्यांनी सोबत गायींचे कळप आणले होते असं म्हणतात. खुप आधी म्हणजे १६०० च्याही खुप आधी आमच्या भारतात गाय हे धन मानल्या जायचं , त्याला गोधन अशी संकल्पना होती. य़ज्ञाच्या काळात गायींचे दान केल्या जाई. संदर्भ हवा असल्यास नचिकेताची कथा आठवा.गोधन हरण केल्या जाई, या बाबत अनेक संदर्भ आपल्याला महाभारतात सहज सापडतील. य़ज्ञाच्या वेळी यज्ञकुंड आणि सभोवतालचा भाग गायीच्या शेणाने सारवला जाई. त्याला त्या काळात सुध्द म्हणजेच पवित्र माणल्या जाई. हजारो वर्षांत शब्दांचे अर्थ पार बदलल्या जातात.
एक मात्र नक्की की गोमुत्राने अनेक हानीकारक जंतूंचा नाश होतो, आपल्या शरिराला आवश्यक खनिजांची पुर्तता होते, गोमुत्र प्राशनाने कसलीच हानी नाही उलट लाभच आहे. हे आमच्या पुर्वजांना ठाऊक होते. त्यांनी त्या गोमुत्राची माहीती तुमच्या आधुनिक विज्ञाच्या आरेखणात बसेल अशी नसेल केली, म्हणून काही त्याबाबींचं महत्व कमी होत नाही.

गाय ही अनेक अंगांनी उपयोगी आहे. ती दूध देते जे पुर्णांन्न् माणल्या जातं. गोमुत्र आणि गोमयाच्या उपयोगाबाबत आपण चर्चा करतो आहोतच. गाय शेतीसाठी आवश्यक असे बैल उत्पन्न करून देते, जो एका शेतकर्‍यासाठी सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. अगदी भाकड झालेल्या गायी सुध्दा गोमुत्र आणि गोमयाच्या कामी आहेतच. गाय मृत झाल्यावर ती जमीनीत पुरल्या जाते, वर्षा-दोन वर्षांत तेथे उत्तम प्रकारचं कंम्पोस्ट खत तयार होतं. गाय ही भारतात कामधेनू होती. अश्या संदर्भात जर भारतीय सांस्कृतीक मानसिकतेत सहजच ही एवढी उपयोगी गाय हीला आपली उपकार कर्ती मानल्या गेलं. गाय ही समृध्दतेला मदत करते त्यामुळे तिची जोपासना व्हायला हवी, या हेतूने गायीला धार्मीक मान्यता देण्याचा विचार झाला असावा.

गायीच्या आणि बैलाच्या मुत्रात काय फरक आहे हे मी नाही सांगू शकत, मात्र शेळीला ग्रामीण भागात खुप महत्व आहे. शेळीच्या दूधाला अतिशय सकस मानल्या जाते, लहान बाळालासुध्दा सहज पचेल असे ते दूध आहे. शेळीच्या लेंड्यांचा खत म्हणून वापर केला जातो त्याकरीला धनगराला आपल्या शेतात मे महिण्यात शेळ्या-मेंढ्या बसवण्याची परवाणगी असते. शेळी ही बहू प्रसवा असल्याने पिल्लांसाठी सुध्दा तीची जोपासना केली जाते. बोकड हे मासांसाठी प्रसिध्द आहे. मात्र बोकडाचे मास जेवढे रुचकर तेवढेच बकरीचे मास वातळ असते, शिजायला आणि पचायला अवघड.

वरूणराव , तुम्ही सांगताय तो प्रकार मला नवीनच आहे. तरी सुध्दा मेजवानी देताय का? येतो मी मला काही अडचण नाही.

नीलकांत

काय म्हणावे ?

मी आता पर्यंत गायीचे काळानुरूप महत्व सांगत होतो. त्यात हेही सांगत होतो की, पुर्वीच्या काळी गाईला किती आणि का महत्व होते, अर्थकारणाशी संबधीत असलेली गाय ही त्याकाळानुरूप सहज धर्माशी जोडल्या गेली होती. पुढे सावरकरांनी तिला उपयुक्त पशू असं म्हटलेलं आहे. हे असं स्पष्ट असतांना आता सर्किट यांचा आलेला प्रतिसाद केवळ आपला 'फाऊल' वाचावा म्हणून आला असं आम्ही मानावं का? ;-)

नीलकांत

मग कोंबडीचा काय गुन्हा?

अहो मग कोंबडीने काय गुन्हा केला?
ती नाही का आपल्याला अंडी देत? कोंबडीची शिट सुद्धा खत म्हणून फार उपयोगात येते. ती मेल्यानंतर तिला जमिनीत पुरले तर दोन वर्ष काय फक्त दोन महीन्यातच फार चांगले कंपोस्ट खत तयार होईल :)
मग मला वाटतं 'कोंबडी माता' हा शब्द रुजायला काहीच हरकत नसावी!!

(कोंबडी प्रेमी) रम्या

 
^ वर