विदर्भाच्या व्यथा

"वासरे"

आम्ही वासरे, वासरे, मुकी उपाशी वासरे
गायी पन्हवतो आम्ही, चोर काढतात धार

टप टप घाम उनरतो उनरतो भुईवर
मोती पिकवतो आम्ही तरी उपाशी लेकरे

श्री श्रीकृष्ण कळंब याच्या या ऑळी.५५ वर्षाचे श्री कळंब, अकोला जिल्ह्यातील बाभुळगाव येथील ५ एकराचे शेतकरी व कवी. आर्थिक आघाडीवर भुईसपाट झालेला मनकवडा कवी. खाजगी सावकाराचे कर्ज फेडणे, मुलीचे शिक्षण, गावात एक मातीचे घर बांधणे, व शेतीला पुरक व्यवसाय म्हणुन थ्रेशर खरेदीसाठी त्यांनी १० वर्षापुर्वी ३ एकर जमीन विकली. त्यानंतरही त्याचा व्यवसाय काही चालला नाही. शेती विकुन बैंकेत ठवेलेल्या पैशातुन, शेतीतुन कसे बसे १० वर्षे काढली जास्त व्याजाच्या आशेने बैंकेत ठेवलेली पुंजी बैंकेसकट बुडली.

गेल्या काही वर्षापासुन शेतीतुन काहिच उत्पन्न निघत नसे. त्यात बैंकेचे २०००० हजार कर्ज व सावकाराचे भरगोस व्याजाचे रु.५०००० कर्ज कसे फेडायचे हि विवंचना. विकण्यासारखे सर्व विकुन झाल्यावर उरलेली ५ एकर जमीन विकायचे विचारे मनात येत असतांना खरडलेल्या वरिल ओळी. शेव॑टी तो विचार सोडुन त्यांनी आयुष्य संपवुन उरलेली जमीन पत्नी व चार मुलीसाठी ठेवुन जगाचा निरोप घेतला.

पश्चीम महाराष्ट्राचे वर्चस्व असलेल्या सत्ताधिकार्‍याच्या कापसा बाबत च्या चुकिच्या धोरणामुळे किवा त्याबाबत काणाडोळा केल्यामुळे विदर्भातील प्रत्येक गावात अनेक कळंब जेरिस येवुन व आपल्या कुटुंबाला वार्‍यावर सोडुन मुक्त झाले आहेत्. त्यांच्या जाण्याने देखील प्रश्न सुटलेले नाहीत. परवा मुख्यमंत्र्यानी १०००० कोटि रुपयांचे पैकेज जाहिर केले. परंतु वस्तुस्थीति अशी आहे कि त्यपैकी ६००० कोटि चे पैकेज केन्द्र सरकारने या आधिच मंजुर केले आहे. विषयाच्या मुळाशी जाउन ती समस्या सोडविण्याचा मनापासुन प्रयत्न केल्या जातील तेंव्हाच ही समस्या खर्‍या अर्थाने सुटु शकेल. आणी मुळ कळिचा मुद्दा आहे तो कापसाचे भाव हे लागवडी खर्च लक्षात घेउन ठरविण्याचा.

चार दिवसांच्या उपाशी माणसाला एक दिवस जेवण फुकट देण्यापेक्षा त्याला रोज मिठ भाकरी कशी मिळेल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. अन्याय सहन करण्याची एक सीमा असते अन ती एकदा पार झाली की पुढील परिणाम भयंकर होण्याची भीति असते याचे भान शासनकर्त्यांनी ठेवणे गरजेचे आहे.

लेखनविषय: दुवे:

Comments

या संदर्भातील अधिक माहिती

या संदर्भात

विश्वास कल्याणकर

 
^ वर