पा (२००९)

ज्यांनी 'पा' हा चित्रपट अजून पाहिलेला नाही आणि पाहायची इच्छा बाळगून आहेत त्यांनी या वा अशा परीक्षणा पासून जाणीव पूर्वक दूर रहावे.

वरील सूचना पाहून 'पा' मध्ये (अमिताभच्या अवतारा इतकेच) भयंकर काहीतरी रहस्यमय आहे असा गैरसमज होण्याची शक्यता आहे. सूचनेमागचे कारण असे काही नसून, ही प्रतिक्रीया वैयक्तिक, एकांगी व काहीशी रूक्ष असल्याने त्याने संभावित प्रेक्षकांचा भ्रमनिरास होवू नये म्हणून घेतलेली दक्षता मात्र आहे.

प्रोजेरिया नावाच्या कुण्याएका रोगावर आधारित असल्याचा 'आभास' निर्माण करणारे प्रोमोज पाहिल्यावर चित्रपटात काही तरी खास असेल अशी आशा उगाचच निर्माण झाली होती. मुळात चित्रपटाचे नाव 'पा' का आहे हाही बुचकळ्यात टाकणारा प्रश्न वाटला.ते 'बम' असते तरीही हरकत नव्हती.

चित्रपटात यत्र-तत्र पेरलेल्या (टाळू शकता आले अश्या प्रकारच्या) विनोदांची विषयाचे गांभिर्य प्रेक्षका पर्यंत पोहोचत नाही. भावनापूर्ण प्रसंगांच्या अभावाने हे विनोद काढून टाकल्यास चित्रपटात काही उरले नसते ही दुसरी खेदाची बाजू.

'पा'चे (उद्यमशील?) राजकारणी असणे, प्रसारमाध्यमांवर आगपाखड करणे सारे काही बनावटी. आरते लखनौ चे खासदार व आंबेडकर नगर यामागे काय गौडबंगाल हे ही उमजण्यापलिकडचे.

ऑरो ला वाढवण्यासाठी (सदा न कदा क्लीनिक मध्ये असणार्‍या) आईची धडपड का कोण जाणे एका गाण्यापुरती आणि ऑरो आपला मुलगा आहे हे माहित नसताना सरकारी खर्चात फिरणार्‍या बापाच्या आणी मुलाच्या प्रेमाची काहाणी हा चित्रपटाचा आव!

इलायिराजाची गाणी नेहमी प्रमाणेच सुश्राव्य. चित्रिकरण ही प्रसन्न वाटावे असे. अमित्राभची चित्रपटात अपेक्षित असलेली उंची नक्की लक्षात येत नाही. अमिताभाची देहबोली मात्र एकदम हटके. विद्याचा अभिनय चांगला म्हणावा असा तर अभिषेकच्या अभिनय त्याच्या कुर्त्याइतकाच वैविध्यपूर्ण.

चित्रपटात सरतेशेवटे लक्षात राहते ती विद्या व अमोल आरतें च्या घराची सजावट, ऑरोची गाडी व त्याचा शोफर.

लेखनविषय: दुवे:

Comments

हम्म

जरा अपेक्षाभंग होतोच. पण प्रसारमाध्यमं, राजकारण, याविषयीची नवी ओळख दाखवण्याचा प्रयत्न आवडला. दी ग्रेट बच्चन चा अभिनय केवळ ग्रेटच. 'पा' चा अर्थ कळत नाही, याच्याशी सहमत. विद्या बालनचा अभिनय मस्तच. अरुंधती नाग यांचाही ['बम'सहीत] अभिनय,संवाद लक्षात राहावा असाच आहे.

दोनेक दिवसापूर्वी कुठे तरी वाचले की, चित्रपटांमधील कॅन्सर,ब्रेनट्यूमर, वगैरे आजार जाऊन डिस्लेक्सिया, प्रोजेरिया, अशा नव-नवीन आजारांची चित्रपटातून ओळख होत आहे. हे बरेच होत आहे. असे वाटले.

अर्थात 'पा'एकदा पाहण्यासारखा नक्कीच आहे.

-दिलीप बिरुटे

ऑरो

'पा' बघतांना मला एक प्रश्न पडला होता. ऑरो ला लाभलेली सगळी मित्रमंडळी चांगलेच सहकार्य करणारे कसे काय लाभले?

तो

तों लेखस्वरुपात भेटल्याने आनंद झाला. बाकी त्याला काय फुकट तिकिटे मिळाली होती की काय? असा कसा तो वाट चुकला व सिनेमा बघत बसला.

तों सारखे अजुन एक कशाला दे दणादण बघायला गेले होते ?

सभ्य लोकांना जबरदस्तीने पळवुन नेउन टुकार सिनेमे दाखवणारी टोळी आली की काय? ;-)

माझ्या मते

माझ्या मते 'पा' ची निर्मिती अमिताभने आपल्या अभिनयाचा कळस दाखविण्या साठी केली असावी. त्याने आवाजाचा पीच थोडा वर ठेवला असता तर तो कळस दिसला असता.

 
^ वर