प्रिझनर्स डिलेमा

मनुष्यबळ विकास व्यवस्थापनाचा (एचआरएम) अभ्यास केलेले आणि "नेतेगिरी" (मराठी- लिडरशिप) चा अभ्यास केलेल्यांना कदाचित माणसाच्या ह्या मानसिक द्वंद्वाची, कलाची माहिती असेल. मला जेव्हा ह्या थेअरीची तोंडओळख झाली तेव्हा मी हरखून गेलो होतो व पटले की, ही एक बहूव्यापी थेअरी आहे. - असे मी का म्हणतो आहे, ते नंतर सांगितलेले आहेच. प्रथम ह्या थेअरीची पार्श्वभूमी (उगम) पाहू व तीचा नेतेगिरीत कसा वापर होतो ते पाहू.
"प्रिझनर्स डिलेमा" ला आपण ह्या गोष्टीपुरते "कैद्यांचा पेच" असे म्हणू. 
गृहीत धरा की, एका मोठ्या गुन्ह्यात दोन (अ आणि ब) संशयितांना पकडले आहे. पोलिस त्यांना वेगवेगळ्या कैद-खोलीत डांबून ठेवतात. नंतर पोलिस त्यांना वेगवेगळे भेटून त्यांच्यासमोर एकच आणि तोच प्रस्ताव ठेवतात. प्रस्ताव असा असतो- 

 

कैदी ब गप्प बसला

कैदी ब ने, अ बद्दल पुरावे दिले

कैदी अ गप्प बसला

दोघांना ६ महिन्याची साधी कैद

कैदी ब ची सुटका,

अ ला १० वर्षे कारावास

कैदी अ ने, ब बद्दल पुरावे दिले

कैदी अ ची सुटका,

 ब ला १० वर्षे कारावास

दोघांना ५ वर्षांचा कारावास

चौकटीत दाखवल्याप्रमाणे पोलिस त्या दोघांनाही तो प्रस्ताव समजावुन सांगतात. दोघांनाही त्यातील फायदे व तोटे स्पष्ट दिसतात. दोघेही गप्प बसले तर दोघांचाही त्यात फायदा असतो. पण एक जण गप्प बसला आणि दुसऱ्याने त्याच्याबद्दल पुरावे दिले तर साहजिकच गप्प बसणाऱ्याची मुक संमती आहे असे मानून त्याला गुन्ह्याची सजा मिळणार हे दोघांनाही समजते. 
आणि हाच त्यांचा पेच असतो. 
पहिल्या मार्गाचा अवलंब केल्यास (दोघांनीही गप्प बसणे), दुसऱ्याची काहीच शाश्वती नसल्यामुळे सरळसरळ आत्महत्या केल्यासारखेच होईल ह्या भीतीने गप्प आपण बसण्याचा मार्ग स्वीकारणे दोघांनाही योग्य वाटत नाही. त्यांना ही जाणीव असते की, त्यामुळे दोघेही कमीत-कमी शिक्षेच्या प्रस्तावाला मुकणार असतात. 
तो मार्ग दुसरा मार्ग स्वीकरल्यास (दोघेही एकमेकांबद्दल काही-बाही पुरावे देतील), दोघांनाही १० वर्षांऐवजी ५ वर्षे कैद होईल. आणि हाच मार्ग ते निवडतात. दुसऱ्याला आपल्या गप्प बसण्यामुळे पूर्ण फायदा होईल अ तो सुटेल आणि आपण मात्र १० वर्षे कैदेत खितपत पडून राहू हे शहाणपणाचे त्यांना वाटत नाही. दोघेही गप्प बसतील असा विश्वास त्यांना एकमेकाबद्दल वाटणे शक्य नाही, मग अशा परिस्थितीत ते दोघेही तोंड उघडतात व चक्क दुसऱ्याचा फायदा होऊ नये म्हणून आपले नुकसान स्वीकारतात. 
"दुसऱ्याचा फायदा होऊ नये म्हणून आपले नुकसान स्वीकारणे" हाच तो कळीचा मुद्दा, ज्याला कैदयांचा पेच असे म्हणले जाते. मनोभ्यासक ह्या मनोवृत्तीचा बारकाईने अभ्यास करतात व त्याचा संबंध आपल्या रोजच्या आयुष्यात कसा लागू पडतात ते पाहतात. 
सांघिक काम- टिमवर्क- हे जितके सोपे वाटते तितकेच अवघड असलेले एक कौशल्य. एकाच छपराखाली एकाच संघटनेत, कंपनीत, कार्यालयात काम करणाऱ्या संघांमधे अशी रस्सीखेच होणे हे नैसर्गिक आहे; पण ते हिताचे नाही. मानवाच्या ह्या अशा मनोवृत्तीची जाण असणे हे प्रत्येक नेत्याचे कर्तव्य आहे. त्यातून मार्ग कसा काढायचा हा लेखाचा एक स्वतंत्र विषय आहे. नेत्यांना ह्याची ओळख एका खेळाव्दारे करुन दिली जाते- "विन ऍज मच ऍज यु कॅन". 
पण ह्या मनोवृत्तीचे अस्तित्व कसे व्यापक आहे ह्याची काही उदाहरणे पाहू-
१. दोन शेजारील राष्ट्रे आपल्याकडील शस्त्रसंख्या, वैविध्य, आधुनिकता ह्यांचा विचार करत असतांना, दोघेही एकत्र येऊन शस्त्रांवर होणारा खर्च कमी करु शकतात. पण तसे होत नाही. दोघेही राष्ट्रे आपल्या इतर आवश्यक गुंतवणूकीवर टाच आणून शस्त्रांवर जास्तीत जास्त गुंतवणूक करतात. 
२. खेळामधे स्टेरॉइडचा वापर एकाने न करणे व दुसऱ्याने करणे....
३. वातावरणाला घातक अशा वायूंचा उत्सर्ग रोखण्यासाठी काही कठोर बंधंनं स्वतः वर लादून घेणे. पण दुसऱ्या राष्ट्रांनी जर तसे केले नाही तर पहिला त्यात नुकसान करुन घेईल व दुसऱ्या देशातील लोक मजा करतील....
तर, असा आहे प्रिझनर्स डिलेमा!
लेखनविषय: दुवे:

Comments

विकिवरुन भर घातली आहे

[वरील् लेखात् माझ्या आधीच्या माहितीत विकिवरुन भर घातली आहे]

इंटरेस्टींग विषय्!

इंटरेस्टींग विषय्! बाय् द् वे, पहिला कैदी गप्प राहुन् दुसर्‍या कैद्याला एक् संधी देउन् पाहतो आणि त्याने जर् विरोधी पुरावे दिले तर्च् पुरावे द्यायला तयार् होतो असे शक्य नाही का? (हे खालच्या उदाहरणांमध्ये शक्य दिसत् नाही पण् ती उदाहरणे बरीच् किचकटही आहेत्.)

"विन ऍज मच ऍज यु कॅन"

>>त्याने जर् विरोधी पुरावे दिले तर्च् पुरावे द्यायला तयार् होतो असे शक्य नाही का?<<<

उत्तर थोडेसे वळसे घालून दिले आहे. -

नाईल, ज्या खेळाविषयी मी लिहिले आहे, "विन ऍज मच ऍज यु कॅन"- हा खेळ व्यवस्थापकांना, नेत्यांना ह्या मानवी भाव-भावनांविषयी ओळख व्हावी म्हणून तयार् केला गेला. मुळात मानसशास्त्र हा जरा क्लिष्ट विषय!- त्यामुळे मानसशास्त्रज्ञांनी सोपे करुन समजाऊन सांगण्यासाठी हा खेळ उपयोगी पडतो. त्यात आपण सुरुवातीला वर् दिलेला प्रयोग करुन पाहू शकतो व त्याचे काय निकाल हाती लागतात ते पाहू शकतो.

त्यातील काही नियम आपण बदलून पाहून् काय हाती लागते ते पाहू शकतो.

त्यानंतर जे काही आपल्याला समजेल (प्रयोगातून), ते आपल्या दैनंदिन कामात कसे वापरायचे हा एक् लेखाचा स्वतंत्र विषय आहे. स्ट्राटेजिक सोल्युशन काढण्यासाठी जास्तीत-जास्त उपयोग होऊ शकतो.

समजले.

तुमचा दुसरा धागा,त्यावरील् प्रतिसाद् आत्ताच् पाहिले. मुद्दा समजला. धन्यवाद. :)

 
^ वर