उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
अक्षयभाषा सादर करत आहे- त्रिवेणी! (फीनीक्स/मेसा)
Nile
November 22, 2009 - 6:17 am
नुकतंच फीनीक्स जवळील मेसा येथे सादर होत असलेल्या या कार्यक्रमाची माहिती मिळाली. अरिझोनातील उपक्रम सदस्यांना कळावी हाच उद्देश.
अक्षयभाषा सादर करीत आहे,
"त्रिवेणी "
नाट्य-काव्य-नृत्य यांनी सजलेला एक बहारदार कार्यक्रम.
'सिंन्ड्रेला आणि मैत्रिण' - काळजाला हात घालणारी एकांकिका
'आपली भाषा' - मातृभाषेचं बोट न सुटलेल्या मराठी माणसाचा शब्द-काव्य-नृत्य यांनी सजलेला संवाद
'लग्नाला जातो मी' - अमेरिकन-मराठी कुटुंबात चाललेली एक धमाल विनोदी संगितीका
स्थळ - Mountain View High school Mesa AZ.
2700 E Brown Rd Mesa Arizona 85213
वेळ - संध्याकाळी ४ - ६ वाजता
दिवस - शनिवार ५ डिसेंबर २००९.
शुल्क -
प्रौढ - १० डॉलर, मुले - मोफत
विद्यार्थी आणि आजी-आजोबा - ५ डॉलर
(अधिक माहितीसाठी akshaybhasha@cox.net किंवा 480 705 8039 यावर संपर्क करा)
दुवे:
Comments
शुभेच्छा
अंतर लाब असल्याने (उपस्थीत राहणे) जमेल असे वाटत नाही. कार्यक्रमासाठी शुभेच्छा!
काही भाग संपादित.
(शुभेच्छूक)बेसनलाडू
परवानगी.
काही भाग संपादित.
धन्यवाद.
शुभेच्छा
नाईलराव , कार्यक्रमास अनेक शुभेच्छा.
काही भाग संपादित.
धन्यवाद्.
धन्यवाद मुक्तसुनीतराव, तुमच्या भावना पोहोचल्या. :)
कार्यक्रमासाठी शुभेच्छा
सगळ्यांना कार्यक्रमासाठी शुभेच्छा. ह्या कार्यक्रमाचे परीक्षण येऊ द्या. वाचायला आवडेल. अमेरिकन-मराठी संस्कृतीची सद्यावस्था ह्यावरही कुणी लिहायला हवे. अमेरिकेत जन्माला आलेली पिढी किती मराठी आहे हे जाणून घ्यावेसे वाटते आहे.
अवांतर:
अमेरिकन-मराठी माणूस मराठीचे बोट सुटू न देण्याचा प्रयत्न करतो आहे हे कौतुकास्पदच आहे. पण हा 'पुरुषांची मंगळागौर'फेम सलील कुलकर्णी अमेरिकत येऊन इंग्रजी गाणे म्हणतो. का? ऐका व आनंदविभोर व्हा:
जिथे सलील व संदीप जातात ती जागा काही काळासाठी 'पुरुषांची तुळशीबाग' होते म्हणे.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
मराठीपणा
माझ्या थोड्याश्या अनुभव् आणि माहीती वरुन् तरी त्यांचा 'मराठीपणा' कौतुकास्पद आहे (अर्थात जनरलायझेशन आहे) पण हे तुम्ही कीती अपेक्षा ठेवता यावर अवलंबुन आहे.