मुंबईचा बाप कोण?
साधारण वर्षापूर्वी , "मुंबई कोणाच्या बापाची?" हा प्रश्न चर्चेत होता. गेल्या काही दिवसात मुंबई पुन्हा चर्चेत आली आहे. निमित्त? सचिन तेंडुलकरनी मुंबई भारताची आहे असं म्हंटलं.
मीडियावाल्याना खरूज काढण्याची खाज अनावर झाली आणि त्यांनी सचिनला मुंबईबद्दल प्रश्न विचारला. त्यावर सचिननी मुंबई भारताची असं उत्तर दिलं. आता पद्मभूषण, पद्मविभूषण, खेलरत्न, इत्यादि सन्मान प्राप्त झालेला आंतराराष्ट्रीय कीर्तीचा खेळाडू मुंबई भारताची आहे असंच म्हणणार. तो आपल्या प्रांताभिमानाचं प्रदर्शन थोडंच करणार आहे? पण मीडियावाल्यांनी त्याचा मनसे व शिवसेना यांच्याविरुद्ध वापर करण्याचा चंग बांधला. मराठी माणसाची अस्मिता ठेचायला टपलेल्या टाइम्स् ऑफ् इंडिया नी त्याची मथळा बातमी दिली. उद्देश, मनसे व शिवसेनेची गोची करण्याचा.
आता सर्व वादळ शमलं आहे असं वाटत असतानाच एका चॅनेलला परत खुमखुमी आली. दोन-तीन दिवसांपूर्वी सकाळी ९ च्या सुमारास चॅनेलवाले कॅमेरा व तोंडापुढे धरायचे बोंडुक घेऊन शिवाजी पार्कवर गेले. तिथे फिरायला आलेल्या एका ज्येष्ठ नागरिकाला 'सामना'तल्या सचिनवरच्या लेखावर प्रतिक्रिया विचारली. चॅनेलवाल्याची अपेक्षा कोणाला तरी एकाला बरोबर व दुसर्याला चूक म्हणावं अशी होती. पण त्या नागरिकानी दिलेलं उत्तर असं होतं: "अहो मुंबई महाराष्ट्राचीच; म्हणजे मराठी लोकांची. महाराष्ट्र भारताचा हे मान्य. पण असं बघा, तुमचा मुलगा बाप म्हणून तुमचं नाव लावतो. नाही का? आता तुम्ही तुमच्या वडिलांचे पुत्र आहात म्हणजे एकत्रित कुटुंबात तो तुमच्या वडिलांच्या कुटुंबापैकीच आहे. पण म्हणून तो बाप म्हणून तुमच्या वडिलांचं नाव लावील का? नाही ना?"
हा संवाद अर्थातच चॅनेलवाल्यानी मुद्रित करून घेतला नाही.
आपणास एकंदर प्रकाराविषयी काय वाटतं?
Comments
मुंबईचे पितृत्व
मुंबईचा बाप असण्याचा अभिमान असणार्यांना तो जरुर असो. मुंबईचा बाप असणे म्हणजे काय हा एक वेगळा प्रश्न आहे. मुंबई महाराष्ट्राची आहे, ती भारताची नाही, म्हणणार्यांनी या वाक्याचा अर्थ स्वतःला तरी कळतो का ते पाहावे. मुलगा, बाप आणि आजोबा ही तुलना मुंबई, महाराष्ट्र आणि भारत यांच्याशी करणे हास्यास्पद आहे.
सन्जोप राव
होगा कोई ऐसा भी, कि 'गालिब' को न जाने?
शाइर तो वो अच्छा है, प' बदनाम बहोत है
गंगा मेरी मां का नाम, बाप का नाम हिमाला !
गंगा मेरे मां का नाम बाप का नाम हिमाला! आनंद व लाभ घ्यावा.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
मी नक्कीच नाहि
>>>मुंबईचा बाप कोण?
मी नक्कीच नाही. :)
आणि मला कल्पना नाहि.
एखाद्या ज्योतिषाला नाहितर इतिहाससंशोधकांना विचारा ;) दोघेही खात्रीने चुकीची माहिती देतील :प्
ऋषिकेश
------------------
भ्रष्टाचार संपविण्याचा सर्वोत्तम आणि सर्वात सोपा(?) उपाय म्हणजे त्यात स्वतः सहभागी न होणे