ईटानगरचा किल्ला

ईटानगर् किल्ल्याचे बांधकाम हे १४ ते १५ व्या शतकातील आहे. संपुर्ण किल्ल हा विटांनी बांधला आहे म्हणुनच याचे नाव ईटाफोर्ट् असे असावे. किल्ल्याचे बांधकाम हे अव्यवस्थीत रित्या बांधल्यासारखे वाटते. आज असलेला किल्ल्याचा भाग हा उत्खननातुन निर्माण झाला असल्यामुळे पर्यंटकांच्या आकर्षणाचे केन्द्र आहे. शहराच्या मध्यभागी उंचवट्यावर असल्यामुळे या शहराला याचे नाव देण्यात आले. मायापुर राजाने या किल्ल्याचे बांधकाम केले. या किल्ल्याबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही.

way leading to fort

किल्ल्यावरुन दिसणारे विहंगम द्रुष्य

view from fort

किल्ल्याचा उपयोग कि दुरुपयोग तरुण मंडळि बिअर पिण्यासाठी करित असतांना पाहुन वाईट वाटले.

Misuse of fort

किल्ल्याचा जवळुन दिसणारा भाग. आपण शिवाजी महाराजांचे किल्ले बघितले असल्याने माझ्या कल्पनाविश्वातिल किल्ला या संकल्पनेला ईटा किल्ला बघुन तडा गेला यात सशय नाही.

closer view of fort.

किल्ल्यावरुन दिसणारा ईटानगर् शहराचा परिसर.

Itanagar from fort.
me at fort

या किल्ल्याबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही याचा प्रत्यय बोर्ड वाचुन देखिल येतो.

board displayed at the fort.
लेखनविषय: दुवे:

Comments

फोटो

पाहिल्याने प्रत्यक्ष जाऊन आल्याचा अनुभव मिळत नसला, तरी परिसराविषयी खूपच अधिक कल्पना येते.
त्यामुळे आभार.

छान

तिसर्‍या फोटोत दिसणारी एक पिवळी पिशवी सोडल्यास फारसा कचरा/भिंतीवरील रेघोट्या-नावे वगैरे दिसले नाहि. त्यामुळे किल्ल्याचे रूप अधिकच खुलले आहे

ऋषिकेश
------------------
भ्रष्टाचार संपविण्याचा सर्वोत्तम आणि सर्वात सोपा(?) उपाय म्हणजे त्यात स्वतः सहभागी न होणे

 
^ वर