माजुली-नव वैश्नवी पंथाचे मज्जाकेंन्द्र
![]() |
Road from Kamalabari ghat to majuli township |
![]() |
Entry path to Majuli |
निमानीघाट ते माजुली असा ब्रम्हपुत्रेच्या विशाल पात्रातुन् बोटीने दिड् तासाच्या प्रवासानंतर आम्ही माजोलीच्या कमलाबारी घाटावर उतरलो. या घाटावर बस तसेच टाटा सुमो ची प्रवाशांना वस्तीवर् नेण्यासाठी रिघ लागली असते. हा प्रवास अंदाजे ४ कि.मी चा आहे. रस्ता कच्च्या खडीचा असुन रस्त्याच्या दुतर्फा येथील विवीध जमातीच्या बांबुने शाकारलेली घरे लागतात्.
आमची ही माजुली भेट अकस्मात ठरल्यामुळे माझ्या आसामी गाईड ने त्याच्या संपर्कातिळल व्यक्तीला संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण अखेर पर्यंत संपर्क होऊ न शकल्याने आणी तेथील रहाण्याच्या सोईबद्दल काहीच कल्पना नसल्याने मी थोडा साशंक होतो. परंतु आम्ही मुख्य वस्तीला लागताच आम्हाला रहाण्याच्या हॉट्ल चा एक बोर्ड दिसला आणी आम्ही तेथेच उतरलो.
अपेक्षेपेक्षाही उत्तम व्यवस्था असलेले ते होटल होते. बाहेरुन स्वागत कक्षावरुन अजिबात कल्पना न येणारी व्यवस्था तेथे होती आणि ती ही रास्त दरात. आम्हा दोघांसाठी तीन कॉट असलेली प्रशस्त खोली सलग्न स्वच्छ्ता गृहासकट् भाडे केवळ ३०० रुपये म्हणजे आम्हाला आकाश ठेंगणे झाले. सकाळी सात पासुन काझीरंगा ची सफारी नंतर् तीन च्या आत निमातीघातट पोचण्याची चिंता यामुळे तुटक तुटक मीळेल त्या वाहनाने प्रवास करत आम्ही येथपर्यंत पोचलो होतो. त्यामुळे राहाण्याची उत्तम सोय आणि स्वच्छ् चादरी व बिछाने बघुन सात वाजले असतांनाही आम्ही झोपेच्या आधीन झालो. बेटाची सैर सकाळी करण्याचे ठरवून. तसेही सकाळी ५ वाजता तिकडे उजाडत असल्याने ते सोईस्कर होते.
![]() |
Entry to our new found home on the island |
![]() |
Room with clean bedshits,mosquito net was an irresestible sight for our tired body and soul |
आसामी मधील वैशनवी पंथाचे लोकाचे माजुली हे श्रध्दा स्थान आहे. बौध्द मठाप्रमाणे येथे वैश् नवि धर्म,संस्कृती व आचार यांचे बालपणापासुन शिक्षण देणारे गुरुकुल इथे आहेत.यात पालक आपल्या मुलांना धर्म, व संस्कृती चे शिक्षण घेण्यासाठी पाठवतात. आश्रम हा ५-१० एकरात पसरलेला असुन त्यात गुरुकुलात रहाणार्या मुलांसाठी विशीष्ठ पध्दतीने बांधलेल्या खोल्या असतात. मठाधीश व उप् मठाधिशांच्या रहाण्याची वेगळी व्यवस्था असते. प्रार्थना मंदिर साठी वेगळा हाल असतो. या गुरुकुलास येथे 'सत्र' म्हणतात आणी मठाधिशाला 'सत्रधार' म्हणतात. ही सत्र परंपरा हा स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. त्याची माहिती ईंटर्नेट वर देखील उपलब्ध आहे त्यामुळे त्याबाबत येथे सांगणे मी टाळतो. अशी सत्रे १६ होती ती आजच्या घटकेला ८ असुन त्यांचे वेगळे व स्वतंत्र प्रकार आहेत्.
![]() |
The Entry Gate of Kamalabari Satra |
![]() |
Prayer Hall of Kamalabari Satra |
![]() |
Residential area of Inmates |
![]() |
Another residential area of inmates in the same satra |
![]() |
An inmate in the Satra |
![]() |
Residence of Satradhar i.e. Mathadish |
या परिसरात आल्यावर आपण लहानपणी ऐकलेली कृष्ण-सुदामा व सांदीपनी ऋषी व त्यांच्या आश्रमाची आठवण होते.
Comments
लेखमाला
सुरेख व माहितीपूर्ण लेखमाला. छायाचित्रांमुळे लज्जत वाढली आहे. चालू ठेवा.
शरद
वा
चांगली माहिती.. सत्रधारांच्या खोलीचे द्वार खूपच भारी आहे.
अजून येऊ द्या माहिती
ऋषिकेश
------------------
भ्रष्टाचार संपविण्याचा सर्वोत्तम आणि सर्वात सोपा(?) उपाय म्हणजे त्यात स्वतः सहभागी न होणे
सुंदर
वा छानच लेख आला. बरीच माहिती असल्याने वाचायलापण आवडला.
अजून येवू दे...
चित्रे चांगली आहेत.
प्रवासात चांगले हॉटेल मिळणे हा कधी कधी भाग्याचाच योग असतो.
काझिरंगा विषयी वाट पाहतो...
आपला
गुंडोपंत