पुण्याचे सार्वजनिक काका

पुण्याच्या सार्वजनिक काकांबद्दल काही प्रश्नांची उत्तरे हवी आहेत.

१. सार्वजनिक काकांचे खरे नाव काय होते?
२. काकांचा कालखंड कोणता ?
३. त्यांना लोकांनी 'सार्वजनिक काका' ही पदवी कधी व का दिली?

सार्वजनिक काकांच्या तऱ्हेवाईकपणाचे अनेक किस्से महशूर आहेत. काही किस्से तुम्हाला माहीत आहेत का? ते किस्सेही इथे दिल्यास आवडेल. ह्या चर्चेतून मिळणारी माहिती कुणी विकिपीडियाला दिल्यासही हरकत नाही.

लेखनविषय: दुवे:

Comments

सार्वजनिक काकांबद्दल

सार्वजनिक काकांचे खरे नाव गणेश वासुदेव जोशी.

सार्वजनिक काकांबद्दल खालील माहिती मिळाली:

"गणेश वासुदेव हे स्वतः नावाजलेले वकील होते. त्यांचा जन्म २० जुलै १८२८ मध्ये सातारा येथे झाला. त्यांचे वडील इंग्रज अमदानीमध्ये अमिन होते. गणेश वासुदेव जोशी यांचे प्राथमिक शिक्षण सातार्‍यात झाल्यानंतर ते पुण्यात आले. पुण्यात नाझरची नोकरी करताना वकिलीची परीक्षा देऊन पुण्यातील मोठ्या वकिलांमध्ये त्यांची गणना होत होती. ते दिवाणी व फौजदारी स्वरूपांचे खटले चालवीत त्यांनी अनेक सरदार व जहागिरदार घराण्यांच्या इनामाचे व मालमत्तेचे खटले चालवले. प्रसिद्ध क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचे वकिलपत्र घेऊन इंग्रज सरकारच्या विरोधात ही केस लढवली. परंतु, त्यात त्यांना यश आले नाही. पुण्यातील जनतेवर होणार्‍या अन्यायाविरुद्ध दाद मागण्याकरिता अहोरात्र धडपड करणार्‍या गणेश वासुदेव यांना सार्वजनिक सभेच्या स्थापनेनंतर ‘सार्वजनिक काका‘ ही उपाधी पुणेकरांनी दिली."

पुणे सार्वजनिक सभा लेखातून साभार

पटता तो टेक. नहीं तो रामटेक.

णमस्कार

सार्वजनिक काका आम्हालाही माहित आहेत पण ते हे या चर्चेतले नव्हेत.

-राजीव.

 
^ वर