माजुली-निसर्गाचा निवांत स्वर्ग

जगाच्या पाठीवर लोकवस्ती असलेले नदितील सर्वात मोठे बेट असा लौकिक असलेले हे ठीकाण म्हणजे माजुली बेट. ब्रम्हपुत्रेच्या विशाल पात्रात निर्माण झालेले हे विशाल बेट नदिच्या उगमापासुन ११०० कि.मी व समुद्राला मीळते त्या बांगला देशाच्या सिमेपासुन ६३० कि.मि वर हे बेट आहे. याचा विस्तार १९५० पुर्वी म्हणजे फार मोठा भुकंप आला त्या वर्षा आधी १२५६ चौ.कि.मी इतका होता. यावरुन ब्रम्हपुत्रा या नदाची आणी त्यातील या बेटाची कल्पना येते.

गौहाटी ते जोरहाट हे ८ तासाचे अंतर पार केल्यानंतर बस किवा आटो रिक्षाने १३ कि.मी वर असलेल्या निमातिघाट या नदिच्या घाटावर गेल्यास फेरी बोट मिळते. शेवटची बोट ही दुपारी ३वाजता सुटते. त्यानंतर या बेटाचा संपर्क दुसर्‍या दिवशी ८ पर्यंत मुख्य भुमीशी तुटलेला असतो.

Jorhat Bus Stand where we arrive from Gauhati and go back to Gauhati
Ferry boat leaving for Majuli from Neamatighat

या बोटीत जोर्हाट येथे नोकरी करणारे चाकर माने, व्यापारी आपल्या वाहनासकट प्रवास करतात. माणशी १८ रुपये भाडे पडते. प्रवास हा जातांना १.१५ तासांचा तर परतीचा २.३० तासांचा असतो. प्रवासात भुकंपामुळे मुळ बेटांशी संपर्क तुटलेले भुखंड लागतात आणी भुकंपानी केलेल्या थैमानाची कल्पना येते. प्रवासाचे अंतर कमी जास्त असण्याचे कारण म्हणजे जातांना बोट प्रवाहाच्या दिशेने जाते तर परत येतांना प्रवाहाच्या विरुध्द येते.

disintegrated pieces of island in the river

बोटीत चहा, पान याची सोय असणारी टपरी देखील असते.

Tea and Pan shop in the boat
Alighting from boat at Majuli

माजुली सारख्या प्रदेशाचे वर्णन एका भागात आणी एका बैठकित संपण्यासारखे नाही तेव्हा नमस्कार मंडळी.

लेखनविषय: दुवे:

Comments

किलो मिटर्स?

याचा विस्तार १९५० पुर्वी म्हणजे फार मोठा भुकंप आला त्या वर्षा आधी १२५६ चौ.कि.मी इतका होता. यावरुन ब्रम्हपुत्रा या नदाची आणी त्यातील या बेटाची कल्पना येते.

किलो मिटर्स?
नक्की?

जरा जास्तच मोठा वाटतोय मला हा विस्तार...

असो,
अजून जरा लिहा ना या बेटा विषयी. इथले जीवन, काय चालते येथे, लोक का राहतात?
का नाही राहात?

वीज कुठून येते? की नाहीच्चे, मग काय करतात?
तुमचा प्रवास कसा झाला? काय अदचणी आल्या?
बेटाचा काही उल्लेखनिय इतिहास?

आपला
गुंडोपंत प्रश्नांकीत

माजुली

बेटाचा आकार कि.मी. मधेच आहे. बेटाची सविस्तर माहिती मी देतच रहाणार आहे. सध्या माझे इन्टर्नेट कनेक्शन जेसीबी च्या प्रतापामुळे तुटले आहे बि एस एन एल ने १ दिवसात होईल असे सांगीतले आहे.

विश्वास कल्याणकर

थोडी अधिक माहिती हवी

थोडी अधिक माहिती दिली तर आवडेल. आपल्याकडे भरपुर संग्रह दिसतो.
प्रकाश घाटपांडे

छान

अधिक माहिती वाचायला आवडेल.. छान चालु आहे
बाकी, दुसरा फोटो (दोन होड्यांचा) लै आवडला :)

ऋषिकेश
------------------
भ्रष्टाचार संपविण्याचा सर्वोत्तम आणि सर्वात सोपा(?) उपाय म्हणजे त्यात स्वतः सहभागी न होणे

 
^ वर