मनुस्मृती..थोड्या विस्ताराने

मनुस्मृती... थोड्या विस्ताराने.

स्मृतीच्या १२ अध्यायांमध्ये ( श्लोक न देता, त्यांत) कोणकोणते विषय आले आहेत ते पाहू,
(१) जगाची उत्पत्ती, मन्वंतर कथन, चतुर्युग प्रमाण, आयु;प्रमाण, चारही वर्णांची कर्मे.
(२) धर्माचे सामान्य लक्षण, गर्भादानाचे संस्कार, वेदाध्ययनविधी, प्रणव-आचार्य-गुरू-ऋत्विज-अध्यापक प्रशंसा.मन व वाणी यांचा संयम, मातृ-पितृसेवा.
(३) गृहस्थाश्रम,, अष्टविध विवाह, गृहस्थाचे पंचमहायज्ञ, नित्यश्राद्ध,इत्यादी.
(४) जीवनोपाय, संतोषप्रशंसा, दिनकृत्ये, स्वाध्याय, अनध्याय, अभोज्य अन्नदानादीचे फल, भिक्षाविचार.
(५) मांसाविषयी भक्ष्याभक्ष्य, अशौचविचार, स्त्रीधर्म, पातिव्रत्य इत्यादी.
(६) वानप्रस्थ, अतिथिचर्चा, परिव्राजक व त्याचे नियम, ध्यानयोग,इत्यादी.
(७) राजधर्म, राजप्रशंसा, दंडप्रशंसा, राजकृत्ये, सचिव, सेनापत्य, दुर्ग, शत्रू,मित्र व उदासिन यांचे गुण,इत्यादी.
(८) व्यवहार, १८ प्रकारचे विवाद, साक्षीदार,सत्यप्रशंसा, शपथ, आय-व्यय निरीक्षण, १७ प्रकारचे दास, इत्यादी. मनु हा जगातील आद्य विधीकर्त्यांपैकी (Law makers}
एक प्रमुख मानला जातो.
(९) स्त्रीरक्षण, स्त्रीस्वभाव, स्त्रीप्रशंसा, स्त्रीधर्म, वधू-वरांचे वय, स्त्रीधन, विविध अपराधांकरिता विविध दंड,ब्रह्म-क्षत्र परस्पर सहकार्य इत्यादी.
(१०) वर्णसंकर, व्रात्य, चांडाळ,त्रैवर्णिकांची कर्तव्ये, आपद्धर्म,राजा व शूद्र यांचे आपद्धर्म, इत्यादी.
(११) स्नातकांचे प्रकार, प्रायश्चित्तकरण,पंचमहापातके, पतितसंसर्ग,प्राजापत्यादी व्रते इत्यादी.
(१२) शुभाशुभ कर्मांचे फल, मानस-वाचिक-शारीर कर्मे, क्षेत्रज्ञ, त्रिगुणलक्षणे, मोक्षोपाय इत्यादी. (हुssssश्य !)

वरील विषयांपैकी एखाद्याची जास्त माहिती पाहिजे असेल तर आचार्य आहेतच. मी अष्टविध विवाह ह्या सुरस गोष्टीबद्दल स्वतंत्र लिहणार आहे. स्मृतीवरून नव्हे.

शरद

लेखनविषय: दुवे:

Comments

कशासाठी

कृपया कसलाही गैरसमज नको..व्यक्तिशः शरदरावांशी आपलं कधीच काही खटकलं नव्हतं त्यामुले वाकड्यातही जाण्याचा प्रश्न येत नाही..

पण एक प्रश्न जरूर मनात आला की ह्या कालबाह्य ग्रंथावर चर्चा करण्याचा उद्देश काय? हेतू शब्दाला जरा तिरकस छटा आहे. ;-)

निव्वळ माहिती म्हणून तरी अशी माहिती देणे-वाचणे वेळेचा अपव्यय नाही का?

उदा: जगाच्या व्युत्पतीवर मनु काय म्हणाला यापेक्षा डार्विन काय म्हणाला हेच भारत धरून सर्व जगात शिकवले आणि मानले गेले. अगदी ब्राम्हण लोकही इंग्रजी भाषा/विज्ञान शिकून इंग्रजांच्या आमदानीत प्रगत राहिले. हे उदाहरण माझा दृष्टिकोन स्पष्ट करण्यासाठी दिलं आहे.

अभिजित यादव
ता. कर्‍हाड जि. सातारा

द्यायला हरकत नाही

निव्वळ माहिती म्हणून तरी अशी माहिती देणे-वाचणे वेळेचा अपव्यय नाही का?

द्यायला हरकत नसावी. ज्यांना त्यात अधिक रूची वाटेल त्यांच्यासाठी ही सुरुवात आहे असे मानता येईल.

परंतु, लेखकाने मनुस्मृतीतील कालबाह्य विचार किती आणि कालातीत विचार किती यावर प्रकाश पाडला असता तर आवडले असते.

अगदी आठ प्रकारचे विवाह पाहिले तरी त्यातील एकच (फारतर दोन) सद्य नितीमत्तेनुसार जमेस धरता येतात. ९० -१० चा किंवा ८० - २० चा कायदा येथे चालावा काय?

उद्या हिटलर नराधम होता असे चटकन म्हणू नये त्याचा मोठेपणाही पाहावा कारण हिटलरने वेगवान महामार्ग, सुटसुटीत कार अश्या प्रयोगांत रूची दाखवली होती. इतकेच नव्हे तर मरणापूर्वी आपल्या प्रेयसीशी लग्नही केले होते. अशाप्रकारचा उदो-उदो करणार्‍यांप्रमाणेच हे लेख वाटत आहेत, तसे होऊ नये म्हणून शरदराव आपण विस्ताराने लेख लिहावेत.

असे केवळ मुद्दे टाकल्याने फारसे काहीच कळत नाही.

वाचायला आवडेल..

(५) मांसाविषयी भक्ष्याभक्ष्य, अशौचविचार, स्त्रीधर्म, पातिव्रत्य इत्यादी.

या विषयी मनूने काय बरळून ठेवले आहे ते वाचायला आवडेल..

वरील विषयांपैकी एखाद्याची जास्त माहिती पाहिजे असेल तर आचार्य आहेतच.

आत हे कोण आचार्य ते कळेल काय?

आपला,
तात्याचार्य.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

स्वागत

मनुस्मृती वाचणे म्हणची तिचा पुरस्कार करणे नव्हे. उलट कानाडोळ्यांवर हात ठेवून तिचा तिरस्कार करणेच थोडे विचित्र वाटते.

अधिक माहिती जाणण्यास उत्सुक.

तुम्ही भारतात असाल तर तुमच्या भ्रमणध्वनीवर उपक्रम चे नवे लेख एस.एम.एस. ने मिळवण्यासाठी हे पाहा.

खरे आहे

हिटलरने ही बहुतेक धर्मांचे धर्मग्रंथ वाचले होते..

अभिजित यादव
ता. कर्‍हाड जि. सातारा

कदाचित

हिटलर दाढी देखील करत असावा. अब्दुल कलाम देखील करत असावेत.साईबाबा करत नसावेत.

तुम्ही भारतात असाल तर तुमच्या भ्रमणध्वनीवर उपक्रम चे नवे लेख एस.एम.एस. ने मिळवण्यासाठी हे पाहा.

 
^ वर