खिडकीतली फुलदाणी

काल हे चित्र काढले. बसल्याबसल्या डोळ्यासमोर ही चौकट दिसली. कॅमेरा, ट्रायपॉड तयार होता, सहज जमले आणि मलाच आवडले. तब्बल २ सेकंदाचे एक्सपोजर (मराठी) वापरले आहे.

window sill

लेखनविषय: दुवे:

Comments

सुंदर मांडणी

मस्त चित्र आहे. फोरशॉर्टनिंगचा* तोटा न होता फायदा करून घेणे हे विशेष. माध्यमाची मर्यादा हेच बल करून घेतले!

मला हे चित्र कृष्णधवल करूनही आवडले.

(*फोरशॉर्टनिंग स्पष्टीकरण: पडद्याच्या खालच्या पट्ट्या क्षितिजसमांतर आहेत, पण वरील पट्ट्या तिरक्या आहेत. कॅमेरा फार जवळ असल्यामुळे असे होते. अन्य कुठल्या चित्रात हा दोष असता, तो इथे उलट फायदाच होतो आहे.)

जाणीवपूर्वक

मुद्दामहून खिडकीच्या बरोबर समोर उभे न राहता बाजूने चित्र घेतले. त्यामुळे त्या मागच्या वेनिशन पट्ट्या छान दिसू लागल्या. मी चित्रावर ते लहान केल्याखेरीज काही संस्कार केलेले नाहीत. कृष्णधवल करून बघते. सुचवणी आणि प्रोत्साहनाबद्दल आभार. :-)

रचना आबवडली

मांडणी, रचना आवडली. बॅकलिट पट्ट्या परिणामकारक वाटतात. चित्राचा वरील भाग थोडासा क्रॉप केला असता तर अजून आवडले असते.

छान

चित्र छान आहेच मला आवडली ती स्वाक्षरी .. मृ :)
"मृ" बघून पफिल्म्स डिव्हीजनच्या फितींखाली "फि" यायचा (अजूनही येतो?) त्याची आठवण झाली

ऋषिकेश
------------------
भ्रष्टाचार संपविण्याचा सर्वोत्तम आणि सर्वात सोपा(?) उपाय म्हणजे त्यात स्वतः सहभागी न होणे

छान

छान!

 
^ वर