तर्कक्रीडा:७५:चॉकलेट वाटप

चॉकलेट वाटप
चॉकलेटच्या नऊ लाद्या आहेत.प्रत्येक लादी २० सेमी x २०सेमी चौरस आकाराची असून १ सेमी जाड आहे.ही सर्व चॉकलेटे वीस मुलांना समसमान वाटून द्यायची आहेत.(म्हणजे प्रत्येक मुलाला १८०चौसेमी चॉकलेट मिळेल).प्रत्येक लादीचे वीस तुकडे असे एकूण १८० तुकडे पाडले आणि प्रत्येक मुलाला नऊ तुकडे दिले तर समान वाटप होईल.पण अट अशी आहे की प्रत्येक लादीचे कमीत कमी तुकडे पाडले पाहिजेत.म्हणजे प्रत्येक मुलाला कमीत कमी तुकड्यांत त्याची वाटणी मिळाली पाहिजे.तसेच प्रत्येकाला मिळणार्‍या तुकड्यांची संख्याही समान असली पाहिजे.तर हे वाटप कसे करावे?(लादी जाडीच्या बाजूने कापता नये.तुकड्यांची जाडी १ सेमीच हवी)
.................................................................................................................
(कृपया उत्तर व्य.नि.ने)

लेखनविषय: दुवे:

Comments

तर्कः७५:व्य नि उत्तर १

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री. धनंजय यांनी प्रत्येक मुलाला दोनच तुकडे देऊन समसमान चॉकलेट वाटप केले आहे.याहून कमी तुकडे करणे अर्थातच अशक्य आहे.

व्यंइ.उत्तरे:२ अणि३

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.भाऊराव आणि श्री. नितीन थत्ते यांची व्यनि उत्तरे आली. दोनही उत्तरे अगदी अचूक आहेत. असेच उत्तर अपेक्षित आहे.

व्य्. नि. उत्तरः४

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.विसुनाना यांचे उत्तर आधीच मिळाळे आहे. ते दिलेल्या अटींत बसणारे असून बरोबर आहे.मात्र सोडवण्याची पद्धत भिन्न (माझ्या पद्धतीहून) असल्याने तपासून पाहाण्यास विलंब लागला.
..'अ' प्रकारचे २० तुकडे ,सर्व एकरूप तसेच 'ब'प्रकारचे २० तुकडे, सर्व एकरूप, असे ४० तुकडे करून प्रत्येक मुलाला दोन्ही प्रकारचा एक एक तुकडा द्यायचा असे अपेक्षित आहे. मात्र ही अट कोडे लेखनात स्पष्ट दिलेली नाही.

तर्कः७५: स्पष्टीकरण

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
या कोड्यात ९ लाद्या २० जणांना समसमान वाटायच्या. म्हणजे प्रत्येकी (९/२०) लादी येणार. आता ९/२०=(१/४)+(१/५) यावर कोडे आधारले आहे.
चॉकलेट लाद्यांचे 'अ' प्रकारचे २० तुकडे ,सर्व एकरूप, तसेच 'ब'प्रकारचे २० तुकडे, सर्व एकरूप, असे ४० तुकडे करून प्रत्येक मुलाला दोन्ही प्रकारचा एक एक तुकडा द्यायचा असे अपेक्षित आहे. मात्र ही अट कोडे लेखनात स्पष्ट दिलेली नाही.

द्रविडी प्राणायामाबद्दल क्षमस्व!

या प्रतिसादात आपण उत्तरच दिले असल्याने पुन्हा नव्या अटीप्रमाणे ते सोडवत नाही.
कोडे इतके सोपे असता मी मात्र उगीच द्रविडी प्राणायाम करून अनवट उत्तर काढले असे वाटले. :)

व्य. नि. उत्तरः५:

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.चतुरंग यांनी हे कोडे अपेक्षित पद्धती प्रमाणे अचूक सोडविले आहे.धन्यवाद!

खुलासा

अरेच्चा यनांनी खुलासा करता करता उत्तरच सांगितले की !!!!

नितिन थत्ते

तर्कक्रीडा:७५:उत्तर

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
या कोड्याचे श्री.चतुरंग यांनी पाठविलेले मोजक्या शब्दांतील परिपूर्ण उत्तर पुढील प्रमाणे:

प्रेषक: चतुरंग
विषय: चॉकॉलेट्स्
दिनांक: सोम, 11/02/2009 - 20:51

५ लाद्यांचे प्रत्येकी ४ सारखे तुकडे = १०० चौ.सेंमी आकाराचे २० तुकडे => गट अ
४ लाद्यांचे प्रत्येकी ५ सारखे तुकडे = ८० चौ.सेंमी आकाराचे २० तुकडे => गट ब
प्रत्येक मुलाला अ गटातला एक + ब गटातला एक असे दोन तुकडे द्यायचे = १८०चौ सेंमी चॉकोलेट प्रत्येकी.

-चतुरंग

 
^ वर