नागपुर च्या दापत्याचा अरुणाचल मध्ये शिक्षण उपक्रम

अरुणाचल प्रदेश मध्ये नहरलगुन या राजधानी च्या ईटानगर या शहरापासुन १२ कि.मी अलिकडे असलेल्या शहरात माझे वास्तव्य १० दिवस होते. तीथे अशोक वर्णेकर व त्यांची सुविद्य पत्नी एक शाळेचा उपक्रम गेल्या २० वर्षापासुन राबवित असल्याचे मला समजल्यावर मी त्यांना भेटण्यास आतूर झालो. श्री वर्णेकर् हे कुटुंब तसे नागपूरचे. विवेकानंद केन्द्राचे कामा निमीत्त ईटानगर येथे गेले आणि तेथलेच झाले. त्यांनी स्थापन केलेली शाळा हि नहरल्गुन येथुन १६ कि.मी वर असलेल्या बंदरदवा या आसाम अरुणाचल सीमेवर असलेल्या गावापासुन २ की.मी वर असलेल्या पर्वतीपुर या खेड्यात १ एकर जागेत कुडाच्या घरात स्थापन झाली असुन ते देखील तिथेच वास्तव्यास आहेत्. आज त्या शाळेत १५० मुले मुली प्राथमीक शीक्षण घेत असुन त्याच शाळेत शीकलेली मुले आज विद्यादानाचे कार्य करित आहेत.या शाळेत आसपासच्या खेड्यातील सनदी जमातिची मुले मुख्यतः शिक्षण घेत आहेत्.

SCHOOL AREA

School Ground
faculty of school who studied in the school and now teaching in the school
School Children during races
Mr. Ashok Warnekar watching his dream came true
Ashok Warnekar, the spirit behind the project.

मला त्यांच्या पत्नींना भेटण्याची देखील ईछा होती परंतु त्या गोहाटीला कामानिमीत्त् गेल्या होत्या आणी माझे तेथील वास्तव्याचा काळ संपत आला होता. मला १० दिवसांचे इनर लाईन परमीट अरुणाचल साठी मिळाले होते आणी त्याची मुदत दुसर्‍याच दिवशी संपत आली होती.

लेखनविषय: दुवे:

Comments

इनर लाईन परमीट ?

इनर लाईन परमीट म्हणजे काय ?

हे पहा

इनर लाईन परमिट

चित्रे बोलकी आहेत. वर्णेकरांची मुलाखत घ्यायला हवी होती असे वाटले.

असेच म्हणतो

हो असेच म्हणतो. जाताना व्हाईस रेकॉर्डर नेला असता तर बरे झाले असते. शशीधर भावे यांना मी व्हाईस रेकॉर्डरची उपयुक्तता पटवून दिल्यावर त्यांनी तो ताबडतोब घेतला.
प्रकाश घाटपांडे

आपल्या मताबद्दल

माझी त्यांच्यासोबत सविस्तर चर्चा झाली. त्यांच्या घरीच त्यांच्या एका शिक्षीकेने बनविलेले जेवण (भात् आणि वरण्) आम्ही जेवलो. मी देखील नागपूरचा असल्याने आणी एकाच नगरात(अभ्यंकर नगर) वास्तव्यास असल्याने जुन्या आठवणी आणी कॉमन मित्रांच्या आठवणीत आम्ही रमुन गेलो होतो. त्यांची एक मुलगी IAF मधे पायलट आहे तिचा या वर्षी २ दा Accident झाला यावेळी तर Landing करतांना विमानाचा टायर फुटला. मुलगी सुरक्षीत आहे आणी नागपुरला सुट्टीवर आहे. त्यामुळे ते देखील अस्वस्थ होते आणी नागपुरला जाणार होते. मुलगा बेंगलोर ला नोकरीला असतो.

त्याच्या कामाचा व्याप आणी उद्दिष्ट बघुन कल्याणाश्रमने सध्या त्यांची शाळेची जवाबदारी घेतली आहे. त्यामुळे ते स्वतः नागपुरला जाउन कुटुंबीयांची दखल घेत असतात. पण तरी २० वर्षे त्यांनी अनेक अडचणीना तोंड देउन हा प्रकल्प राबविला आणी तो यशस्वी केला याला तोड नाही. भारत सरकार ने याची दखल घेउन हे उदाहरण लोकासमोर आणुन अशा कामासाठी सहाय्य उपलब्ध करणे गरजेचे आहे.

विश्वास कल्याणकर

असेच म्हणतो

वर्णेकरांची कार्यात झोकून द्यायची वृत्ती स्फूर्तिदायक आहे.

+१ चांगली माहिती

श्री वर्णेकरांचे कार्य स्फूर्तिदायक आहे.

+२

वर्णेकरांचे कार्य स्फूर्तिदायक आहे.

+३

>>वर्णेकरांचे कार्य स्फूर्तिदायक आहे.
असेच म्हणतो.

शाळेला शासकीय अनुदान मिळते का ?

-दिलीप बिरुटे

+४

सहमत आहे. स्फूर्तिदायक कार्य.

---
"भाई बनना है तेरेको?" -- भिकू म्हात्रे

अनुदान

शाळेने अनुदानासाठी प्रयत्न केला नाही कारण अनुदानासोबत शासकिय बंधने येतात आणी मुळ उद्देश एकीकडे राहातो.

विश्वास कल्याणकर

अशोक वर्णेकर

अशोक वर्णेकर यांचा संपर्क क्र. -०९९५४३२७४५७
विश्वास कल्याणकर

 
^ वर